बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यात बेस्ट तुम्ही मसाला ओट्स
न्या.तुमचा डाएट असला तर तो maintain राहिल आणि ओट्स खाल्ले तर जास्त भुक जाणवणार नाही. Campfire करणार असाल तर marshmellows पण सोबत न्या.
हे काहिच नको वाटत असेल आणि camp मधे दुधाची/ताकाची सोय होत असेल तर पोहे सोबत घ्या आणि दुधपोहे/दडपे पोहे खा. Happy

आम्ही सँडविच , भेळ , दडपे पोहे ,उपम्याचं फोडणी घालून सुकं तसच सेम डाळ तांदुळाची खिचडी चं सुकं ,ऑम्लेट करायची सोय असेल तर अंडी .. चिवडा भडंग हे तर असतंच कायम , भरपूर फळं आणि ज्यूस , टॉर्टिलास आणि रेडी मेड भाज्यांची पाकिटं नेतो त्या फार महान लागत नाहीत ..पण टोमॅटो/ काकडी च्या (फक्त दही घालून) कोशिंबीरीसोबत धकून जाते एकवेळ

शनिवारी संध्याकाळी ४ पाहुणे येणार आहेत. भारतातून आलेले एक जोडपे आणि त्यांचा भाचा + सून अमेरिकेत २-३ वर्षे शिकणारे जोडपे. सर्व मंडळी व्हेजिटेरियन आहेत , तमिळनाडूचे आहेत. अ‍ॅलर्जी / पथ्य वगैरे काही नाही म्हणालेत . रात्रीच्या जेवणाकरता पटकन करता येईल असा मेनू सुचवा प्लीज. शनिवारी सकाळी तयारीला वेळ नसणार फारसा .

Baghare baingan sambar rice plus little dahi bhat fried papad avial semia payasam with kesar and cardamom
3-4 pooris per person. Curries and payasam you can make on Friday and freeze. If you do get time add veg pulao and masala vada. If you are entertaining you will need a helper to do all the frying half an hour before dinner time. Or order chapati. May be some light refreshing salad with pineapples
If non veg then srilankan chicken curry

पुलाव किंवा मसालेभात, ( ऐनवेळी इंपॉ मधे लावायचा) टोमॅटोचे सार, एखादी भाजी (फ्लॉवर बटाटा रस्सा किंवा मटार उसळ किंवा फणसाची भाजी.) दोन गॅस वर दोन फोडण्या Happy आणि आंब्याचा शिरा. हा आधीच करून ठेवता येईल.

तयार चपाती,तयार गुलाबजाम/जिलेबी, जीरा राईस, पनीर बटर मसाला किंवा कुर्मा , बटाटे वांगी भाजी किंवा आलु मेथी किंवा आलु पालक , दाल तडका , पापड तळुन

बिसीबेळे भात मृण च्या सल्ल्यानुसार भरपूर साजुक तूप आणि काजू बिजू घालून दमदार असा. तिकडे गार गरम जसं वातावरण असेल त्यानुसार पायसम/फिरनी इ गार गरम गोडात. हिरवा मटर रस्सा + अप्पम खरंतर पण सोय पाहून पोळी, पुरीही जमेल यासोबत. एखादी कोशिंबीर/पचडी.
यात स्टफ केलेली मिरची भज्जी फरसाण म्हणून अ‍ॅडता येइल.
बिसीबेळे करता वेळ नसल्यास दहीबुत्ती /पुलिहोरा इ. सुद्धा करता येइल

चेंज ऑफ टेस्ट हवी असेल तर तुमचा पेशल रिसोतो. व पास्ता सलाड, कोल्ड सूप मिनिस्ट्ररोन करता येइल. खरे सिद्धहस्त आहात काय केलेत ते तुम्हीच लिहा. <३

धन्यवाद मंडळी .
अमा, फारसे ओळखीचे नाहीत पाहुणे. अशा वेळेस रिसोतो, पास्ता, टाको वगैरे प्रकार करून अवलक्षण बरेच वेळा झालेले आहे. भारतातून पहिल्यांदाच अमेरिकेत आलेल्या पाहुण्यांना , आणि त्यातून दोन चार दिवस भटकंती करुन जेवायला येणार्‍यांना त्यांच्या सवयीचे पदार्थ वाढणे बेस्ट . बिसी बेळे भात, मिर्ची का सालन, अवियल हे जमेल. त्या दिवशी घरची मंडळीच ८-९ असतील. त्यामुळे इतक्या लोकांच्या पुर्‍या जमणार नाहीत. बहुतेक पोळ्या. घरच्या चिल्लर पब्लिकची पाणी पुरीची ऑर्डर आहे - तो एक प्रकार राहील ( अन मुलं फक्त पाणीपुरीच खातील )

मँगो शिरा ट्राय करेन यावेळेस

सग ळी चर्चा करून मी हा बेत केला मागच्या शनीवारी:

- आम्बा रस,
- पूरी
- मटार-बटाटा ची काळा मसाला वाटून रस्सा भाजी
- कैरी किसून तक्कू
- बटाटाकिसून + ऊ. बटाटा घालून कटलेट्स
- तोन्डली भात ग्रीन

मस्त बेत जमला होता... धन्यवाद सगळ्याना

एक सुधारणा:
- पनीर किसून + ऊ. बटाटा घालून कटलेट्स

------ पनीर किसून + ऊ. बटाटा घालून कटलेट्स
कृपया कसे केले ते सांगावे...घरी भरपूर पनीर आहे तर मी पण करून बघेन...
धन्यवाद...

पनीरचे तुकडे आलं लसूण पेस्ट, तिखट मीठ लिंबू लावून मॅरिनेट करा, त्यानंतर तव्यावर शॅलो फ्राय्/ओव्हनमधे भाजून इत्यादी, लय भारी लागतात.

रोचीन >>
पनीर, बटाटा कट्लेट्स असे केले

ऊकडलेला बटाटा कुस्कूरून घेतला, पनीर किसून घेतले, दोन्ही मिक्स केले
त्या धने पूड, जीरे पूड, लाल तिखट, हळद, मीठ, चवीपूरती साखर, बारीक चिरून पुदीना, बारीक चिरून कोथिम्बीर असे सगळे साहीत्य मिक्स
केले
चपटा गोल आकार देउन टीक्क्या केल्या, त्या ब्रेड क्रम मध्ये घोळून तव्यावर शॅलो फ्राय् केल्या
रवा सुध्हा वापरू शकता ब्रेड क्रम नसेल तर

नारळी पोर्णिमेसाठी घरी तीन भाऊ, वहिनी मुले वगैरे येणार आहेत.

नारळीभात व पातोळे करायचा विचार होता पण दोन्ही सारख्याच चवीचे होतील असे वाटतेय. त्यामुळे सणासाठी म्हणून नारळीभात व जेवणानंतर खाण्यासाठी फ्रुट सॅलड करेन. पण मेन मेन्यू म्हणून नारळीभात चालणार नाही कारण कुणीही गोडखाऊ नाहीत. मेन मेन्यू म्हणून नेहमीचे पुलाव, दाल फ्राय, कुरमा, पुऱ्या वगैरे सोडून अजून काय वेगळे बनवता येईल जे फारशी कंबरतोड न करता, थोडी तयारी आदल्या दिवशी करून ठेऊन मला जमेल? किचनमध्ये जास्त उस्तवार मला झेपत नाही.

मटर पनीर,चपात्या, कोशिंबीर ,पापड/कुरडया , वरण/आमटीभात आणि नारळीभात असा मेन्यू की जास्त दगदg her होणार नाही.

चकोल्या? नारळ खऊन घालायचा वरून. One dish meal.
गुजराती हांडवो सुद्धा चांगला option आहे. एक केला कि चार piece करून देऊ शकता. अशे चार पाच खुप होतील नारळी भात आहेच ना थोडा तरी खातीलच ना आणि सोबत नारळी चटणी. पूर्व तयारी केली आदल्या रात्री तर सुटसुटीत होईल.

नारळीभात व जेवणानंतर खाण्यासाठी फ्रुट सॅलड करेन. >> दोन्ही पदार्थ गोडच होतिल.
पिवळी बटाटा मटार भाजी
वरण-भात
पुर्‍या/पोळ्या
बुन्दी रायता/फ्रुट रायत
नारळी भात.

प्राजक्ता छान मेन्यू आहे.

फ्लावर बटाटा मटार रस्सा ओले खोबरे व हिरवे वाटण घालून. अंगाबरोबर रस्सा
हरबर्‍याची उसळ
काकडीची कोशिंबीर किंवा डाळींबाची कोशींबीर. ( डाळींबाचे दाणे ओले खोबरे, कोथिंबीर, मीठ साखर मिरची बारीक कापून व थोडा लिंबू रस)
टोमाटो सार.
नारळी भात.
पोळ्या किंवा पुर्‍या.
नारळी भातच गोड पदार्थ. व इथल्या सायो रेसीपीने मसाले भात केला तर जबरी बेत होईल.
पापड कुरडया तळून.

मी यु का मदतीला. नारळ खोवायचा अभ्यास करून ठेवला आहे इथे वाचून.

सगळ्यांचे आभार.... अमा या की...

प्राजक्ता, सुटसुटीत आहे मेन्यू, असाच करेन. नारळीभात स्टार आयटम ठेवल्यावर बाकी इतर झगमगीत नको, साधेच असलेले बरे असे वाटतेय. हेवी जेवण असेल तर नारळीभात दुर्लक्षित राहील असे वाटतेय. Happy Happy लेक काहीतरी पनीरवाला आयटेम करणार आहे म्हणालीय.

फ्रुट सॅलड फारसे केले जात नाही घरात, बहुतेक वेळी आईस्क्रिम +गु जा वगैरे असते. म्हणून थोडा बदल म्हणून फ्रु स चा विचार करतेय.

मस्त मेनु प्राजक्ता, अमा ,देवकी.
साधना, नारळीभात असेल तर फ्रुट सॅलड ची गरज नाही. एक दिवस खातील म्हणे सगळे नारळीभात. Happy
वरण भाता ऐवजी, प्राजक्ताच्या मेनुत अमांचे टोमॅटो सार जास्त छान वाटेल. पनीरची भाजी करणार असाल तर कढाई पनीर छान जाईल. अगदी सोपे करायला.

तीन भाऊ + त्यांच्या अर्धांगिनीज म्हण्जे इथेच ६ लोक्स + अमा मदतीला + साधना + पोरी. झाले की ८-१० लोकं हिथे.
तर यांकरता जेवणाचा मेनू पाहा बरं -
नारळीभात (हा आदल्या रात्री किंवा जेवणादिवशी स़काळी लवकर केला तर उत्तम; गोडाचे प्रकार जरा मुरल्यावर फार चविष्ट लागतात)
मुलीनं पनीर चा स्टार्टर केला तर वर म्हटल्याप्रमाणे फ्लॉवर ची मटार किंवा स्वीट कॉर्न घालून जरा रस राखलेली भाजी + परोठे (हे उत्तम लागतात याबरोबर; तळण टाळलं जातं आणि पोळ्यावाल्या मावशी असतील तर मग प्रश्नच नाही)
कुठलाही साधा पुलाव + टोमाटो सार
एखादी कोशिंबीर - वर अमांनी दिलेली डाळिंब कोशिंबीर मस्त वाटतेय. किंवा मग बुंदी रायता वगैरे प्रकार आहेतच.

यांवर एखादा फरसाण आयटम अ‍ॅड केला (तयार खमण, अळूवडी, कोथिंबीरवडी इ. काही) की ताट भरून जाईल छान (अर्थात पनीर स्टार्टर नाही हे धरून).
शेवटी ताक किंवा मठ्ठा.

आपल्या आईसारखा जमणारा एखादा पदार्थ करता येईल किंवा आईने रट्टे देवून देवून भावाना खाऊ घातलेला पदार्थ करता येईल. तुमची आई फार सैपाक करत नसेल आता तर त्या त्या चवींसाठी तुम्हीच क्लोझेस्ट ऑप्शन आहात. (किंवा अगदीच खोड्या काढायच्या असतील तर वहिनीला जे पदार्थ जमत नाहीत ते करावे ;)) नायतर बहिणीकडे येण्याच काय विशेष!
पथ्य मोडेल असे पदार्थ कर सांगणारे ही बंधू पाहिले आहेत उदा: एरवी बटर पावभाजी घरचे खाऊ देत नाहीत. मग बहिणीकडे बटर पावभाजी! बहिण - मला काय माहिती होतं...भाऊ - मी नाही खाल्ल तर वाईट दिसतं.. वहिनी - मागे सांगितलं तरी पावभाजी करतात. पण ताईंसारखी सगळ्यांना जमत नाही म्हणून मी ही खाते.

झाले की ८-१० लोकं हिथे.......पहिली ओळ वाचली आणि म्हटल योकु की काय? तर बाप्पा तेच निघाले की!
मेनू छान आहे.पण जरा भरगच्च वाटला.

Pages