अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मांजराचे भूत माझ्या घरात फिरत आहे ...! दोन आठवड्यापूर्वी तिला कुत्र्यांनी मारले.

चारपाच दिवसांपासून तिचे भास होतात...!
तिची खाण्यापिण्याची वाटी 'नेहमी' भरलेली असते...! आम्ही न भरता..

रात्री तिच्या ओरडण्याचे आवाज येतात. नखांनी दार ओरबाडल्याचा भास होतो.

विशेष म्हणजे मांजर मारणारा रस्यात्वरचा हट्टाकट्टा कुत्रा परवा एकाएकी मेला.

बायकोने घाबरुन घर सोडायची तयारी दर्शवली आहे..

भूत पळवायचा उपाय सुचवा...!

<<< माझ्या मांजराचे भूत माझ्या घरात फिरत आहे ...! >>>

The other day I told my friend. "I am so lucky. My wife is an Angel".
He said " You are really lucky. Mine is still alive".

अहो, उपाशी बोका,

मी मांजराबद्दल बोलतोय... !

मानव,

जेरी उंदराचा फोटो लावला तर मांजराचे भूत आणखी मांजरभूते गोळा करेल...!
तिला भटकी मांजरे घरात बोलवण्याची सवय होती

आता एक कुत्रा पाळायचा निर्णय घेतला आहे

सुश्या,

दुसऱ्या मांजरालाही कुत्र्यांनी मारु नये आणि दोन्ही मांजरांचे भास एकत्र होऊ नयेत म्हणून कुत्रा पाळतो आहे

मांजराचं भुत असेल तर त्याची खाण्याची वाटी नेहमी भरलेली कशी राहिल?
मांजर भरतं का वाटी?
तुम्ही भरत असाल आणि रिकामी होत असेल तर एकवेळ मांजराच्या भुतानी खाल्लं असा तरी अर्थ निघेल.

मांजराचं भुत असेल तर त्याची खाण्याची वाटी नेहमी भरलेली कशी राहिल?>>>
म्हणजे ते आवाज , भास खऱ्या मंजरामुळे नाहीयेत, नाहीतर तिने खाल्ले असते आणि वाटी रिकामी झाली असती, असं त्यांना सांगायचे आहे.

पण रत्न, हे करणारी चार पायी मांजर नसून दोन पायी मांजर असेल हे तुमच्या ध्यानात नाही आलं का?
तिने दुसरीकडे नविन घर बघितलं असेल, तिला ते खूप आवडले असेल, आणि तुम्ही "कशाला हे घर काय वाईट आहे! काहीही हां" असं म्हणुन मोडता घेतला असेल, आणि "एकदा फक्त बघायला तरी काय हरकत आहे?" ही विनंतीही फेटाळली असेल . म्हणुन ही युक्ती सुरू आहे. . लागतं काय हळूच जाऊन दारावर ओरबाडायला, आणि घराच्या कोपऱ्यात / बाल्कनीत जाऊन म्याव म्याव आवाज काढायला?

मानव,
काही, सांगता येत नाही.. पण तिला घर बदलून हवे असल्यास हा अतिशय वाईट, मार्ग आहे..! Sad
माझ्या मेलेल्या मांजरीच्या आतम्याला शांती लाभो...!!

आमच्या गावाकडे मानकाप्या भूताची भीती असायची. सातनंतर कोणी बाहेर पडायचे नाही. अमावस्येला तो भूत बारा वाजता दारावर थापा मारायचा, असे ऐकलेहोते. नंतर त्याचे काय झाले ठावूक नाही.

काही वर्षां पूर्वी किसन नगर,वागळे इस्टेट ठाणे इथे एक इमारत( राहत्या लोकांची) एकाएकी जमीनदोस्त झाली होती,त्या वेळी आम्ही शालेय जीवनात होतो दुपारी शाळा सुटल्यावर आलो आणि समोरच्या दृश्याना पाहुन छातीत धड़कीच भरली,स्ट्रेचर वरन घेऊन जाणारे मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेतील पाहुन मन सुन्न झाल होत.लहान वयात हे सर्व पाहायला मिळाल होत,इमारत दिवसा कोसळली असल्याने जे नोकरी निमित्त व्यवसायानिमित्त बाहेर पडले होते ते सुदैवा ने वाचले होते पण जे घरी होते उदा.महिला वर्ग,लहान मूले,अजारी व वृद्ध माणस.बहुतेक सर्व च्या सर्व त्या अपघातात बळी पडली होती,एका बिल्डर ने ति इमारत एका नाल्यावर बांधली होती त्याची शिक्षा या निरपराध जीवान्ना जीव गमाऊन मिळाली होती, किती दुष्ट पणा होता त्याचा पण तो ही कुठे तरी लम्पास झाला होता.कित्येक कुटुंब त्याच्या एका चुकिमुळ उध्वस्त झाली होती तर कित्येक बेघर झाली होती.
तो हादसा आमच्या एरियातील लोक हळू हळू विसरत चालले होते पण त्या जागी खुप जणांना विचित्र अनुभव आले होते, इमारत कोसळल्यानंतर तिथला राडा रोडा साफ केल्यावर रिकामी जागा झाली होती तिथे आम्ही लहान मूले क्रिकेट व तत्सम खेळ खेळत पण त्या जागी कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे तर कोणी तरी अदृश्य शक्ति आमच्यात खेळत आहे असे भासत,कधी लहान मूले खेळत असताना जास्त आरडा ओरड केली की त्या जागेतुन काही अदृश्य शक्ति तिथुन पिटाळून लावत असल्याचा भास होत.खुप दा त्या जागेत किंचाळन्याचा आर्ततेने मदतिचा आवाज,रडणयाचा आवाज ऐकला गेला होता.

ह्याच इमारतीची कथा का?

Thane: Court convicts builder, architect for 1998 Sairaj building collapse

The builder and the architect of a building that collapsed in 1998 killing 18 persons, were sentenced to three years in jail by a court here today.

https://realty.economictimes.indiatimes.com/news/regulatory/thane-court-...

त्या ठिकाणी मी अमावस्येच्या रात्री एकटा थांबून आलोय. मला कसलाही भास झाला नाही. घरांचे रेट पडावे म्हणून काहीही अफवा पसरवू नका.

आता तिथे दुसरी इमारत उभी झाली आहे ... आधीच्या पेक्षा थोडी छोटी ... परंतु लोकांना काही अनुभव आल्याचे आढळले नाही. फक्त एक अपवाद वगळता ...

कोणीतरी बोकलत तिथे कोकलत गेले होते तेव्हा लोकांनी दारं खिडक्या एकदम बंद करून घेतल्या होत्या

आताशी गोव्यात शिमगोत्सवाची धूम सुरू आहे. शिमग्यात काणकोण येथे एक अमानवी प्रकार पहायला मिळतो. तो म्हणजे श्री स्थळ मल्लिकार्जुन इथला प्रसिद्ध शिर्षारान्नी उत्सव. कालच हा उत्सव पार पडला. दोन वर्षांनी हा ठराविक प्रकार होतो. तीन शिरांची रांधण आणि शिसवीचे लाकूड वापरले जाते. देवालयाच्या राजांगणात गडे व भगत, अंगावर चंदनाचे लेप लावून येतात, या वेळी देवाची सहाही तरंगे कोणताही आधार न घेता सरळ उभी रहातात. तीन गड्यांच्या दंडावर गरे टोचले जातात आणि याच गड्यांच्या डोक्याचा चूल म्हणून उपयोग करून त्यावर मातीचे भांडे ठेवले जाते. त्यात तांदूळ घातले जातात. शिसविच्या लाकडाचा विस्तव करतात. गड्यांवर अवसर आल्यानंतर भगताच्या अंगात अवसर येतो व तो दाढेत सुपारी घेऊन खाली बसतो. दुसरा भगत त्याच्या डोक्यावर धारदार खड्गाने प्रहार करतो. डोक्यातून रक्त येतं, ते रक्त शिजवलेल्या भातात कालविले जाते. हा भात आजूबाजूला शिंपडला जातो. मात्र भाविकांवर तो पडणार नाही याची काळजी घेतली जाते. त्या नंतर उत्सवाची समाप्ती होते. ही किमया पहाण्यासाठी भाविक गर्दी करतात.

ही पोस्ट तुम्ही स्वतः लिहिली आहे की कॉपी पेस्ट आहे?

स्वतः लिहिली असेल तर नीट कळेल असे लिहा. गडे म्हणजे काय, देवाची तरंगे उभी रहाणे म्हणजे काय, अवसर येणे म्हणजे काय?.

कॉपी पेस्ट असेल तर पास.

Pages