ABP माझाचा जाहीर निषेध

Submitted by उनाडटप्पू on 29 May, 2019 - 10:50

ABP माझा, या वाहिनीवर निरनिराळे कार्यक्रम आपण मोठ्या कष्टाने चालवत असाल ह्याची महाराष्ट्रतील आम्हा तमाम प्रेक्षकांना खात्री आहे. अर्थात हे कार्यक्रम चालविताना चॅनेलच्या प्रमुख जाहिरातदारांची सुद्धा आपण काळजी घेत असाल हे आम्हाला काल २८ मे च्या प्राईम टाईमच्या शो मधून मनोमन जाणवले. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं अख्खे घरदार निरपेक्ष भावनेने आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले त्या महापुरुषाबद्दल आपण 'खलनायक' ही संज्ञा आपला टीआरपी वाढविण्यासाठी वापरत आहात ह्याचा आश्चर्यकारक खेद वाटतो, वाईट वाटते.

आपली पत्रकारिता ही केवळ ‘धंदा’ म्हणून राहिली आहे याचे दुःख वाटते आणि आजची पत्रकारिता नक्की समाजाला कुठे नेत आहे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो इथवर आपल्या वाहिनीची मजल गेली. पत्रकारिता हे आता पत्रकारांचे व त्यांच्या मालकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनल्याने त्यातून नफा तर अपेक्षित आहेच, परंतु हा नफा कमावताना आपण पत्रकारितेच्या मूळ हेतूलाच नख लावतोय का याचा विचार करायला हवा. काल ज्या प्रकारे आपण चर्चा घडवून आणलीत, त्या चर्चेला जे शीर्षक दिले, तिथे आपल्या वाहिनीवरचा किंचित सैल असणारा विश्वास आज पूर्णपणे अस्त पावला.

टिळक, आगरकर, अत्रे यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची एक श्रीमंत दिपमाळ आज क्षीणपणे लुकलुकताना दिसते ती केवळ आपल्यासारख्या टुकार आणि नावाने प्रसन्न पत्रकारांमुळेच.

सावरकर नायक की खलनायक हे पडताळून पहाण्याची तुमची लायकी तरी आहे का हे पहा आधी मग बाकीचे बोला.

शास्त्रींची हत्त्या कोणी केली,हेरॉल्ड मध्ये कोणी शेण खाल्ले यावर पण हिम्मत असेल तर जाहीर चर्चासत्र प्रसन्न जोशीने आणि खांडेकर यांनी आयोजित करावी असे माझे आवाहन आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

७०० स्वातंत्र्य सैनीक अंदमानला माफि न मागता शहिद झाले. ५० जणांची नावे सांगा तुम्हि . मग या काळे करायला.

त्या ७०० पैकी किती जणांची नावे १९४७ पासून थोर गांधी परिवाराने देशातील विविध स्मारक / रस्ते / उपक्रमाना दिली त्याची फक्त ५० उदाहरणे दया की ...म्हणजे पकौडे का आटा सिर्फ गांधी चक्की से नही आता बल्कि यह तो सही मायने में प्रजातन्त्र है ह्याची ओळख होईल इकडेपण

पकौडेवाला, सावरकरांचे काहीच योगदान नाही असं तुझं म्हणणं आहे.
दुसरीकडे पाठ्यपुस्तकात आतापर्यंत काँगी सरकार हेच सांगत आलेय की गांधी-नेहेरुंमुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं.

पण महात्मा गांधी, नेहेरू या विभूतींकडे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची कुवत असताना त्यांना भारतातच राहू देणे व सावरकर यांना अंदमानात पाठविणे हे करून ब्रिटिशांनी स्वतःच्याच पायावर कुर्हाड का मारून घेतली असेल?

पकोडेवाला, are you serious? की माबो वर राखी सावंत नाही म्हणून तिची कमी पूर्ण करण्यासाठी उगीच controversial पोस्ट्स टाकायच्या ?

मी राजकारणात कणभर इंटरेस्टड नाही, ते धागे कवचित वाचते पण कधीही कमेंट्स करत नाही पण आता तुमच्या पोस्ट्स वाचून वाटलं की अति होतं आहे

पण आता तुमच्या पोस्ट्स वाचून वाटलं की अति होतं आहे >>> कोन आहात तुम्हि ???? कोनाचे अति होते आहे हे तुम्हि कोण ठरवणार ?

माझे मत आहे कि सावरकांचे काहिहि योगदान नाहिये.
का सावरकांवरच धागा काढला जातो ? का सावरकांवरच एबीपी माझा कार्यक्रम करते ? कारण त्यांचे योगदान controversial आहे म्हणुनच

महात्मा फुले, विनोबा भावे , राजगुरु असे बरेच जण आहेत यावर काढा ना धागा त्यांचे योगदान controversial नाहि हे सर्वांना माहित आहे.
उगीच आगी लावायच्या ! कडी लावा आतली आणी मी नाहि त्यातली असे नका वागु.

सावरकर मोठे होते हे सिध्द करताना गांधी नेहरू छोटे होते हे सिद्ध करायची काहींना गरज का वाटते

ते माफिनामा देतील हे माहित होते म्हणुन !

नवीन Submitted by पकौडेवाला on 2 June, 2019 - 11:30. >>>

हायला, म्हणजे त्यांच्याकडे भविष्य बघण्याची मशीन होती की काय?

उत्तर नसलं की वेगवेगळे चाळे सुरू होतात काँगीचे.

का सावरकांवरच धागा काढला जातो ? का सावरकांवरच एबीपी माझा कार्यक्रम करते ?>>>

कारण त्यांना सावरकरांची मुद्दाम बदनामी करण्याचा कंडू शमवून घ्यायचा असतो, आणि ती मजा काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला द्यायची असते.

अरेरे वेडे होते सावरकर! मस्त बॅरिस्टरकी करून सुखात रहायचं सोडून फालतू देशसेवेच्या मागे लागले. घरदाराचा होम केला अन आता हे असले टुकार आरोप सहन करावं लागतंय!

एकुणात कठीण आहे! एकीकडे गांधींचे चारित्र्यहनन, दुसरीकडं सावरकरांवर चिखलफेक.

बेक्कार हाय सगळं.

मस्त बॅरिस्टरकी करून सुखात रहायचं सोडून फालतू देशसेवेच्या मागे लागले >> हो ? मग माफि नामा का दिला ? का नाहि भगतसिंगांसारखे हौतात्म्य स्विकारले ?

एकुणात कठीण आहे! एकीकडे गांधींचे चारित्र्यहनन, दुसरीकडं सावरकरांवर चिखलफेक. >>> दोन्हिचे कर्ते एकच आहेत. भाजपा. काहिहि करुन निवडणुका जिंकायच्या मह अबीपी माझा ला सांगुन सावरकरांवर चिखलफेक करायला लावायची आणी महारश्ट्रा तले महत्वाचे प्रश्न मिडियात येणार नाहित याची काळजी घ्यायची.

पकोडवाला कोण आहे माहिती नाही पण त्यांनी सावरकरांबद्दल जी काही चिखलफेक चालवली ती अत्यंत दुर्दैवी आहे.
अत्यंत हीन दर्जाची मानसिकता

आता यावर पर्सनल अटॅक करतीलच पण काही फरक नाही पडणार मला, असल्या हलकट विचारांच्या व्यक्तींकडून शेणच येणार
दुसरी अपेक्षाच नाही त्यामुळे चालू द्या
मी निषेध व्यक्त केला आहे, तुमची लाथाळी सुरू ठेवा

>>बाकी सावरकरांचे काहिहि योगदान नाहिये . उगाचच कोणालाहि मोठे करायचा प्रयत्न चालु आहे!

Submitted by पकौडेवाला on 2 June, 2019 - 09:30<<

यांना पाठवा अंदमानला कोलू ओढायला मग कळेल कुणाचे काय योगदान ते!

ABP माझा वरच्या आगामी चर्चा - तयार राहा ऐकायला !
*"सावरकर - नायक की खलनायक"* नंतर ABP वर आगामी नवीन चर्चा

1. लताजी : सुरेल की बेसूर?

2. मधुबाला : सुंदर की कुरूप?

3. Bill Gates : श्रीमंत की कफल्लक?

4. अमिताभ : सुपरस्टार की extra Junior?

5. Nile : नदी की ओढा?

6. एव्हरेस्ट : पर्वत का टेकडी?

7. प्रसन्न जोशी : मूर्ख की महामूर्ख?

8. ABP : माझा की तुझा?

लगे रहो !!

चर्चा तर व्हायलाच पाहिजे.

आणि हो ... आमचा हेतू तसा वाईट बिईट अजिबात नाही बरं का !!
उगाच शंका बिंका घेऊ नका !!

गांधीचे आणी नेहरुंचे फोटो शौप केलेले घाण फोटो चवीने पहाणारे आणी लाइक करणारे देशद्रोहि , सावरकरांचे भारताच्या स्वतंट्र्यात काहि योगदान नाहि या साध्या मतावर केवढे भडकले आहेत. खरी मानसिकता बाहेर येते दंगे पसरवण्याची आणी भारताचे तुकडे पाडण्याची.

गांधीचे आणी नेहरुंचे फोटो शौप केलेले घाण फोटो चवीने पहाणारे आणी लाइक करणारे देशद्रोहि , सावरकरांचे भारताच्या स्वतंट्र्यात काहि योगदान नाहि या साध्या मतावर केवढे भडकले आहेत. खरी मानसिकता बाहेर येते दंगे पसरवण्याची आणी भारताचे तुकडे पाडण्याची.

नवीन Submitted by पकौडेवाला on 2 June, 2019 - 15:4 >>>

पकौडेवाल्या, इथे किती लोकांच्या पर्सनल लाईफ बद्धल तुला माहीत आहे? इथे लिहीत असलेले लोक नेहेरू गांधींच्या फोटोशॉप केलेल्या फोटोंना लाईक करतात हे तू कुठल्या पुराव्यांच्या आधारे लिहिलं? अडमिन कृपया लक्ष द्या.

तुझी एकट्याचीच मानसिकता स्वतःला वेगळं दाखवायची , दुसऱ्यांच्या भावना भडकविण्याची आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुरु असलेली अश्लाघ्य चिखलफेक अत्यंत तिरस्कारणीय आहे.

सावरकरांबद्दल वाटेल ते बोलणार्‍यांना कोलू हा प्रकार काय असतो आणि तो फिरवण्यासाठी किती कष्ट पडतात याबद्दल कणभरतरी माहिती आहे का? सावरकर ११ वर्ष अंदमानात होते आणि त्यातला प्रत्येक दिवस किमान आठ तास त्यांना कोलू फिरवावा लागत होता. इथे की-बोर्ड बडवून वाटेल ते टाईप करणार्‍यांच्यानी फक्त एक तास कोलू फिरवून दाखवावा, त्यानंतर त्यांना जडलेल्या व्याधींचा खर्च उचलण्याची माझी तयारी आहे. हिम्मत असेल तर हे आव्हान स्वीकारावे.

सावरकरांनी माफीनामा दिला म्हणून हेटाळणी करणार्‍यांनी त्यांची माफीनाम्यामागची भूमिका काय होती याचा एक अक्षर तरी विचार केला आहे का?

रत्नागिरीला परतल्यावर सावरकरांनी सर्व जातीच्या लोकांसाठी उभारलेले पतित पावन मंदीर, जातीनिर्मूलनासाठी केलेले कार्य आणि घेतलेले कष्ट याबद्द्ल कधी तोंडातून एक शब्द आला आहे का?

सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला हे दावे करणार्‍यांना मुसलमानांच्या पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची कल्पना सर्वात आधी इंग्लंडमध्ये रहमत अली याने मांडलेली होती हे माहीत आहे का?

मी कधीही कोणाबद्दल पर्सनल कॉमेंट करत नाही, पण कोणतीही माहिती नसताना सावरकरांबद्दल वाटेल ते लिहीणार्‍यांना लाज वाटली पाहिजे हे आज इथे लिहीतो आहे.

मायबोली प्रशासक,
सावरकरांवर सुरु असलेली चिखलफेक आपण खपवून घेत आहात याचा अर्थ ती आपणास मान्य आहे असे सदस्यांनी गृहीत धरावे का?

महाराष्ट्रातील प्रत्येकी किमान 1

मेडिकल कॉलेज
संशोधन केंद्र
शिक्षण केंद्र
सरकारी योजना
रस्ता

ह्यांना सावरकरांचे नाव द्यावे, तेही नवीन बांधून , नुसतेच नामांतर नको

नवीन Submitted by BLACKCAT on 2 June, 2019 - 19:08 >>>

त्याने काय होणार? कुठल्याही नेत्यांची नावे कुठल्याही सरकारी गोष्टीला नकोत, जी आहेत तीही बदलून टाकली पाहिजेत.

मग नावे काय देणार ?
चिकूवाडी हॉस्पिटल

बोरे बुद्रुक ते तेंभुर्णी खुर्द हमरस्ता अशी का ?

आहेत तीही बदलून टाकली पाहिजेत.

ही मुख्य पोटदुखी आहे तर , जुनी नावे ठसठसत आहेत. अजून गांधी नेहरू ठसठसत आहेत
Proud

पूर्वी मायबोलीवरही चर्चा व्हायच्या

ज्योतिष सत्य की थोतांड?
कुठलाही विषय घेऊन त्याला सत्य की थोतांड ? जोडले की चालू गाडी, 500 + प्रतिसाद फिक्स

बोरे बुद्रुक ते तेंभुर्णी खुर्द हमरस्ता अशी का ? >>>
होय, मोठ्या रस्त्यांना अशीच नावे आहेत. छोट्या रस्त्यांना नंबर असावेत.

मी नाही त्यातली कडी लावा आतली

ही गलिच्छ म्हण एका स्त्री आय डी ला उद्देशून येथे वापरण्यात आली आहे

नवल आहे, कोणीही निषेध सोडा, विरोधही केलेला नाही

जुना जमाना असता तर नीधप, नंदिनी अशा व इतर अनेक सदस्यांनी हलकल्लोळ केला असता जसा वैवकू या सदस्या च्या विरोधात केला होता

येथे स्त्री सदस्यांनी हे ऐकायला, वाचायला यावे का?

मीरा - मला वाईट वाटत आहे, जरी ती म्हण प्रतिकात्मकरीत्या वापरली गेली आहे

=====

जाती वगैरे पलीकडे जाऊन काही विचार करावा ही मुभा काही विखारी संघटना आपल्या अनुयायांना देत नाहीत याची उत्तम उदाहरणे वर दिसून येत आहेत

{{{ जुना जमाना असता तर नीधप, नंदिनी अशा व इतर अनेक सदस्यांनी हलकल्लोळ केला असता जसा वैवकू या सदस्या च्या विरोधात केला होता

येथे स्त्री सदस्यांनी हे ऐकायला, वाचायला यावे का? }}}

जुना जमाना नवा जमाना असा काही प्रकार असेल असे वाटत नाही. कोण कोणास म्हणाले हे महत्त्वाचे आहे त्यातही हे कोण व कोणास ह्यांच्यापैकी कोणी आपल्या कंपूतील आहे का त्यावरही ते अवलंबून आहे.

बाकी स्त्री आयडीविषयी असले गलिच्छ विधान करणार्‍या प्रवृत्तीचा तीव्र निषेध.

बिपीनजी

माझा कोणताही कंपू नाही

मी इथे कायम एकटा होतो, एकटा असतो व एकटाच असेन जोवर आहे

Pages