Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्रिय करावी आणि समाधी प्लिज
प्रिय करावी आणि समाधी प्लिज एवढा पर्सनल होऊ नका. हा धागा वाचताना खूप मजा येते. कृपया लिहिणे सोडू नका. _/\_ _/\_ _/\_
मला वाटत कि ऑफिसामध्ये दिवसभर काम करून थोडा वेळ मानोरंजन करण्यासाठी टीव्हीसमोर बसावे तर मालिकेत जे दाखवतात ते भरकटलेले लॉजिक बघून खूप त्रास होतो. हे फक्त ह्या मालिके बद्दल नाही तर बऱ्याच मालिकां बाबत असे वाटते. असो 'करावी' तुमचे शब्द सामर्थ्य छान आहे. खूप मजेत चालणारा हा धागा असाच मनोरंजन करत राहो. झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे... पिसे काढत राहावे.
विक्या जेव्हा तिच्या
विक्या जेव्हा तिच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा परत खाली मान घालून ती अशी काही वागत होती की विक्या जबरदस्तीच करत आहे. >>>>>>>> कदाचित विसच खर रुप ( अर्धवट) कळल्यामुळे ईशा त्याला घाबरली असेल. म्हणून त्याच्या नजरेला नजर देत नसावी.
सगळे क्यूज ,हिऔट्स मिळूनही विक्याचा फोटो हातात घेऊन मख्ख चेहर्याने ही विचारते"सर्र....।तुम्ही नक्की कोण आहात आणि नंतर म्हणते सर्र....।।तुम्ही मला का फसवलत >>>>>>>> अगदी अगदी. हे मात्र कैच्याकै होत.
राजेशच्या शेजार्याची कमाल वाटते. राजेशच आणि फॅमिलीच काय झाल असेल हे त्याला पक्क माहित होत, पण जर तो त्याच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहत असेल तर त्याला वास येत नसेल का? खुन होऊन कित्ती आठवडे झाले!
पुढच्या भागात विसने बाजीगरची हिण्ट दिलीय. दादासाहेबान्नी केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचाय म्हणे त्याला.
परवाचा पण सुभाचा शर्ट छान होता निळा व बारीक बुंदके सुभा एकदम छान दिसला व बोलला आहे. सूट छान बो टाय जरा यप्पड दिसतो पर चलता है. >>>>>> +++++++++२२२२२२२२२२२
मी तुम्हाला तुमचे मत बदलायला सांगणार पन नाही
तुमचे विचार तुम्हाला लखलाभ >>>>>>>> +++++++++४४४४४४४४४
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/ec-issues-show-cause-notice-to-...
आज सोन्या आणि ईबाळ मधला
आज सोन्या आणि ईबाळ मधला सवान्द मधे एक मख्ख आणी दुसरी लक्ख अस क्लियर सेपरेशन होत, सोन्या खरच उत्तम अभिनय करते, तिला दिलेल्या निगेतिव्ह शेड्स, जरा तिरक चालणार डोक, बोलताना लाईट अप होणारा चेहरा, सवान्द मधे शार्पनेस अगदी मस्त दाखवते ( तिला कपडे पट फार मर्यादित दिलाय पण ज्या २-३ साड्या आहेत त्या सुद्धा ग्रेस्फुली कॅरी करते ती) आणि त्याविरुद्ध अतिकमाल मर्यादेतल मख्ख इशा बाळ
( गायत्रीने थोड वेट पुट ऑन केलय किवा आज काहितरी गण्दलय पण तिचा चेहरा सुजलेला वाटत होता)
कालच एपी बघून माझं डोकच
कालच एपी बघून माझं डोकच दुखायला लागलं.काल बाळाला पूर्णवेळ सहन कराव लागलं तव बंद करणार होते पण म्हटलं की बाळ सही करत नाही तेवढा सीन तरी बघावा, म्हणून मोठ्या हिमतीने बघितला. मला माझ्या सहनशक्तीच खूप कौतुक वाटत आहे

विस बद्दल एवढे पुरावे मिळूनपण ही बावळट याच संभ्रमात आहे की विस च नाव काय आहे, अग बाई त्याच खर नाव गजा पाटील आहे ही कळलं ना तुला तरीपण काय सगळ्यांना विचारत बसते, आणि तिला फक्त नाव लपवण्याचं वाईट वाटत आहे पण fraud करणारा गपा म्हणजेच विस आहे याचं काही वाटत नाहीये. आणि ती बाळाची प्रतिकृती म्हणजे बाळ स्वतःसोबत बोलताना काय म्हणत होती की ती आधी confident होती आणि नंतर अस म्हणाली की आधी बिलकुल confidence नसलेली होती बाई ग एक काय ते ठराव.
सोन्या चा अभिनय उत्तम, तिचे संवादपण छान होते. मला सोन्या चा रोल खूप आवडतो म्हणजे अगदी practicaclly जगणारी स्वतःच्या तालात असणारी पण मनाने चांगली असणारी, ती एवढ्या वेळ बोलत होती पण बाळ मक्ख, इशा तर कुणी बोलत असलं की काहीही न बोलता मक्ख चेहरा करून बसते फक्त हेच करत आहे ती अस वाटत आपणच बोलून द्यावं
कालच एपी बघून माझं डोकच
कालच एपी बघून माझं डोकच दुखायला लागलं.काल बाळाला पूर्णवेळ सहन कराव लागलं तव बंद करणार होते >>>> एपी केव्हाच बंद केला पहायचा काल टी.व्ही गळत होता तर हिची खरखर चालू होती.त्या आवाजाने डोकं कलकलायला लागलं! शेवटी माबोवर येऊन वाचत बसले.
.... आणि ती बाळाची प्रतिकृती
.... आणि ती बाळाची प्रतिकृती म्हणजे बाळ स्वतःसोबत बोलताना काय म्हणत होती की ती आधी confident होती आणि नंतर अस म्हणाली की आधी बिलकुल confidence नसलेली होती >>>>नसलेली किंवा असलेली कशीही पण स्वच्छ करकरीत इस्त्री हावभावाची हे फक्त सत्य
.... आणि सर्र्रांनी असं काय हिच्यावर उपकार केलेत??..कोणाला माहिती आहे का?
काय बरं म्हणत होती की स्सर्र्रांनी माझ्यासाठी यांव केलं नी त्यांव केलं, मग असं कसं ब्लाब्लाब्ला... आख्खा एपिसोड तवा घासलेल्या आवाजात विचार करत होती...
विक्याने न केलेल्या कोणत्या उपकारांची ओझी त्या बिचार्या ईशावर लेखक /मालिका वाले लादताहेत झी म जाणे.
सॉन्या अभिनय उत्तम.. एक नंबर
सॉन्या एक नंबर अनुमोद न.
सॉन्या एक नंबर अनुमोद न. इथे छायाच हवी. सराला पाण्या त फेकून दिले असते आणि जायदाद घेतली असती बिनधास्त. म्हातारी देतेच आहे तर का नको.? साधी गो ष्ट आहे स्वतःचा रक्ताचा मुलगा असताना आईसाब इतर कोणत्याही व्यक्तीला का देतात इस्टेट? फंडामेंटली राँग. जयडू डोक्याने
बेताचा असेल तर सोनियाला व वकिलाला अॅड्मिन बनवायचे. मी तर असेच केले असते. हिला देउन टाकायची हौसच आहे. तिथे तो एक इशाबाबा व इथे ही रानं आई.
सही करा यचे किंवा न करायचे झाले का? काल फक्त दोघींचा संवाद. मेक इन इंडियाचे प्रमोशन. मी वैताग आला की फुले बघत बसते.
एकच फ्लावर पाट व दोन चित्रे जयडू व सोन्या बोलत असते तेव्हा मागे असतात. सोन्या इशाच्या रूमात आली की मागे तेच फुलदाणी व चित्र.
ह्यामगे काही गूढ असावे. इशाच्या रुमात बेड कपाट सोफा हे सर्व नाटकाच्या सेट वाणी असते. स्पेस कधी लिव्ह्ड इन दिसत नाही. अपेक्षा पण नाही.
सुभा घड्याळ घालून झोपतो? झोपेत पण शिरिमंती दाखवायास होवी. त्यापेक्षा आण्णा परवडले.
कालचा एपी महा रटाळ होता .
कालचा एपी महा रटाळ होता .

आज सोन्या आणि ईबाळ मधला सवान्द मधे एक मख्ख आणी दुसरी लक्ख अस क्लियर सेपरेशन होत>> हो खरंच !
सॉन्या चा अभिनय उत्तम
सुभा घड्याळ घालून झोपतो?>> >एकवेळ ठीक .. पण उशाशी ढणढण दिवे चालू असताना कोणी कसं झोपू शकतं ?
सध्या इशा द्विधा मनःस्थितीत आहे असं दाखवायचं आहे .. कि खरंच विक्या गजा पाटील असेल का ?एवढा जवळचा माणूस जो रोज विश्वासाच्या गोष्टी करतो तो असं खोटं वागेल का ? तिला ते पचनी पडत नाहीये. असं कसं असेल असं वाटतंय ... पण कसलं सगळं बोर चाल्लंय सध्या खरंच
आख्खा एपिसोड तवा घासलेल्या आवाजात विचार करत होती...>> एक करेक्शन .. आख्खा एपिसोड तारेच्या घासणीने तवा घासलेल्या आवाजात विचार करत होती...
त्या मूर्ख ईशाला काल नको त्या
त्या मूर्ख ईशाला काल नको त्या गोष्टी आठवत होत्या पण जालिंदर नावाच्या एका माणसाने याबद्दल आपल्याला आधीच वॉर्न केले होते ते नाही आठवल.केड्याने परत माती खाल्ली.
बर,आज जर जमल तर दुपारी 2.30 वाजता news18 वर शितु आणि सुभाची मुलाखत आहे.,ती बघा.
एक करेक्शन .. आख्खा एपिसोड
..
एक करेक्शन .. आख्खा एपिसोड
एक करेक्शन .. आख्खा एपिसोड तारेच्या घासणीने तवा घासलेल्या आवाजात विचार करत होती... >>>>>अरे देवा!!! नुसत्या कल्पनेनेच कसतरीच वाटलं...हाहाहाहा
आपल्याला जाणवणारा अभिनयातील दोष वगैरे, खटकणाऱ्या, कंटीन्यूईटीच्या नावाने ठणाणा असलेल्या गोष्टी, वयाचा घोळ, नात्यांचा झोल, आणि बरेच काही.. इ. इ. दिग्दर्शकाच्या ध्यानात येत नाहीत का...
अशा खरखरीत आवाजाचा खरंतर चांगला उपयोग करून घेता आला असता... थोडी मेहनत घेतली तर अभिनयाचा मुख्य भाग असणारी देहबोली (बॉडी लँग्वेज), वॉइस मधील चढउतार यात सुधारणा होऊ शकते...
सध्या मालिकेतील कथा लक्षातच रहात नाही, त्यातली पात्रं मात्र डोक्यात जातात...
खरच तुपारे टीम पैकी कोणी तरी हा धागा फॉलो करत असेल तर जरूर याचा विचार करावा..
सॉन्या अभिनय उत्तम.. एक नंबर
सॉन्या अभिनय उत्तम.. एक नंबर >>>>>>> ++++++++१११११११
इथे छायाच हवी. सराला पाण्या त फेकून दिले असते आणि जायदाद घेतली असती बिनधास्त. >>>>>>>>>>> मग विसचा पुनर्जन्म दाखवावा लागला असता , छायाचा बदला घेण्यासाठी.
एकच फ्लावर पाट व दोन चित्रे जयडू व सोन्या बोलत असते तेव्हा मागे असतात. सोन्या इशाच्या रूमात आली की मागे तेच फुलदाणी व चित्र.
ह्यामगे काही गूढ असावे. >>>>>>>>> काही नाही हो. सगळे सीन एकाच खोलीत शूट केले असावे किव्वा एकच फुलदाणी आणि चित्र आलटून पालटून वेगवेगळ्या खोलीत लावत असावेत.
त्या मूर्ख ईशाला काल नको त्या गोष्टी आठवत होत्या पण जालिंदर नावाच्या एका माणसाने याबद्दल आपल्याला आधीच वॉर्न केले होते ते नाही आठवल. >>>>>>>> अगदी अगदी
मला सोन्या चा रोल खूप आवडतो म्हणजे अगदी practicaclly जगणारी स्वतःच्या तालात असणारी पण मनाने चांगली असणारी, >>>>>>> ++++++++११११११११ पण आईसाहेब जस्ट ती किचनच्या कामात लक्ष घालत नाही म्हणून तिला आपली सून मानत नाही.
काल बाळाला पूर्णवेळ सहन कराव लागलं>>>>>> आणि काल तर दोन दोन ईशाबाळान्ना सहन कराव लागल.
दुसच्या ईशाच्या स्वगताच्या वेळी तिला प्रेक्षकान्समोर न दाखवता पाठमोरी दाखवली.
... आणि सर्र्रांनी असं काय हिच्यावर उपकार केलेत??..कोणाला माहिती आहे का? >>>>>> काही नाही. सरान्नी तिला नोकरी दिली, राजनन्दिनी साडीची हेड केली, तिच्याशी लग्न केल, तिला ऑफिसच्या कामासाठी प्रोत्साहन दिले, आत्मविश्वास दिला हे उपकार केलेत तिच्यावर.
सही करा यचे किंवा न करायचे झाले का? >>>>> आज दाखवणार आहेत. त्या सोहळयासाठी ( प्रोमोत सोहळाच दाखवलाय) आईसाहेबान्नी ईशाच्या आई बाबान्ना सुद्दा बोलावलय. झाल, म्हणजे ईशाने सही करायला नकार दिला तर निमकर्स तिला लेक्चर दयायला मोकळे.
विस आणि ईशापेक्षा विस आणि झेण्डेची केमिस्ट्री छान दाखवलीये मालिकेत. एकदम मुन्ना- सर्कीट स्टाईल जोडी. चला, विस कोणाशी तरी एकनिष्ठ आहे तर.
सुभा घड्याळ घालून झोपतो?>>
सुभा घड्याळ घालून झोपतो?>> >एकवेळ ठीक .. पण उशाशी ढणढण दिवे चालू असताना कोणी कसं झोपू शकतं ? >>>>> आणि 30 ते 45 अँगलने शरीर रडत केलेलं असतं. आपण पडून पुस्तक वाचताना किंवा गप्पा मारताना या पोझमध्ये असतो. पण अशी रात्रीची झोप शक्य वाटत नाही. भावेना हे कळू नये आश्चर्य आहे.
कारवी, तुझ्या पोस्ट्स तुझ्या विनोदी टिप्पण्या आणि खोल निरीक्षणामुळे फारच मजेदार असायच्या. म्हणजे वाचलं की पटकन पटायचं की खरंच की असच दाखवतात किंवा ती व्यक्ती असाच अभिनय करते. या धाग्यावर मी तर तुझी फॅन आहे.
तुझ्या त्या objectionable पोस्टबद्दल (माझ्यासाठी नाही), तू मनाला लावून घेऊ नकोस. प्लिज लिहीत रहा. खरं तर तिथली निरीक्षण आणि त्यावरची तुझी टिप्पणी इतकी परफेक्ट होती. की मला इशाचा चेहरा अगदी स्पष्ट त्या एक्सप्रेशनसहीत दिसला. ते पर्समध्ये पॅड नसणं बोरबर लिहिलंस तू.
सॉन्या अभिनय उत्तम.. एक नंबर
सॉन्या अभिनय उत्तम.. एक नंबर >>> ह्यासाठी अगदी अगदी. परवा दोन मिनिटं फक्त एक सीन बघितला त्यात सोन्या आणि जयदीप पण सरस वाटले कितीतरी पटीने नायिकेपेक्षा.
ह्यामगे काही गूढ असावे>> आहो
ह्यामगे काही गूढ असावे>> आहो मी हे सर्कॅस्टिकली लिहीत असते.
वयाच्या घोळा बद्दल एक प्रश्न
वयाच्या घोळा बद्दल एक प्रश्न अजून आहे. रा नं २२ ते २५ एक वर्षाची असताना मेली असावी असे समजले तरच वि सं ४३/४४ चां आणि इशा १९/२० हे गणित जुळू शकते. मग शिल्पा तुळसकर यात २०/२२ वर्षाची दाखवली आहे का? म्हणजे तसे काही ऑब्जेक्शन नाही पण तिचे खरे वय ४३ असे वाचले. मग एखादी अजून एक बालिका रा नं म्हणून घ्यायला हवी होती ना? की रा नं जिवंत आहे असा धक्का येणार आहे?
आपण पडून पुस्तक वाचताना किंवा
आपण पडून पुस्तक वाचताना किंवा गप्पा मारताना या पोझमध्ये असतो.>>>> एका सीनमधे आईसाहेबांना चक्कर आली अस्ते तेव्हा पण त्यांना एकदम अशा अवघडलेल्या पोजिशन मधे झोपलेले दाखवलंय.
महामख्ख ईबाळ, ते अर्धवट तोंड उघडे टाकले आणि भुवया आकुंच केल्या की आपण आश्चर्यचकित, रडवेले, दु:खी, चिंतीत सगळे भाव दाखवू शकतो असं वाटते तिला. फारच वैतागवाणी अॅक्टींग
सॉन्या खरंच ब्राईट आहे एकदम.
मलाही असच वाटत आहे की
मलाही असच वाटत आहे की राजनंदिनी जिवंत आहे.
आज ईशाने पराकाष्ठा केली सुन्न
आज ईशाने पराकाष्ठा केली सुन्न झाल्याचा अभिनय करताना.
तिने सही न केल्याचे समजते तेव्हा विसने आपल्या सगळ्यांना जे एवढे दिवस वाटते आहे तेच बोलून दाखवलं.. (एक थोबाडीत द्यायला हवी होती)
इथे कोणाच्या घरी सासूबाई जावयांचा समोरासमोर जावई बापू असा उल्लेख करतात का.. सीरियसली विचारत आहे कारण आमच्या कडे तरी करत नाहीत. ईआई सतत असंच संबोधत असते..
आलेला राग व्यक्त करताना झेंडेभाऊ नी मान अशी इकडे तिकडे केली जणु धुसफुसणारा रानटी माणूस (हिंदी टारझन मध्ये आहे एक)
बाकी विसला गुलाबी शर्ट शोभत होता.
एक शंका.. ई बाळ म्हणाली की मी
एक शंका.. ई बाळ म्हणाली की मी सही करेन पण अशा पेपर वर ज्यात प्राॅपर्टी जयदीप भौजींच्या नावे होईल... अरेच्या, मला हे नाही समजले की तिला प्रॉपर्टी नकोय म्हणजे तिच्या सहीचा विषय गोल झाला ना??... मग असे काय ड्वायलॉग की मी अशाच पेपर वर सही करेन...
किती बकवास आहे यार!!
विस आणि ईशापेक्षा विस आणि
विस आणि ईशापेक्षा विस आणि झेण्डेची केमिस्ट्री छान दाखवलीये मालिकेत. >> चला हवा येऊ दया च्या टीम ने तर पार त्यांचा दोस्ताना angle करुन टाकला होता
तिला प्रॉपर्टी नकोय म्हणजे
तिला प्रॉपर्टी नकोय म्हणजे तिच्या सहीचा विषय गोल झाला ना??... मग असे काय ड्वायलॉग की मी अशाच पेपर वर सही करेन...
किती बकवास आहे यार!! >> हो नं, कदाचित केड्याला NOC म्हणायचं असेल... काहीही डायलॉग
पण पलटी चं लॉजिक आवडलं
कारवी, होऊन जाऊदे एक मस्त
कारवी, होऊन जाऊदे एक मस्त पोस्ट... धागा फॉलोअर वाट बघत आहेत......

..... कसली एनओसी, त्यात ई बेबीचा काय संबंध?.. अर्थात केड्याच्या लॉजिक नुसार काहीही...
https://www.zee5.com/gu/news
https://www.zee5.com/gu/news/details/mumbai-spotlight-on-tula-pahate-re-...
शितु आणि सुभाचा इंटरव्ह्यू
शितु आणि सुभाचा इंटरव्ह्यू
शितु ह्या सिरीयलमधे आता
शितु ह्या सिरीयलमधे आता एवढ्या उशीराने तरी का यायला तयार झालीये?
हिला आता एवढ्या एवढ्या उशीराने तरी कळायला नको का 
भावे एक फसलाय आधीपासनंच.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/BwGbUlfjW5O/?utm_source=ig_share_sheet&igshi...
कारवी, खरंच येऊ द्या पोस्ट..
कारवी, खरंच येऊ द्या पोस्ट.. बरंच काही झालेलं दिसतंय मालिकेमध्ये.. तुमच्या भाषेत लिहिलेलंच समजतं बुआ आम्हाला2 तर
वयाच्या घोळा बद्दल एक प्रश्न
वयाच्या घोळा बद्दल एक प्रश्न अजून आहे. रा नं २२ ते २५ एक वर्षाची असताना मेली असावी असे समजले तरच>>> हो ती २० वर्षाची असताना गेली .

असं ए ते 
ती जाऊन एवढी वर्ष झाली तरी तिच्या साड्या बिड्या बऱ्या सांभाळून ठेवल्या आहेत यांनी
एका सीनमधे आईसाहेबांना चक्कर आली अस्ते तेव्हा पण त्यांना एकदम अशा अवघडलेल्या पोजिशन मधे झोपलेले दाखवलंय.>> आणि मुख्य म्हणजे असल्या चकरा येताना आजूबाजूला सोफे/ पलंग असतात . ज्या बाजूला सोफे पलंग असतात त्याच बाजूला चक्कर पडते . सोफा मागे असेल तर मागे; पुढे कोणीच पडत नाही ... अगदी बिचारी हिरवीण असेल तर टेबलाचा कोपरा लागून खोक पडते .
बाकी विसला गुलाबी शर्ट शोभत होता.>>+११११ डोळ्यात नक्कीच थोडेसे बदाम
काल इतक्या बुटक्या कॉफी टेबल वर इशा असं वरून वाकून काय सही करत होती ?! घे ना फाईल हातात आणि बस सोफ्यावर .. आणि विक्या हाताला धरून अ ,आ इ शिकवल्यासारखं सही कर असं समजावत होता . काय चाल्लंय ते चाल्लंय .. बोर भाग पळवत पळवत पहिला
भावे एक फसलाय आधीपासनंच. Lol हिला आता एवढ्या एवढ्या उशीराने तरी कळायला नको का>> मी डुबलोय /डुबतोय तुलापण सोबत घेऊन डुबतो
Pages