अनेकजण आपल्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह का असतात?

Submitted by Parichit on 3 March, 2019 - 02:51

थोडा नाजूक विषय आहे. पण बोलायला तर हवेच. कारण त्याला सामाजिक महत्व आहे. जास्त पाल्हाळ न लावता थेट विषयावर येतो.


काहीजण (किबहुना बरेचजण) आपल्या वैवाहिक/एंगेज्ड/कमिटेड जोडीदाराविषयी इतके पजेसिव्ह का असतात? मुळात वैवाहिक/लैंगिक जोडीदाराबाबत पजेसिव्ह असणे हे नैसर्गिक आहे कि मानवी संस्कृतीचा परिणाम म्हणून आले आहे? लोक काय म्हणतील अशी भावना त्यामागे असते कि तू फक्त माझाच/माझीच अशी भावना असते? एकमेकाला आपापली स्पेस देऊन संसार करणे सुखकारक कि एकमेकाला जखडून एकमेकांवर पाळत ठेवत जगणे सुखकारक? पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपली संस्कृती नष्ट होईल अशी काहीना भीती वाटते ती किती खरी आहे? ती संस्कृती आपलीशी करणारा एक वर्ग आणि ते करता न आल्याने चिडचिड होणारा दुसरा वर्ग अशामध्ये आपला समाज भरडला जात आहे का?

या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. हे प्रश्न डोक्यात येण्याला कारण तसेच घडले. ती पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे सयुचित वाटते...

माझे माझ्या एका मित्राशी आणि त्याच्या बायकोशी अत्यंत मित्रत्वाचे संबंध आहेत. म्हणजे अर्थातच आधी हा माझा मित्र झाला. मग ती झाली. तशी ती आधी भेटत वगैरे होती. आमची अनेकदा नजरानजर होत होती. पण संवाद असा होत नव्हता. कारण संवादाचे काहीच कारणच नव्हते. पण काळाच्या ओघात अशा काही घटना घडल्या कि त्यामुळे हा माझा मित्र झाला. आवडीनिवडी आणि अनेक बाबींवर आमची मते जुळत असल्याने लवकरच आम्ही चांगले घनिष्ट मित्र झालो. घरी जाणेयेणे वाढले तसे त्याची पत्नी पण माझी चांगली मैत्रीण झाली. म्हणजे थट्टामस्करी करण्याइतकी निखळ मैत्री झाली. पुढे आम्ही व्हाट्सपवर पण जोडले गेलो. मेसेजेसची देवाणघेवाण होत होती. मस्करी पण चालत होती. अर्थात मैत्रीची मर्यादा ठेवूनच, हे वेगळे सांगायला नको. अन्यथा मैत्रीचे नाते राहिलेच नसते. हा आपल्या पत्नीविषयी पजेसिव्ह असेलसे कधीही वाटले नव्हते. नाहीतर काहीजण मी पाहिले आहेत. इतके सुद्धा त्यांना चालत नाही. त्यामानाने हा विचाराने फारच पुढारलेला "वाटत होता". म्हणून मी सुद्धा तिच्याशी संवाद साधताना फार कधी विचार केला नाही. तेवढा विश्वास निर्माण झाला होता आमच्यात. असे कित्येक महिने सुरु होते.

पण एक दिवस विचित्रच घडले. मी नेहमीप्रमाणे तिला मेसेज टाकला. बऱ्याच वेळाने सुद्धा तिला तो पोहोचला नसल्याचे लक्षात आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. तिचा प्रोफाईल फोटो पण गायब होता, स्टेटस सुद्धा दिसत नव्हते. मी तिची व्हाट्सप प्रोफाईल चेक केली आणि माझी शंका खरी ठरल्याचे लक्षात आले. तिने मला ब्लॉक केले होते. मला खूप आश्चर्य वाटले. थोडे वाईट सुद्धा वाटले. काय प्रकार झाला असेल याचा मी अंदाज करू शकत होतो. त्यानंतर हा मात्र भेटत होता. अगदी नेहमीप्रमाणेच. आमच्या गप्पा भेटणे वगैरे सगळे सुरूच होते. त्याच्यात काहीही म्हणजे काहीही फरक जाणवला नाही. जणू काहीच घडलेले नाही. पण ती मात्र अनेक दिवस गायब झाली होती. अधूनमधून भेटायची ती दिसेनाशीच झाली. असे पूर्वी कधी झाले नव्हते. त्यामुळे थोडी चिंता पण वाटू लागली. कारण अनेकदा ती भेटत असे दिसत असे. नक्की काय झालेय याचा मला बोध होईना. पण मित्राच्या आणि माझ्या नात्यात काहीही फरक झाला नसल्याने काही दिवसांनी मी सुद्धा विषय सोडून दिला. कुणी बोलले, बोलले. नाही बोलले, नाही बोलले. असेल काहीतरी झाले म्हणून विषय डोक्यातून काढून टाकला.

आणि एक दिवस अनेक दिवसांनी ती बाहेर दिसली. पण दुरूनच. आम्ही दोघांनीही स्माईल केले. काही झाले आहे असे दोघांपैकी कुणीच दाखवले नाही. मला नाही म्हटले तरी हायसे वाटले. कि चला फार वाईट असे काही घडलेले नसावे. त्यानंतर ते दोघेही अधूनमधून भेटत राहिले. हा तर काय नेहमीच भेटायचा. पण ती सुद्धा भेटू लागली. तिच्याशी पूर्वीइतका संवाद असा होत नव्हताच. एखादे स्माईल आणि हाय हेलो बस्स इतकेच. त्यापलीकडे काहीही बोलणे नाही. व्हाट्सपवरचे संवादसुद्धा अजूनही थांबलेलेच होते. अजूनही मी ब्लॉक होतो.

या सगळ्या प्रकारानंतर लक्षात आले कि तो स्वत:ला दाखवत होता तसा प्रत्यक्षात नव्हता. प्रत्यक्षात तो नक्कीच खूप पजेसिव्ह असणार. पण त्याचबरोबर आमच्यातल्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होऊ नये हे सुद्धा त्याने पाहिले. हे दोन्ही मुद्दे सांभाळताना त्याला बरीच मानसिक कसरत करावी लागली असावी. किंवा कदाचित "आपण नात्यामध्ये एकमेकाला स्पेस देणारे आहोत" असे त्याला "वाटत" असावे पण प्रत्यक्षात वेळ आपल्यावर मात्र त्याला ते हाताळता आले नसेल असाही एक अंदाज आहे. माझा अजून एक मित्र आहे व त्याची पत्नी सुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे. त्या दोघांच्याबाबत मात्र त्याच्यापेक्षा तीच माझी खूप चांगली मैत्रीण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी परिस्थिती आहे. आपापली पूर्ण स्पेस त्यांनी एकमेकाला दिली आहे. नाते म्हणजे एकमेकाला जखडून ठेवणे नव्हे हे त्यांनी जाणले आहे. पण हे सर्वांनाच जमत नाही.

हे जे काही घडले यावर मला सल्ले नको आहेत. ते सगळे सोर्टआउट झाले/होईल तो भाग वेगळा. पण या सगळ्या घटनेमुळे माझ्या मनात वर धाग्याच्या सुरवातीला मांडलेले प्रश्न आले त्यावर आपली मते हवी आहेत. काहीजण आहेत (माझ्या ह्या मित्रासारखे) ज्यांना वरकरणी वाटते कि जोडीदाराला आपापली स्पेस देणे आवश्यक आहे पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर मात्र या गोष्टी हाताळता येत नाहीत. त्यांनी हे कसे हाताळावे? वगैरे वगैरे प्रश्न माझ्या मनात आले. ह्याबाबत मायबोलीकर आपली मते मांडू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाटलीण बाईंसोबत माझा/ त्यांचा कोणी मित्र/मैत्रीण असेल, आणि त्या व्यक्तीचे हेतू गैर असतील, जे पाटलांना कळले आहेत तर पाटील पाटलीण बाईंना याची कल्पना नक्की देतील.
१. जर यात पाटलांचा गैरसमज झाला असेल आणि पाटलीण बाईंनी तो दूर केला तर पाटील खुश, आणि पुन्हा त्यात नाक खुपसणार नाहीत.
२. पाटलीण बाईंना देखील समोरच्या व्यक्तीचा गैर हेतू ठाऊक असतील आणि त्या काही कारणाने पाटलांना सांगू शकत नव्हत्या, पण पाटलांनी विषय काढल्यावर त्यांनी तसं सांगितलं तर पाटील त्या गैर हेतू असणाऱ्या व्यक्तीला शिंगावर घेऊन जगाची सैर करून आणतील.
३. पाटलीण बाईंना जर पाटलांचं मत पटलं तर त्या,
(अ) त्या गैरहेतु असलेल्या व्यक्तीला स्वतःहुन पार्श्वभागावर लाथ घालून आयुष्यातून घालवतील.
(ब) अगदी आयुष्यातून घालवणं अशक्यच असेल, तर त्या व्यक्तीला त्याच्या मर्यादा लक्षात आणून देतील.
(क) पाटलांपेक्षा ती व्यक्ती अधिक योग्य वाटली तर पाटलांच्या पार्श्वभागावर लाथ घालून त्या व्यक्तीला निवडतील, आणि पाटलांना तो निर्णय मान्य असेल. (यानंतर पाटील बेवडे होतील, पाटलीण बाईंना पुन्हा पुन्हा संपर्क करतील, त्रास देतील आणि एक दिवस नाद सोडतील. त.टी. पाटलांना स्वतःवर आणि भावी पाटलीण बाईंवर विश्वास आहे, की परिस्थिती क्रमांक क कधीच उद्भवणार नाही)

पण, पाटील कधीच तगादा लावणार नाहीत, पाटलीण बाईंवर बंधने घालणार नाहीत.
कारण पाटील स्वतः कधीच बंधनात राहिले नाहीत, कुणाला बांधून ठेवणार नाहीत!

- राव पाटील

१. ह्या धाग्याला इतके प्रतिसाद का मिळाले?
अ. लोकांना असे विषय आवडतात.
ब. स्त्री-पुरुष संबंधाच्या चर्चा करायला मिळतात
क. आपले हाय मोराल ग्राउंड दाखवायला मिळते
ड. वरिलपैकी सर्वकाही

माझ्या मते अ .
पण स्वतः विषयी चर्चा सोडून बाकी सर्वांच्या खासगी आयुष्यात लोकांना खूप इंटरेस्ट असतो

प्रतिसाद आवडला राव पाटील.

> १. ह्या धाग्याला इतके प्रतिसाद का मिळाले? >
सुरवातीचे शंभरेक प्रतिसाद धागकर्त्याची टवाळी उडवणारेच आहेत. चूभूद्याघ्या. टाईमपास करत होती लोकं.

बादवे कोणी ही शक्यता विचारात घेतलीय का की परिचित यांचा तो मित्र क्लोजेटेड होमो आहे, आणि परिचितमधे इंटेरेस्टेड आहे, त्याची बायको कबाब में हड्डी बनण्याची शक्यता वाटल्याने त्याने काहीबाही सांगून तिचा पत्ता कट केला, आणि आता परत फिल्ड लावले आहे Proud

आपले हाय मोराल ग्राउंड दाखवायला मिळते
>> हे असावे. कारण पुरुष आयडी च जास्त फेमिनिस्ट असतात, ऍट लीस्ट सोशल मीडिया वर.

बादवे कोणी ही शक्यता विचारात घेतलीय का की परिचित यांचा तो मित्र क्लोजेटेड होमो आहे, आणि परिचितमधे इंटेरेस्टेड आहे, त्याची बायको कबाब में हड्डी बनण्याची शक्यता वाटल्याने त्याने काहीबाही सांगून तिचा पत्ता कट केला, आणि आता परत फिल्ड लावले आहे >> Lol

हा तिसरा angle पुरुष मंडळींच्या लक्षातच नाही आला .
बिचारे पुरुष किती सरळ मार्गी आणि नाकासमोर विचार करतात

बादवे कोणी ही शक्यता विचारात घेतलीय का की परिचित यांचा तो मित्र क्लोजेटेड होमो आहे, आणि परिचितमधे इंटेरेस्टेड आहे, त्याची बायको कबाब में हड्डी बनण्याची शक्यता वाटल्याने त्याने काहीबाही सांगून तिचा पत्ता कट केला, आणि आता परत फिल्ड लावले आहे>> मी कधीचा हेच सांगतोय, यापूर्वी दोनदा टायपून पण झालो, यांचा मित्रच त्याच्या बायकोच्या मोबाईलवरून चॅट करायचा यांच्याशी.

<< बादवे कोणी ही शक्यता विचारात घेतलीय का की परिचित यांचा तो मित्र क्लोजेटेड होमो आहे, आणि परिचितमधे इंटेरेस्टेड आहे, त्याची बायको कबाब में हड्डी बनण्याची शक्यता वाटल्याने त्याने काहीबाही सांगून तिचा पत्ता कट केला, आणि आता परत फिल्ड लावले आहे >>
Lol
Agony Aunt Amy असे एक सदर चालू करा आता.

तिच्या नवऱ्याने तिच्या वर दडपण आणले आसेल हे नाही पटत .
कारण पुरुषांचे संबंध तोडायची पद्धत ही जास्त करून हिंसक मार्गाने जाते .

> नात्यातील व्यक्ती दुरावू नये म्हणून तिच्यावर अंकुश ठेवण्याचे उपाय शोधणे सुरु होते

हेच होत आहे माझ्या मित्राच्या बाबत. शिवाय मी तिचा मित्र आहे अशी आजूबाजूला चर्चा सुरु झाली तर लोक काय अर्थ काढतील वगैरे वगैरे. पण अनेक स्त्रियांचे आजकाल चांगले मित्र असतात. ह्यालाच काय चिंत्ता लागून राहिली आहे माहित नाही.

> पझेसिव्हनेस म्हणजे मालकीहक्क गाजवणे

काही प्रमाणात सहमत. खेडेगावांत स्त्रिया नवऱ्याला "मालक" म्हणत असत. काही ठिकाणी अजूनही म्हणत असतील. ओनरशिपच असते.

> सुरवातीचे शंभरेक प्रतिसाद धागकर्त्याची टवाळी उडवणारेच आहेत.

मी रागारागाने काहीतरी प्रतिसाद द्यावा आणि त्यामुळे मला मायबोलीवरून उडवले जावे असा हेतू असण्याची शक्यता आहे.

> बादवे कोणी ही शक्यता विचारात घेतलीय का की परिचित यांचा तो मित्र क्लोजेटेड होमो आहे

ह्याला मराठीत ल्याटरल थिंकिंग असे म्हणतात. काढायच्या म्हटले तर अशा अनेक शक्यता काढता येतील

> तिच्या नवऱ्याने तिच्या वर दडपण आणले आसेल हे नाही पटत . कारण पुरुषांचे संबंध तोडायची पद्धत ही जास्त करून हिंसक मार्गाने जाते .

नाही माझा मित्र गुंड नाही. शिवाय उच्चशिक्षित पण आहे. शिवाय माझ्याशी मैत्रीचे नाते त्याला तोडायचे नाही. त्यामुळे त्याने हा मधला मार्ग स्वीकारला असावा. अर्थात त्यानेच तिला मला ब्लॉक करायला लावले हा माझा परिस्थितीजन्य पुरावे बेस्ट गेस आहे. ब्लॉक केले तेंव्हा प्रत्यक्ष मी तिथे नव्हतो. फेसबुकवर ती आहे. तिथे मी ब्लॉक नाही. पण तिथे ती माझ्या मेसेजला रिप्लाय पण देत नाही. मेसेज बघितला इतके कळले. असो, तो विषय नाही धाग्याचा.

एकंदर चर्चा आणि माझे पूर्वानुभव पाहता हे वाचणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांना सांगावे वाटते कि आपल्या भिन्नलिंगी मित्रमैत्रिणींचे चाट वेळच्या वेळी डिलीट करत जा. जोडीदारावरचा फाजील विश्वास एक दिवस तुमचा घात करू शकतो. (त्याला/तिला चालते. वाचले तर तो/ती काही म्हणणार नाही. वगैरे. ये सबकुछ झूठ होता है. वक्त आने के बाद सब पजेसिव्ह हो जाते है)

परिचित
तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर टाळले. तुम्हाला तुमच्या पत्नीचा मित्र चालेल का ? त्याच्याशी तुम्ही जसे चाट करता तसे केले तर चालेल का ?

परिचीत मी काही प्रश्न विचारतो त्याची उत्तर द्या म्हणजे समस्या नक्की काय आहे ते समजेल .
तुमचा जो मित्र आहे तो तुमचा बालपणीचा मित्र आहे?

तो तुमचा कॉलेज चा मित्र आहे ?

तो तुमचा ऑफिस मधला मित्र आहे ?
फक्त तुम्ही दोघेच ऐकमेकाचे मित्र आहात की तुमचे अजुन कॉमन मित्र सुधा आहेत? सहसा फक्त दोन पुरुषांची मैत्री आसात नाही कमीत कमी ऐक तरी कॉमन मित्र असतो
T

"एकंदर चर्चा आणि माझे पूर्वानुभव पाहता हे वाचणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांना सांगावे वाटते कि आपल्या भिन्नलिंगी मित्रमैत्रिणींचे चाट वेळच्या वेळी डिलीट करत जा. जोडीदारावरचा फाजील विश्वास एक दिवस तुमचा घात करू शकतो. "

पण मैत्री निर्भेळ असेल तर चॅट लॉग डिलीट करण्याची गरज का पडावी? ज्याचे पुरावे मिटवावे लागतील असे संभाषण इतरांना अजिबात खटकू नये असा आग्रह का?

आज माझा फोन/फेसबुक/मेल इतर काहीही वर भिन्न लिंगी व्यक्तीशी झालेले संभाषण माझा नवरा केव्हाही(मला लॉग डिलीट करण्याचा वेळ न मिळता) बघू शकतो.मी त्याचा बघू शकते.

आणि तरीही आम्ही दोघं ते बघत नाही.बघायची, तपासायची वेळ आणि शंका येणारी परिस्थिती आलीच तर ते बघून तसाही विशेष फरक पडणार नाही ☺️☺️ डॅमेज विल बी अलरेडी डन.त्या केस मध्ये शांत पणे जा सिमरन किंवा सिमरोबा जी ले अपनी जिंदगी म्हणणे जास्त मस्त.

नवीन Submitted by mi_anu on 9 March, 2019 - 12:13
हे अगदी परेफेक्त. दोघांनी दोघांचा फोन कधीही बघू शकावा., आणि तो त्यांनी कधीच बघू नये हे खरे प्रेम आणि विश्वासाचे नाते..

हे अगदी परेफेक्त. दोघांनी दोघांचा फोन कधीही बघू शकावा., आणि तो त्यांनी कधीच बघू नये हे खरे प्रेम आणि विश्वासाचे नाते..

>> सौ बात की एक बात, एकदम सहमत.

"पझेसिव्हनेस = प्रेम" हे समीकरण माझ्या तरी पचनी पडत नाही. प्रेमाचं नातं दुतर्फी असतं, ज्यात दोघांचाही एकमेकांवर विश्वास असणं इज अ मस्ट.

जर एकाही जोडीदाराचा विश्वासच डळमळीत झाला, मग त्या नात्यात प्रेम उरलं कसं ?

आपल्या पार्टनरवर जेव्हा संशय घ्यायची वेळ येते, म्हणजे नात्यातला विश्वास आधीच उडालाय , मग त्यात प्रेम कसं काय आलं ?
संशय खोटा ठरला तर विश्वास संपतो, अन खरा ठरला तर प्रेम. अशी नाती मग गळ्यातली लोढणी होऊन बसतात, आणि भीतीपोटी काही लोक नातं तोडण्याऐवजी प्रेमाचं गोंडस लेबल लावून खुशाल आयुष्यभर ही लोढणी ओढत राहतात.

आणि बायकोने कुणाबरोबर चॅट करावं हे ठरवणारा नवरा कोण ? आणि नवऱ्याने कुणाशी बोलावं, बोलू नये हेही बायकोने का ठरवावे ?

फेमिनिझम मानणारे प्रत्यक्षात पझेसिव्हनेसच्या नावाखाली दुसऱ्याला बांधून ठेवत असतील , तर त्यांचा फेमिनिझम कितपत खरा मानावा ?

दोघांनी दोघांचा फोन कधीही बघू शकावा., आणि तो त्यांनी कधीच बघू नये हे खरे प्रेम आणि विश्वासाचे नाते..

व. पु. काळेंची आठवण आली.

हे अगदी परेफेक्त. दोघांनी दोघांचा फोन कधीही बघू शकावा., आणि तो त्यांनी कधीच बघू नये हे खरे प्रेम आणि विश्वासाचे नाते..>>> एकदम सही हेला!

मी रागारागाने काहीतरी प्रतिसाद द्यावा आणि त्यामुळे मला मायबोलीवरून उडवले जावे असा हेतू असण्याची शक्यता आहे. >>> Lol

आणि बायकोने कुणाबरोबर चॅट करावं हे ठरवणारा नवरा कोण ? आणि नवऱ्याने कुणाशी बोलावं, बोलू नये हेही बायकोने का ठरवावे ?
>>मुद्दा बरोबर आहे, पण सगळेच समजूतदार नसतात.
पार्टनर संशय घेणारा नसला तरी जे चाललंय ते डिस्टरब कशाला करायचं म्हणून त्याला/तिला आवडत नाही म्हणून एखाद्या व्यक्तीशी बोलणे सोडणे, एखाद्या व्यक्तीचे चाट्स डिलीट करणे का करत नसतील लोक.
भांडणे आणि डिस्टर्बनस कोणाला हवा असतो, पीस ऑफ माईड साठी प्रायोरिटी बघून गोष्टी ठरवल्या जातात.

पार्टनर संशय घेणारा नसला तरी जे चाललंय ते डिस्टरब कशाला करायचं म्हणून त्याला/तिला आवडत नाही म्हणून एखाद्या व्यक्तीशी बोलणे सोडणे, एखाद्या व्यक्तीचे चाट्स डिलीट करणे का करत नसतील लोक.
>>

असेलही. पण याचा अर्थ तुमच्या नात्याचा पायाच कच्चा आहे, असा निघतो.

बरं क्षणभर धरून चालू की स्वतःची इच्छा असूनपण केवळ नवऱ्याला/बायकोला आवडणार नाही म्हणून एखाद्याने चॅट करायचं सोडून दिलं. हे एक तुलनेनं कमी जाचणार बंधन आहे. पण हि गोष्ट तिथपर्यंतच थांबेल याची काय खात्री ? आज जो नवरा मित्राबरोबर चॅट करण्यावर आक्षेप घेऊ शकतो, तो उद्या बायकोच्या फिरण्यावर घेईल, तिच्या कपड्यांवर घेईल. पार्टनरच्या खुशीसाठी अशी किती बंधनं दुसऱ्या जोडीदाराने स्वेच्छेने घ्यायची ?

अशा बंधनामुळेच पुढे नात्यात कडवटपणा येतो. पुढे एवढ्या तेवढ्या कारणामुळे भांडणं झाली कि हीच सो कॉल्ड 'प्रेमात असणारी' त्यागमूर्ती जोडपी, मग "मी तुझ्यासाठी यंव केले नी त्यंव केले" अशा टाईपचे डायलॉग फेकायला कमी करत नाहीत.

आयुष्यभराचं नातं आनंदात टिकवायचं असेल तर अशी बंधनं टाळलेलीच बरी. इथं लॉन्ग टर्म मध्ये कुणीही आनंदी राहू शकत नाही , मग तुम्ही ती स्वतःहून लादून घेतलेली का असेना.

च्रप्स बरोबर आहे.
एक तत्वाचा मुद्दा म्हणून विचार केला तर तसे करणे चूक.
इतर अनेक बाबतीत जोडीदार कसा आहे, ज्या व्यक्ती सोबत संबंध वाढवण्यास मनाई करत आहे तिच्या सोबत मैत्री खरच वाढवायची आहे का आणि त्यासाठी वादविवाद घालणे, मुद्दा उचलून धरणे वर्थ आहे की नाही वगैरे विचार सुद्धा लोक करतात.
जर जोडीदार प्रत्येक किंवा बऱ्याच बाबतीत असे करत असेल तर अर्थात गोष्ट वेगळी.

मुळात आपल्याला (फक्त मैत्रीण म्हणून किंवा फक्त मित्र म्हणून) आवडणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या जोडीदाराने किती पझेसिव्ह असावं हे आपण नाही ठरवू शकत.पार्लर मध्ये हेड ऑइल मसाज करताना आर्टिस्ट 'फिंगर प्रेशर ठीक है ना, या कम रखु' विचारतात तसं आपल्याला ते जोडीदार 'पझेसिव्ह लेव्हल ठीक है ना, या कम करू' विचारून सुरुवात करणार नाही आहेत ☺️☺️☺️

आपल्या मित्र/मैत्रिणीला आपल्या बरोबर चे नाते एक लग्न उडवून लावून चालू ठेवण्या इतके वर्थ वाटत असेल तर ते विरोध करून तुम्हाला परत संपर्क करतीलच.

जर जोडीदार प्रत्येक किंवा बऱ्याच बाबतीत असे करत असेल तर अर्थात गोष्ट वेगळी.
>>

हेच माझं म्हणणं आहे.
तुम्हीच विचार करा, ज्याला बायकोचं दुसऱ्या पुरुषाबरोबर फ्रेंडली चॅट करणं आवडत नाही, जी खरंतर अगदी छुल्लक गोष्ट आहे; तो तिचा इतर बाबतीतला मोकळेपणा खरोखर नजरेआड करेल ? अन समजा केलं तरी त्याच्या मनात संशय राहणारच नाही असं कशावरून ? हाच संशय पुढं जोडप्यातल्या विसंवादाचं कारण बनतो. शब्दाने शब्द वाढला की एकतर बायको मन मारून नातं जपण्यासाठी शरणागती पत्करते, अन शहाणी असली तर सरळ काडीमोड घेते.

प्रश्न तत्वाचा नाहीच आहे, आहे तो नातं टिकवण्याचा. नात्यात विश्वास नसला की दुस्वास आलाच .

सर्वांचा ऐक गैरसमज झालाय
सर्व फक्त सॅक्शुअल relation par पुरुष बरोबर ह्याच्या भोवतीच फिरतात .ती तर मतभेद आणि अविश्वास ह्याची अंतिम पायरी आहे .तिथून सहिसलामत कोण्ही परत येत नाही.
त्या व्यतिरिक्त असे खूप कारण आहेत त्यामुळे दोघा मधील ऐक दुखावला जातो .
आणि ही नात तुटायची पहिली पायरी आहे .
मोबाईल चेक करायचे स्वतंत्र हा पॉइंट तर बालिश आहे .
जे खेळाडू आसतात त्यांना समोरची टीम आपल्याला कशी हरवू शकेल हे माहीत आसात . स्वतंत्र देणे हे म्हटलं तर ऐक खेळी पण आस्ते

Pages