Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कारवी, हसवलत हो
कारवी, हसवलत हो
तिखट चहा म्हणजे आल्याचा असेल
तिखट चहा म्हणजे आल्याचा असेल ना..?.
हो ना...काहीही..!!!
पण लहान मूल नाहीच पिणार पहिल्यांदा पिताना....त्यात एव्हढं आठवण काढून हसण्यासारखे काये? काहीही करून एपिसोड भरतायत म्हणजे...
ही सिगरेट ओढत असेल का खरंच?
गेंडयाला पिसं
गेंडयाला पिसं

आतापर्यत ऐकलेलं कि गेंडयाची कातडी जाड असते
@कारवी... दातार काका बक्षिसं
@कारवी... दातार काका बक्षिसं वाटणार आहेत हे ईथे कळवल्याबद्दल धन्यवाद!!!!
... बक्षीस समारंभ कधी आयोजित करण्यात येणार आहे ते पण कळवा...
.. मला पामराला एकूण एक एपिसोड पहायला मिळणार आहेत...
गेंड्याची पिसं???... काय एक एक कहर कल्पना सुचतात तुम्हाला!!!
चालू जन्मातील मानसोपचार डॉक्टरचा सहकारी =(20/25 वर्षांपूर्वी) गत जन्मातील डासांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट (खरा अथवा खोटा) घेऊन येणारा माणूस = पुन्हा एकदा वयाचा घोळ...

वीस वर्षांपूर्वीचा लूक = सध्याचा लूक.....
खरं तर कालच्या भागात काही प्रसंग खूप हळवे होते...
रूपाली किती छान अभिनय करते ना... ती बाळाला समजावत होती तो प्रसंग फारच उत्तम वठवलाय तिने..
... थोडं गंभीर होऊन पाहत होते तोवर ई बाळ पचकन् सपाट react झालं... आणि मला फिस्सकन हसू आले
हो ना, तो रिपोर्ट घेऊन येणारा
हो ना, तो रिपोर्ट घेऊन येणारा तेव्हा दहा बारा वर्षाचा असेल. तो दुसरा कोण होता दवाखान्यात ज्याच्यावर कॅमेरा स्थिरावत होते. जनरल फिजीशियनकडे बसतात लोक असे बाहेर रांग लाऊन, मानसोपरचारतज्ञाला भेटायची वेळ ठरलेली असते त्याच्या पाच मिनिटं आधी लोक येतात आणि ते लोक ब-यापैकी सधन असतात (माझ्या आकलनाप्रमाणे), बाहेर बसलेले लोक ताप, सर्दी, खोकलावाले वाटत होते. ईशाकडे कपडे कुठून आले, आणि आले तरी जुना ड्रेस घालायचा ना काॅॅटनचा.
रूपाली किती छान अभिनय करते ना
रूपाली किती छान अभिनय करते ना... ती बाळाला समजावत होती तो प्रसंग फारच उत्तम वठवलाय तिने..

... थोडं गंभीर होऊन पाहत होते तोवर ई बाळ पचकन् सपाट react झालं... आणि मला फिस्सकन हसू आले>> हो ना ! मी खूप दिवस असं समजत होते कि हिला मुद्दाम असा अभिनय करायला लावला असेल .. पुचाट बावळट भित्री मेंगळट दाखवण्यासाठी .. आणि नंतर तिच्यात एकदम ड्रॅस्टीक चेंज घडवतील ... सूड घेणारी ,डोळ्यात अंगार ,तरी चतुरपणे शोध घेणारी वगैरे .. पण सगळं कळून गेले २ आठवडे हिच्या चेहऱ्यावरची रेष हि हलत नाहीये ..जी गेले ४ महिने हलली नाहीये .. कायम दुर्मुखलेली , संभ्रमित , गोंधळलेली .. आईने हाक मारल्यावर वळून बघत नाही .. बघितलं तर मंदासारखी बघते.. .. खणखणीत आणि तरतरीतपणा म्हणून नाही .. हे कॅरॅक्टर खरंच असच दाखवायचंय का त्यांना ?इतकं गुळमुळीत ?!.. काय ते ड्रेस , काय ते केस ,काय ती ओढणी हाताला गुंडाळायची स्टाईल , कसले ते सॅन्डल ..
आणि आता तर काय सायकियाट्रिक डॉक च्या वाऱ्या सुरु झाल्या .. त्यातलेत्यात त्या डासांचा रिपोर्ट आणणाऱ्या माणसाला ओळखताना थोडासा ठामपणा वाटला अभिनयात ..
त्या डॉक च्या दवाखान्यात बाहेर रिसेप्शन च्या खोलीत एक पृथ्वीचा गोल होता .. आणि सेम तसाच परत डॉक च्या आतल्या केबिन मध्ये .. करायचेत काय एवढे गोल मुळात जिकडेतिकडे ?!
तो दुसरा कोण होता दवाखान्यात
तो दुसरा कोण होता दवाखान्यात ज्याच्यावर कॅमेरा स्थिरावत होते>> तो झेंडे ने इशा च्या मागावर सोडलेला डिटेक्टिव्ह आहे / असावा
बाहेर रिसेप्शन च्या खोलीत एक
बाहेर रिसेप्शन च्या खोलीत एक पृथ्वीचा गोल होता .. आणि सेम तसाच परत डॉक च्या आतल्या केबिन मध्ये .. करायचेत काय एवढे गोल मुळात जिकडेतिकडे ?>>>
@anjali_kool... बरोबर....
@anjali_kool... बरोबर....
.
.. या आधी या माणसाने ईशा - जाळ्या ची मीटिंग, कॉल रेकॉर्ड्स वगैरे माहिती झेंड्याला पुरवली होती
>>>> आणि तो डॉक्टर!!!... कसा
>>>> आणि तो डॉक्टर!!!... कसा विचित्रच दाखवलाय... पेशंटचं काही ऐकूनच घेत नव्हता... ... ईशाला किती बावळट सल्ले देत होता...
... केड्याला treatment सुरू केली पाहिजे त्वरित!!
कालचा डॉक्टर बरोबरचा सीन
कालचा डॉक्टर बरोबरचा सीन अशक्य करमणूक करणारा होता.
काल, ईबाळाची दया आली मात्र.. ती तीचं ईप्पू लॉजिक (पप्पू वरून सुचलय!) ईतकं समजावून सांगत होती तरी डॉक्टर ला काही सुधरेना..
"ती सांगते आहे त्यातली एखादी तरी घटना आई साहेबांना विचारून पडताळून घेता येईल हे कुणाच्याच ध्यानी कसं येत नाही?". असं कन्येने विचारल्यावर मला खूप अभिमान वाटला.
ती तीचं ईप्पू लॉजिक (पप्पू
ती तीचं ईप्पू लॉजिक (पप्पू वरून सुचलय!) >>>> ओह ग्रेट!!!!!
"ती सांगते आहे त्यातली एखादी
"ती सांगते आहे त्यातली एखादी तरी घटना आई साहेबांना विचारून पडताळून घेता येईल हे कुणाच्याच ध्यानी कसं येत नाही?". असं कन्येने विचारल्यावर मला खूप अभिमान वाटला. Proud >>> रिअली यु शुड फील प्राऊड, किती हुशार आणि स्पष्ट विचार. नाही तर तो खेड्या.
"ती सांगते आहे त्यातली एखादी
"ती सांगते आहे त्यातली एखादी तरी घटना आई साहेबांना विचारून पडताळून घेता येईल >>>>>
खरंय, त्या लेखकापेक्षा हल्लीची चिल्लीपिल्ली जास्त सुसंगत विचार करतात.
पण त्या स्नेल काही नाही सांगणार..... टेन्शन दाखवण्यासाठी डोळ्याच्या दोन कोपर्यात बाहुल्या फिरवणार आणि पुन्हा एकदा ट्रॅफिक हवलदारासारखा आडवा हात धरून चक्करून पडतील फार्तर
करायचेत काय एवढे गोल मुळात जिकडेतिकडे ? >>>>>
जेव्हा ती सांगेल, आमच्या दोघींच्याही माहेरच्या घराला गच्ची आहे म्हणून मी रा नं चा पु ज.
तेव्हा गोळ्यावर बोट ठेवून डॉ सांगतील तिला ----
तू कुठे आहेस -- बेडेकर चाळीत;
रा नं कुठे -- कर्जतला,
विस आता कुठे -- लंडनला,
विस तेव्हा कुठे होता -- बंगलोरला
---- निष्कर्ष >> मग तू रा नं चा पुनर्जन्म असूच शकत नाहीस
एका गोळ्यावर डॉ बोट ठेवतील, दुसर्या गोळ्यावर निमकर भूगोल कन्फर्म करतील
तिखट चहा म्हणजे आल्याचा असेल
तिखट चहा म्हणजे आल्याचा असेल ना..?. >>>>>>>>> अरेच्चा, हे माझ्या लक्षात नाही आल. मला वाटल, पुष्पाने चुकून तिखटच घातल असेल चहात.
चालू जन्मातील मानसोपचार डॉक्टरचा सहकारी =(20/25 वर्षांपूर्वी) गत जन्मातील डासांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट (खरा अथवा खोटा) घेऊन येणारा माणूस = पुन्हा एकदा वयाचा घोळ... >>>>>>>> +++++++११११११११मानसोपचार डॉक्टरचा सहकारी शवागारात कसा काय काम करु शकतो?
खरं तर कालच्या भागात काही प्रसंग खूप हळवे होते... >>>>>>>> कुठले प्रसन्ग, सुषमाताई?
रूपाली किती छान अभिनय करते ना... ती बाळाला समजावत होती तो प्रसंग फारच उत्तम वठवलाय तिने..
... थोडं गंभीर होऊन पाहत होते तोवर ई बाळ पचकन् सपाट react झालं... आणि मला फिस्सकन हसू आले >>>>>>>>> अगदी अगदी बिपिनशी भाण्डताना २-३ वेळा त्याच्याकडे जाते, पुन्हा मूळ जागेवर परत उभी राहते.
सूड घेणारी ,डोळ्यात अंगार ,तरी चतुरपणे शोध घेणारी वगैरे .. पण सगळं कळून गेले २ आठवडे हिच्या चेहऱ्यावरची रेष हि हलत नाहीये . >>>>>>> तेच ना. प्रोमोमध्ये सुद्दा तीच अवस्था आहे.
खर तर सिरियलच्या सुरुवातीला चान्गली अॅक्टिव्ह आणि बोल्ड दाखवलेली ईशा लग्नानन्तर इतकी बावळट का दाखवलीये तेच कळत नाही.
त्यातलेत्यात त्या डासांचा रिपोर्ट आणणाऱ्या माणसाला ओळखताना थोडासा ठामपणा वाटला अभिनयात .. >>>>>>>>>> ++++++++२२२२२२२
आले तरी जुना ड्रेस घालायचा ना काॅॅटनचा. >>>>>>>>>>> नैतर काय. मानसोपचार तज्ञाकडे लग्नाला जातात तशी नटून थटून गेली.
त्या डॉक च्या दवाखान्यात बाहेर रिसेप्शन च्या खोलीत एक पृथ्वीचा गोल होता .. आणि सेम तसाच परत डॉक च्या आतल्या केबिन मध्ये .. करायचेत काय एवढे गोल मुळात जिकडेतिकडे ?! >>>>>>> त्याच काय आहे ना, ईशा सध्या गोल गोल फिरतेय ना शोधकार्यात, सो तिला मदत करायला एवढे गोल.
. या आधी या माणसाने ईशा - जाळ्या ची मीटिंग, कॉल रेकॉर्ड्स वगैरे माहिती झेंड्याला पुरवली होती >>>>>>> हा माणूस काल आणि परवा रुपाली, ईशा समोर बसलेला होता तरीही त्यान्नी ओळखल नाही.
>>>> आणि तो डॉक्टर!!!... कसा विचित्रच दाखवलाय... पेशंटचं काही ऐकूनच घेत नव्हता... ... ईशाला किती बावळट सल्ले देत होता... >>>>>> सहमत आणि निमकर सुद्दा मध्ये मध्ये बोलत होते. तो डॉक्टर ईशाभोवती फिरत बोलत होता तेव्हा वाटल विसच त्याच्या चेहर्याचा मास्क लावून आला की काय. केडया काहीही दाखवू शकतो.
"ती सांगते आहे त्यातली एखादी तरी घटना आई साहेबांना विचारून पडताळून घेता येईल हे कुणाच्याच ध्यानी कसं येत नाही?". >>>>>>> मला सुद्दा हेच वाटलेल. जयदीपची शपथ देऊन तिने आसाला ' दासाला चुकीच औषध तुम्ही दिल होत का?' विचारायला हव होत. जालिन्दर सुद्दा मदतीला आहेच की. त्याला फोन करायचा ना.
गेण्डयाची पिसे, ईपप्पू लॉजिक
जेव्हा ती सांगेल, आमच्या दोघींच्याही माहेरच्या घराला गच्ची आहे म्हणून मी रा नं चा पु ज.
तेव्हा गोळ्यावर बोट ठेवून डॉ सांगतील तिला ----
तू कुठे आहेस -- बेडेकर चाळीत;
रा नं कुठे -- कर्जतला,
विस आता कुठे -- लंडनला,
विस तेव्हा कुठे होता -- बंगलोरला
---- निष्कर्ष >> मग तू रा नं चा पुनर्जन्म असूच शकत नाहीस
एका गोळ्यावर डॉ बोट ठेवतील, दुसर्या गोळ्यावर निमकर भूगोल कन्फर्म करतील >>>>>>>>>>
काल नूडल्सच्या फ्लॅशबॅक मध्ये पुर्वीचा विस दिसला.
कालच सुभादर्शन एवढच काय ते बघण्यासारख होत एपिसोडमध्ये.
>>एका गोळ्यावर डॉ बोट ठेवतील,
>>एका गोळ्यावर डॉ बोट ठेवतील, दुसर्या गोळ्यावर निमकर भूगोल कन्फर्म करतील >>>>>>>>>> Rofl

डोळ्यासमोर ऊभे राहिले..
पण त्यावर बाळ चिरक्या आवाजात म्हणेलः पण म्हणून काय झालं? पृथ्वीचा गोल तर तोच आहे ना?
आता बोला..
(यावर ईआई ने ऑलरेडी गोल मान पण डोलावली!
झेंडे ला ही हे लॉजिक एकदम पट्टल.. अन त्याने विस यायच्या आत बाळा ला दुसर्या गोलावर पाठवायचा घाट घातला.. )
मला एक कळत नाही की पूर्वीचा
मला एक कळत नाही की पूर्वीचा जन्म आणि आताचा जन्म यांना जोडणारा एक कॉमन दुवा जालिंदर साक्षात मदतीसाठी उभा असताना ,त्याला नंदू आणि त्याच्याबद्दलच जे काही या मंद मुलीला स्वप्नात दिसल ते ही त्याला विचारू शकत नाही का,निदान फोन तर करू शकते ना.
केड्या हे ही इतक्यात विसरला आणि असा हा विचित्र प्रकारचा कोणता पुनर्जन्म आहे की आधीच्याच आऊट झालेल्या प्लेयरला नंतर खेळणार्या प्लेयरला येऊन सांगाव लागत आहे की बाई ग,मी म्हणजे तू.आता माझा गेम पूर्ण कर.
ते परांजपे आहेत,त्यांच्याकडून त्या कँसेटबद्दल ही विचारू शकते.पण नाही.कर्कश आवाजात भोकाड पसरून"आ.........ई,कोण आहे मी,अस कोण विचारणार
एकंदरीत कठीण आहे.
अशं नाही कलायचं अंजली. शाणुली
अशं नाही कलायचं अंजली. शाणुली ना तू? दातार आजोबा चॉकी, बलून आणि छोटा भीमचा स्टिकर देणार हं कोण शेवटपर्यंत बघेल त्याला.>>>>>>>>>>>> कारवी
च्या खोलीत एक पृथ्वीचा गोल होता .. आणि सेम तसाच परत डॉक च्या आतल्या केबिन मध्ये .. करायचेत काय एवढे गोल मुळात जिकडेतिकडे ?! :आईग्गं हसून फुटले
खरंच तो डॉ किती बावळट होता. ईशाला शोभेल असाच. ईआई पण विचित्रच. तिखट चहा काय, मारूतीला तेल काय
डासांचा रिपोर्ट म्हणजे मला एक मिनिट खरंच वाटलं असं काहीतरी डास चावून मलेरिया वगैरे झाला कोणालातरी?
हाहाहा... मी असं काही लिहिलंय
@सुलू_८२....हाहाहा... मी असं काही लिहिलंय हे विसरूनच गेले होते.. (परत आजचा एपी बघायची मानसिक तयारी करतीय मी)...
... रुपालीचे बाळा बरोबरचे संवाद ("काही" उगीचच टाईपलं) ऐकून मी क्षणभर गंभीर झालेले...
.. बाकी पुढे... ई आई बाबा संवाद ... दवाखाना..इत्यादी प्रसंग मी हळवेपणाने पाहायचा प्रयत्न केला.. पण प्रत्येकवेळी दातार कन्येने मला हसायलाच लावले...
... समजून घ्या सुलू!!!
खर तर सिरियलच्या सुरुवातीला
खर तर सिरियलच्या सुरुवातीला चान्गली अॅक्टिव्ह आणि बोल्ड दाखवलेली ईशा लग्नानन्तर इतकी बावळट का दाखवलीये तेच कळत नाही. >>> ही झीमच्या हिरवीणींची परंपरा आहे
दातार - गायत्री तुला कळतंय का
दातार - गायत्री तुला कळतंय का मायबोलीवर तुझ्यावर किती कमेंट्स टाकताय लोक?
म्हणजे काय हो बाबा?
म्हणजे तुझी पिसे काढतायेत...(रागावर कंट्रोल करून=
म्हणजे आता हे बघा बाबा मी अभिनय करते तो त्यांना समजत नाही म्हणून ते तसं करतात ना?
हो तसंच, पण तू अभिनय करतच नाहीस,असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं
मग बरोबर ना बाबा मी अभिनय करतच नाहीये मला जे वाटतं तेच मी करते...
पण बाई आता तरी अभिनय कर ना...( डोकं हाताने ठोकून)
पण बाबा तुम्ही तर म्हणाला होतात ना की अभिनय वास्तव असायला हवं.
अग बाई वास्तववादी अनुभव म्हटलं होतो, घरी जसा काय मख्ख चेहरा घेऊन बसते तसं नाही...
मग बाबा सांगा तुमचं चुकलं की माझं चुकलं?
बाई चुकलं, चुकलं, माझं चुकलं (आता भिंतीवर दाणादाण डोकं)
बघितलं नाही बाबा आपली चूक मान्य करताना किती त्रास होतो ते..
बाई मला माफ कर, (खाली पडून वर डोळे पांढरे)
बघा सिरियलीत सगळ्या लोकांना मी अशीच छान समजवते...
(No subject)
ओ up..जालिंदर मेला की कधीच.वि
ओ up..जालिंदर मेला की कधीच.वि स नेच मारलं त्याला लुटुपुटुच्या लढाईत..
@chaitrali.......नाही,जालिंदर
@chaitrali.......नाही,जालिंदर जिवंत आहे.त्याने मेल्याच नाटक केलेल असत.
केलेलं पाप वापस आलं
केलेलं पाप वापस आलं असं काहीतरी म्हणाला तो डाॅ चा कंपांऊडर. काय हे मराठी
ईशा पहाटे कर्जतला पोहोचली, चालत गेली का परत. रूपालीचे केस किती लांब आहेत. फिल्मी आहे सगळं. त्यापेक्षा राजनंदिनीने नागीण वगैरे होऊन बदला घेतला असता तर किती बरं झालं असतं. नागीणीने ईशापेक्षा चांगला अभिनय केला असता डसण्याचा.
नागीणीने ईशापेक्षा चांगला
नागीणीने ईशापेक्षा चांगला अभिनय केला असता डसण्याचा>>>>

नागीणीने ईशापेक्षा चांगला
नागीणीने ईशापेक्षा चांगला अभिनय केला असता डसण्याचा>>>>

राजनंदिनीने नागीण वगैरे होऊन
राजनंदिनीने नागीण वगैरे होऊन बदला घेतला असता तर किती बरं झालं असतं. नागीणीने ईशापेक्षा चांगला अभिनय केला असता डसण्याचा.>>>>>>>>>>>>
कर्जत चा बंगला पण बदलला की
कर्जत चा बंगला पण बदलला की काय..काल वेगळाच भासत होता
कर्जत चा बंगला पण बदलला की
कर्जत चा बंगला पण बदलला की काय.. >>>> परत ???
Pages