अनेकजण आपल्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह का असतात?

Submitted by Parichit on 3 March, 2019 - 02:51

थोडा नाजूक विषय आहे. पण बोलायला तर हवेच. कारण त्याला सामाजिक महत्व आहे. जास्त पाल्हाळ न लावता थेट विषयावर येतो.


काहीजण (किबहुना बरेचजण) आपल्या वैवाहिक/एंगेज्ड/कमिटेड जोडीदाराविषयी इतके पजेसिव्ह का असतात? मुळात वैवाहिक/लैंगिक जोडीदाराबाबत पजेसिव्ह असणे हे नैसर्गिक आहे कि मानवी संस्कृतीचा परिणाम म्हणून आले आहे? लोक काय म्हणतील अशी भावना त्यामागे असते कि तू फक्त माझाच/माझीच अशी भावना असते? एकमेकाला आपापली स्पेस देऊन संसार करणे सुखकारक कि एकमेकाला जखडून एकमेकांवर पाळत ठेवत जगणे सुखकारक? पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपली संस्कृती नष्ट होईल अशी काहीना भीती वाटते ती किती खरी आहे? ती संस्कृती आपलीशी करणारा एक वर्ग आणि ते करता न आल्याने चिडचिड होणारा दुसरा वर्ग अशामध्ये आपला समाज भरडला जात आहे का?

या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. हे प्रश्न डोक्यात येण्याला कारण तसेच घडले. ती पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे सयुचित वाटते...

माझे माझ्या एका मित्राशी आणि त्याच्या बायकोशी अत्यंत मित्रत्वाचे संबंध आहेत. म्हणजे अर्थातच आधी हा माझा मित्र झाला. मग ती झाली. तशी ती आधी भेटत वगैरे होती. आमची अनेकदा नजरानजर होत होती. पण संवाद असा होत नव्हता. कारण संवादाचे काहीच कारणच नव्हते. पण काळाच्या ओघात अशा काही घटना घडल्या कि त्यामुळे हा माझा मित्र झाला. आवडीनिवडी आणि अनेक बाबींवर आमची मते जुळत असल्याने लवकरच आम्ही चांगले घनिष्ट मित्र झालो. घरी जाणेयेणे वाढले तसे त्याची पत्नी पण माझी चांगली मैत्रीण झाली. म्हणजे थट्टामस्करी करण्याइतकी निखळ मैत्री झाली. पुढे आम्ही व्हाट्सपवर पण जोडले गेलो. मेसेजेसची देवाणघेवाण होत होती. मस्करी पण चालत होती. अर्थात मैत्रीची मर्यादा ठेवूनच, हे वेगळे सांगायला नको. अन्यथा मैत्रीचे नाते राहिलेच नसते. हा आपल्या पत्नीविषयी पजेसिव्ह असेलसे कधीही वाटले नव्हते. नाहीतर काहीजण मी पाहिले आहेत. इतके सुद्धा त्यांना चालत नाही. त्यामानाने हा विचाराने फारच पुढारलेला "वाटत होता". म्हणून मी सुद्धा तिच्याशी संवाद साधताना फार कधी विचार केला नाही. तेवढा विश्वास निर्माण झाला होता आमच्यात. असे कित्येक महिने सुरु होते.

पण एक दिवस विचित्रच घडले. मी नेहमीप्रमाणे तिला मेसेज टाकला. बऱ्याच वेळाने सुद्धा तिला तो पोहोचला नसल्याचे लक्षात आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. तिचा प्रोफाईल फोटो पण गायब होता, स्टेटस सुद्धा दिसत नव्हते. मी तिची व्हाट्सप प्रोफाईल चेक केली आणि माझी शंका खरी ठरल्याचे लक्षात आले. तिने मला ब्लॉक केले होते. मला खूप आश्चर्य वाटले. थोडे वाईट सुद्धा वाटले. काय प्रकार झाला असेल याचा मी अंदाज करू शकत होतो. त्यानंतर हा मात्र भेटत होता. अगदी नेहमीप्रमाणेच. आमच्या गप्पा भेटणे वगैरे सगळे सुरूच होते. त्याच्यात काहीही म्हणजे काहीही फरक जाणवला नाही. जणू काहीच घडलेले नाही. पण ती मात्र अनेक दिवस गायब झाली होती. अधूनमधून भेटायची ती दिसेनाशीच झाली. असे पूर्वी कधी झाले नव्हते. त्यामुळे थोडी चिंता पण वाटू लागली. कारण अनेकदा ती भेटत असे दिसत असे. नक्की काय झालेय याचा मला बोध होईना. पण मित्राच्या आणि माझ्या नात्यात काहीही फरक झाला नसल्याने काही दिवसांनी मी सुद्धा विषय सोडून दिला. कुणी बोलले, बोलले. नाही बोलले, नाही बोलले. असेल काहीतरी झाले म्हणून विषय डोक्यातून काढून टाकला.

आणि एक दिवस अनेक दिवसांनी ती बाहेर दिसली. पण दुरूनच. आम्ही दोघांनीही स्माईल केले. काही झाले आहे असे दोघांपैकी कुणीच दाखवले नाही. मला नाही म्हटले तरी हायसे वाटले. कि चला फार वाईट असे काही घडलेले नसावे. त्यानंतर ते दोघेही अधूनमधून भेटत राहिले. हा तर काय नेहमीच भेटायचा. पण ती सुद्धा भेटू लागली. तिच्याशी पूर्वीइतका संवाद असा होत नव्हताच. एखादे स्माईल आणि हाय हेलो बस्स इतकेच. त्यापलीकडे काहीही बोलणे नाही. व्हाट्सपवरचे संवादसुद्धा अजूनही थांबलेलेच होते. अजूनही मी ब्लॉक होतो.

या सगळ्या प्रकारानंतर लक्षात आले कि तो स्वत:ला दाखवत होता तसा प्रत्यक्षात नव्हता. प्रत्यक्षात तो नक्कीच खूप पजेसिव्ह असणार. पण त्याचबरोबर आमच्यातल्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होऊ नये हे सुद्धा त्याने पाहिले. हे दोन्ही मुद्दे सांभाळताना त्याला बरीच मानसिक कसरत करावी लागली असावी. किंवा कदाचित "आपण नात्यामध्ये एकमेकाला स्पेस देणारे आहोत" असे त्याला "वाटत" असावे पण प्रत्यक्षात वेळ आपल्यावर मात्र त्याला ते हाताळता आले नसेल असाही एक अंदाज आहे. माझा अजून एक मित्र आहे व त्याची पत्नी सुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे. त्या दोघांच्याबाबत मात्र त्याच्यापेक्षा तीच माझी खूप चांगली मैत्रीण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी परिस्थिती आहे. आपापली पूर्ण स्पेस त्यांनी एकमेकाला दिली आहे. नाते म्हणजे एकमेकाला जखडून ठेवणे नव्हे हे त्यांनी जाणले आहे. पण हे सर्वांनाच जमत नाही.

हे जे काही घडले यावर मला सल्ले नको आहेत. ते सगळे सोर्टआउट झाले/होईल तो भाग वेगळा. पण या सगळ्या घटनेमुळे माझ्या मनात वर धाग्याच्या सुरवातीला मांडलेले प्रश्न आले त्यावर आपली मते हवी आहेत. काहीजण आहेत (माझ्या ह्या मित्रासारखे) ज्यांना वरकरणी वाटते कि जोडीदाराला आपापली स्पेस देणे आवश्यक आहे पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर मात्र या गोष्टी हाताळता येत नाहीत. त्यांनी हे कसे हाताळावे? वगैरे वगैरे प्रश्न माझ्या मनात आले. ह्याबाबत मायबोलीकर आपली मते मांडू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही पार्टी संमती असल्यास (या केस मध्ये तिन्ही पार्टी) मैत्रीत काहीच प्रॉब्लेम नाही.'तुझ्याबरोबर मनमोकळी विशुद्ध मैत्री ठेवण्यात अडथळा आला म्हणून मी लग्न मोडले.आता आपण परत मनमोकळी मैत्री बिना अडथळा चालू ठेवू' असे कोणीच करणार नाही.
प्रॉब्लेम का आला वगैरे अनालिसिस पेक्षा प्रॉब्लेम आला हे जास्त महत्वाचे आहे ☺️☺️अनालिसिस चा विशेष उपयोग नाही.

अनेकजण आपल्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह का असतात?

मग काय तुमच्यासारखे दुसर्‍याच्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह व्हायचे का ??

नवीन Submitted by शाहिर on 5 March, 2019 - 13:43 >> Rofl

सही एकदम Proud

मग काय तुमच्यासारखे दुसर्‍याच्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह व्हायचे का ??>>>>>>. Lol

सगळेच प्रतिसाद ळोळ आहेत Lol

हा धागा हे ऑनलाईन गळचेपीचे उत्तम उदाहरण आहे असे समितीचे मत आहे. इथेही ऑनलाईन महिलांनी उच्छाद मांडलाच आहे, शिवाय पुरूष देहातील स्त्रियांनीही ऑनलाईन पुरूष धागालेखकाचा अनन्वित छळ केला आहे. मात्र जर हे असे पुरूष दाद मागू शकत नसतील, यांच्यासाठी चालवलेल्या अभियानात भाग घेत नसतील तर समिती तरी काय करू शकणार ? समिती स्वतःहून या अन्यायाच्या प्रकरणात लक्ष घालू इच्छित नाही.

कळावे,
आपले विनीत

पुरूष हक्क समिती
पुरूष हक्क अभियान

हा धागा 'एका मोडलेल्या लग्नाची गोष्ट' ह्या कथेवरुन वरुन सुचलाय का?
आताच ती कथा वाचली. आणि ह्याच धाग्याची आठवण आली.

> अनेकजण आपल्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह का असतात? >

१. मनुष्यप्राणी हा 'नैसर्गिकरित्या' मोनोगॅमस नाहीय.
२. लग्न ही व्यवस्था अनैसर्गिक, सांस्कृतिक, मनुष्यनिर्मित, वगैरे आहे.
३. जेकोणी विवाहबाह्य संबंधासाठी प्रयत्न करत नसतात ते त्यांचे जोडीदारावर प्रेम आहे या कारणापेक्षा सामाजिक दबाव, मुलं दुरावली जाण्याची शक्यता किंवा इन जनरलच रिस्क न घेण्याची वृत्ती वगैरे कारण असण्याची शक्यता जास्त असते.
४. बर्याचजणांना इंस्टिन्गटीवली स्वतःची लायकी माहित असते + कसेबसे जोडे झिजवून एकाध सेक्स पार्टनर मिळाला असतो + तो आपल्या लायकीचा पलीकडंचा आहे याची सतत जाणीव असते + तो आपल्याला कधीही डम्पू शकतो अशी भिती असते.
५. स्त्री जर आपल्या नवर्याबद्दल पझेसिव्ह असेल तर त्यामागे आर्थिक परावलंबन हे कारण असू शकेल. नवरा सगळे पैसे परस्त्रीवर खर्चू लागला तर मला, माझ्या मुलांना कमी पडेल.
६. पुरुष जर आपल्या बायकोबद्दल पझेसिव्ह असेल तर त्यामागे आपल्या जेेंडरचे प्राणी कसे गयेगुजरे, कमी नैतिकतेचे, कधीच निखळ मैत्री न करू शकणारे असतात याची जाणीव असणे

वगैरे

बरोबर लेखक- ओव्हर पसेसिव्ह जोडीदार कोणाला आवडेल.
पुन्हा एकदा जुने चाट्स वाचून बघा, जुने संवाद आठवा -बघा एखादी हिंट दिसतेय का.
व्हाट्सएप ब्लॉक केला ना, फेसबुक मेसेज करा, तिथे ब्लॉक केले तर इंस्टा वापरा, तिथे ब्लॉक केले नवऱ्याने तर ट्विट करा, शेवटी नॉर्मल sms करून बघा.
परसिस्ट करणे महत्वाचे परिचित... तुमच्या मैत्रीला शुभेच्छा !
विजयी भव !!!!

हा नर्मविनोद नाही - सिरियसली घ्या.

100 कमेन्टस. तरीही नक् ्की काय विचारले आहे समजत नाही.
(स् ्मायली कश्या द्याव्या? Phone मधल्या टाकता येत नाही आहेत )

शाहीर यांनी एकाच वाक्यात सगळे सांगून टाकलेय !!! जी व्यक्ती आपल्या जोडीदाराबरोबर अजिबात
पझेसिव्ह नसते, त्या व्यक्तीचे आपल्या जोडीदारावर प्रेम नसते. विशुद्ध निखळ मैत्री अजून तरी मी शाळा-कॉलेज आणि लहानपणापासून एकाच बिल्डिंगमध्ये ,भागामध्ये राहणाऱ्या मित्र मैत्रिणींमध्ये बघितलेली आहे. तुम्ही ज्याला निखळ मैत्री म्हणता ती निखळ मैत्री असल्याचे तुम्ही स्वतःच्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करीत आहात. वाचकांना माहित आहे की तसे नाही आहे.

ऍमी जबरदस्त आणि सर्व मुद्द्याना स्पर्श करणारा प्रतिसाद.शेवटचे 2 पॉईंट विशेष पटले.

अ‍ॅमी, मस्त एकदम, सिक्सर लावला तुम्ही, विशेषतः शेवटचा मुद्दा ☺️

चर्प्स, खूप छान सल्ला देताय, शेवटी तिने # Me too करायलाच हवे, नाही का??

१. मनुष्यप्राणी हा 'नैसर्गिकरित्या' मोनोगॅमस नाहीय.
२. लग्न ही व्यवस्था अनैसर्गिक, सांस्कृतिक, मनुष्यनिर्मित, वगैरे आहे.

लग्न च नाही तर शासन व्यवस्था ,न्याय व्यवस्था,देश,चलन व्यवस्था ,प्रतिष्ठा,अपमान,नैतिक,अनैतिक हे सर्व च अनैसर्गिक आहे .
तरी ह्या संस्था टिकून आहेत कारण ती मनुष्याची गरज आहे .
प्राणी आणि माणूस ह्या मध्या आसलेल्या फरका मधला महत्वाचं फरक आहे त्यामुळे वरची दोन्ही कारण गैरलागू आहेत .
. स्त्री जर आपल्या नवर्याबद्दल पझेसिव्ह असेल तर त्यामागे आर्थिक परावलंबन हे कारण असू शकेल. नवरा सगळे पैसे परस्त्रीवर खर्चू लागला तर मला, माझ्या मुलांना कमी पडेल.
ही मत सुधा अविचारी आणि वाह्यात आहेत बिलकुल लागू पडत नाहीत समजत खूप सारी उदाहरण ह्या matana खोटे ठरवू शकतो .
चंचल वृत्ती सेक्स विषयी जास्त रुची ,समजबंधनाच्य विरोधी राहणारे समाजकंटक ,आणि अनैतिक लोक आपल्या गैर नात्याला योग्य ठरवण्यासाठी असल्या युक्ती वादच आधार घेतात .

मनुष्य निर्मित सर्व व्यवस्था hatavlya तर 50% पुरुषांना सेक्स पार्टनर मिळणारच नाही
आणि 100% स्त्रियांना सेक्स पार्टनर निवडायचं स्वतंत्र नष्ट होईल

दुसऱ्या व्हाट्सअप नंबर वरून मेसेज करायचा ना लगेच. पण मला तर वाटतंय तुमचा मित्रच त्याच्या बायकोच्या मोबाईलवरून तुमच्याशी चॅट करून तुमची मजा घेत असेल. ते फेसबुकवर नाही का पोरींचे फेक प्रोफाइल तयार करून पोरच पोरांशी चॅट करत असतात, त्यातलाच हा प्रकार असावा. नंतर तुम्ही जास्तच सिरीयस झाल्यावर, आपल्याच अंगलट यायचं हे प्रकरण म्हणून मित्र शांत बसला असेल, बायकोला बिचारीला काहीच माहीत नसेल यातलं, नशीब बाहेर दिसल्यावर काय विचारलं नाहीत ते, नाहीतर चांगलीच नाचक्की झाली असती तुमची.

विविध राजकीय धाग्यांवरील विरोधकांचे निदान एकातरी धाग्यावर मतैक्य घडवून आणण्यात यश मिळाल्याबद्दल लेखक महाशयांचे अभिनंदन.

अनु, किरणुद्दीन आणि VB _/\_

===
> जी व्यक्ती आपल्या जोडीदाराबरोबर अजिबात
पझेसिव्ह नसते, त्या व्यक्तीचे आपल्या जोडीदारावर प्रेम नसते. > प्रेम असते कि नाही हे डिबेटेबल आहे. पण विश्वास नक्कीच नसतो आणि असुरक्षीतता, जेलसी, इन्फिरिरिटी कॉम्प्लेक्स असतो....

<६. पुरुष जर आपल्या बायकोबद्दल पझेसिव्ह असेल तर त्यामागे आपल्या जेेंडरचे प्राणी कसे गयेगुजरे, कमी नैतिकतेचे, कधीच निखळ मैत्री न करू शकणारे असतात याची जाणीव असणे> चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक.

ज्यांना वाटत आहे मी कोणाबद्दलतरी पजेसिव्ह आहे त्यातून धागा सुरु केलाय अशांसाठी एक गोष्ट सांगत आहे:

खूप वर्षांपूर्वी मी पुण्यात उपनगरात रात्री दहाच्या सुमारास एका रस्त्याने चाललो होतो. तसा तो माझा नेहमीचाच रस्ता त्यामुळे तिथली आसपासची सगळी दुकाने वगैरे सर्वकाही माझ्या पाहण्यातलेच होते. तिथे एका किराणामालाच्या दुकानाजवळ आडोशाला एक टेलिफोन बूथ होते. त्या काळात अजून मोबाईल आलेले नव्हते. फोन करण्यासाठी लोक टेलीफोन बूथ वापरत. तो तिथला बूथ एक स्त्री चालवायची आणि तिच्याबरोबर तिचे पाच-सहा वर्षांचे एक बाळ पण असायचे. जाता येता माझे अनेकदा लक्ष जायचे. नाही म्हटले तरी मला आश्चर्यच वाटायचे. इतक्या रात्री एकटीने बूथ चालवायची वेळ तिच्यावर का यावी? आणि त्या दिवशी मला त्याचे उत्तर मिळाले. नेहमीप्रमाणे रात्री तेथून जात असताना मला मारहाणीचे रागावण्याचे ओरडण्याचे रडण्याचे आवाज आले. मी थबकून इकडे तिकडे पाहिले. आवाज त्या बूथच्या दिशेनेच येत होते. म्हणून मी थोडे जवळ जाऊन पाहिले. तर एक मनुष्य दारू पिऊन तिला मारहाण करत होता. चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळी करून तिच्यावर हात उगारत होता. एरवी ती चांगल्या सुसंस्कृत घरातली वाटत होती. त्यामुळे मला हे सगळे पाहून धक्का बसला. ते बाळ सुद्धा भेदरून बाजूला रडत उभे होते. आजूबाजूला जे जातयेत होते ते पाहिल्या न पहिल्यासारखे करून निघून जात होते. तो तिला कानाखाली गालावर तोंडावर पाठीवर एकामागोमाग एक जोरजोरात हाताने तडाखे देत होता. मला राहवले नाही व मी तसाच पुढे गेलो आणि त्या दारुड्याला ओरडलो. ए काय करतोस. तसा तो चमकला. मारायला वर केलेला हात तसाच खाली घेऊन मला म्हणाला तू कोण, तुझा काय संबंध. मी म्हणालो मारहाण करू नकोस. तर म्हणाला माझी बायको आहे मी बघून घेईन. तू निघ इथून. पुन्हा एक दोन फटके हाणले. मी इरेला पडलो व म्हणालो असेल बायको तुझी पण अशी मारहाण कशाला करतो. तर तो माझ्यावर ओरडत माझ्या दिशेने येऊ लागला. बराच प्यायलेला होता. मी आहे नाही तेवढे अवसान आणून त्वेषाने त्याला ओरडलो. म्हणालो तू येच जवळ ****च्या आणि लाव माझ्या अंगाला हात. पोलीस स्टेशन आहे जवळच. सगळे मला ओळखतात तिथे *****च्या असे म्हणून मी त्याला ओरडून शिवी दिली. माझा अवतार बघून तो वरमला. तोवर आजूबाजूचे बाकीचे पण काही लोक मला साथ देऊ लागले. म्हणालो अजिबात हाणामारी करायची नाही, नाहीतर पोलिसात नेऊन देईन तुला. मग तो हा ठीक आहे लई शाणा आहेस जा जा वगैरे बोलू लागला. मी थोडे दूरवर जाऊन त्याला दिसणार नाही अशा जागेवरून पाहू लागलो. त्याने पुन्हा मारहाण केली नाही. नंतर ते जोडपे बूथ बंद करून निघून गेले.

मी पजेसिव्ह आहे म्हणणाऱ्यानी मला सांगावे या स्त्रीच्या बाबत मी पजेसिव्ह होतो म्हणून असे वागलो असेन का. लग्न म्हणजे पजेसिव्ह पुरुषांसाठी स्त्रियांवर वारेमाप अत्याचार करण्याची सोय असते का. माझ्या मित्राची केस पोलिसांपर्यंत जाण्याइतकी नाही. पण म्हणून त्याबाबत कुठे चर्चा सुद्धा करायची नाही आणि केली तर मीच पजेसिव्ह असे बरे नाही.
---

ज्यांना वाटत आहे तिने माझ्यावर मिटू टाकायला हवे.

तिच्याबाबत माझे कसे नाते होते हे मला माहित आहे. तसे काही असते तर तिने मिटूफीटू न करता थेट आपल्या नवऱ्याला स्वत:च माझ्याविषयी सांगून दोघांनीही माझ्याशी नाते कायमचे तोडले असते. हे सगळे डिटेल सांगूनही त्याकडे थेट दुर्लक्ष करून केवळ माझ्याकडे पूर्वग्रहदुषित विचाराने बघून काढलेले हे उद्गार आहेत. यापलीकडे मी त्यास महत्व देत नाही.
---

ॲमी यांचा प्रतिसाद आवडला. पण त्याहीपुढे जाऊन म्हणेन कि पझेसिव्ह असणे हे दुबळ्या मानसिकतेचे लक्षण आहे. आपल्या प्रेमावर आपला विश्वास नाही. एकदा फ्रीडम देऊन बघा तरी. होऊ द्या जे व्हायचे ते. अरे जगू द्या जोडीदाराला तिचे/त्याचे आयुष्य. फिअर ऑफ लुझिंग चा बाऊ कशासाठी? तुमच्या प्रेमात ताकत असेल तर जोडीदार तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. आणि नसेल तर यू नीड टू इम्पृव देअर.

एकमेकाला जखडून ठेवायचे. शरीरसंबंध म्हणजे लिटमस. इतके आपले प्रेम यांत्रिक असेल तर त्याला अर्थ काय. बारबालांबरोबर लग्न करून अनेक वर्षे ते टिकवलेले पुरुष आहेत. सनी लिओनिवर तिच्या नवरा अजूनही प्रेम करतो आहे. इतकी वर्षे संसार करत आहेतच ते दोघे. कमऑन गाईज व्हाट्स राँग विथ यू.

परिचित साहेब, तुम्ही ज्या जोडप्याचे उदाहरण धाग्यामधे दिलेले आहे, त्या नवरा बायकोत आपसात मारहाण होते का ?

बरं, अशी मारहाण दुर्दैवाने कनिष्ठ आर्थिक स्तरावरच्या समाजात सर्रास चालते. अशा सगळ्या ठिकाणी तुम्ही जाता का ? आपसात ताळमेळ नसलेली दोन भिन्न उदाहरणे देऊन आपले म्हणणे मांडण्याने ते सिद्ध होते का ?

ज्यांना कुणाला विबासंची प्रबळ उबळ आली असेल तर करून टाकावा ! नोंदणी पद्धतीने करायचं की हॉल घ्यायचा ?
( आपल्यात धमक नाही म्हणून राहीलं... इच्छा तर बलदंड !!)

वरच्या उदाहरणाबद्दल:
नवरा बायकोला मारतोय हे बघून वाचवण्याची आपली भावना चांगली असली तरी त्यामुळे त्या बाईला आपण गेल्यावर डबल मार पडला असण्याची शक्यता आहे.
म्हणजे त्या आणि तुमच्या आता सध्याच्या प्रश्नात, दोन्हीकडेही अनालिसिस करून प्रश्न सुटत नाहीयेत.शिवाय अगदी खरं उत्तर मिळालं तरी जे उत्तर मिळेल त्याने ती मैत्री पुढे चालू ठेवण्याची दोन्ही पार्टीची इच्छा राहणार नाही(अरे मी याला मित्र समजत होतो हा माझ्याबद्दल असे विचार करतो/अरे मी याला मित्र समजत होतो, याला मैत्रीत माझी बायको बरोबर असली तरच स्वारस्य.एकट्या माझी मित्र म्हणून काहीही किंमत नाही).
इंग्रजीत don't look under that rock अशी म्हण आहे.
आणि तरीही मैत्री चांगली मॅच्युअर असली तर एकदा मित्राशी(बायकोशी नव्हे) विषय काढून पाहावे.

अजून एक प्रश्न
तुम्ही विवाहीत असाल तर बायकोला ही असा एखादा मित्र असल्यास तुमची प्रतिक्रिया काय असेल ?

> आपसात ताळमेळ नसलेली दोन भिन्न उदाहरणे देऊन आपले म्हणणे मांडण्याने ते सिद्ध होते का ?

दोन्ही केस मध्ये कृती (मारहाणीची) वेगळी असली तरी विचारांची दिशा (पजेसिव्ह) तीच आहे. हा माझा मित्र उच्चशिक्षित आहे दारुडा नाही. त्याचा परिणाम म्हणून मारहाण न करता मानिसक त्रास दिला असेल इतकेच.

> तुम्ही विवाहीत असाल तर बायकोला ही असा एखादा मित्र असल्यास तुमची प्रतिक्रिया काय असेल ?

हा प्रश्न आजच्या काळात ते सुद्धा मायबोलीवर जिथे बहुतांश सभासद मेट्रोसिटीज मध्ये किंवा परदेशात राहणारे/राहून आलेले आहेत? आजकाल नवरा बायको दोघेही एमेनसीज मध्ये काम करतात. काही केसेस मध्ये तर नवरा एका देशात तर बायको दुसऱ्या देशात असेसुद्धा आहे. या काळात बायकोचा मित्र हि नवीन बाब आहे का? माझ्या मित्राची गोष्ट वेगळी. त्याची पार्श्वभूमी थोडीशी वेगळी आहे. पण इथे हा प्रश्न अपेक्षितच नव्हता.

> काय नाही ओ तो नवराच तुमच्याशी चॅट करायचा

तुम्ही मस्करी करत आसलात तरी मला हि शंका खरंच आली होती पण अगदी सुरवातीच्या काळात. पण नाही. हे सगळे बेसिक व्हेरिफिकेशन खूप पूर्वी करून झालेय. सो नो लक टू युवर गेस Happy

> मैत्री चांगली मॅच्युअर असली तर एकदा मित्राशी(बायकोशी नव्हे) विषय काढून पाहावे.

नाही ती समस्या किंवा विषय नाहीच आहे इथे. ती एक होऊन गेलेली गोष्ट आहे. पण आपण इथे जनरल चर्चा करत आहोत. पजेसिव्ह असणे योग्य कि अयोग्य, जोडीदाराचा मित्र/मैत्रीण, स्पेस वगैरे वगैरे मुद्दे.

क्वोटिंग ह्रितीक फ्रॉम znmd:
"मतलब तुझे किसी और के मूह से सूनना है की तुझे ये शादी नही करनी चाहीये"

"मतलब तुझे किसी और के मूह से सूनना है की तू सही था और वह पती बेवकुफ कुत्ता कमिना गधा " ☺️☺️

Pages