ABP माझाचा जाहीर निषेध

Submitted by उनाडटप्पू on 29 May, 2019 - 10:50

ABP माझा, या वाहिनीवर निरनिराळे कार्यक्रम आपण मोठ्या कष्टाने चालवत असाल ह्याची महाराष्ट्रतील आम्हा तमाम प्रेक्षकांना खात्री आहे. अर्थात हे कार्यक्रम चालविताना चॅनेलच्या प्रमुख जाहिरातदारांची सुद्धा आपण काळजी घेत असाल हे आम्हाला काल २८ मे च्या प्राईम टाईमच्या शो मधून मनोमन जाणवले. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं अख्खे घरदार निरपेक्ष भावनेने आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले त्या महापुरुषाबद्दल आपण 'खलनायक' ही संज्ञा आपला टीआरपी वाढविण्यासाठी वापरत आहात ह्याचा आश्चर्यकारक खेद वाटतो, वाईट वाटते.

आपली पत्रकारिता ही केवळ ‘धंदा’ म्हणून राहिली आहे याचे दुःख वाटते आणि आजची पत्रकारिता नक्की समाजाला कुठे नेत आहे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो इथवर आपल्या वाहिनीची मजल गेली. पत्रकारिता हे आता पत्रकारांचे व त्यांच्या मालकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनल्याने त्यातून नफा तर अपेक्षित आहेच, परंतु हा नफा कमावताना आपण पत्रकारितेच्या मूळ हेतूलाच नख लावतोय का याचा विचार करायला हवा. काल ज्या प्रकारे आपण चर्चा घडवून आणलीत, त्या चर्चेला जे शीर्षक दिले, तिथे आपल्या वाहिनीवरचा किंचित सैल असणारा विश्वास आज पूर्णपणे अस्त पावला.

टिळक, आगरकर, अत्रे यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची एक श्रीमंत दिपमाळ आज क्षीणपणे लुकलुकताना दिसते ती केवळ आपल्यासारख्या टुकार आणि नावाने प्रसन्न पत्रकारांमुळेच.

सावरकर नायक की खलनायक हे पडताळून पहाण्याची तुमची लायकी तरी आहे का हे पहा आधी मग बाकीचे बोला.

शास्त्रींची हत्त्या कोणी केली,हेरॉल्ड मध्ये कोणी शेण खाल्ले यावर पण हिम्मत असेल तर जाहीर चर्चासत्र प्रसन्न जोशीने आणि खांडेकर यांनी आयोजित करावी असे माझे आवाहन आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वातंत्र्यवीरांनी आपलं अख्खे घरदार निरपेक्ष भावनेने आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले त्या महापुरुषाबद्दल आपण 'खलनायक' ही संज्ञा आपला टीआरपी वाढविण्यासाठी वापरत आहात ह्याचा आश्चर्यकारक खेद वाटतो, वाईट वाटते>>>>>>> खेद नव्हे.आत्यंतिक चीड आली हे वाचून.तो कार्यक्रम पाहिला नाही,पण फे.बुवर यासंबंधी वाचले होते.
वाईट वाटते की या थोर माणसाने आपले सर्वायुष्य देशासाठी वाहिले त्याच राष्ट्राला,त्यांचीकदर नाही.त्यांना अरेतुरे करून बोलणारीआणि लिहिणारी माणसे पाहिली की वाटते निदान त्यांच्या विद्वत्तेकडे पहा.कारण प्रखर देशभक्ती ही न पेलण्यासारखी होती.

एकूणच हे दोघे माझा कट्टा वर किंवा इतर कार्यक्रमात येणाऱ्या सन्माननीय व्यक्तींशी जरा उर्मटपणे किंवा "आम्ही भारी" टाईप टोनमध्येच बोलताना दिसतात

मी तो कार्यक्रम पाहिला नाही पण काय चूक झाली नेमकी? सावरकरांबद्दल तसंही खूप वाईट पसरवलं जातं मग चॅनेल जर ते उघड दाखवून त्याचं खंडन करायची संधी देत असेल तर काय चूक आहे?
मला तर टायटल मध्येही नेमका काय आक्षेप हे कळलं नाही पण तरीही चॅनेलने चूक कबूल केली आहे. मग सोडा की आता. फ्रीडम ऑफ स्पीच नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही????

भावणा दुखावल्या यावरचे विनोद आटले काय हल्ली ?
बरं एबीपी माझा ने माफी मागितली की अर्थव्यवस्था क्रमांक एक ची होईल यात शंका नाही.

भावणा दुखावल्या यावरचे विनोद आटले काय हल्ली ?
बरं एबीपी माझा ने माफी मागितली की अर्थव्यवस्था क्रमांक एक ची होईल यात शंका नाही.

नवीन Submitted by किरणुद्दीन on 29 May, 2019 - 22:06 >>>

भाऊ स्वतःची खवटबुद्धी सगळीकडे वापरू नका. विषयाच्या गांभीर्याच आकलन करून घ्या. ते जमत नसेल तर गप्प राहा.

>>एबीपी माझा ने माफी मागितली की अर्थव्यवस्था क्रमांक एक ची होईल यात शंका नाही<<

ओ संभ्रमकार, कुठेतरी विषयाला धरुन बोलत जावा राव!
सगळीकडे कशाला मळमळ बाहेर काढता?

आज कसकायं वर पोस्ट वाचली. छान वाटली. महापौर हा शब्द मराठी भाषेला सावरकरांनी कसा दिला याची रंजक माहिती होती.
असे बरेच शब्द त्यांनी दिलेत असे ऐकण्यात आहे.
यावर माबोवर धागा आहे का?

विषयाच्या गांभीर्याच आकलन करून घ्या. ते जमत नसेल तर गप्प राहा. >>>> कोण सांगतंय >>> ते सांगावं लागलं यासाठीही एकदा हसूनहसून लोळून घ्या...

सनव, किरणुद्दीन >>> तुमची फक्त कीव येते

मला सावरकरांची कीव येतेय. ते हिंदू महासभेचे मेंटल लोक सुऱ्या वाटतायत मुलांना. आणि हे लोक सावरकरांचे अनुयायी म्हणवतात स्वतःला. तात्याराव असते तर त्यांनी हिंदू महासभा आधी विसर्जित केली असती. बिनडोक लोक.

वाईट वाटते की या थोर माणसाने आपले सर्वायुष्य देशासाठी वाहिले त्याच राष्ट्राला,त्यांचीकदर नाही.त्यांना अरेतुरे करून बोलणारीआणि लिहिणारी माणसे पाहिली की वाटते निदान त्यांच्या विद्वत्तेकडे पहा.कारण प्रखर देशभक्ती ही न पेलण्यासारखी होती.>>> +१११
दुर्दैवी, पण काय करणार...बाकी या घटनेबाबत काही माहिती नाही सो नो कमेंट्स, पण सावरकर द्वेषाचे बाळकडू मिळालेले लोक्स बर्याच ठिकाणी बघायला मिळतात हल्ली. अशांच्या बौद्धिक दिवाळखोरीची कीव येते फक्त.

बंगाली लोक त्यांच्या नेत्यांचे मार्केटिंग करतात तसे महाराष्ट्रातले मराठी लोक एकजुटीने करत नाहीत. वेगवेगळ्या जिल्हापातळीवरच प्रयत्न होतात हे कारण आहे. तिकडच्या कित्येकांची नावे महाराष्ट्रांतल्या शहरांतल्या रस्त्यांना पक्षीय माध्यमांतून लादली ती इकडच्या नेत्यांनी स्विकारली, आमची तिकडे किती गेली?
तीच प्रथा चानेलवर उचलून धरली जाते.

मला सावरकरांची कीव येतेय. ते हिंदू महासभेचे मेंटल लोक सुऱ्या वाटतायत मुलांना. आणि हे लोक सावरकरांचे अनुयायी म्हणवतात स्वतःला. तात्याराव असते तर त्यांनी हिंदू महासभा आधी विसर्जित केली असती. बिनडोक लोक.>>>> +११११

>>बंगाली लोक त्यांच्या नेत्यांचे मार्केटिंग करतात तसे महाराष्ट्रातले मराठी लोक एकजुटीने करत नाहीत<< Srd ह्यांनी मांडलेला मुद्दा खरचं विचार करण्याजोगता आहे. आपण थोडंसं जात-पात सोडुन आपल्या लोकांचं / नेत्यांचं मार्केटिंग करायला हवं. पण आपण आपलीच मंडळी जातींमध्ये विखरुन टाकली आहे. आणि त्यात ही ब्राह्मण समाजाला झोडपणं हे सगळ्यात मोठं कार्य होउन बसलं आहे.
गम्मत अशी आहे की तमाम लोकं सगळ्यात जास्त ब्राह्मण समाजावर आणि ब्राह्मण नेत्यांवर त्यांनी बहुजनांवर अत्याचार केल्याचा सरळ-सरसकट आरोप करतात, पण ह्याच ब्राह्मण नेत्यांनी इतर कुठल्या ही नेत्यांच्या आधी आणि अतिशय भरीव अशी कामगिरी केली आहे बहुजन उध्दाराची. मला वाटतं ज्या प्रमाणे ल्युटन्स दिल्ली हा प्रकार आहे, तसा ल्युटन्स महाराष्ट्र हा ही प्रकार अस्तित्वात असावा, आणि प्रसन्न जोशी, खांडेकर साहेब त्यात कार्यरत असावीत. ह्या कुणाची हि कधी हि हिम्मत होणार नाही असा कार्यक्रम इतर सन्माननीय परंतु ब्राह्मणेतर नेते अथवा वीर-पुरुषांवर काढण्याची.

जरा खोलातच लिहायचं आणि बोचरं वाटेल असं - कांग्रेसने सावरकरांना टाळलंच पण भाजपवाल्यांनाही वावडेच आहे.

पांडे या स्वातंत्र्य वीराने गोळ्या झेलल्या त्याचे नाव ऐकतो वारंवार. बाबू गेनूचा धडा चौथीत होता. नंतर विसरलो. पण भीमाशंकरला बसने जाताना जुन्नरजवळ एका ठिकाणी दिसले बाबू गेनू प्रवेशद्वार. धडा आठवला.
आता आणखी लिहीत नाही.

काल बघितला तो कार्यक्रम.... म्हणजे दुसऱ्या दिवशीचा..... सारवासारवीवाला!
तो प्रसन्न जोशी कसला शब्दछल करत होता..... इथल्या काही काही आयडींसारखा असे म्हण्टलेच नाही, तसे म्हंटलेच नाही, तसा हेतूच नव्हता, महाभारताततला कर्ण काय..... काहीच्या काही चालू होते पण माफी मागायचे नाव घेत नव्हता पट्ठ्या!

शेवडेंनी मस्त सणसणीत हाणली त्याला.... प्रसन्न जोशी पत्रकार की दलाल म्हंटले तर चालेल का म्हणून तर शेवडेंना परत on air घेतलेच नाही त्याने!

अश्या सगळ्या माकडचाळ्यातुन स्वताचीच प्रतिमा मलीन होते ते कळत नाही का या लोकांना?

>>बाबू गेनूचा धडा चौथीत होता. नंतर विसरलो. पण भीमाशंकरला बसने जाताना जुन्नरजवळ एका ठिकाणी दिसले बाबू गेनू प्रवेशद्वार. <<

अहो जुन्नर पर्यंत कशाला जायचे?
आपल्या पुण्यातच हुतात्मा बाबू गेनू चौक आहे की!
दहीहंडी फार फेमस असते तिथली.

शास्त्रींची हत्त्या कोणी केली,हेरॉल्ड मध्ये कोणी शेण खाल्ले यावर पण हिम्मत असेल तर जाहीर चर्चासत्र प्रसन्न जोशीने आणि खांडेकर यांनी आयोजित करावी असे माझे आवाहन आहे >>>>> चर्चा सत्र कशाला , पिक्चर निघाला आहे आणी प्रदर्शितही झाला आहे आणी कोणी गळचेपीहि नाहि केली आणी निषेध हि नाहि केला. जरा माहिती घ्या आणी मग काळे करा !

फक्त अर्ध्या तासाच्या या चर्चासत्रात सुरुवातीला संतुलित पणाचा आणलेला आव शेवटी-शेवटी गळुन पडलेला दिसतो आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनीच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा अभ्यास केला नाहि, त्यांना सावरकर कळले नाहित तर मणिशंकर, रागा यांना दोष देण्यात काहिहि अर्थ नाहि...

मुंबईतले गेट वे ऑफ इंडिया, बांनगणगा, करोडो खर्चून देखभालीसाठी खाजगी कम्पनिस देणार आहेत,
पुढचा नंबर सावरकरांच्या घराचा आहे,

पेपरात आले आहे

अबीपी माझा फालतु चैनेल आहे. वाद व्हावेत म्हणुन त्यांनी तो विषय घेतला होता. विधान्सभेच्या निवडणुकित दिशाभुल करणारे मुद्दे नकोत का ? नाहितर कोणीतरी शेतकरि पाणी प्रश्न काढेल !
बाकी सावरकरांचे काहिहि योगदान नाहिये . उगाचच कोणालाहि मोठे करायचा प्रयत्न चालु आहे!

सावरकरांचे काहिहि योगदान नाहिये . उगाचच कोणालाहि मोठे ----होय की पकानेवाला अगदी बरोबर बोललात.... इंग्रजांना टाइमपास होत नव्हता म्हणून त्याना बोटीने लांब समुद्रात फिरायला नेले होते ना फुकटात

आणि अंदमानचे हॉलिडे पैकेज दिलेले लाइफटाइम व्हैलीडीटी वाले

Pages