अनेकजण आपल्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह का असतात?

Submitted by Parichit on 3 March, 2019 - 02:51

थोडा नाजूक विषय आहे. पण बोलायला तर हवेच. कारण त्याला सामाजिक महत्व आहे. जास्त पाल्हाळ न लावता थेट विषयावर येतो.


काहीजण (किबहुना बरेचजण) आपल्या वैवाहिक/एंगेज्ड/कमिटेड जोडीदाराविषयी इतके पजेसिव्ह का असतात? मुळात वैवाहिक/लैंगिक जोडीदाराबाबत पजेसिव्ह असणे हे नैसर्गिक आहे कि मानवी संस्कृतीचा परिणाम म्हणून आले आहे? लोक काय म्हणतील अशी भावना त्यामागे असते कि तू फक्त माझाच/माझीच अशी भावना असते? एकमेकाला आपापली स्पेस देऊन संसार करणे सुखकारक कि एकमेकाला जखडून एकमेकांवर पाळत ठेवत जगणे सुखकारक? पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपली संस्कृती नष्ट होईल अशी काहीना भीती वाटते ती किती खरी आहे? ती संस्कृती आपलीशी करणारा एक वर्ग आणि ते करता न आल्याने चिडचिड होणारा दुसरा वर्ग अशामध्ये आपला समाज भरडला जात आहे का?

या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. हे प्रश्न डोक्यात येण्याला कारण तसेच घडले. ती पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे सयुचित वाटते...

माझे माझ्या एका मित्राशी आणि त्याच्या बायकोशी अत्यंत मित्रत्वाचे संबंध आहेत. म्हणजे अर्थातच आधी हा माझा मित्र झाला. मग ती झाली. तशी ती आधी भेटत वगैरे होती. आमची अनेकदा नजरानजर होत होती. पण संवाद असा होत नव्हता. कारण संवादाचे काहीच कारणच नव्हते. पण काळाच्या ओघात अशा काही घटना घडल्या कि त्यामुळे हा माझा मित्र झाला. आवडीनिवडी आणि अनेक बाबींवर आमची मते जुळत असल्याने लवकरच आम्ही चांगले घनिष्ट मित्र झालो. घरी जाणेयेणे वाढले तसे त्याची पत्नी पण माझी चांगली मैत्रीण झाली. म्हणजे थट्टामस्करी करण्याइतकी निखळ मैत्री झाली. पुढे आम्ही व्हाट्सपवर पण जोडले गेलो. मेसेजेसची देवाणघेवाण होत होती. मस्करी पण चालत होती. अर्थात मैत्रीची मर्यादा ठेवूनच, हे वेगळे सांगायला नको. अन्यथा मैत्रीचे नाते राहिलेच नसते. हा आपल्या पत्नीविषयी पजेसिव्ह असेलसे कधीही वाटले नव्हते. नाहीतर काहीजण मी पाहिले आहेत. इतके सुद्धा त्यांना चालत नाही. त्यामानाने हा विचाराने फारच पुढारलेला "वाटत होता". म्हणून मी सुद्धा तिच्याशी संवाद साधताना फार कधी विचार केला नाही. तेवढा विश्वास निर्माण झाला होता आमच्यात. असे कित्येक महिने सुरु होते.

पण एक दिवस विचित्रच घडले. मी नेहमीप्रमाणे तिला मेसेज टाकला. बऱ्याच वेळाने सुद्धा तिला तो पोहोचला नसल्याचे लक्षात आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. तिचा प्रोफाईल फोटो पण गायब होता, स्टेटस सुद्धा दिसत नव्हते. मी तिची व्हाट्सप प्रोफाईल चेक केली आणि माझी शंका खरी ठरल्याचे लक्षात आले. तिने मला ब्लॉक केले होते. मला खूप आश्चर्य वाटले. थोडे वाईट सुद्धा वाटले. काय प्रकार झाला असेल याचा मी अंदाज करू शकत होतो. त्यानंतर हा मात्र भेटत होता. अगदी नेहमीप्रमाणेच. आमच्या गप्पा भेटणे वगैरे सगळे सुरूच होते. त्याच्यात काहीही म्हणजे काहीही फरक जाणवला नाही. जणू काहीच घडलेले नाही. पण ती मात्र अनेक दिवस गायब झाली होती. अधूनमधून भेटायची ती दिसेनाशीच झाली. असे पूर्वी कधी झाले नव्हते. त्यामुळे थोडी चिंता पण वाटू लागली. कारण अनेकदा ती भेटत असे दिसत असे. नक्की काय झालेय याचा मला बोध होईना. पण मित्राच्या आणि माझ्या नात्यात काहीही फरक झाला नसल्याने काही दिवसांनी मी सुद्धा विषय सोडून दिला. कुणी बोलले, बोलले. नाही बोलले, नाही बोलले. असेल काहीतरी झाले म्हणून विषय डोक्यातून काढून टाकला.

आणि एक दिवस अनेक दिवसांनी ती बाहेर दिसली. पण दुरूनच. आम्ही दोघांनीही स्माईल केले. काही झाले आहे असे दोघांपैकी कुणीच दाखवले नाही. मला नाही म्हटले तरी हायसे वाटले. कि चला फार वाईट असे काही घडलेले नसावे. त्यानंतर ते दोघेही अधूनमधून भेटत राहिले. हा तर काय नेहमीच भेटायचा. पण ती सुद्धा भेटू लागली. तिच्याशी पूर्वीइतका संवाद असा होत नव्हताच. एखादे स्माईल आणि हाय हेलो बस्स इतकेच. त्यापलीकडे काहीही बोलणे नाही. व्हाट्सपवरचे संवादसुद्धा अजूनही थांबलेलेच होते. अजूनही मी ब्लॉक होतो.

या सगळ्या प्रकारानंतर लक्षात आले कि तो स्वत:ला दाखवत होता तसा प्रत्यक्षात नव्हता. प्रत्यक्षात तो नक्कीच खूप पजेसिव्ह असणार. पण त्याचबरोबर आमच्यातल्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होऊ नये हे सुद्धा त्याने पाहिले. हे दोन्ही मुद्दे सांभाळताना त्याला बरीच मानसिक कसरत करावी लागली असावी. किंवा कदाचित "आपण नात्यामध्ये एकमेकाला स्पेस देणारे आहोत" असे त्याला "वाटत" असावे पण प्रत्यक्षात वेळ आपल्यावर मात्र त्याला ते हाताळता आले नसेल असाही एक अंदाज आहे. माझा अजून एक मित्र आहे व त्याची पत्नी सुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे. त्या दोघांच्याबाबत मात्र त्याच्यापेक्षा तीच माझी खूप चांगली मैत्रीण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी परिस्थिती आहे. आपापली पूर्ण स्पेस त्यांनी एकमेकाला दिली आहे. नाते म्हणजे एकमेकाला जखडून ठेवणे नव्हे हे त्यांनी जाणले आहे. पण हे सर्वांनाच जमत नाही.

हे जे काही घडले यावर मला सल्ले नको आहेत. ते सगळे सोर्टआउट झाले/होईल तो भाग वेगळा. पण या सगळ्या घटनेमुळे माझ्या मनात वर धाग्याच्या सुरवातीला मांडलेले प्रश्न आले त्यावर आपली मते हवी आहेत. काहीजण आहेत (माझ्या ह्या मित्रासारखे) ज्यांना वरकरणी वाटते कि जोडीदाराला आपापली स्पेस देणे आवश्यक आहे पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर मात्र या गोष्टी हाताळता येत नाहीत. त्यांनी हे कसे हाताळावे? वगैरे वगैरे प्रश्न माझ्या मनात आले. ह्याबाबत मायबोलीकर आपली मते मांडू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्होटिंगला घ्या बघू.

तुम्हाला काय वाट्ते?

१) ब्लॉक केले ते बरोबर का चूक
२) लग्न केल्यावर पार्टनर संदर्भात पझेसिव असणे बरोबर का चूक.

माझ्या मते दोन्ही बरोबर.

एका सोकॉल्ड वॉट्सेप मित्राने अश्या कपल मधल्या बायकोचे फोटो घेउन ते व्हायरल करायची धमकी दिली. त्याने हाय खाउन कपलने जीव द्यायचा प्रयत्न केला अशी परवाच टाइम्स ऑफ इंडिया मध्ये बातमी होती. आय से लीव्ह द कपल अलोन.

जीव द्यायचा प्रयत्न केला>>> ???
फोटो व्हायरल करेल ह्या भितीने जीव द्यायचा प्रयत्न केला असे कसे फोटो होते?
आणि असतील जर काही तसे फोटो तर ते त्या सोकॉल्ड वॉट्सेप मित्राच्या हाती कसे लागले? आणि जर कपलचे फोटो होते तर दोघानाही त्याबद्दल माहित होते तर त्यांना घाबरायची काही गरज नव्हती.

सस्मित, व्हॉटसप वर कधीकधी लोक डायनॅमिक प्रोफाइल ला भरपूर इतर पर्सनल फोटो/व्हिडीओ टाकतात त्यातले काही व्हायरल करेन वगैरे असे काही असेल.
हे दिसण्याची सेटिंग असतात.कॉन्टॅक्ट लिस्ट/ऑल/ऑल एक्सेप्ट वगैरे बहुतेक.यात कॉन्टॅक्ट लिस्ट ला थोडे पर्सनल फोटो दिसू शकले/सेव्ह करता आले तर गैरवापर होण्याची धमकी ही शक्यता असू शकते.(मी फेसबुक व्हॉटसप दोन्हीवर या पब्लिक शेअरिंग बाबत ढ आहे.पण बहुतेक असे सेटिंगं आहेत.)

अनु, मला माहित आहे हे. पण जर कपलचे फोटो होते आणि त्यांनी स्वतःच वॉअ‍ॅ ला टाकलेले तर शेअर केले काय नी व्हायरल केले काय तर त्यांना फरक पडायला नको असं मला वाटलं.
पण वर अमा म्हणतात तसं काही वेगळं असावं .

पण वर अमा म्हणतात तसं काही वेगळं असावं >> अहो संत्रे असे आहे कि त्या मित्राने कपलशी वॉट्सॅप वर मैत्री केली. विश्वास संपादन केला. मग त्या बाई एकट्याने अम्घोळ करत असताना फोटो घेतले तेव्हा त्या एकट्या होत्या. व मग दोघांना व्हायरल करतो हे फोटो अशी धमकी दिली. त्यामुळे दोघांना बे इज्जतीची भीती बसली व हाय खाउन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दोन तीन दिवस मागच्या टाइम्स ऑफ इंडियात डाव्या बाजूच्या पानावर खाली बातमी आहे. हे सर्व एकाच एरिआत राहणारे होते. तो ऑफिसला गेल्यावर कदाचित फोटो घेतले असतील. फारच विचित्र वाटले मला. विश्वासाचा फायदा किती घ्यायचा एखाद्याने व नक्की इरादा काय होता? असल्या मैत्रीपासून दूर राहिलेलेच बरे. घरी जाउन शोधते.
लिंक मिळेना तशी छोटी आहे बातमी.

एकतर अंघोळ करताना एक परपुरुष फोटो घेतो म्हणजे आश्चर्य. हा काही सिनेमा नाही.
इथे घेतले ही असतील असं मानुया.
तर लोकांना / बाईला नक्की बेइज्जत कसली वाटते ? असल्या ठगाला कर म्हणायचं शेअर काय करायचं ते.
आंजावर लाखो करोडो विडीओ आहेत त्यात माझाही एक असं ठणकावुन सांगायचं.
अशी ठाम भुमिका घेतल्यावर त्याच्या धमकीतली हवाच जाणार.
एक भामटा एका स्त्रीचे अंघोळ करतानाचे चोरुन फोटो घेतो. वर ते शेअर करेन, व्हायरल करेन अशा धमक्या देतो.
तो गुन्हेगार आहे. त्याची कंप्लेंट करायची तर हे दोघे आत्महत्या करायला निघाले Sad
तो ब्लॅकमेल करुन नको त्या गोष्टी करवुन घेणार किंवा मग ह्या कपल ने केलं तसं आत्महत्येचा प्रयत्न किंवा दृश्यम सिनेमा सारखं खुन वैगेरे.

दृश्यम सिनेमा पाहुन मी माझ्या मुलीला सांगितलं आहे की, असं कुणीही काहीही कारणाने ब्लॅकमेल करत असेल धमकाउन काही स्वार्थ साधायचा प्रयत्न करत असेल, तुझं हे गुपित मला माहित आहे, तुझी ही चुक मला माहित आहे मी सगळ्यांअना सांगेन वैगेरे तर न घाबरता जा काय करायचं ते कर असं सांगायचं. आणि घरी जे काही आहे ते खरं आणि स्पष्ट सांगुन ठेवायचं. तुझी चुक असली तरीही.

जा काय करायचं ते कर असं सांगायचं >> फक्त एकट कुठे सापडायच नाही, हि काळजी घ्यावी Happy

एकतर अंघोळ करताना एक परपुरुष फोटो घेतो म्हणजे आश्चर्य. हा काही सिनेमा नाही.>> अहो आज काल स्मार्ट फोन्स असतात सर्वांक डे व अगदी पूर्ण लॅच लॉक प्रायवेट बाथरूम नसू शकते कोणाकडे. त्याने चोरून व वाइट इंटेन्शनने च फोटो घेतले. सत्य कधीही सिनेमा पेक्षा वाइट असतेच.
मुद्दा तो नाही. पण एखाद्याला विश्वास ठेवून मैत्री केली तर असेही काही घडू शकते.

ठणकावून सांगणे वगिअरे लिहायला ठीक आहे इथे पण स्वतःची बे इज्जती, तसेच घराण्याची अब्रू वगिअरे पदर असतात फीलिन्ग्ज ना.
लाज वाटू शकते कि नाही . वॉट्सेप मित्राशी मेसेजिन्ग केल्याबद्दल बायकांचे खुनही झालेले आहेत. रिस्क असते अहो.
ते दोघे वाचले व पोलिस केस केलेलीच आहे.

अमा, मी सहमत आहे हो. रीस्क असते ते कळतंय. पन जिथे आपली चुक नाही तिथे घाबरुन आत्महत्या करायला निघाले त्याचं जरा वाईट वाटलं.

अमा हेच लिहायचं होतं.
सध्या पेपर मध्ये येणाऱ्या पैकी 70% खून 'तू माझ्या बायकोशी फेसबुकवर का बोलतो' आणि 'नवरा मध्ये येतोय त्याला कटवू' वाल्या केसेस आहेत.हा इश्यू माणसाला माणसाचा जीव घ्यावासा वाटण्याइतका समाजात मोठा आहे.बाकी उदार बिदार सगळेच एका हद्दी पर्यंत असतील. पण ही हद्द प्रत्येकासाठी काय असावी याचे नियम स्पष्ट नाहीत.

सस्मित मुद्दा बरोबर आहे पण प्रत्येक माणसाची सितुअशन हँडल करण्याची कॅपबिलिटी वेगळी असते.
आणि कदाचित फक्त अंघोळ करताना काढलेले फोटो नसतील, ते फक्त न्युज ला सांगायला.
जो माणूस बाथरूम मध्ये हळूच कॅमेरा ठेवू शकतो तो मित्राच्या बेडरूम मध्ये का नाही ठेऊ शकत?
नवरा पण आत्महत्या करायला निघाला, म्हणजे याचीच शक्यता जास्त वाटते.आपली क्लिप व्हायरल होईल या भीतीने.

सस्मित
ते दोघे ज्या वस्तीत रहात असतील तिथे या व्हिडीओनंतर होऊ शकणा-या संभाव्य शेरेबाजीची, टवाळीची आणि बदनामीची त्यांना कल्पना असावी. त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे नसेल.

बापरे!!
त्यापेक्षा पजेसिव्ह होऊन असल्या लोकांपासून आपल्या जोडीदाराला सावध केलेले बरे. मग कोणी कितीही वाईट बोलूदे कि बायकोला स्पेसच देत नाही म्हणून. आता त्याच्या बायकोलाच जास्त स्पेस हवी असेल तर तिचे ती बघून घेईल काय करायचे ते.

> २) लग्न केल्यावर पार्टनर संदर्भात पझेसिव असणे बरोबर का चूक.
माझ्या मते दोन्ही बरोबर.

त्यापेक्षा पजेसिव्ह होऊन असल्या लोकांपासून आपल्या जोडीदाराला सावध केलेले बरे. मग कोणी कितीही वाईट बोलूदे कि बायकोला स्पेसच देत नाही म्हणून >

डेंजरस स्लिपरी स्लोप आहेत हे.
काकबळी (https://www.maayboli.com/node/69201) मधले अप्पा पझेसिव आहेत कि संशयी स्वभावाचे?
गोष्ट मोडलेल्या लग्नाची (https://www.maayboli.com/node/69186) मधला संकेत कसा आहे?
पझेसिवनेस कुठे संपतो आणि संशयी वृत्ती कुठे चालू होते कसं ठरवणार?

केवळ परपुरुषाशी बोलू नको सांगणार कि असेतसे कपडे घालू नको सांगणार कि घरातच बसून रहा घराबाहेर पडू नको सांगणार? आणि हे सगळं तुला इतरांपासून सुरक्षीत ठेवण्यासाठीच ग...

पझेसिव्ह पना प्रेम ह्याचा कुठे तरी प्रेम,आपुलकी, इगो, ह्याच्या शी संबंध आहे .ह्या तिन्ही गोष्टी असतील तर आपोआप पझेसिव्ह पना त्या बरोबर येतो .
पण ठराविक मर्यादा प्रत्येक गोष्टीला आसने गरजेचं आसात.जसे वाहन चालवताना आपण ठराविक स्पीड लॉक ठेवतो हायवे आहे मोकळा आहे म्हणून अमर्याद स्पीड अपघाताला आमंत्रण देते .
तसाच अतीप्रेम सुधा वाईटच .अतीप्रेमात सुधा लोकांनी जीव दिला आहे आणि
ते सुधा मूर्ख पना पेक्षा कमी नाही.
लग्न करणे किंवा relationship मध्ये आसने किंवा कोणत्या ही नात्यात व्यवहारी पना आसव .
आंधळं प्रेम करू नये bhavne बरोबर बुध्दीचा सुधा सल्ला घावा हे सर्वांना जमणार नाही ,पण गरजेचं आहे .
नवरा बायको हे नात tas नाजूक .अगदी आताच्या युगाचा विचार केला तर थोड practical vagal पाहिजे .पहिले तर दोघांचं ऐकमेकवार प्रेम हवं फक्त दाखवायला नाही खरोखर विश्वास हवा आपण पार्टनर च्या मताला भावनेला किंमत दिली पाहिजे जे पटत नाही ते स्पष्ट बोललं पाहिजे .
पार्टनर धोका कधी देतो तर कधी प्रेम दाखवण्याचा नादात आपण खूप दुबळेपणा घेतो किंवा आपली मतं जबरदस्ती त्याच्यावर थोपवतो ह्या नात्यात शारीरिक सुख हा पण पैलू असतो .
तेव्हाच नाती तुटत आसतात .तेव्हा तुमचं मर्यादेत प्रेम करण्याचा स्वभाव मदतीला येतो आणि पार्टनर सोडून जरी गेली तरी आशि व्यक्ती त्याचा जास्त विचार करत नाही आणि पर्यायी गोष्टीचा विचार करून आयुष्य आनंदात जगतो .
पण हे आदर्श वागणं सर्वांना. जमत नाही मग खून करणे आत्महत्या करने असले मूर्ख पणाचे निर्णय घेवून दुःखात बुडतो

जेव्हा पार्टनर सोडून जातो किंवा धोका देतो त्याबरोबर responsibility Sudha संपते .
फक्त ज्यांनी जन्म दिला ते आणि ज्यांना आपण जन्म दिला ते फक्त ह्यांची जबाबदारी घेतलीच पाहिजे ते नाकारणे म्हणजे क्रूरपणा

पझेसिवनेस कुठे संपतो आणि संशयी वृत्ती कुठे चालू होते कसं ठरवणार?> बरोबर. पझेसीवनेसच्या आड male chauvinism ही दडू शकतो.

?> बरोबर. पझेसीवनेसच्या आड male chauvinism ही दडू शकतो.

फक्त पुरुष नाही स्त्रिया सुधा passesive आसतात .
उलड थोड्या जास्तच .फक्त पुरुषांना दोष देवू नका

फक्त पुरुष नाही स्त्रिया सुधा passesive आसतात .
उलड थोड्या जास्तच .फक्त पुरुषांना दोष देवू नका
>>>राजेश +188. एकदम सहमत !

हा धागा जर स्त्रीने आपल्या मैत्रिणीच्या नवऱ्याने ब्लॉक केले असा असता, संशय मैत्रिणीवर घेतला असता, प्रतिक्रिया वेगळ्या असत्या.

नवरा दुसऱ्या बाई शी फ्रेंडली होत असेल, बायका होतात का पसेसिव्ह - प्रत्येकाने स्वतःलाच विचारावा प्रश्न.

च्रप्स
तुम्हाला राजेश १८८ यांचे प्रतिसाद समजत असतील तर आमच्यासाठी सुलभ मराठीत भाषांतर कराल का प्लीज ?

फक्त पुरुष नाही स्त्रिया सुधा passesive आसतात .
उलड थोड्या जास्तच .फक्त पुरुषांना दोष देवू नका
>>> याचे काय भाषांतर करू ☺️

पझेसिव्ह पना प्रेम ह्याचा कुठे तरी प्रेम,आपुलकी, इगो, ह्याच्या शी संबंध आहे .ह्या तिन्ही गोष्टी असतील तर आपोआप पझेसिव्ह पना त्या बरोबर येतो .
पण ठराविक मर्यादा प्रत्येक गोष्टीला आसने गरजेचं आसात.जसे वाहन चालवताना आपण ठराविक स्पीड लॉक ठेवतो हायवे आहे मोकळा आहे म्हणून अमर्याद स्पीड अपघाताला आमंत्रण देते .
तसाच अतीप्रेम सुधा वाईटच .अतीप्रेमात सुधा लोकांनी जीव दिला आहे आणि
ते सुधा मूर्ख पना पेक्षा कमी नाही.
लग्न करणे किंवा relationship मध्ये आसने किंवा कोणत्या ही नात्यात व्यवहारी पना आसव .
आंधळं प्रेम करू नये bhavne बरोबर बुध्दीचा सुधा सल्ला घावा हे सर्वांना जमणार नाही ,पण गरजेचं आहे .
नवरा बायको हे नात tas नाजूक .अगदी आताच्या युगाचा विचार केला तर थोड practical vagal पाहिजे . >>> इथे अडलो होतो.

पझेसिवनेस कुठे संपतो आणि संशयी वृत्ती कुठे चालू होते कसं ठरवणार?> बरोबर. पझेसीवनेसच्या आड male chauvinism ही दडू शकतो

>>> यात स्त्रिया पझेसिव्ह नसतात असा अर्थ कुठे दिसला?
हां. Male chauvinism हा एक मुद्दा आहे पुरुषांच्या बाबतीतला. पझेसिव्हनेसच्या आडून त्याचा वापर होऊ शकतो असे मी म्हटले आहे.

Pages