अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..
आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.
त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .
हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.
सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.
पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.
खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...
बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..
सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा
वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032
संकासूर प्रचि अप्रतिम आहे.
संकासूर प्रचि अप्रतिम आहे. फार सुरेख रंग. इतक्यात परिसरात कुठे दिसला नाही. नर्सरीत शोधते. मिळालं तर रोप लावायला आवडेल.
प्राचिन आज खुप वेळ विजांचा
प्राचिन आज खुप वेळ विजांचा खेळ चालला होता. पाऊस मात्र नाही.
मीरा आमच्याकडे लाल आणि पुर्ण पिवळा अशा दोन्ही संकासुरांची रांगच आहे मोठी. कंपाऊंड वॉलला लागून. मावळत्या उन्हात खुपच खुलून दिसतात रंग.
वाह, सर्व फोटो एकसेएक अप्रतिम
वाह, सर्व फोटो एकसेएक अप्रतिम.
आमच्याकडेही आज बराच वेळ
आमच्याकडेही आज बराच वेळ विजांचा खेळ चालला, कुठंतरी जवळपास कोसळली असं वाटतंय! पाऊस बऱ्यापैकी पडला.
सहा वाजता तर ढगाळ वातावरण १०० चा पिवळा बल्ब लावून बघावं तसं दिसत होतं.. क्लासिक!
आमच्याकडे लाल आणि पुर्ण पिवळा
आमच्याकडे लाल आणि पुर्ण पिवळा अशा दोन्ही संकासुरांची रांगच आहे मोठी. >>>>> मधुमालती आणि संकासूर कंपाउंड वॉलला सुरेख दिसतात. हे बियांनी लावतात की फांदी लागते की रोपच लावावे लागेल? हे सुंदर फुल विस्मरणात गेलं होतं. आता लवकरच नर्सरीत शोधणार.
वॉव मस्त फोटो!
वॉव मस्त फोटो!
सध्या आम्हि काही जणानी देशी
सध्या आम्हि काही जणानी देशी झाड लावायचा उपक्रम हाती घेतलाय...कारण पर्यावरणाच्या.द्रुष्टीने हल्ली.लावली.जातायत.त्या वीदेशी अँकेशीया,शीरिष या झाडाचा काहीच उपयोग नाही....आम्ही गेली वर्षभरात पंचवीस देशी झाड.(वड,पींपळ जाभूळ,बाभूळ,काटेसावर)लावलीयत आमच्या गावात (माझ गाव कराड)
@शाली - मोबाईलवर असे चित्र
@शाली - मोबाईलवर असे चित्र मिळाले म्हणजे खरंच भाग्यवान आहेत नाहीतर DSLR वर हाय शटरस्पीड पण असे फोटो मिळत नाहीत. सौदामिनीचे फोटो काढणे हा एक खेळाचं आहे
अजुनि जागे आहे गोकुळ मध्ये
अजुनि जागे आहे गोकुळ मध्ये लिहिलेल्या माझ्या घरातील परसातली जपाकुसुम (माझ्या भावाने टिपलेली)

सुरेख फोटो प्राचीन.
सुरेख फोटो प्राचीन.
@उनाडटप्पू, दुर्दैवाने तो फोटो काढण्यात माझे काहीही कौशल्य नाहीए. मोबाईलवर एक अॅप आहे. मोबाईल ट्रायपॉडवर लावून आकाशाकडे पॉईंट करुन ठेवला की जेंव्हा जेंव्हा विज चमकते तेंव्हा कॅमेरा फोटो क्लिक करतो. अजुन काही फोटो देतो.




१
२
३
आहे हे असं आहे ब्वॉ! पण विजेचे फोटो काढायचा मी खुपदा प्रयत्न केला होता इथुन मागे. कॅमेऱ्याच्या क्लिक बटनवर हात ठेवून अर्धा अर्धा तास बसायचो. आणि कंटाळून उठलो की नेमकी विज चमकायची. किंवा विज इतकी लख्खकन चमकायची की क्लिक करायला अर्धा सेकंदही वेळ मिळत नसे. या अॅपने माझी थोडी तरी हौस पुर्ण झाली विजेचा फोटो काढायची.
@शाली फोटो छान आहेत.
@शाली, फोटो छान आहेत.
एकंदर धागा पण मस्त आहे.
संकासुराचा फोटो मस्त आहे शाली
संकासुराचा फोटो मस्त आहे शाली.
मीरा, संकासुराच्या शेंगा मिळाल्या तर त्यातल्या बिया सहज रुजतात.
संकासुराचे फोटो रिपोस्ट
संकासुराचे फोटो रिपोस्ट करायचा मोह आवरत नाहीए.


१
२
Sundar photos
Sundar photos
प्राचीन मस्त फोटो .. टवटवीत
प्राचीन मस्त फोटो .. टवटवीत
@शाली भारीच फोटो !! मोबाईलवर एक ऍप आहे>> अरेच्चा ! असं पण ऍप असतं का ? कोणतं म्हणायचं हे ?नाव सांगू शकाल का ?
संकासुर मस्तच!
कोणतं म्हणायचं हे ?नाव सांगू
कोणतं म्हणायचं हे ?नाव सांगू शकाल का? शिक्रेट आहे ते!
@अंजली iLightningCam2 नावाचे
@अंजली iLightningCam2 नावाचे iOS ॲप आहे. खाली लिंक देतोय ॲप स्टोअरची. ॲन्ड्रॉईडसाठीही Lightning Camera नावाचे ॲप आहे.
iLightningCam2
शिक्रेट आहे ते>> फ़ुटलेच शेवटी
शिक्रेट आहे ते>> फ़ुटलेच शेवटी शिक्रेट
थँक्स 
पण अॅप ओपन केले की विजा
पण अॅप ओपन केले की विजा चमकायच्या थांबतात आणि बंद केले की पुन्हा चमकायला लागतात असा अनुभव आहे.
इथे मुळात वीजा च चमकत नाहीत
इथे मुळात वीजा च चमकत नाहीत
मी भारतात सांगेन घरच्यांना .. हे ऍप इन्स्टॉल करून .. दबा धरून बसायला
शालीदा मस्त प्रचि.
शालीदा मस्त प्रचि.
संकासुर कुकुक करतोय कोणला तरी....>>>+१११
आमच्या जुन्या घरी होते पुर्वी दोन्ही संकासुर त्यांची आठवण आली.
सीगल ...
सीगल ...
वॉव! सीगल कसला भारी टिपलाय!
वॉव! सीगल कसला भारी टिपलाय!
ह्या झाडाचे नाव काय्?फोटो
ह्या झाडाचे नाव काय्?फोटो अजिबात चांगले नाहीत.



शेवटच्या बिया आहेत.झाडावर घोस असतात.
मध्यंतरी नंदू तांबे याच्या
oriental dwarf kingfisher चा
oriental dwarf kingfisher चा फोटो झकास आहे.
बहावा आहे वाटत>>>> नाही. बहाव्याची पाने बहुदा मोठी असतात.फुले पिवळी असतात.फुलांचे घोस असतात.
बहावा आहे वाटत>>>> नाही.
बहावा आहे वाटत>>>> नाही. बहाव्याची पाने बहुदा मोठी असतात.फुले पिवळी असतात.फुलांचे घोस असतात.))))))))हो बरोबर.बहावा पीवळा असतो आमच्या कराडला दोनतीन ठिकाणी फूललाय तो
dilipp, किती सुंदर आलाय फोटो.
dilipp, किती सुंदर आलाय फोटो. मी फक्त असे फोटो काढायची स्वप्नेच पहातो.
देवकी हा घ्या बहावा (गोल्डन शॉवर). फुल आणि कळी यांचा फोटो मी काढलाय. (मोबाईल कॅमेरा)



पुर्ण झाडाचा फोटो माझा नाही. आमच्या सोसायटीत एक बहावा व एक गुलमोहर अशी रांगेत आठ दहा झाडे आहेत.
१
२
३
(फोटो मागील वर्षीचे आहेत)
हा घ्या बहावा .......Mala
हा घ्या बहावा .......Mala bhava nko.मी टाकलेल्या फोटोतील झाडाचे नाव हवे आहे.रच्याकने बहाव्याचे फोटो मस्त आहेत.
Submitted by देवकी on 18
Submitted by देवकी on 18 April, 2019 - 19:35>>
त्या झाड़ाचं नाव 'करंज/करन्जी' आहे. खूप तापलेल्या उन्हात सुध्धा याची सावली अत्यन्त थंड असते. नागपूर शहरात रस्त्याच्या दुतर्फा मुद्दाम या झाडांची लागवड केली आहे.
एप्रिल महिन्यात फ़ुलान्चे घोस लागतात. शेंगेच्या आकारावरून कदाचित करंजी नाव पडले असावे पण आतील बिया जालिम विषारी असतात. गावात कोणाला विषारी कीटकानी दंश केल्यास first-aid म्हणून जखमेवर याचा डिंक लावतात,.
नागपूरला एका जगप्रसिद्ध मिठाईवाल्या दुकानासमोर एक करन्जीचे भलेमोठे झाड होते. वार्षिक परीक्षेचा निकाल लागला की बाबा शाळेतून परस्पर त्या मिठाईच्या दुकानात न्यायचे तेव्हा हे झाड पूर्ण बहरलेले असे त्याची आठवण झाली .
Pages