ABP माझाचा जाहीर निषेध

Submitted by उनाडटप्पू on 29 May, 2019 - 10:50

ABP माझा, या वाहिनीवर निरनिराळे कार्यक्रम आपण मोठ्या कष्टाने चालवत असाल ह्याची महाराष्ट्रतील आम्हा तमाम प्रेक्षकांना खात्री आहे. अर्थात हे कार्यक्रम चालविताना चॅनेलच्या प्रमुख जाहिरातदारांची सुद्धा आपण काळजी घेत असाल हे आम्हाला काल २८ मे च्या प्राईम टाईमच्या शो मधून मनोमन जाणवले. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं अख्खे घरदार निरपेक्ष भावनेने आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले त्या महापुरुषाबद्दल आपण 'खलनायक' ही संज्ञा आपला टीआरपी वाढविण्यासाठी वापरत आहात ह्याचा आश्चर्यकारक खेद वाटतो, वाईट वाटते.

आपली पत्रकारिता ही केवळ ‘धंदा’ म्हणून राहिली आहे याचे दुःख वाटते आणि आजची पत्रकारिता नक्की समाजाला कुठे नेत आहे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो इथवर आपल्या वाहिनीची मजल गेली. पत्रकारिता हे आता पत्रकारांचे व त्यांच्या मालकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनल्याने त्यातून नफा तर अपेक्षित आहेच, परंतु हा नफा कमावताना आपण पत्रकारितेच्या मूळ हेतूलाच नख लावतोय का याचा विचार करायला हवा. काल ज्या प्रकारे आपण चर्चा घडवून आणलीत, त्या चर्चेला जे शीर्षक दिले, तिथे आपल्या वाहिनीवरचा किंचित सैल असणारा विश्वास आज पूर्णपणे अस्त पावला.

टिळक, आगरकर, अत्रे यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची एक श्रीमंत दिपमाळ आज क्षीणपणे लुकलुकताना दिसते ती केवळ आपल्यासारख्या टुकार आणि नावाने प्रसन्न पत्रकारांमुळेच.

सावरकर नायक की खलनायक हे पडताळून पहाण्याची तुमची लायकी तरी आहे का हे पहा आधी मग बाकीचे बोला.

शास्त्रींची हत्त्या कोणी केली,हेरॉल्ड मध्ये कोणी शेण खाल्ले यावर पण हिम्मत असेल तर जाहीर चर्चासत्र प्रसन्न जोशीने आणि खांडेकर यांनी आयोजित करावी असे माझे आवाहन आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@विजय टी >>>> या देशात फक्त आणि फक्त गांधीचीच पूजा होते आणि इतरांना मात्र जाणीवपूर्वक डावललं जातं हे दुर्दैव आहे

भविष्यात योगी पंतप्रधान झाले की 5000 ची नोट आणणार व साध्वी पंतप्रधान झाली की 10000 ची नोट आणणार,तरी त्यावर गांधीच छापणार.

अन डोक्याचे नथुरामी गाडगे झालेले लोक काँग्रेसच्या नावाने ओरडत बसणार.

खरं म्हणजे सगळ्या बुऱ्याभल्या गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या नोटांवर वीर सावरकर वा श्री छत्रपती शिवाजी महाराज वा बाबासाहेब आंबेडकर अशा प्रभृतींचे फोटो नसावेत हे माझे मत आहे. नोटांवर गांधींचेच चित्र असावे, फारतर एक वेगळेपणा आणण्यासाठी चाचा नेहेरू यांचा फोटो छापला तरीही चालेल.

Loksatta

मुखपृष्ठ » मनोरंजन
सावरकरांची ‘जन्मठेप’ वाचून कर्करोगाशी लढण्याची प्रेरणा मिळाली- शरद पोंक्षे
सहा महिने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा नाटकाच्या तालमीसाठी सज्ज झाले आहेत.
लोकसत्ता ऑनलाइन | July 17, 2019 11:08 am

NEXT
सावरकरांची ‘जन्मठेप’ वाचून कर्करोगाशी लढण्याची प्रेरणा मिळाली- शरद पोंक्षे
तब्बल सहा महिने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा नाटकाच्या तालमीसाठी सज्ज झाले आहेत. ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून ते पुनरागमन करत आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी ते म्हणाले, ‘माणूस आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवरून जात असतो आणि काही संकटं अचानक येतात. तसं डिसेंबरमध्ये मला अचानक बरं वाटेनासं झालं आणि कर्करोगाचं निदान झालं. मला त्या गोष्टीची प्रसिद्धी नको होती. म्हणून मी कुठेही सोशल मीडियावर फोटो टाकला नाही. मला खोटी सहानुभूती नको होती. पण आता सांगायला काही हरकत नाही कारण मी ती लढाई जिंकलोय.’

कर्करोगाशी झुंज देताना सावरकरांची ‘जन्मठेप’ वाचून प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. ‘हा काळ फार भयंकर होता. कारण मी २५ वर्षांत एकही दिवस रजा न घेता काम केलंय. सगळे दिवस व्यापलेले होते. अशा व्यक्तीला पहिले तीन महिने तर उंबरठाही ओलांडायचं नव्हतं. त्यामुळे हे सगळं फार भयंकर होतं. पण अशा वेळी ‘जन्मठेप’ परत एकदा वाचावंसं वाटलं. अकरा वर्ष एका छोट्या खोलीत साखळदंडाने बांधलेला माणूस आपल्या देशासाठी एवढं काही करू शकतो, तर मला तर फक्त सहा महिने त्रासातून काढायचे होते.’

अभिनंदन

खरं म्हणजे सगळ्या बुऱ्याभल्या गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या नोटांवर वीर सावरकर वा श्री छत्रपती शिवाजी महाराज वा बाबासाहेब आंबेडकर अशा प्रभृतींचे फोटो नसावेत हे माझे मत आहे. नोटांवर गांधींचेच चित्र असावे, फारतर एक वेगळेपणा आणण्यासाठी चाचा नेहेरू यांचा फोटो छापला तरीही चालेल.
Submitted by मी-माझा on 17 July, 2019 - 08:26

>>> अगदी मनातलं बोललात!!!

अकरा वर्ष एका छोट्या खोलीत साखळदंडाने बांधलेला माणूस आपल्या देशासाठी एवढं काही करू शकतो,>> Uhoh वाक्यातील अर्थाचा आणि वास्तवीक जीवनाचा संबंध ताडायचा म्हटलं तर कसं सिद्ध करणार..??

>>> नोटाबंदीच्या ढळढळीत अपयशाचा खणखणीत पुरावा या धाग्यावर मिळेल असं वाटलं नव्हतं. >>>

अरे वा, अभिनंदन!

Pages