अनेकजण आपल्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह का असतात?

Submitted by Parichit on 3 March, 2019 - 02:51

थोडा नाजूक विषय आहे. पण बोलायला तर हवेच. कारण त्याला सामाजिक महत्व आहे. जास्त पाल्हाळ न लावता थेट विषयावर येतो.


काहीजण (किबहुना बरेचजण) आपल्या वैवाहिक/एंगेज्ड/कमिटेड जोडीदाराविषयी इतके पजेसिव्ह का असतात? मुळात वैवाहिक/लैंगिक जोडीदाराबाबत पजेसिव्ह असणे हे नैसर्गिक आहे कि मानवी संस्कृतीचा परिणाम म्हणून आले आहे? लोक काय म्हणतील अशी भावना त्यामागे असते कि तू फक्त माझाच/माझीच अशी भावना असते? एकमेकाला आपापली स्पेस देऊन संसार करणे सुखकारक कि एकमेकाला जखडून एकमेकांवर पाळत ठेवत जगणे सुखकारक? पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपली संस्कृती नष्ट होईल अशी काहीना भीती वाटते ती किती खरी आहे? ती संस्कृती आपलीशी करणारा एक वर्ग आणि ते करता न आल्याने चिडचिड होणारा दुसरा वर्ग अशामध्ये आपला समाज भरडला जात आहे का?

या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. हे प्रश्न डोक्यात येण्याला कारण तसेच घडले. ती पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे सयुचित वाटते...

माझे माझ्या एका मित्राशी आणि त्याच्या बायकोशी अत्यंत मित्रत्वाचे संबंध आहेत. म्हणजे अर्थातच आधी हा माझा मित्र झाला. मग ती झाली. तशी ती आधी भेटत वगैरे होती. आमची अनेकदा नजरानजर होत होती. पण संवाद असा होत नव्हता. कारण संवादाचे काहीच कारणच नव्हते. पण काळाच्या ओघात अशा काही घटना घडल्या कि त्यामुळे हा माझा मित्र झाला. आवडीनिवडी आणि अनेक बाबींवर आमची मते जुळत असल्याने लवकरच आम्ही चांगले घनिष्ट मित्र झालो. घरी जाणेयेणे वाढले तसे त्याची पत्नी पण माझी चांगली मैत्रीण झाली. म्हणजे थट्टामस्करी करण्याइतकी निखळ मैत्री झाली. पुढे आम्ही व्हाट्सपवर पण जोडले गेलो. मेसेजेसची देवाणघेवाण होत होती. मस्करी पण चालत होती. अर्थात मैत्रीची मर्यादा ठेवूनच, हे वेगळे सांगायला नको. अन्यथा मैत्रीचे नाते राहिलेच नसते. हा आपल्या पत्नीविषयी पजेसिव्ह असेलसे कधीही वाटले नव्हते. नाहीतर काहीजण मी पाहिले आहेत. इतके सुद्धा त्यांना चालत नाही. त्यामानाने हा विचाराने फारच पुढारलेला "वाटत होता". म्हणून मी सुद्धा तिच्याशी संवाद साधताना फार कधी विचार केला नाही. तेवढा विश्वास निर्माण झाला होता आमच्यात. असे कित्येक महिने सुरु होते.

पण एक दिवस विचित्रच घडले. मी नेहमीप्रमाणे तिला मेसेज टाकला. बऱ्याच वेळाने सुद्धा तिला तो पोहोचला नसल्याचे लक्षात आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. तिचा प्रोफाईल फोटो पण गायब होता, स्टेटस सुद्धा दिसत नव्हते. मी तिची व्हाट्सप प्रोफाईल चेक केली आणि माझी शंका खरी ठरल्याचे लक्षात आले. तिने मला ब्लॉक केले होते. मला खूप आश्चर्य वाटले. थोडे वाईट सुद्धा वाटले. काय प्रकार झाला असेल याचा मी अंदाज करू शकत होतो. त्यानंतर हा मात्र भेटत होता. अगदी नेहमीप्रमाणेच. आमच्या गप्पा भेटणे वगैरे सगळे सुरूच होते. त्याच्यात काहीही म्हणजे काहीही फरक जाणवला नाही. जणू काहीच घडलेले नाही. पण ती मात्र अनेक दिवस गायब झाली होती. अधूनमधून भेटायची ती दिसेनाशीच झाली. असे पूर्वी कधी झाले नव्हते. त्यामुळे थोडी चिंता पण वाटू लागली. कारण अनेकदा ती भेटत असे दिसत असे. नक्की काय झालेय याचा मला बोध होईना. पण मित्राच्या आणि माझ्या नात्यात काहीही फरक झाला नसल्याने काही दिवसांनी मी सुद्धा विषय सोडून दिला. कुणी बोलले, बोलले. नाही बोलले, नाही बोलले. असेल काहीतरी झाले म्हणून विषय डोक्यातून काढून टाकला.

आणि एक दिवस अनेक दिवसांनी ती बाहेर दिसली. पण दुरूनच. आम्ही दोघांनीही स्माईल केले. काही झाले आहे असे दोघांपैकी कुणीच दाखवले नाही. मला नाही म्हटले तरी हायसे वाटले. कि चला फार वाईट असे काही घडलेले नसावे. त्यानंतर ते दोघेही अधूनमधून भेटत राहिले. हा तर काय नेहमीच भेटायचा. पण ती सुद्धा भेटू लागली. तिच्याशी पूर्वीइतका संवाद असा होत नव्हताच. एखादे स्माईल आणि हाय हेलो बस्स इतकेच. त्यापलीकडे काहीही बोलणे नाही. व्हाट्सपवरचे संवादसुद्धा अजूनही थांबलेलेच होते. अजूनही मी ब्लॉक होतो.

या सगळ्या प्रकारानंतर लक्षात आले कि तो स्वत:ला दाखवत होता तसा प्रत्यक्षात नव्हता. प्रत्यक्षात तो नक्कीच खूप पजेसिव्ह असणार. पण त्याचबरोबर आमच्यातल्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होऊ नये हे सुद्धा त्याने पाहिले. हे दोन्ही मुद्दे सांभाळताना त्याला बरीच मानसिक कसरत करावी लागली असावी. किंवा कदाचित "आपण नात्यामध्ये एकमेकाला स्पेस देणारे आहोत" असे त्याला "वाटत" असावे पण प्रत्यक्षात वेळ आपल्यावर मात्र त्याला ते हाताळता आले नसेल असाही एक अंदाज आहे. माझा अजून एक मित्र आहे व त्याची पत्नी सुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे. त्या दोघांच्याबाबत मात्र त्याच्यापेक्षा तीच माझी खूप चांगली मैत्रीण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी परिस्थिती आहे. आपापली पूर्ण स्पेस त्यांनी एकमेकाला दिली आहे. नाते म्हणजे एकमेकाला जखडून ठेवणे नव्हे हे त्यांनी जाणले आहे. पण हे सर्वांनाच जमत नाही.

हे जे काही घडले यावर मला सल्ले नको आहेत. ते सगळे सोर्टआउट झाले/होईल तो भाग वेगळा. पण या सगळ्या घटनेमुळे माझ्या मनात वर धाग्याच्या सुरवातीला मांडलेले प्रश्न आले त्यावर आपली मते हवी आहेत. काहीजण आहेत (माझ्या ह्या मित्रासारखे) ज्यांना वरकरणी वाटते कि जोडीदाराला आपापली स्पेस देणे आवश्यक आहे पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर मात्र या गोष्टी हाताळता येत नाहीत. त्यांनी हे कसे हाताळावे? वगैरे वगैरे प्रश्न माझ्या मनात आले. ह्याबाबत मायबोलीकर आपली मते मांडू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< आपली संस्कृती आणि पाश्चात्त्य संस्कृती यातील फरक आधी स्पष्ट करा पाहू! >>
--------- आपली संस्कृती आणि पाश्चात्त्य संस्कृती यातील फरक या धाग्यापुरता स्पष्ट करा.

पाश्चात्य संस्कृती म्हणजे अर्थातच व्यक्तिस्वातंत्र्यचा पुरस्कार करणारी संस्कृती. एकमेकाला स्पेस देणारी संस्कृती. तिकडे जोडीदार आपल्याला जखडून ठेवतोय म्हटल्यावरच घटस्फोट देऊन रिकामे होतात लोक.

परिचित सर
हा धागा व या आधीचा आपला एक धागा (https://www.maayboli.com/node/68373) वाचल्यास असे लक्षात आले की अशा प्रकारच्या घटना तुमच्या बाबतीत वारंवार घडतात. असे का होत असावे याचा विचार करा. त्या मित्राच्या जागी स्वत:ला ठेवून बघा. कदाचित तुमचे तुम्हालाच उत्तर मिळेल.
बाकी आपण जाणते आहात.

पण पर्सनल चाट हवेत कशाला उगीच ? सरळ एक क्लोज ग्रुप ठेवायचा नं हम तुम और वो .. सगळे एकाच ठिकाणी सर्वासमोर बोला काय ते ! म्हणजे कोण काय बोलले ते ३ऱ्याला उगीच टेंशन नको.

माबोवरचे लेखक लेखाबद्दलही पझेसिव असतात तर जोडीदाराचं काय घेऊन बसलात!!!
एकाच विषयावर चारचार क्वाडकोर धागे निघतात. ते पझेसिवपणाच की.

पण कशावरून तुम्ही अंदाज बांधलात की त्यानेच तिला सांगितले तुम्हाला ब्लाॅक करायला?? तिने स्वतःहूनही केलेच असू शकते की.

पण कशावरून तुम्ही अंदाज बांधलात की त्यानेच तिला सांगितले तुम्हाला ब्लाॅक करायला?? तिने स्वतःहूनही केलेच असू शकते की.>>> +१.

दोन व्यक्ती काय बोलतात हे आपल्याला शश्प माहित् नाही.त्यातली एक व्यक्ती इथे येउन अर्धवट सोयिस्कर माहिती देऊन स्वतः हायमोराल ग्राउंडवर तिसर्‍या व्यक्तीवर पझेसिव्ह असल्याचे शरसंधान करते, त्यासाठी की जे त्या तिसर्‍या व्यक्तीने काय केले हे शष्प माहित नसतांना.

लॉजवाला उगाच भडक्ला नसेल ह्याची खात्री वाटू लागलीये.

तुमची एखादी कंमेन्ट तिला आवडली नसेल नि तिने ब्लॉक केले असेल असे असू शकते. देयर इस अ फाईन लाईन, कित्येक वेळा ती क्रॉस झालीय हे बोलणाऱ्याला कळत नाही.

दुसरे म्हणजे तिने व्हाट्सएप नंबर चेंज केला असेल असे पण असू शकते की, त्यामुळे जुना नंबर ब्लॉक वाटतोय.

तुमची एखादी कंमेन्ट तिला आवडली नसेल नि तिने ब्लॉक केले असेल असे असू शकते. देयर इस अ फाईन लाईन, कित्येक वेळा ती क्रॉस झालीय हे बोलणाऱ्याला कळत नाही.>>+११११

ह्यांचे ईतर लेख वाचता याचीच शक्यता जास्त आहे,

मर्यादा ओलांडली असणार तुम्ही प्रत्येक प्रसंगात ।
स्त्रिया चा सिक्स सेन्स खूप पॉवर फुल असतो ।
बदलेली नियत त्याना लगेच समजते

खाण मध्ये सर्व उदाहरण मध्ये स्त्री ह्यांची मैत्रीण आहे हीच उदाहरण आहेत ।त्या मुळे लिखाण संशयास्पद आहे >>> कल फिर आना वाली का ?

एकंदर प्रतिसाद पाहता काही खुलासे करत आहेत:

खुलासा १: मी त्या मित्राच्या ठिकाणी असतो तर एक भूमिका घेतली असती. एकतर पजेसिव्ह. म्हणजे तिला स्पष्ट सांगायचे मला तू अन्य कोणत्या पुरुषाशी मैत्री केलेले आवडणार नाही. तुझ्यावर नेहमी पाळत राहील. विषय संपला. किंवा तिला पूर्ण स्पेस तरी दिली असती. तुझे स्वत:चे पण आयुष्य आहेस. कोणाशी मैत्री करायची ते तू ठरव. अशीच भूमिका ठेवली असती. पण हे असे अध्यात न मध्यात कन्फ्युजन करून दुटप्पी वागलो नसतो.

खुलासा २: जर तिने स्वत:च ब्लॉक केले तर ते आधीच केले नसते का? कारण त्या दिवशी कोणताच मेसेज मी पाठवला नव्हता. मैत्रीच्या परिघात राहून कधी किरकोळ थट्टामस्करी केली होती त्याला पण खूप दिवस झाले होते. त्यावर तिने सुद्धा हसून प्रतिसाद देऊन विषय तिथेच संपला होता. शिवाय जर तिने खरेच स्वत:हून ब्लॉक केले असते तर नन्तर भेट झाल्यावर ओळख तरी दाखवली असती का? इथे तिने मला ब्लॉक करून सुद्धा प्रत्यक्ष भेटीत मात्र स्माईल दिले हाय हेलो केले.

खुलासा ३: मी धाग्याखाली नोट लिहून सुद्धा माझ्या पूर्वीच्या धाग्यावरून टोमणे मारायचे सुरु आहे ह्याला मी काय म्हणू? एक मात्र विशेष आहे कि तिथे सुद्धा धक्कादायक म्हणजे लॉज मालकाच्या बाजूने बोलणारे भेटले आणि आता इथे सुद्धा माझी काहीही चूक नाही तरीही माझीच चूक म्हणत आहेत. कमाल आहे.

खुलासा ४: मी हे प्रसंग काल्पनिक लिहित नाही. तशी मला गरज पण नाही. ह्या खऱ्या घटना घडल्या आहेत. तरीही मला कथा लिहिण्याचा सल्ला दिल्याबद्दल आपले आभार.

खुलासा ५: अन्य एका धाग्यात "संधी असताना मी काहीच करत नाही" म्हणून माझ्याशी संवाद बंद केलेल्या स्त्रिया/मुलींविषयी मी लिहून गेलो आहे. तो संदर्भ वेगळा होता. तो प्रकार इथे नाही. इथली केस वेगळी आहे हे लक्षात घ्या.

प्रतिसादांबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.

ता.क. मी धाग्यात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर मात्र कोणी बोलताना दिसले नाही. हि पजेसिव्ह वृत्ती कशी निर्माण होते? आणि जे आपल्या जोडीदारांना जगण्याची पूर्ण मुभा देतात त्यांची मानसिकता काय असते? यावर चर्चा व्हावी असे वाटत होते.

जे आपल्या जोडीदारांना जगण्याची पूर्ण मुभा देतात त्यांची मानसिकता काय असते?
! तुम्ही देता का? देत असाल तर हा प्रश्न का पडला? देत नसाल तर का देत नाही?

वृत्ती कशी निर्माण होते? आणि जे आपल्या जोडीदारांना जगण्याची पूर्ण मुभा देतात त्यांची मानसिकता काय असते

1) कितीही खर्च करण्याची स्वतंत्रता,
2)मित्रानं बरोबर मर्यादेत फिरबे आणि हॉटेलिंग
3)पुरुष मित्र स्त्री मैत्रीण ह्यांना संकट काळी मदत
4) सर्व विषयावर एकत्र गप्पा ।
इथपर्यंत स्त्री पुरुष मैत्री योग्य

पण कशावरून तुम्ही अंदाज बांधलात की त्यानेच तिला सांगितले तुम्हाला ब्लाॅक करायला?? तिने स्वतःहूनही केलेच असू शकते की.

Submitted by Nidhii on 3 March, 2019 - 19:21
>>>>>>
निधी, कशाला लेखकुला गिल्ट फिलिंग देतेय...
Wink

{{{ शिवाय जर तिने खरेच स्वत:हून ब्लॉक केले असते तर नन्तर भेट झाल्यावर ओळख तरी दाखवली असती का? इथे तिने मला ब्लॉक करून सुद्धा प्रत्यक्ष भेटीत मात्र स्माईल दिले हाय हेलो केले. }}}

हा निष्कर्ष मात्र अत्यंत चूकीचा आहे. तुम्ही आभासी आणि वास्तव जगात मोठी गफलत करत आहात. मी माझ्या अनेक मित्र, नातेवाईक, परिचित यांना रोज उठून गुड मॉर्निंग किंवा इतर फालतू जोक्स, चित्रे इत्यादी पाठवू नका म्हणून अनेकदा विनंती केली तरीही त्यांनी ते न ऐकल्याने त्यांना केवळ व्हॉट्स अ‍ॅप वरच ब्लॉक केले आहे. प्रत्यक्ष भेट झाल्यास व्यवस्थित बोलतोही. तिथे कटूता नाही. फक्त त्यांच्या प्रचंड फॉरवर्डिंगने माझ्या फोनची मेमरी फूल होऊ नये म्हणून घेतलेली काळजी आहे. व्हॉट्सॅपवर ब्लॉक करण्याचा आणि प्रत्यक्ष जीवनात शत्रूत्व असण्याचा काहीएक संबंध नाही.

असो.

{{{ मी धाग्यात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर मात्र कोणी बोलताना दिसले नाही. हि पजेसिव्ह वृत्ती कशी निर्माण होते? आणि जे आपल्या जोडीदारांना जगण्याची पूर्ण मुभा देतात त्यांची मानसिकता काय असते? यावर चर्चा व्हावी असे वाटत होते. }}}

मूळात तिने तुम्हाला ब्लॉक केले नसून तिच्या नवर्‍याने तिचा फोन ताब्यात घेऊन तुम्हाला ब्लॉक केले आहे असा अचाट निष्कर्ष तुम्ही काढलाय जो तर्कशुद्ध वाटत नाहीये त्यामुळे त्या निष्कर्षावर आधारित प्रश्न्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न कशाला करायचा?

{{{ मी धाग्याखाली नोट लिहून सुद्धा माझ्या पूर्वीच्या धाग्यावरून टोमणे मारायचे सुरु आहे ह्याला मी काय म्हणू? एक मात्र विशेष आहे कि तिथे सुद्धा धक्कादायक म्हणजे लॉज मालकाच्या बाजूने बोलणारे भेटले आणि आता इथे सुद्धा माझी काहीही चूक नाही तरीही माझीच चूक म्हणत आहेत. कमाल आहे. }}}

दोन्हीकडे चूक तुमची नाहीच हे तुम्ही कसे ठरवले? बहुसंख्य वाचकांना दोन्ही कडे तुमचीच चूक वाटलीये. त्याला कारणही आहे तिथेही तुम्ही लॉजवाल्याने (मालक नव्हता बहुदा तो ज्याच्यासोबत तुमचे भांडण झाले होते. असो.) तुम्हाला तुम्ही विबासं करीत असल्याच्या संशयावरुन रुम नाकारली असा स्वतःच निष्कर्ष काढला होता. या निष्कर्षाला काहीही ठोस आधार नव्हता आणि आता या धाग्यातही मित्रानेच पझेसिव्हनेसमुळे बायकोच्या मोबाईलमधून तुम्हाला ब्लॉक केले या निष्कर्षाला आधार नाही. या कॉमन विचारसरणीमुळे लोक एका धाग्यावर तुमच्या दुसर्‍या धाग्याची आठवण काढणे नैसर्गिक आहे.

लेखकाचे हे वाक्य पण लक्षात घ्या.

"माझ्या एका धाग्यात व्यक्त केलेल्या मतांशी/तपशिलाशी माझ्या अन्य धाग्यातील मते/तपशील जुळतीलच असे नाही. कृपया आपापली मते ज्या त्या धाग्यापुरती मांडावीत हि विनंती. "

<< मैत्रीच्या परिघात राहून कधी किरकोळ थट्टामस्करी केली होती त्याला पण खूप दिवस झाले होते. त्यावर तिने सुद्धा हसून प्रतिसाद देऊन विषय तिथेच संपला होता. शिवाय जर तिने खरेच स्वत:हून ब्लॉक केले असते तर नन्तर भेट झाल्यावर ओळख तरी दाखवली असती का? इथे तिने मला ब्लॉक करून सुद्धा प्रत्यक्ष भेटीत मात्र स्माईल दिले हाय हेलो केले. >>
-------- स्माईल ने अनेक गोष्टी टाळता येतात.

कुणाला ब्लॉक करायचे, नाही करायचे, करायचे असेल तर कधी करायचे ह्याचे तिला स्वातंत्र आहे ना? तुमचा एव्हढा पझेसिव नेस का ? कशासाठी?

ओळख दाखवली ते तीच mature पण दर्शवत ।
पण नंतर ती सावध संपर्क ठेवू लागली हे तुमचं मैत्री करायचं हेतू शुद्ध नाही हे दर्शवत

परिचीत,
तुमची समस्या खरंच गंभीर आहे आणि मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. पुढे १ उपाय सुचवत आहे, कदाचित उपयोगी पडेल.

A man inserted an ad in the classified: ''Wife wanted.'' Next day he received a hundred letters. They all said the same thing: ''You can have mine.''

> तुम्ही देता का? देत असाल तर हा प्रश्न का पडला? देत नसाल तर का देत नाही?

माझ्या बाबत मी वर सांगितलेच आहे कि माझी भूमिका जी काय असेल ती क्लीअर असेल. असे कन्फ्युजन नसणार इतके मात्र खरे. पण प्रश्न तुमचा किंवा माझा व्यक्तिगत नाही. मुभा दिली जाण्यासाठी जी मानसिकता असते तिथे खरेच आपल्यापैकी अनेकांना पोहोचता येते का हा प्रश्न आहे. बहुतेकजण प्रेम म्हणजे बांधून घालणे आणि पाळत ठेवणे असेच मानतात.

> जे आपल्या जोडीदारांना जगण्याची पूर्ण मुभा देतात त्यांची मानसिकता काय असते ... इथपर्यंत स्त्री पुरुष मैत्री योग्य

म्हणजे मुभा च्या नावाखाली शेवटी आपणच जोडीदाराची मर्यादा ठरवायची? हि कसली मुभा?
मी एक सन्माननीय जोडी पाहिली आहे. त्यांना माहित आहे त्यांचे नाते असे बांधून घालणारे नाही. त्यांनी खऱ्या अर्थाने एकमेकांना फ्रीडम दिला आहे. एखादी गोष्ट "मला आवडते पण जोडीदाराला आवडणार नाही म्हणून मी ती न करणे" हे प्रेम नव्हे. पण हे फार कमी जणांना उमगते. अशी नाती फार कमी पहायला मिळतात. अनेकजण केवळ तसे व्हायचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर डळमळतात.

> व्हॉट्सॅपवर ब्लॉक करण्याचा आणि प्रत्यक्ष जीवनात शत्रूत्व असण्याचा काहीएक संबंध नाही.

काही अंशी सहमत आहे. काही अंशी अशासाठी कि कारण स्त्री जेंव्हा ब्लॉक करते पुरुषाला तेंव्हा तिला तो पुरुष तिच्या आयुष्यात नको असतो. असे ब्लॉक आपण उल्लेखलेल्या तांत्रिक कारणासाठी नसतात बहुतेक वेळा.

> तिच्या नवर्‍याने तिचा फोन ताब्यात घेऊन तुम्हाला ब्लॉक केले आहे असा अचाट निष्कर्ष तुम्ही काढलाय जो तर्कशुद्ध वाटत नाहीये

या निष्कर्षाला तशीच कारणे आहेत. ते सगळे लिहिणे योग्य होणार नाही (अनेक दृष्टीने) म्हणून थोडक्यात इतकेच लिहितो कि "त्या" दिवसापासून त्यांच्यात दुरावा आला होता हे मला जाणवले होते. मी अशा काही केसेस पूर्वी पण बघितल्यात. आणि आपल्यापैकी अनेकांनी बघितल्या असतील आसपास. कि अनेकदा नवरा (विशेषतः नवीन लग्न झालेला किंवा लग्न होऊन काहीच वर्षे झालेला) आपल्या बायकोला असे दाखवतो कि बायकोला तो तिची स्पेस देत आहे. किंबहुना तो स्वत:ला सुद्धा तसे वाटवून घेत असेल. बायको सुद्धा पट्कन विश्वास ठेवते आणि मित्राशी बिनधास्त गप्पा वगैरे मारते. मित्राने जरी समजा सांगितले कि "आपण काही चुकीचे चाटिंग करत नाही. तरीही खबरदारी म्हणून हे चाट तू लगेच डिलीट कर". तरी ती ऐकत नाहीत. आपला नवरा इतरांसारखा नाही असा फाजील आत्मविश्वास तिला असतो. आणि अचानक एक दिवस हे "असे" घडते. अशी मी पूर्वीसुद्धा काही उदाहरणे पाहिली आहेत. (यात नवरा व बायको या शब्दांची अदलाबदल केली तरी चालेल). हि नक्कीच तशी केस आहे. म्हणून इतकी खात्री आहे.

> काही कारणांमुळे तिने व्हाट्सएप अकाउंट डिलीट केले असेल.

हि एक शक्यता केवळ युक्तिवाद करण्यासाठी ठीक आहे पण एकंदर परिस्थितीचा विचार करता ती वास्तव वाटत नाही

> तिला स्वातंत्र आहे ना? तुमचा एव्हढा पझेसिव नेस का ? कशासाठी?

अहो मी तिच्याबाबत पजेसिव्ह नाहीच आहे. कसा असेन? गरज काय? मी धाग्यात पण लिहिलेय कि विषय डोक्यातून काढून टाकला. पण धागा अशासाठी आहे कि बरेचजण जोडीदाराविषयी पजेसिव्ह का असतात.

> पण नंतर ती सावध संपर्क ठेवू लागली हे तुमचं मैत्री करायचं हेतू शुद्ध नाही हे दर्शवत

ह्याला काय अर्थ आहे. अहो जे आहे ते मी सांगितले. सावध संबंध ठेवू लागली तर ठेवू लागली. त्यात माझ्या हेतू कसा काय जाणवतो.

Pages