निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पहिलं..
पण आता तिन्ही उडून गेलीयत..

गुलमोहोराच्या झाडावर उडून गेलेलं पिल्लू..

काल दुपारी आमच्या गॅलरीत चुकून हा तांबट पक्षी ( बार्बेट) आला होता आणि बराच वेळ त्याला बाहेर जाता येत नव्हतं. कारण नुकतीच आम्ही कबुतरं येऊ नयेत म्हणून जाळी बसवली आहे. शेवटी गेला बाबा एकदाचा उडून Happy

barbet_0.jpg

हे नेहमी पहात असतो. पण सकाळच्या कोवळ्या उन्हात फार सुंदर पोत दिसला यांचा. नारळाच्या झाडाच्या भोवतीची जाळीदार साल.

2019-06-02 12.40.26.jpg

2019-06-02 12.40.34.jpg

2019-06-02 12.40.40.jpg

मस्त फोटो शाली! लहानपणी कधीतरी या सालीचा आयताकार तुकडा कापून त्याच्यावर रंगीत खडूंनी ( तेव्हा क्रेयॉन्स हा शब्द वापरत नव्हतो Wink ) चित्र काढल्याचं आठवलं.

शालीदा मस्त मेजवानी मिळाली डोळ्यांना.
वावे तो तांबट घाबरलेलाच दिसतोय, त्याला उडून जायला मिळालं हे बरं झालं.

B93BAFD6-912A-4DF4-8EC3-571B91E613D9.jpeg
(मी बरेचदा Snapseed या ॲप वर फोटो ट्युन करतो.)

निरुदा बुलबुल पिलू मस्तच.

शालीदा सगळे फोटो अप्रतिम. त्या नारळाच्या जाळीला आम्ही खेळण्यात गोणपाट करायचो.

वावे तांबट सुंदर आहे ग. असे अचानक घरात येणारे पक्षी खुप बावरतात. आमच्या कडे येणारा तांबट गडद हिरवा आणि डोळ्यांची कडा आणि चोच लाल असते.

माझे फोटोच गुगलवर येत नाहीत मेमरी जास्त झाल्याने. आता उपाय काय करावा? बरेच डिलिट केले तरी नाही होत.

ShivLingam/Cannon Ball Tree/Couroupita guianensis
ShivLingam 20190305_113433.jpg

उनाडटप्पू मी अगोदरही सांगीतले होते. माझ्या आयफोनमध्ये लाईटनींग नावाचे ॲप आहे. विज चमकली की फोटो क्लिक होतो. त्यात माझे कौशल्य नाही. पण विजांचे फोटो काढण्याची थोडी हौस भागते. Happy
अर्थात थोडेफार सेटींग करावे लागते.
(ॲन्ड्रॉईड साठी असे ॲप आहे का ते माहित नाही.)
9CF50A21-98D1-4727-A1F1-7FF5C2BD383C_0.png

सोमन पहिला फोटो कैलाशपती, दुसरा सीता अशोक आणि तिसरा बहुतेक संक्रांतवेल आणि चौथा चित्रक.

शालीदा वीज मस्तच. काल खुप पाऊस पडला का पुण्यात?

मला एक शंका आहे.
मी घरी कंपोस्टिंग करते. तर कधीतरी एकदा पोरकिडे किंवा तत्सम किडे लागून खराब झालेलं कुठलंतरी धान्य ( बहुतेक मटकी किंवा राजमा) मी इतर कचऱ्याबरोबर कंपोस्टमधे ढकललं होतं. आता त्या किड्यांची संख्या वाढत वाढत चालली आहे. जे कंपोस्ट तयार झालं आहे त्यातही प्रचंड संख्येने ते किडे आहेत. Sad मी आधी दुर्लक्ष केलं कारण मला वाटलं की एका मर्यादेपुढे ते वाढणार नाहीत. पण ते वाढतच चालले आहेत. मी काल नीम पावडर आणली आणि थोडी मिसळली कंपोस्टमधे.
१. नीम पावडरने ते किडे मरतील का? की कुठलं ऑरगॅनिक कीटकनाशक आणू? कुठलं ?
२. असे किडे असलेलं कंपोस्ट झाडाला घातलं तर हे किडे झाडाला अपाय करतील का?
मी मॅगॉट्सना हॅंडल करू शकते Happy कारण आर्द्रता जास्त प्रमाणात वाढली की ते वाढतात आणि कमी झाली की ते कमी होतात हे मला माहीत आहे. पण तसं काही या किड्यांचं दिसत नाही. मॅगॉट्स अगदी नावाला थोडेसे उरलेत कंपोस्ट पाइलमधे. या किड्यांनी त्यांच्यावर मात केली आहे.

Pages