अनेकजण आपल्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह का असतात?

Submitted by Parichit on 3 March, 2019 - 02:51

थोडा नाजूक विषय आहे. पण बोलायला तर हवेच. कारण त्याला सामाजिक महत्व आहे. जास्त पाल्हाळ न लावता थेट विषयावर येतो.


काहीजण (किबहुना बरेचजण) आपल्या वैवाहिक/एंगेज्ड/कमिटेड जोडीदाराविषयी इतके पजेसिव्ह का असतात? मुळात वैवाहिक/लैंगिक जोडीदाराबाबत पजेसिव्ह असणे हे नैसर्गिक आहे कि मानवी संस्कृतीचा परिणाम म्हणून आले आहे? लोक काय म्हणतील अशी भावना त्यामागे असते कि तू फक्त माझाच/माझीच अशी भावना असते? एकमेकाला आपापली स्पेस देऊन संसार करणे सुखकारक कि एकमेकाला जखडून एकमेकांवर पाळत ठेवत जगणे सुखकारक? पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपली संस्कृती नष्ट होईल अशी काहीना भीती वाटते ती किती खरी आहे? ती संस्कृती आपलीशी करणारा एक वर्ग आणि ते करता न आल्याने चिडचिड होणारा दुसरा वर्ग अशामध्ये आपला समाज भरडला जात आहे का?

या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. हे प्रश्न डोक्यात येण्याला कारण तसेच घडले. ती पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे सयुचित वाटते...

माझे माझ्या एका मित्राशी आणि त्याच्या बायकोशी अत्यंत मित्रत्वाचे संबंध आहेत. म्हणजे अर्थातच आधी हा माझा मित्र झाला. मग ती झाली. तशी ती आधी भेटत वगैरे होती. आमची अनेकदा नजरानजर होत होती. पण संवाद असा होत नव्हता. कारण संवादाचे काहीच कारणच नव्हते. पण काळाच्या ओघात अशा काही घटना घडल्या कि त्यामुळे हा माझा मित्र झाला. आवडीनिवडी आणि अनेक बाबींवर आमची मते जुळत असल्याने लवकरच आम्ही चांगले घनिष्ट मित्र झालो. घरी जाणेयेणे वाढले तसे त्याची पत्नी पण माझी चांगली मैत्रीण झाली. म्हणजे थट्टामस्करी करण्याइतकी निखळ मैत्री झाली. पुढे आम्ही व्हाट्सपवर पण जोडले गेलो. मेसेजेसची देवाणघेवाण होत होती. मस्करी पण चालत होती. अर्थात मैत्रीची मर्यादा ठेवूनच, हे वेगळे सांगायला नको. अन्यथा मैत्रीचे नाते राहिलेच नसते. हा आपल्या पत्नीविषयी पजेसिव्ह असेलसे कधीही वाटले नव्हते. नाहीतर काहीजण मी पाहिले आहेत. इतके सुद्धा त्यांना चालत नाही. त्यामानाने हा विचाराने फारच पुढारलेला "वाटत होता". म्हणून मी सुद्धा तिच्याशी संवाद साधताना फार कधी विचार केला नाही. तेवढा विश्वास निर्माण झाला होता आमच्यात. असे कित्येक महिने सुरु होते.

पण एक दिवस विचित्रच घडले. मी नेहमीप्रमाणे तिला मेसेज टाकला. बऱ्याच वेळाने सुद्धा तिला तो पोहोचला नसल्याचे लक्षात आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. तिचा प्रोफाईल फोटो पण गायब होता, स्टेटस सुद्धा दिसत नव्हते. मी तिची व्हाट्सप प्रोफाईल चेक केली आणि माझी शंका खरी ठरल्याचे लक्षात आले. तिने मला ब्लॉक केले होते. मला खूप आश्चर्य वाटले. थोडे वाईट सुद्धा वाटले. काय प्रकार झाला असेल याचा मी अंदाज करू शकत होतो. त्यानंतर हा मात्र भेटत होता. अगदी नेहमीप्रमाणेच. आमच्या गप्पा भेटणे वगैरे सगळे सुरूच होते. त्याच्यात काहीही म्हणजे काहीही फरक जाणवला नाही. जणू काहीच घडलेले नाही. पण ती मात्र अनेक दिवस गायब झाली होती. अधूनमधून भेटायची ती दिसेनाशीच झाली. असे पूर्वी कधी झाले नव्हते. त्यामुळे थोडी चिंता पण वाटू लागली. कारण अनेकदा ती भेटत असे दिसत असे. नक्की काय झालेय याचा मला बोध होईना. पण मित्राच्या आणि माझ्या नात्यात काहीही फरक झाला नसल्याने काही दिवसांनी मी सुद्धा विषय सोडून दिला. कुणी बोलले, बोलले. नाही बोलले, नाही बोलले. असेल काहीतरी झाले म्हणून विषय डोक्यातून काढून टाकला.

आणि एक दिवस अनेक दिवसांनी ती बाहेर दिसली. पण दुरूनच. आम्ही दोघांनीही स्माईल केले. काही झाले आहे असे दोघांपैकी कुणीच दाखवले नाही. मला नाही म्हटले तरी हायसे वाटले. कि चला फार वाईट असे काही घडलेले नसावे. त्यानंतर ते दोघेही अधूनमधून भेटत राहिले. हा तर काय नेहमीच भेटायचा. पण ती सुद्धा भेटू लागली. तिच्याशी पूर्वीइतका संवाद असा होत नव्हताच. एखादे स्माईल आणि हाय हेलो बस्स इतकेच. त्यापलीकडे काहीही बोलणे नाही. व्हाट्सपवरचे संवादसुद्धा अजूनही थांबलेलेच होते. अजूनही मी ब्लॉक होतो.

या सगळ्या प्रकारानंतर लक्षात आले कि तो स्वत:ला दाखवत होता तसा प्रत्यक्षात नव्हता. प्रत्यक्षात तो नक्कीच खूप पजेसिव्ह असणार. पण त्याचबरोबर आमच्यातल्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होऊ नये हे सुद्धा त्याने पाहिले. हे दोन्ही मुद्दे सांभाळताना त्याला बरीच मानसिक कसरत करावी लागली असावी. किंवा कदाचित "आपण नात्यामध्ये एकमेकाला स्पेस देणारे आहोत" असे त्याला "वाटत" असावे पण प्रत्यक्षात वेळ आपल्यावर मात्र त्याला ते हाताळता आले नसेल असाही एक अंदाज आहे. माझा अजून एक मित्र आहे व त्याची पत्नी सुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे. त्या दोघांच्याबाबत मात्र त्याच्यापेक्षा तीच माझी खूप चांगली मैत्रीण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी परिस्थिती आहे. आपापली पूर्ण स्पेस त्यांनी एकमेकाला दिली आहे. नाते म्हणजे एकमेकाला जखडून ठेवणे नव्हे हे त्यांनी जाणले आहे. पण हे सर्वांनाच जमत नाही.

हे जे काही घडले यावर मला सल्ले नको आहेत. ते सगळे सोर्टआउट झाले/होईल तो भाग वेगळा. पण या सगळ्या घटनेमुळे माझ्या मनात वर धाग्याच्या सुरवातीला मांडलेले प्रश्न आले त्यावर आपली मते हवी आहेत. काहीजण आहेत (माझ्या ह्या मित्रासारखे) ज्यांना वरकरणी वाटते कि जोडीदाराला आपापली स्पेस देणे आवश्यक आहे पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर मात्र या गोष्टी हाताळता येत नाहीत. त्यांनी हे कसे हाताळावे? वगैरे वगैरे प्रश्न माझ्या मनात आले. ह्याबाबत मायबोलीकर आपली मते मांडू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरात मुलांनी कसे वागावे ह्या वरून मतभेद .
नातेवाईक आले को कशी treat द्यायची ह्या वरून मतभेद
खूप गोष्टी आहेत .
जेव्हा आपण विचार जुळतात असे म्हणतो ह्याचा अर्थ खूप व्यापक असतो .

मुळात आपल्याला (फक्त मैत्रीण म्हणून किंवा फक्त मित्र म्हणून) आवडणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या जोडीदाराने किती पझेसिव्ह असावं हे आपण नाही ठरवू शकत.>>>
स्पॉट ऑन.

आणि आवडणाऱ्या व्यक्तीच्या जोडीदारा व्यतिरिक्त तिच्या आई / बाबा / भाऊ / बहीण वगैरेने सुद्धा.

घरात मुलांनी कसे वागावे ह्या वरून मतभेद .
नातेवाईक आले को कशी treat द्यायची ह्या वरून मतभेद.
खूप गोष्टी आहेत .
जेव्हा आपण विचार जुळतात असे म्हणतो ह्याचा अर्थ खूप व्यापक असतो .

>>

मान्य. पण हे सारे प्रॉब्लेम दोन्ही बाजू समजूतदार निघाल्या की सहज सुटतात. कारण दोन्ही बाजू कमीत कमी दुसऱ्याच बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत असण्याची शक्यता इथे जास्त आहे.

संशयाचं तसं नाही. थेंबे थेंबे तळे साचे टाईप संशय हळूहळू मनात घर करतो. जोडीदारावरचा भरोसा एकदा उडाला की माणूस दुसरी बाजू ऐकण्याच्याही मनस्थितीत नसतो. कावीळ झालेल्याला जसं सगळीकडं पिवळं दिसतं, तसं संशयखोर माणसाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी विश्वासघात दिसतो.
प्रत्येकाला वाटतं तितका संशय काबूत ठेवणं सोपं नाही. विवाहबाह्य संबंधाच्या नुसत्या शंकेने गळे कापायचे प्रकार रोजच्या पेपरात दिसतात, यातच कायतें समजा.

म्हणून तर मी बोलतोय विवाह बाह्य संबंध हे नात तुटण्याची शेवटची पायरी आहे आणि तो रस्ता one-way aahe आणि त्या रस्त्यावर u टर्न सुधा नाही

<<< Submitted by Rajesh188 on 9 March, 2019 - 20:34 >>>
मूळ पोस्ट बदलल्यामुळे प्रकाटाआ.

१) डिल्यूजनल डिसऑर्डर आणि पझेसिव्हनेस यात गल्लत तर होत नाहीये ना?
>>

पझेसिव्हनेस तोपर्यंतच ठीक(?) आहे जोपर्यंत नात्यामध्ये संवाद आहे आणि एकमेकांना स्वातंत्र्य आहे . पण हा बराचसा ग्रे एरिया आहे ज्यात गोष्टी बघता बघता चिघळू शकतात. तुम्ही जो डिल्युजनल डिसऑर्डर चा मुद्दा उचलालात, त्याचा एक प्रकार म्हणजे मॉर्बिड जेलसी त्याबद्दल विकिपीडिया काय म्हणते ते पहा -

Obsessions: the individual's own thoughts are egodystonic; they are acknowledged to be senseless, and usually resisted.(इथे संशय घेणाऱ्याला माहिती आहे की त्याचे विचार चुकीचे आहेत , आणि म्हणून तो ते स्वतःहून दाबण्याचा प्रयत्न करतो ) Jealous thoughts are experienced as intrusive and excessive, and compulsive behavior such as checking up on their partner may follow.

Extreme obsessions: much time is taken up by jealous concerns, and there is a great difficulty in putting the concerns out of the mind. Impairment of the relationship, limitation of the partner's freedom and checking on the partner's behavior may occur.
(जे कदाचित परिचितांच्या मैत्रिणीबरोबर घडले असण्याची शक्यता आहे, इथेच आपल्या जोडीदारावर संशय घेण्याचा निर्णय बरोबर आहे असं ओब्सेससिव्ह व्यक्तीला वाटू शकतं )
.

Delusions: Some authors compare morbid jealousy to a delusional state (e.g. Enoch & Trethowan, 1979). Beliefs may include the morbidly jealous subjects' suspicion that: 1. he or she is being poisoned or given some substance(s) to decrease sexual potency by the partner, 2. that the partner has contracted a sexually transmitted disease from a third party 3. is engaging in sexual intercourse with a third party while the subject sleeps.

यात संशयाचा कीड जर वेळीच रोखली नाही तर तिचं परिवर्तन गंभीर मानसिक आजारात पण होऊ शकत. सगळ्यांचंच होईल असं नाही, पण म्हणून संशयाला वाव देण्याची गरजच काय ? आणि संशय बंधनं घालून निघत नाही, संवादाने निघतो (जो धाग्यातल्या जोडप्यात झाला असेल तर उत्तमच, तरीही बंदी का आली हा एक प्रश्नच आहे.)

आज चॅट रोखल्यामुळे तेवढ्यापुरता संशय घ्यायची शक्यता गेली, असं एकवेळ मानून चालू. पुढे ऑफिसातले मित्र, कलीग यांच्याबद्दल संशय निर्माण झाला तर ? उगाच चान्स कशाला घ्या म्हणून तिथेही बोलाचालीची बंदी आणावी का ?

२) म्हणून तर मी बोलतोय विवाह बाह्य संबंध हे नात तुटण्याची शेवटची पायरी आहे. >>
खरंय. अन हेही तितकंच खरंय की विवाह बाह्य संबंध असण्यावरून (प्रत्यक्षात नसला तरी) अतिरेकी संशयसुद्धा नातं नष्ट करायला तितकाच कारणीभूत आहे. संशयामुळे आणि चुकीच्या बंधनामुळे उलट अशा संबंधांना प्रोत्साहन नाही का मिळणार ?

विलभ,

तुमचे सगळेच प्रतिसाद चांगले आहेत.
> संशयामुळे आणि चुकीच्या बंधनामुळे उलट अशा संबंधांना प्रोत्साहन नाही का मिळणार ? > मिर्च सिनेमात श्रेयस तळपदेच्या संशयी वृत्तीमुळे दुखावलेली रायमा सेन अरुणोदय सिंगसोबत अफेअर करते अशी एक कथा आहे.

माणसाला अतिशय तीव्र बुद्धिमत्ता असल्या मुळे .
मानवी मनात असंख्य भावनांचा कल्लोळ झालेला आसती
त्यामुळे लोभ,संपत्ती ची हाव , ऐश,चैन, ह्यासाठी सुधा नाती तोडली जातात इथे संशय घेणे हा विषय नसतो.
श्रीदेवी आणि अनिल कपूर चा पिक्चर आहे ह्या विषयावर ऐक

Pages