ABP माझाचा जाहीर निषेध

Submitted by उनाडटप्पू on 29 May, 2019 - 10:50

ABP माझा, या वाहिनीवर निरनिराळे कार्यक्रम आपण मोठ्या कष्टाने चालवत असाल ह्याची महाराष्ट्रतील आम्हा तमाम प्रेक्षकांना खात्री आहे. अर्थात हे कार्यक्रम चालविताना चॅनेलच्या प्रमुख जाहिरातदारांची सुद्धा आपण काळजी घेत असाल हे आम्हाला काल २८ मे च्या प्राईम टाईमच्या शो मधून मनोमन जाणवले. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं अख्खे घरदार निरपेक्ष भावनेने आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले त्या महापुरुषाबद्दल आपण 'खलनायक' ही संज्ञा आपला टीआरपी वाढविण्यासाठी वापरत आहात ह्याचा आश्चर्यकारक खेद वाटतो, वाईट वाटते.

आपली पत्रकारिता ही केवळ ‘धंदा’ म्हणून राहिली आहे याचे दुःख वाटते आणि आजची पत्रकारिता नक्की समाजाला कुठे नेत आहे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो इथवर आपल्या वाहिनीची मजल गेली. पत्रकारिता हे आता पत्रकारांचे व त्यांच्या मालकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनल्याने त्यातून नफा तर अपेक्षित आहेच, परंतु हा नफा कमावताना आपण पत्रकारितेच्या मूळ हेतूलाच नख लावतोय का याचा विचार करायला हवा. काल ज्या प्रकारे आपण चर्चा घडवून आणलीत, त्या चर्चेला जे शीर्षक दिले, तिथे आपल्या वाहिनीवरचा किंचित सैल असणारा विश्वास आज पूर्णपणे अस्त पावला.

टिळक, आगरकर, अत्रे यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची एक श्रीमंत दिपमाळ आज क्षीणपणे लुकलुकताना दिसते ती केवळ आपल्यासारख्या टुकार आणि नावाने प्रसन्न पत्रकारांमुळेच.

सावरकर नायक की खलनायक हे पडताळून पहाण्याची तुमची लायकी तरी आहे का हे पहा आधी मग बाकीचे बोला.

शास्त्रींची हत्त्या कोणी केली,हेरॉल्ड मध्ये कोणी शेण खाल्ले यावर पण हिम्मत असेल तर जाहीर चर्चासत्र प्रसन्न जोशीने आणि खांडेकर यांनी आयोजित करावी असे माझे आवाहन आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी इथे कायम एकटा होतो, एकटा असतो व एकटाच असेन जोवर आहे
Submitted by बेफ़िकीर on 2 June, 2019 - 22:10

कंपूबाजी हा शब्द तुमच्याकरिता नव्हता. तुम्ही ज्या आयडींनी हलकल्लॉळ केला असता असे लिहिले आहे त्यांच्याबद्दल वापरला आहे.

काहीहि करुन निवडणुका जिंकायच्या एबीपी माझाला सांगुन सावरकरांवर चिखलफेक करायला लावायची आणी महारश्ट्रातले महत्वाचे प्रश्न मिडियात येणार नाहित याची काळजी घ्यायची.>> हे वाक्य कोणत्या पुराव्यावरून लिहिले आहे पकोडेवाला यानी? कोणी सान्गितले याना? तसेच एबीपी माझावर सावरकरांवर चिखलफेक केली हे मान्य करून नन्तर उगीच काही अफवा उठवायच्या आणि त्याचे समर्थन करायचे हे अयोग्य आहे.

स्त्रियांबद्दल एवढा आदर ? ये बात कुछ हजम नही हुइ . विवाह बाह्य बायका फक्त ' वापरायच्या ' असतात असा आमचा समज करून देण्यात आला होता एके काळी....

विवाह बाह्य बायका फक्त ' वापरायच्या ' असतात असा आमचा समज करून देण्यात आला होता एके काळी....>>>>> आवरा.एके काळी म्हणताय तर आतापर्यंत तुमच्यात सुधारणा झाली असेल अशी आशा आहे.

स्त्री आयडीविषयी असले गलिच्छ विधान करणार्‍या प्रवृत्तीचा तीव्र निषे++++++++१११११११,मीरा तुम्ही मायबोलीवरच्या या चिखलापासून लांब राहा. चिखलात दगड मारला कि आपल्यावरच उडतो.

देवकी

ते माझ्या 24 विबासं कथांच्या संदर्भाने लिहून वैयक्तिक होण्याची त्यांची जुनी सवय शाबूत ठेवत आहेत

याचमुळे एकदा आय डी गमावून बसले असूनही सवयीत फरक पडलेला नाही

Happy

>>याचमुळे एकदा आय डी गमावून बसले असूनही सवयीत फरक पडलेला नाही<<

त्यांची भाषा त्या दुसऱ्या एका आक्रस्ताळी आयडीशी मिळतीजुळती वाटतीय Proud

>>बाकी सावरकरांचे काहिहि योगदान नाहिये . उगाचच कोणालाहि मोठे करायचा प्रयत्न चालु आहे!

Submitted by पकौडेवाला on 2 June, 2019 - 09:30<<

केवळ आपल्या बुद्धीची कीव असे वाक्य .. आपली पातळी कळली

कर्कश्य आणि पातळी सोडून बोलणारे अँकर्स आणि निश्कर्ष आधीच काढून ते समोरच्याच्या तोंडात घालण्याची उघड उघड निलाजरी घाई अगदीच डोक्यात गेली.

त्यांचा पोटपण्याचा व्यवसाय आहे .
कोणाच्या तरी ओसरीवर आसरा घ्यावा लागतो तेव्हाच भाकरी तुकड्याची सोय होते .
Abp पण तेच करतेय

मग कोणाचे योगदान आहे .
फक्त उपास तपासला कंटाळून ब्रिटिश गेले का >>>>> नाहि. महात्मा गांधी, नेहरु यांचे जेवढे योगदान आहे तेवढेच क्रांतीकारकांचेहि आहे उदा. भगतसिंग वगैरे अनेक .
पण माफिवीरांचे नाहि.

>>अनेक .
पण माफिवीरांचे नाहि.<<

याला ब्रिगेडी कंडीशनिंग म्हणतात!

ओ वाचाळ माफि मागीतली त्याची कागदपत्रे आहेत . बाकि कोणत्याहि क्रांतीवीरांबद्दल कधी चड्डी वाल्यांना एवढे प्रेम येत नाहि. जरा पत्री सरकार वर काढा ना धागा!

बाकी सावरकरांचे काहिहि योगदान नाहिये भारताला स्वतंत्य्र मिळण्यात
नवीन Submitted by पकौडेवाला on 4 June, 2019 - 10:30
<<

प्रमाणाबाहेर पकोडे खाण्याचा हा परिणाम आहे बहुतेक !

माबोवर येउन तंबाखु च्या पि़का टाकण्यापेक्षा पकौडे खाणे कधीहि चांगले. मोदी देवाचा आवडता नैवेद्य आहे तो!

चड्डीवाल्यांवर राग हे पण ब्रिगेडी कंडीशनिंग आहे >>> ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली त्या देशद्रोह्याम्ना सप्रोर्ट करणारे देश्द्रोहिच असतात. आणी असे कंडिशनिंग होत असेल तर अभिमानच आहे

>>ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली<<

हे पण कंडीशनिंगच बर का!
ज्यांनी मदत केली त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली का ब्रिटिशांनी?
कंडीशनिंग झाल्यावर असे लॉजिकल प्रश्न पडत नाहीत ना!

असुदे..... तुमच्या या बाष्कळ बडबडीला तुमचे ते हे म्हणतात तसे फाट्यावर मारतो!

ज्यांनी मदत केली त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली का ब्रिटिशांनी? >>> इतिहास माहित नसला तर असे होते.

काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यावर माफिनामा दिला आणी ब्रिटिशांना मदत केली हा इतिहास आहे. तेव्हा जरा वाचायला शिका मग टाका पिंका उगाचच खराब करु नका माबो

काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यावर माफिनामा दिला आणी ब्रिटिशांना मदत केली हा इतिहास आहे. तेव्हा जरा वाचायला शिका मग टाका पिंका उगाचच खराब करु नका माबो
नवीन Submitted by पकौडेवाला on 4 June, 2019 - 13:34
<<

ब्रिगेडी इतिहास का ?

काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यावर माफिनामा दिला आणी ब्रिटिशांना मदत केली हा इतिहास आहे. >>> माफिनामा तारीख आणि सुटकेची तारीख पण लिहा.

काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यावर माफिनामा दिला आणी ब्रिटिशांना मदत केली हा इतिहास आहे. तेव्हा जरा वाचायला शिका मग टाका पिंका उगाचच खराब करु नका माबो

नवीन Submitted by पकौडेवाला on 4 June, 2019 - 13:34 >>

मदत केली म्हणजे नक्की काय केल?

बहुसंख्य क्रांतिकारकांना ३-४ वर्षांतच भारतात परत धाडण्यात आले.
परंतु सावरकरांना यातील एकही सवलत न देता,
सतत दहा वर्षे कोठडीत बंद करून ठेवण्यात आले.
ते शेवटचे ३-४ महिने तेल गोदामाचे मुकादम
असताना देखील त्यांना रात्री कोठडीबंद करण्यात
येत होते. या काळात त्यांना क्षुल्लक अपराधांसाठीही खडा-बेडी (रोज बारा-बारा तास याप्रमाणे ८-१५ दिवस भिंतीशी बेडीत जखडून टांगणे), दंडा-बेडी (१५-१५ दिवस बेडीत हात पाय जखडून ठेवणे), कोलू, एकांत कोठडी अशा असंख्य अमानवी शिक्षांना सामोरे जावे लागले.
केंद्रीय विधिमंडळात विठ्ठलभाई पटेल यांनी सर्वच राजबंद्यांच्या सुटकेची मागणी करणारा ठराव मांडला होता. त्यात सावरकरांचा विशेष उल्लेख होता. २४ फेब्रुवारी १९२0 रोजी ग. श्री. खापर्डे यांनी सावरकरांना सोडावे म्हणून बाजू मांडली होती. १९२१ च्या मार्च महिन्यात केंद्रीय विधिमंडळाचे सदस्य के. व्ही. रंगास्वामी यांनी पण सावरकरांना सोडण्याची मागणी केली. या मागणीला नवाब सर बहरामखान आणि हयातखान या दोन सदस्यांनी विरोध केला. ते म्हणाले, ‘‘सावरकरांना सोडले तर आगीत तेल ओतल्यासारखे होईल.’’ त्यावर अय्यंगार हे सदस्य म्हणाले, की सावरकर बंधूंची हमी मी घेतो.
यादरम्यान सावरकरांच्या सुटकेच्या मागणीपत्रावर सुमारे ८0 हजार स्वाक्षर्‍या गोळा केल्या गेल्या. गांधी आणि नेहरू यांनी मात्र त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

कुठे वाद घालताय लोकहो
पालथा घडा मानसिकता आहे
दुर्लक्ष करा

एक आठवडा वय आहे आणि पुणे शब्दही शुद्ध लिहिता येत नाही त्यावरूनच समजून घ्या, मुद्दाम काहीतरी वाद उकरून काढायला जन्माला घालण्यात आलं आहे.

ज्यांना यातच मजा वाटत असेल त्यांनी चालू द्या, बाकीचे सिरियसली प्रतिसाद देणारे असतील त्यांनी वेळीच सावध होऊन अनुल्लेखाने मारा

Pages