अनेकजण आपल्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह का असतात?

Submitted by Parichit on 3 March, 2019 - 02:51

थोडा नाजूक विषय आहे. पण बोलायला तर हवेच. कारण त्याला सामाजिक महत्व आहे. जास्त पाल्हाळ न लावता थेट विषयावर येतो.


काहीजण (किबहुना बरेचजण) आपल्या वैवाहिक/एंगेज्ड/कमिटेड जोडीदाराविषयी इतके पजेसिव्ह का असतात? मुळात वैवाहिक/लैंगिक जोडीदाराबाबत पजेसिव्ह असणे हे नैसर्गिक आहे कि मानवी संस्कृतीचा परिणाम म्हणून आले आहे? लोक काय म्हणतील अशी भावना त्यामागे असते कि तू फक्त माझाच/माझीच अशी भावना असते? एकमेकाला आपापली स्पेस देऊन संसार करणे सुखकारक कि एकमेकाला जखडून एकमेकांवर पाळत ठेवत जगणे सुखकारक? पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपली संस्कृती नष्ट होईल अशी काहीना भीती वाटते ती किती खरी आहे? ती संस्कृती आपलीशी करणारा एक वर्ग आणि ते करता न आल्याने चिडचिड होणारा दुसरा वर्ग अशामध्ये आपला समाज भरडला जात आहे का?

या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. हे प्रश्न डोक्यात येण्याला कारण तसेच घडले. ती पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे सयुचित वाटते...

माझे माझ्या एका मित्राशी आणि त्याच्या बायकोशी अत्यंत मित्रत्वाचे संबंध आहेत. म्हणजे अर्थातच आधी हा माझा मित्र झाला. मग ती झाली. तशी ती आधी भेटत वगैरे होती. आमची अनेकदा नजरानजर होत होती. पण संवाद असा होत नव्हता. कारण संवादाचे काहीच कारणच नव्हते. पण काळाच्या ओघात अशा काही घटना घडल्या कि त्यामुळे हा माझा मित्र झाला. आवडीनिवडी आणि अनेक बाबींवर आमची मते जुळत असल्याने लवकरच आम्ही चांगले घनिष्ट मित्र झालो. घरी जाणेयेणे वाढले तसे त्याची पत्नी पण माझी चांगली मैत्रीण झाली. म्हणजे थट्टामस्करी करण्याइतकी निखळ मैत्री झाली. पुढे आम्ही व्हाट्सपवर पण जोडले गेलो. मेसेजेसची देवाणघेवाण होत होती. मस्करी पण चालत होती. अर्थात मैत्रीची मर्यादा ठेवूनच, हे वेगळे सांगायला नको. अन्यथा मैत्रीचे नाते राहिलेच नसते. हा आपल्या पत्नीविषयी पजेसिव्ह असेलसे कधीही वाटले नव्हते. नाहीतर काहीजण मी पाहिले आहेत. इतके सुद्धा त्यांना चालत नाही. त्यामानाने हा विचाराने फारच पुढारलेला "वाटत होता". म्हणून मी सुद्धा तिच्याशी संवाद साधताना फार कधी विचार केला नाही. तेवढा विश्वास निर्माण झाला होता आमच्यात. असे कित्येक महिने सुरु होते.

पण एक दिवस विचित्रच घडले. मी नेहमीप्रमाणे तिला मेसेज टाकला. बऱ्याच वेळाने सुद्धा तिला तो पोहोचला नसल्याचे लक्षात आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. तिचा प्रोफाईल फोटो पण गायब होता, स्टेटस सुद्धा दिसत नव्हते. मी तिची व्हाट्सप प्रोफाईल चेक केली आणि माझी शंका खरी ठरल्याचे लक्षात आले. तिने मला ब्लॉक केले होते. मला खूप आश्चर्य वाटले. थोडे वाईट सुद्धा वाटले. काय प्रकार झाला असेल याचा मी अंदाज करू शकत होतो. त्यानंतर हा मात्र भेटत होता. अगदी नेहमीप्रमाणेच. आमच्या गप्पा भेटणे वगैरे सगळे सुरूच होते. त्याच्यात काहीही म्हणजे काहीही फरक जाणवला नाही. जणू काहीच घडलेले नाही. पण ती मात्र अनेक दिवस गायब झाली होती. अधूनमधून भेटायची ती दिसेनाशीच झाली. असे पूर्वी कधी झाले नव्हते. त्यामुळे थोडी चिंता पण वाटू लागली. कारण अनेकदा ती भेटत असे दिसत असे. नक्की काय झालेय याचा मला बोध होईना. पण मित्राच्या आणि माझ्या नात्यात काहीही फरक झाला नसल्याने काही दिवसांनी मी सुद्धा विषय सोडून दिला. कुणी बोलले, बोलले. नाही बोलले, नाही बोलले. असेल काहीतरी झाले म्हणून विषय डोक्यातून काढून टाकला.

आणि एक दिवस अनेक दिवसांनी ती बाहेर दिसली. पण दुरूनच. आम्ही दोघांनीही स्माईल केले. काही झाले आहे असे दोघांपैकी कुणीच दाखवले नाही. मला नाही म्हटले तरी हायसे वाटले. कि चला फार वाईट असे काही घडलेले नसावे. त्यानंतर ते दोघेही अधूनमधून भेटत राहिले. हा तर काय नेहमीच भेटायचा. पण ती सुद्धा भेटू लागली. तिच्याशी पूर्वीइतका संवाद असा होत नव्हताच. एखादे स्माईल आणि हाय हेलो बस्स इतकेच. त्यापलीकडे काहीही बोलणे नाही. व्हाट्सपवरचे संवादसुद्धा अजूनही थांबलेलेच होते. अजूनही मी ब्लॉक होतो.

या सगळ्या प्रकारानंतर लक्षात आले कि तो स्वत:ला दाखवत होता तसा प्रत्यक्षात नव्हता. प्रत्यक्षात तो नक्कीच खूप पजेसिव्ह असणार. पण त्याचबरोबर आमच्यातल्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होऊ नये हे सुद्धा त्याने पाहिले. हे दोन्ही मुद्दे सांभाळताना त्याला बरीच मानसिक कसरत करावी लागली असावी. किंवा कदाचित "आपण नात्यामध्ये एकमेकाला स्पेस देणारे आहोत" असे त्याला "वाटत" असावे पण प्रत्यक्षात वेळ आपल्यावर मात्र त्याला ते हाताळता आले नसेल असाही एक अंदाज आहे. माझा अजून एक मित्र आहे व त्याची पत्नी सुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे. त्या दोघांच्याबाबत मात्र त्याच्यापेक्षा तीच माझी खूप चांगली मैत्रीण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी परिस्थिती आहे. आपापली पूर्ण स्पेस त्यांनी एकमेकाला दिली आहे. नाते म्हणजे एकमेकाला जखडून ठेवणे नव्हे हे त्यांनी जाणले आहे. पण हे सर्वांनाच जमत नाही.

हे जे काही घडले यावर मला सल्ले नको आहेत. ते सगळे सोर्टआउट झाले/होईल तो भाग वेगळा. पण या सगळ्या घटनेमुळे माझ्या मनात वर धाग्याच्या सुरवातीला मांडलेले प्रश्न आले त्यावर आपली मते हवी आहेत. काहीजण आहेत (माझ्या ह्या मित्रासारखे) ज्यांना वरकरणी वाटते कि जोडीदाराला आपापली स्पेस देणे आवश्यक आहे पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर मात्र या गोष्टी हाताळता येत नाहीत. त्यांनी हे कसे हाताळावे? वगैरे वगैरे प्रश्न माझ्या मनात आले. ह्याबाबत मायबोलीकर आपली मते मांडू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. मला एका गोष्टीचे राहून राहून आश्चर्य वाटते कि धाग्यात वा माझ्या प्रतिसादांत सुद्धा मी कुठेही...

१. अमुक एका व्यक्तीने माझ्याशी बोलणे बंद केले मला ब्लॉक केलेय मी काय करू?
२. अमुक एका व्यक्तीविषयी माझ्या मनात काहीतरी आहे ते त्या व्यक्तीला कसे सांगू?
३. मी कुणालातरी खूप मिस करत आहे आता काय करू?

या वा अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न उपस्थित केले नाहीत. मूळ धाग्यातील वाक्ये वाचा...

मित्राच्या आणि माझ्या नात्यात काहीही फरक झाला नसल्याने काही दिवसांनी मी सुद्धा विषय सोडून दिला. कुणी बोलले, बोलले. नाही बोलले, नाही बोलले. असेल काहीतरी झाले म्हणून विषय डोक्यातून काढून टाकला.

तरीही बहुतेकांनी मला न मागितलेल्या उपदेशाचे डोस पाजले आहेत. म्हणून नक्की माझ्याच धाग्यावर प्रतिसाद आहेत का याची शंका आल्याने मी स्वत:चाच धागा पुन्हा वाचून घेतला. Rofl खरेच मला प्रचंड हसायला येत आहे. मी धाग्यात व नंतर सुद्धा सांगितले आहे कि जोडीदाराबाबत पजेसिव्ह असण्याची अनेक जणांची वृत्ती आहे ती योग्य आहे का असा मुद्दा आहे. धाग्यात हाच विषय आहे पण त्याला अनुसरून फार कमी प्रतिसाद दिसत आहेत व बहुतेकांनी मला ब्याशिंग करण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे असे प्रतिसाद मी दुर्लक्षित करत आहे. शिवाय धाग्याखाली स्पष्ट सूचना लिहून सुद्धा माझे इतर धागे वाचून त्याविषयी इथे लिहिले आहे. त्यामुळे ते सुद्धा प्रतिसाद मी दुर्लक्षित करत आहे.

> how to develop an irresistible personality यावर अचूक असं काहीतरी

आपण Temptation Island हि सेरीज पाहिली आहे का? माझा मुद्दा लक्षात येईल. एकमेकांशी "एंगेज" झालेल्या पंधरा कपल्सना एका आयलंडवर पाठवतात. बिग बॉस शो आहे तसाच प्रकार. फक्त इथे हा शो झाल्यानंतर यातल्या किती कपल्सची बॉंडिंग टिकून राहतात, हे आव्हान आहे.

दक्षिणाताई, आपल्या प्रतिसादातले फक्त ६ व ७ हे मुद्देच धाग्याच्या विषयाला धरून वाटतात म्हणून त्यास उत्तर देत आहे...

> कुणी कुणाच्या बाबतीत पझेसिव्ह असावे की नाही, किती आसावे याचे गणित आपण का मांडतोय?

कारण त्याला सामाजिक महत्व आहे. हुंडा घेणे योग्य कि अयोग्य या चर्चेत "कुणी कुणाकडून किती हुंडा घ्यावा याचे गणित आपण का मांडतो?" असे विचारल्यासारखा हा प्रश्न आहे.

> कुणाची स्पेस ची मर्यादा कुठे संपते आणि कुठे सुरू होते याचाही विचार आपण का करतो? आपण स्पेस म्हणून काय अपेक्षा करतो, आणि स्पेस म्हणून काय देऊ शकतो ते पहावे आणि पुढे चालावे.

त्या दुसऱ्या धाग्यावर - ठरलेले लग्न मोडले ती कथा - तिथे स्पेस न देणाऱ्या मुलाला ती मुलगी लग्नाआधी रिजेक्ट करते त्याचे आपण समर्थन केलेत. इथे मी सुद्धा तोच मुद्दा उपस्थित केलाय - स्पेस न मिळण्याबाबत - तर इथे मात्र आपणास हे प्रतिप्रश्न सुचले. हा दुजाभाव का?

> पण तुम्ही काही पुढाकार घेत नाही बघून कंटाळली असेल, केला असेल ब्लॉक ?

च्रप्स, नर्मविनोद आवडला. हसायला आले. धन्यवाद. पण नाही. धाग्याच्या विषयाशी संबंधित नाही.

> त्या मुळे त्यांच्या बाबतीतच आस का घडत हा मूळ प्रश्न आहे

मूळ मुद्दा तुम्हाला पोचलेला नाही. ह्या प्रतिसादामुळे आपणास व आपणासारख्या इतरांस तो पोहचेल अशी अंधुकशी आशा

>> दुसऱ्या धाग्यावर - ठरलेले लग्न मोडले ती कथा - तिथे स्पेस न देणाऱ्या मुलाला ती मुलगी लग्नाआधी रिजेक्ट करते त्याचे आपण समर्थन केलेत. इथे मी सुद्धा तोच मुद्दा उपस्थित केलाय - स्पेस न मिळण्याबाबत - तर इथे मात्र आपणास हे प्रतिप्रश्न सुचले. हा दुजाभाव का?>> ऑSs दुसऱ्या धाग्याचा संदर्भ आणायचा नाही म्हणता आणि तुमच्या डोक्यात ती पूर्वीची गणितं चालू आहेत की! एक पे रैना जी!

जोडीदाराबाबत पजेसिव्ह असण्याची अनेक जणांची वृत्ती आहे ती योग्य आहे का असा मुद्दा आहे>>

हे पहा तुम्ही फक्त एका मित्राची सविस्तर हकीकत सांगून अनेक जणांची अशी वृत्ती आहे असा दावा करताय. त्यामुळे साहजिकच लोकांना वाटणार नाही का की एका उदाहरणावरून असा कसा निष्कर्ष काढता येईल?

तेव्हा जास्त नाही, अजून किमान दहा बारा असे सविस्तर किस्से सांगितले तर बऱ्याच जणांची अशी वृत्ती असते हे लोकांच्या लक्षात येऊन तुमचा मुद्दा लोकांना कळेल आणि मग ते योग्य ती प्रतिक्रिया देऊ शकतील.

अन्यथा वन ऑड केस समजून लोक आता जशा प्रतिक्रिया देत आहेत तशाच देत रहातील.

> ऑSs दुसऱ्या धाग्याचा संदर्भ आणायचा नाही म्हणता आणि तुमच्या डोक्यात ती पूर्वीची गणितं चालू आहेत की!

ओ माय GOD Uhoh ह्द्द्द आहे ब्वा इथे. अहो थोडे तरी वाचत जा ना प्रतिक्रिया लिहिण्यापूर्वी. दक्षिणाताईनी याच विषयाशी संबंधित अन्य एका (माझ्या नव्हे) धाग्यावर मांडलेल्या त्यांच्याच मताविषयी बोलतोय मी.

मुळात वैवाहिक/लैंगिक जोडीदाराबाबत पजेसिव्ह असणे हे नैसर्गिक आहे कि मानवी संस्कृतीचा परिणाम म्हणून आले आहे?

हे नैसर्गिक आहे ,ह्यात परत फरक आहे लैंगिक जोडीदार आणि वैवाहिक जोडीदार ह्यात फरक आहे ,
लैंगिक जोडीदार मध्ये व्यक्ती भावनिक दृष्टया गुंतला असेलच आस नाही बऱ्याच ठिकाणी असे संबंध वर वर चे असतात आशा वेळेस ती व्यक्ती दुसऱ्याच्या जास्त जवळ जात असेल तर मानसिक परिणाम होत नाही possesive पणा सुद्धा नसतो ,भावनिक गुंतवणूक असेल तर मात्र उलट घडत त्यात असुक्षेतेची भावना वरचढ होते ।,
दुसर वैवाहिक जोडीदार असेल तर नात खूप गुंतागुंतीचं आसात ,ह्या नात्यात फक्त स्त्री आणि पुरुष संबंध aivdach संदर्भ नसतो ,इथे तुम्ही म्हणता त्या प्रमाणे सामाजिक दबाव ,संसुकृती,मुलांपासून आईवडील ची जबादारी ,नातेवाईक हे सर्व घटक आणि त्यांची सुद्धा प्रतिष्ठा सांभाळणे ही जबाबदारी येऊन पडते ,
आणि ह्या नात्यात व्यक्ती*(स्त्री आणि पुरुष,) जास्त संवेदनशील असतात ,व्यक्ती स्वातंत्र ला मर्यादा येतात ,
त्या मुळे सर्वानीच विवाहित व्यक्ती शी संबंध ठेवताना त्यांची कुटूंब अस्तव्यस्त होईल इथपर्यंत व्यक्ती स्वतंत्र ची apeksha ठेवू नये स्वतःवर थोडी बंधन घालवीत

Rajesh188, आपला प्रतिसाद मनापासून आवडला. जोडीदाराबाबत पजेसिव्ह असणे हे नैसर्गिक असू शकते. प्राण्यांत हत्तीमध्ये सुद्धा अशी वृत्ती असते असे ऐकून आहे. खरेखोटे माहित नाही.

> विवाहित व्यक्ती शी संबंध ठेवताना त्यांची कुटूंब अस्तव्यस्त होईल

संबंध हा शब्द जरा... बरं 'मैत्री करताना' असे म्हणेन मी. म्हणजे सर्वांनाच हे हाताळता येत नाही. काहीजण हाताळू शकतात. माझ्या मते ते स्त्रोंग माइंड वाले असतात.

जोडीदार ,मित्र, जेव्हा नशेत असतो मग ती कोणतीही आसू द्या ,
तोल जो पर्यंत सांभाळत आहे तो पर्यंत सावरण्याची गरज नसते पण जेव्हा आस जाणवते की ही व्यक्ती तोल जाऊन पडू शकते तेव्हाच support चा मजबूत हात देऊन हस्तक्षेप करावा लागतो ,
नशेत असलेला माणूस आपण तोल जाऊन पडू हे सुद्धा मान्य करत नाही ।
पडणे ह्याचा अर्थ ; भावनिक दृष्टया कोलमडून पडणे,आर्थिक दृष्टया कोलमडून पडणे हे सर्व प्रकार

नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 4 March, 2019 - 19:24. >>>>>. This was hilarious Lol

जोडीदाराबाबत पजेसिव्ह असणे हे नैसर्गिक असू शकते. प्राण्यांत हत्तीमध्ये सुद्धा अशी वृत्ती असते असे ऐकून आहे.>>>> फक्त सेक्स पार्टनर नाही, other wise सुद्धा प्राणी 'पसेसिव्ह' असतात. त्यांच्यामध्ये ही भावना असते. माझ्या आणि शेजाऱ्यांचा कुत्रा एकाच वेळेस आणले आणि एकाच वयाचे आहेत. ते दोघे एकमेकांबद्दल अतिशय पसेसिव्ह आहेत. त्या दोघांपैकी कोणी तिसऱ्या डॉगशी खेळू शकतं नाही. दुसरा लगेच गोंधळ घालतो ( दोघेही बेस्ट फ्रेंड्स आहेत. गे नक्की नाहीत Wink )

अजून किमान दहा बारा असे सविस्तर किस्से सांगितले तर >>>> Rofl

त्या दहा बारा जणांना जर या कॉमन मित्राबाबत समजले तर काय होईल हाच विचार आला मनात..

प्राण्यांत आहे आणि नैसर्गिक आहे म्हणजे ते योग्य आहे असे पण नाही. मोकळीक देण्याइतका विश्वास दाखवला पाहिजे. तेवढे तुम्ही मानाने स्त्रोंग पाहिजे असे माझे मत आहे. माझ्या मते पजेसीव्ह लोक दुबळे असतात. तुम्ही जितके जखडून ठेवाल तितकी ती व्यकी तुमच्या पाशातून मुक्त व्हायला बघेल हे नैसर्गिक आहे. नाना पाटेकर आणि मनीषा कोईरालाचा एक जुना मुव्ही आहे. नाव आठवत नाही. पण पजेसिव्ह नाते काय असते खूपच तीव्रतेने दाखवले आहे त्यात. नाना पाटेकर हा खूपच पजेसिव्ह नवरा दाखवलाय. बायकोवर प्रेम करत असतो. पण किती पजेसिव्ह? हारासमेंट अक्षरश:.. शेवटी ती पळून दुसर्या शहरात जाते आणि जॉकी श्रॉफ बरोबर लग्न करते. तर तिथे पण हा तिचा पाठलाग करत येतो. शेवट फार ह्र्दयस्पर्शी आहे सिनेमाचा.

> त्या दहा बारा जणांना जर या कॉमन मित्राबाबत समजले तर काय होईल हाच विचार आला मनात..

किरणुद्दीन तुम्ही माझ्या धाग्यांबाबत पजेसिव्ह जाहला आहात असे मला वाटू लागले आहे

नाना पाटेकर हा खूपच पजेसिव्ह नवरा दाखवलाय. बायकोवर प्रेम करत असतो. पण किती पजेसिव्ह? हारासमेंट अक्षरश:.. शेवटी ती पळून दुसर्या शहरात जाते आणि जॉकी श्रॉफ बरोबर लग्न करते. तर तिथे पण हा तिचा पाठलाग करत येतो. शेवट फार ह्र्दयस्पर्शी आहे सिनेमाचा.
तुम्ही स्वताला जॅकी श्रॉफ च्या भूमिकेत बघता काय?

जोडीदाराबाबत पजेसिव्ह असण्याची अनेक जणांची वृत्ती आहे ती योग्य आहे का असा मुद्दा आहे. धाग्यात हाच विषय आहे पण त्याला अनुसरून फार कमी प्रतिसाद दिसत आहेत >> हे जे प्रतिसादात लिहिलं आहे तुम्ही तेच धाग्याच्या सुरूवातीस का नाही लिहिले? इतकी मोठी गोष्ट लिहून स्वत:च धागा का भरकटवलात? आँ? Uhoh
एक तर थेट कोल्हापूरला न जाता मध्येच सातारा फिरवून आणलात मग तिथल्या प्रेक्षणीय स्थळाबद्दल लिहिल्यावर माझा धागा त्यावर बोलण्यासाठी नाहीच मुळी असा पवित्रा घेतलात. तरी बरं मी सातारा कोल्हापूर दोन्ही कव्हर केले Proud

त्या दुसऱ्या धाग्यावर - ठरलेले लग्न मोडले ती कथा - तिथे स्पेस न देणाऱ्या मुलाला ती मुलगी लग्नाआधी रिजेक्ट करते त्याचे आपण समर्थन केलेत. इथे मी सुद्धा तोच मुद्दा उपस्थित केलाय - स्पेस न मिळण्याबाबत - तर इथे मात्र आपणास हे प्रतिप्रश्न सुचले. हा दुजाभाव का? >> तुम्हाला माझा स्पेसबद्दलचा मुद्दा कळला नाही म्हणजे. मी लिहिलंय की आपण स्पेस मिळावा म्हणून काय अपेक्षा करतो आणि दुसर्‍याला स्पेस म्हणजे काय देऊ शकतो याचा विचार करून पुढे चालावे. कथेला दिलेला प्रतिसाद अजिबात अस्थायी नाही. कारण माझ्या पुरती स्पेस ची व्याख्या मला क्लियर आहे, त्या गोष्टीत मी स्वतःला रिलेट करून माझ्यापुरता (योग्य) प्रतिसाद दिला आहे.

धन्यवाद(च)

दक्षिणा, अगदी अगदी गं.

मुळात ज्या मुद्द्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे तोच मुद्दा अगदी एका ओळीत का असेना मांडायला हवा होता ना. ही एवढी तपशीलवार पर्सनल स्टोरी लिहायची काय गरज होती?? एक मित्र- त्याची बायको- माझी मैत्रीण आणि नंतर म्हणे नवराच पझेसिव्ह.

तुमच्या मित्राच्या बायकोला स्पेस हवी का?? ती किती हवी?? हे तिचं तिला ठरवू द्या की. तुम्हाला का त्रास तिच्या नवऱ्याच्या पझेसिव्ह असण्याचा??

किरणुद्दीन तुम्ही माझ्या धाग्यांबाबत पजेसिव्ह जाहला आहात असे मला वाटू लागले आहे >>>> मस्तं परिचित. मलाही तसंच वाटतंय. हे आवडेश.

तुमच्या धाग्याबाबत पझेसिव्ह आहे किंवा कसे मला माहीत नाही. पण या धाग्यांमधून तुमचं एक प्रोफाईल बनत चाललं आहे ते बरंच इंटरेस्टींग आहे. या प्रत्येक धाग्यात आजूबाजूचे सर्व व्हिलन असतात आणि तुम्ही एकटेच सज्जन / योग्य वर्तणूक असलेले असता असा या धाग्यांचा रोख असतो तो वाचणा-याला वाचताक्षणीच पटत नाही , का कोण जाणे, हे वैशिष्ट्य आहे तुमच्या धाग्यांचे.

त्यामुळे लोक तुम्हाला अनेक शक्यता सांगू पाहतात ज्या तुम्ही धडाक्यात नाकारता आणि लोकांना धागाच समजलेला नाही. हे तिन्ही धाग्यात होणे हा एक विलक्षण योगायोग असावा. अशा गोष्टी मला खेचून आणतात.

या तिन्ही धाग्यात तुम्ही एक सुपरहिरो असता. पहिला धागा त्या मानाने बराच नॉर्मल आहे. पण त्यातही अनावश्यक सूचना दिली आहे. माझे कुठेही विवाहबाह्य संबंध नाही अशी पाटी तुम्ही लावली. तसेच नवरा बायको एकत्र लॉज बुक करायला गेले नाहीत. ही शक्यता असू शकते. पण खूप कमी. पुढच्या धाग्यात स्त्रिया तुमच्याशी लगट करण्यापूर्वी तुम्ही (निखळ) भावनेने त्यांना लाँग ड्राईव्हला काय नेता किंवा अजून काय करता आणि त्यांचा रिस्पॉन्स आला की लगेच सभ्य गृहस्थ बनता. मग त्या तुम्हाला झिडकारून जातात. या ही सत्यकथा असू शकतात. पण फँटसी असण्याची शक्यता जास्त.

फॅण्टसी असेल तर विशफुल थिंकिंगचा भाग जास्त. त्यात अनेक त्रुटी असतात. त्यामुळे असेल कदाचित वाचताना हे काही तरी वेगळे आहे असे वाचकाला जाणवत राहते.

आत्ताच्या केस मधे नवरा बायकोने आपसात काय करावे याचे तुम्हाला एव्हढे कोडे का पडावे ? मैत्रीण असेल तर तिच्या वैवाहीक जीवनासंबंधी मित्राने सजग असायला हवे हा विचार इथे मनाला शिवलेला दिसत नाही.

एकंदरीत हे विवाहीत पुरूषाचे विशफुल थिंकींग असावे असे वाटते. असे विचार मनात येतात खरे.
तुम्हाला बॅशिंग करण्याचा हेतू नव्हता. पण टीपी सोडून गंभीरपणे सांगावेसे वाटले.

तुम्ही हे धागे काढताना थोडंसं खट्याळपणे, मिस्कीलपणे मांडलं असतंत तर कुणालाच काही वाटलं नसतं. पण तुम्ही सज्जन आणि परिपक्ब पुरुषाचं बेअरिंग सोडत नाहीत म्हटल्यावर तुमचा शर्ट पांढराशुभ्र झाला ना ! डाग दिसणारच... नाईलाज आहे !!

तुमच्या मित्राची बायको मायबोलीकर आहे का? किंवा ती मायबोलीकर आहे, पण नुसती रोमात असते असे काही आहे का ? नाही, म्हणजे ती मायबोलीकर नसेल तर तुम्ही इथे हा एक धागा काढला काय नी १० काढले काय , सारखेच. बहुतेक तिने हे वाचावे म्हणजे तिला ते कळेल, मग ती तुमच्याशी बोलेल असा तुमचा कयास असवा. आणी जर मायबोलीकर नसेलच तर इथे सल्ले मागुन काय होणार?

> तुम्ही स्वताला जॅकी श्रॉफ च्या भूमिकेत बघता काय?

नाही हो. शक्यच नाही. इथे नाना-जॅकी सारखे नाते नाही. इथे हा माझा मित्रच आहे. तो नाना ने साकारलेल्या पात्रा इतका सणकी वगैरे नाही. पण थोडा पजेसिव्ह आहे इतकेच.

> हे जे प्रतिसादात लिहिलं आहे तुम्ही तेच धाग्याच्या सुरूवातीस का नाही लिहिले?
> मुळात ज्या मुद्द्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे तोच मुद्दा अगदी एका ओळीत का असेना मांडायला हवा होता

सहमत आहे. आपल्या सुचनेनुसार कार्यवाही केली आहे व धाग्याच्या विषयात आवश्यक ते बदल केले आहेत.

किरणुद्दीन... माझ्या धाग्यांविषयी इतका अभ्यास! मी स्वत: सुद्धा इतका विचार केला नव्हता "समग्र परिचित" असे काहीतरी वाचल्यासारखे वाटले. कृपया हे टीका म्हणून घेऊ नका. तुमच्या प्रतिसादामागे प्रामाणिकपणा आहे तो अपुनको भलत्याच आवड्या. आपण बऱ्याच गोष्टी जाणवून दिल्या. त्यामुळे आपले मनापासून आभार. पण एका गोष्टीशी असहमत आहे.

> तुम्ही सज्जन आणि परिपक्ब पुरुषाचं बेअरिंग सोडत नाहीत

अहो साहेब इथे आपण सज्जन आणि परिपक्व नाही आहोत असे दाखवणारे कोणीतरी आहे का? सगळे असेच दाखवतात ना? आणि मला हे सुद्धा शंभर टक्के माहिती आहे कि तरीही सगळ्यांच्या आयुष्यात हे प्रसंग येतात जे माझ्या आयुष्यात आलेत. सगळ्यांच्या मनात तेच चालू असते जे माझ्या. फक्त ते मांडायचे धाडस मी करतो आणि वाईटपणा घेतो. पण यातून अनेक "मूक वाचकांना" मार्गदर्शन मिळत असणार व ते ह्यासाठी माझे मनोमन आभार मानत असतील ह्यात शंकाच नाही.

रश्मी... धाग्याचा विषय तो नाही. इतर प्रतिसादकर्त्यांप्रमाणे आपला सुद्धा गोंधळ झाला आहे. कृपया धाग्यात केलेले बदल वाचावेत हि विनंती.

सगळ्यांच्या मनात तेच चालू असते जे माझ्या. फक्त ते मांडायचे धाडस मी करतो आणि वाईटपणा घेतो. >>> रे देवा

मुलं-आईवडिलांबद्दल आणि vice versa जगभर असतं, बहीण-भाऊ, बहिणी-भाऊ एकमेकांबद्दल पझेसिव्ह असतात पण तुम्हाला सगळी नाती सोडून फक्त मित्रांच्या बायकांबद्दल बोलायचंय!

त्या बाईने तुमच्यावर metoo टाकायला पाहिजे होता म्हणजे असले धागे काढायची हिम्मत नसती झाली.

पण यातून अनेक "मूक वाचकांना" मार्गदर्शन मिळत असणार व ते ह्यासाठी माझे मनोमन आभार मानत असतील ह्यात शंकाच नाही.>>>>>>>>>>>>>>>>>>
तुम्ही एखाद्या सी ग्रेड वर्तमानपत्रात लिहून येणाऱ्या सो कोल्ड 'प्रश्न तुमचे उत्तर डॉक्तरांचे' च्या नावाखाली जो फँटसि चा खेळ चालू असतो, तिथेच का काही लिहीत नाही...
चांगलं मार्गदर्शन होईल लोकांना 'मूक' वाचकांना !

अनेकजण आपल्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह का असतात?

मग काय तुमच्यासारखे दुसर्‍याच्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह व्हायचे का ??

कदाचित आशा प्रसंगात समाज कसा react करेल हे त्यांना जाणून घ्याचे आसव ,प्रत्यक्ष सर्व कथा काल्पनिक असण्याची शक्यता आहे ।

लेखकावर तुटून पडू नका असे प्रसंग समाजात घडत असतात हे नाकारू शकत नाही ,
त्यांनी काल्पनिक प्रसंग उभा करून एक उदाहरण दिले आहे ,
फक्त तुमची मत काय आहेत हेच हवं आहे ,
बरोबर ना parshchit

मला एक कळत नाही, लेखक इतके साळसूद असतातच कसे? म्हणजे असू शकतात पण इतके कसे? दुसऱ्या धाग्यावर काहीतरी reverse metoo ची भानगड आहे त्यात पण असंच काहीतरी.

लुनावाले ब्रम्हे?

आपले उद्दिष्ट क्लिअर ठेवणे महत्वाचे.
घ्यायचं आहे की नाही, एवढाच प्रश्न असला पाहिजे मनात. बाकी सब झूठ!

Pages