अनेकजण आपल्या वैवाहिक जोडीदारा विषयी इतके पजेसिव्ह का असतात?

Submitted by Parichit on 3 March, 2019 - 02:51

थोडा नाजूक विषय आहे. पण बोलायला तर हवेच. कारण त्याला सामाजिक महत्व आहे. जास्त पाल्हाळ न लावता थेट विषयावर येतो.


काहीजण (किबहुना बरेचजण) आपल्या वैवाहिक/एंगेज्ड/कमिटेड जोडीदाराविषयी इतके पजेसिव्ह का असतात? मुळात वैवाहिक/लैंगिक जोडीदाराबाबत पजेसिव्ह असणे हे नैसर्गिक आहे कि मानवी संस्कृतीचा परिणाम म्हणून आले आहे? लोक काय म्हणतील अशी भावना त्यामागे असते कि तू फक्त माझाच/माझीच अशी भावना असते? एकमेकाला आपापली स्पेस देऊन संसार करणे सुखकारक कि एकमेकाला जखडून एकमेकांवर पाळत ठेवत जगणे सुखकारक? पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपली संस्कृती नष्ट होईल अशी काहीना भीती वाटते ती किती खरी आहे? ती संस्कृती आपलीशी करणारा एक वर्ग आणि ते करता न आल्याने चिडचिड होणारा दुसरा वर्ग अशामध्ये आपला समाज भरडला जात आहे का?

या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. हे प्रश्न डोक्यात येण्याला कारण तसेच घडले. ती पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे सयुचित वाटते...

माझे माझ्या एका मित्राशी आणि त्याच्या बायकोशी अत्यंत मित्रत्वाचे संबंध आहेत. म्हणजे अर्थातच आधी हा माझा मित्र झाला. मग ती झाली. तशी ती आधी भेटत वगैरे होती. आमची अनेकदा नजरानजर होत होती. पण संवाद असा होत नव्हता. कारण संवादाचे काहीच कारणच नव्हते. पण काळाच्या ओघात अशा काही घटना घडल्या कि त्यामुळे हा माझा मित्र झाला. आवडीनिवडी आणि अनेक बाबींवर आमची मते जुळत असल्याने लवकरच आम्ही चांगले घनिष्ट मित्र झालो. घरी जाणेयेणे वाढले तसे त्याची पत्नी पण माझी चांगली मैत्रीण झाली. म्हणजे थट्टामस्करी करण्याइतकी निखळ मैत्री झाली. पुढे आम्ही व्हाट्सपवर पण जोडले गेलो. मेसेजेसची देवाणघेवाण होत होती. मस्करी पण चालत होती. अर्थात मैत्रीची मर्यादा ठेवूनच, हे वेगळे सांगायला नको. अन्यथा मैत्रीचे नाते राहिलेच नसते. हा आपल्या पत्नीविषयी पजेसिव्ह असेलसे कधीही वाटले नव्हते. नाहीतर काहीजण मी पाहिले आहेत. इतके सुद्धा त्यांना चालत नाही. त्यामानाने हा विचाराने फारच पुढारलेला "वाटत होता". म्हणून मी सुद्धा तिच्याशी संवाद साधताना फार कधी विचार केला नाही. तेवढा विश्वास निर्माण झाला होता आमच्यात. असे कित्येक महिने सुरु होते.

पण एक दिवस विचित्रच घडले. मी नेहमीप्रमाणे तिला मेसेज टाकला. बऱ्याच वेळाने सुद्धा तिला तो पोहोचला नसल्याचे लक्षात आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. तिचा प्रोफाईल फोटो पण गायब होता, स्टेटस सुद्धा दिसत नव्हते. मी तिची व्हाट्सप प्रोफाईल चेक केली आणि माझी शंका खरी ठरल्याचे लक्षात आले. तिने मला ब्लॉक केले होते. मला खूप आश्चर्य वाटले. थोडे वाईट सुद्धा वाटले. काय प्रकार झाला असेल याचा मी अंदाज करू शकत होतो. त्यानंतर हा मात्र भेटत होता. अगदी नेहमीप्रमाणेच. आमच्या गप्पा भेटणे वगैरे सगळे सुरूच होते. त्याच्यात काहीही म्हणजे काहीही फरक जाणवला नाही. जणू काहीच घडलेले नाही. पण ती मात्र अनेक दिवस गायब झाली होती. अधूनमधून भेटायची ती दिसेनाशीच झाली. असे पूर्वी कधी झाले नव्हते. त्यामुळे थोडी चिंता पण वाटू लागली. कारण अनेकदा ती भेटत असे दिसत असे. नक्की काय झालेय याचा मला बोध होईना. पण मित्राच्या आणि माझ्या नात्यात काहीही फरक झाला नसल्याने काही दिवसांनी मी सुद्धा विषय सोडून दिला. कुणी बोलले, बोलले. नाही बोलले, नाही बोलले. असेल काहीतरी झाले म्हणून विषय डोक्यातून काढून टाकला.

आणि एक दिवस अनेक दिवसांनी ती बाहेर दिसली. पण दुरूनच. आम्ही दोघांनीही स्माईल केले. काही झाले आहे असे दोघांपैकी कुणीच दाखवले नाही. मला नाही म्हटले तरी हायसे वाटले. कि चला फार वाईट असे काही घडलेले नसावे. त्यानंतर ते दोघेही अधूनमधून भेटत राहिले. हा तर काय नेहमीच भेटायचा. पण ती सुद्धा भेटू लागली. तिच्याशी पूर्वीइतका संवाद असा होत नव्हताच. एखादे स्माईल आणि हाय हेलो बस्स इतकेच. त्यापलीकडे काहीही बोलणे नाही. व्हाट्सपवरचे संवादसुद्धा अजूनही थांबलेलेच होते. अजूनही मी ब्लॉक होतो.

या सगळ्या प्रकारानंतर लक्षात आले कि तो स्वत:ला दाखवत होता तसा प्रत्यक्षात नव्हता. प्रत्यक्षात तो नक्कीच खूप पजेसिव्ह असणार. पण त्याचबरोबर आमच्यातल्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होऊ नये हे सुद्धा त्याने पाहिले. हे दोन्ही मुद्दे सांभाळताना त्याला बरीच मानसिक कसरत करावी लागली असावी. किंवा कदाचित "आपण नात्यामध्ये एकमेकाला स्पेस देणारे आहोत" असे त्याला "वाटत" असावे पण प्रत्यक्षात वेळ आपल्यावर मात्र त्याला ते हाताळता आले नसेल असाही एक अंदाज आहे. माझा अजून एक मित्र आहे व त्याची पत्नी सुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे. त्या दोघांच्याबाबत मात्र त्याच्यापेक्षा तीच माझी खूप चांगली मैत्रीण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी परिस्थिती आहे. आपापली पूर्ण स्पेस त्यांनी एकमेकाला दिली आहे. नाते म्हणजे एकमेकाला जखडून ठेवणे नव्हे हे त्यांनी जाणले आहे. पण हे सर्वांनाच जमत नाही.

हे जे काही घडले यावर मला सल्ले नको आहेत. ते सगळे सोर्टआउट झाले/होईल तो भाग वेगळा. पण या सगळ्या घटनेमुळे माझ्या मनात वर धाग्याच्या सुरवातीला मांडलेले प्रश्न आले त्यावर आपली मते हवी आहेत. काहीजण आहेत (माझ्या ह्या मित्रासारखे) ज्यांना वरकरणी वाटते कि जोडीदाराला आपापली स्पेस देणे आवश्यक आहे पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर मात्र या गोष्टी हाताळता येत नाहीत. त्यांनी हे कसे हाताळावे? वगैरे वगैरे प्रश्न माझ्या मनात आले. ह्याबाबत मायबोलीकर आपली मते मांडू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्रिया जरका पुरुषांपेक्षा जास्त पझेसिव्ह असतील तर ती वरती लिंक, चर्चा झालीय त्या बातमीऐवजी

क्ष हा पुरुष नागवा अंघोळ करत होता, य स्त्रीने लपूनछपून त्याचा व्हिडिओ घेतला. नंतर तो व्हिडिओ दाखवून, व्हायरल करु अशी धमकी देऊन, जबरदस्ती शरीरसंबंध ठेवायला लावले. य ही क्षच्या बायकोची मैत्रिणच होती.

∆ अशा बातम्या आल्या असत्या.

किंवा

माझ्या नवऱ्याशी फेसबुक, व्हाट्सऍपवर गुलुगुलु बोलते काय ग टवळे म्हणत बायकांनी एकमेकांचे खून केल्याच्या बातम्या ९०% असल्या असत्या.

===
> हा धागा जर स्त्रीने आपल्या मैत्रिणीच्या नवऱ्याने ब्लॉक केले असा असता, संशय मैत्रिणीवर घेतला असता, प्रतिक्रिया वेगळ्या असत्या. > होतात का अशा केसेस? होत असतील आणि त्याबद्दल स्त्रिया बोलत नसतील तर पुरुषांनीच सांगायला चालू करावं आपण किती स्त्रीयांना, काय कारणामुळे ब्लॉक केलं.

===

पझेसिव असणे हे आई-वडील, भावंडे, मित्र-मैत्रीणी, मुलं, जोडीदार वगैरे कुठल्याही नात्यात घडू शकते. लैंगिक जोडीदाराच्या बाबतीत एकनिष्ठतेची अपेक्षा अजून गुंता वाढवते. माणसाला लहानपणापासून जे काही अनुभव आलेले असतील, जोडीला जे काही संस्कार झालेले असतील त्यानुसार नात्यातील वावर ठरणार. वाटणारी असुरक्षितता, वाट्याला आलेली फसवणूक, निरपेक्ष प्रेमासाठी झगडावे लागणे/ न मिळणे, नाकारले जाणे वगैरे जे काही ओझे असेल त्यानुसार बरेचदा वर्तन घडते. काही वेळा जवळच्या दुसर्‍या व्यक्तीच्या वाट्याला आलेली वंचना देखील तुम्हाला असुरक्षित बनवते. नात्यातील व्यक्ती दुरावू नये म्हणून तिच्यावर अंकुश ठेवण्याचे उपाय शोधणे सुरु होते, नात्यात दुसरे कुणी जवळ येणार नाही अशी परीस्थिती निर्माण करणे सुरु होते. व्यक्तीबद्दल प्रोटेक्टिव असणे वेगळे आणि पझेसिव असणे वेगळे. वेळीच आपल्या मनाला सावरण्यासाठी उपाय केले नाही तर चांगले नाते किडून जाते. मात्र बरेचदा परंपरा, संस्कार, राहणीमान यांचा पगडा असा असतो की हे चुकीचे वर्तन आहे हे कबुलच केले जात नाही उलट असे वागणे हा आपला हक्कच आहे असे समजूनच व्यक्ती जगत असते. एका किडलेल्या नात्यातून न कळत दुसर्‍या किडक्या नात्याची पूर्वतयारी सुरु होते. पझेसिव असणे अनैसर्गिक नाही पण चुकीचे आहे. आपले वर्तन/नाते तपासून पाहणे , नात्यातील व्यक्तीशी मोकळा संवाद साधणे , एकमेकांवर विश्वास ठेवत अवकाशाचा आदर करणे हे जाणीवपूर्वक करावे लागते. मी स्पेस देणार आहे / मला स्पेस हवी असे नुसते म्हणून काही होत नाही. सशक्त नात्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात, कारण आपण सगळेच जण काही ना काही ओझे बाळगून असतो.

धागाकर्त्याच्या मैत्रीणीच्या बाबतीत मला नाही वाटत नवर्‍याच्या आग्रहपायी ब्लॉक केले गेले. बरेचदा ओळख होते, थोडी मैत्रीही होते, मात्र यापुढची स्टेप आजकाल एकदम इंस्टंट येते. सोशल मेडीया -नेट मुळे उत्साहाने चॅट, मेसेजेस वगैरे सुरु होते. मात्र काही काळाने आपल्या मित्राच्या/मैत्रीणीच्या अपेक्षेत ती व्यक्ती बसत नाहीये असे जाणवायला लागते. किंवा आपल्याला ज्या परीघात ही व्यक्ती चालेल त्यापेक्षा अधिक जवळीक दाखवली जातेय असे जाणवते. पूर्वी प्रत्यक्ष भेटणे, पत्र पाठवणे, किंवा मुद्दाम लँड लाईन फोन असे संपर्काचे मर्यादित मार्ग होते. समोरच्या पार्टीला थंड प्रतिसाद देवून हळूहळू मैत्री संपून जायची. प्रत्यक्ष भेटीत मधे हाय हॅलो केले, ओळख दाखवणे एवढा शिष्ठाचार पाळला बस्स! , त्या पेक्षा जास्त मैत्री नको हे पूर्वी नुसत्या वावरातून सांगता यायचे . आजकाल सोशल मेडीयामुळे एकतर्फी संवाद सुरुच रहातो. मग ब्लॉक करणे हा उपाय केला जातो.

मला अजून नीट समजलेले नाही. पझेसिव्ह असूनही जोडीदाराची स्पेस मान्य करणे हे होऊच शकत नाही का ?
किंवा उलट स्पेस देणारे पझेसिव्ह नसतात असा काही प्रकार आहे का ?
एखाद्या वस्तू बाबत पण पझेसिव्ह असतो. पण वेळप्रसंगी ती कुणाला देतोच की.
जोडीदाराच्या बाबतीत मात्र साहजिकच काही मर्यादा असतात, असाव्यात..

हे सगळं तरतमभावावर सोडून नाही का चालणार ?

आसतात ना केसेस प्रियकराच्या मदतीने पतीचा खून .
पत्नी नी पतीवर विषप्रयोग केला
.
किती तरी आशा घटना होतात .
पतीच्या मैत्रिणीला पत्नीची मारझोड किती तरी घटना होतात तुम्ही तिकडे डोळेझाक का करताय .
क्ष हा पुरुष नागवा अंघोळ करत होता, य स्त्रीने लपूनछपून त्याचा व्हिडिओ घेतला. नंतर तो व्हिडिओ दाखवून, व्हायरल करु अशी धमकी देऊन, जबरदस्ती शरीरसंबंध ठेवायला लावले. य ही क्षच्या बायकोची मैत्रिणच होती.
हा विषय सेक्युलिटी शी संबंधित आहे तो विषय वेगळा आहे नर हा सेक्शुअली आक्रमक असतो .
तरी सुधा स्त्रियांनी पुरुषांना ब्लॅकमेल केल्याची उदाहरणे आहेत फक्त तुम्हाला तिकडे बघायचे नाही

पझेसिवनेस कुठे संपतो आणि संशयी वृत्ती कुठे चालू होते कसं ठरवणार?>> हे ज्याचे त्याने ठरवायला हवे ना.

केवळ परपुरुषाशी बोलू नको सांगणार कि असेतसे कपडे घालू नको सांगणार कि घरातच बसून रहा घराबाहेर पडू नको सांगणार? आणि हे सगळं तुला इतरांपासून सुरक्षीत ठेवण्यासाठीच ग...>>>>पटले. पण म्हणूनच मी लिहिले कि .....त्याच्या बायकोलाच जास्त स्पेस हवी असेल तर तिचे ती बघून घेईल काय करायचे ते. आपला नवरा सरसकट सगळ्या पुरुषांशी बोलू नको म्हणतोय कि एका पुरुषाबद्दल बोलतोय? तिला ज्या गोष्टी पटत नाहीत त्याबद्दल ती बोलेल.

लेखातल्या केस मधे लेखक म्हणतोय नवर्‍याने बंधन घातले म्हणून मैत्रिणीने ब्लॉक केले. मग असेही असू शकते कि नवरा म्हणाला असेल हा माणूस मला काही 'निखळ' मैत्री करणारा वाटत नाही जरा जपून रहा. तिलाही त्याचे पटले असेल. मग कशाला उगाच बोलायचे म्हणून तिने ब्लॉक केले असेल. त्याचे लेखकाला कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज तिला वाटली नसेल.

समोरचा माणूस कितीही चांगला असला तरी त्याच्याकडे बघून आपल्याला चांगले वाटेलच असे नाही ना.
-पण म्हणून आपण त्याच्याशी एकदम वाईट नाही वागत. 'हाय-हेलो', कधीतरी भेटणे ठिक वाटते. पण घरोबा, पर्स्नल चाट नको वाटते.
-तसेच त्या चांगल्या माणसाने (आपण चांगले आहोत याबाबत शंका नसेल तर) वाईट वाटून घेऊ नये. दुसर्‍याला काय वाटावे हे आपल्या हातात नाही हे जाणून सोडून द्यावे. त्यातून नवरा-बायको मधे कोण कसा आहे, कसे वागतो (जोपर्यंत त्यापैकी कोणीही आपल्याला सांगत /विचारत नाही तोपर्यंत) या फंदात पडू नये.
जे आपल्याला विचारत नाहीत त्यांच्यावर विचार करण्यात वेळ घालवू नये Happy

पुरुषाचे नग्न विडिओ काढून ब्लॅकमेल करणे हास्यास्पद वाटत आहे, पण ब्लॅकमेल करायला इतर गोष्टी असतातच की.
परपुरुषाशी संबंध ठेवणे आणि नंतर ब्लॅकमेल करणे अशा केसेस न्युज मध्ये असतातच की.

स्त्रिया जरका पुरुषांपेक्षा जास्त पझेसिव्ह असतील तर ती वरती लिंक, चर्चा झालीय त्या बातमीऐवजी

क्ष हा पुरुष नागवा अंघोळ करत होता, य स्त्रीने लपूनछपून त्याचा व्हिडिओ घेतला. नंतर तो व्हिडिओ दाखवून, व्हायरल करु अशी धमकी देऊन, जबरदस्ती शरीरसंबंध ठेवायला लावले. य ही क्षच्या बायकोची मैत्रिणच होती.

∆ अशा बातम्या आल्या असत्या. >>>
याचा पझेसिव्हनेसशी काय संबंध?

तुम्ही केलेली तुलना ही पुरुष प्रधान संस्कृतीमुळे समाजाचे झालेले ब्रेन कंडिशनिंग / ब्रेनवॉश दर्शविते.

परपुरुषाशी संबंध ठेवणे आणि नंतर ब्लॅकमेल करणे अशा केसेस न्युज मध्ये असतातच की. >>

या उदाहरणात पुरुषाला आधी संबंध प्रस्थापित करावा लागतो. म्हणजे त्याने आमिषाला बळी पडल्यावर.
त्या स्त्रीला तिच्या नकळत फोटो काढून ब्लॅकमेल करण्यात आले, हा महत्वाचा फरक आहे.

या उदाहरणात पुरुषाला आधी संबंध प्रस्थापित करावा लागतो. म्हणजे त्याने आमिषाला बळी पडल्यावर.
>>>बरोबर पण आमिष दाखवले कोणी .. चूक त्याची ना

"पझेसिव्ह असणे अनैसर्गिक आहे का ?"

=> पझेसिव्ह किंवा मालकी हक्क गाजवणे नैसर्गिक नाही. हा पुरुषप्रधान संस्कृतीचा परिणाम आहे. माझ्या एका धाग्यात पूर्वी यावर विस्तृत चर्चा सुद्धा झाली आहे. स्त्रीप्रमुख टोळ्या असलेली आदिम मानव संस्कृती नांगराच्या शोधानंतर कशी पुरुषप्रधान होत गेली, आणि जमिनीबरोबरच स्त्री सुद्धा कशी पुरुषाच्या मालकीची झाली यावर प्रसिद्ध झालेला संशोधनात्मक लेख मी त्या धाग्यात पेस्ट केला होता. ज्याची जितकी जास्त जमीन आणि जितक्या जास्त बायका तो पराक्रमी हा सामाजिक संकेत नांगराच्या शोधानंतर निर्माण झाला. अन्यथा तत्पूर्वी स्त्रीप्रमुख टोळ्यांमध्ये पुरुषांचा स्वैर संचार असे. मालकीहक्क वगैरे काही नव्हते. कुटुंबव्यवस्था नव्हती. जन्माला आलेली मुले जोडीची नव्हे तर "टोळीची" असत.

ह्या वरच्या बातमीसारख्या बातम्या आपल्याकडे अधूनमधून येत असतात. नग्न फोटोमुळे बदनामीच्या भीतीने आत्महत्या. अशा बातम्या पाश्चात्यांच्या जगात येतात का? माझ्या माहितीप्रमाणे नाही. तिकडे तर न्यूड बीच असतात. ती कल्पना आपल्याकडे का नाही? कारण मालकीहक्क/पजेसिव्हनेस आपल्याइकडे वाजवीपेक्षा जास्त आहे आणि त्यात प्रेम दहा टक्के व "समाज काय म्हणेल" हि भावनाच नव्वद टक्के असते. काळाच्या ओघात ओघानेच स्त्रियांना सुद्धा पजेसिव्ह व्हावे लागले. त्यात दहा टक्के प्रेम आणि नव्वद टक्के "असुरक्षिततेची भावना" असते.

>>नग्न फोटोमुळे बदनामीच्या भीतीने आत्महत्या. अशा बातम्या पाश्चात्यांच्या जगात येतात का? माझ्या माहितीप्रमाणे नाही. तिकडे तर न्यूड बीच असतात. >>
पाश्चात्य जगातही अशा प्रकारचे फोटो आणि त्यातून शोषण होते. फोटो वायरल होतील या भीतीने आत्महत्त्या हा प्रकार कमी असला तरी ब्लॅकमेल करुन पैसे उकळणे, रिवेंज पोर्न वगैरे प्रकार होतात. न्यूड बीच असले तरी सरसकट लोकं काही न्यूडीस्ट नसतात. त्याशिवाय न्यूडीस्ट असणे आणि अशा प्रकारे तुमच्या खाजगीपणावर अतिक्रमण या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या. प्रिडेटरी वर्तन वेगळे आणि पझेसिव असणे वेगळे.

मुलगा म्हणजे आपली म्हातारपणची काठी, तो लग्नानंतर दुरावला तर... या भितीने आई पझेसिव होवू शकते, वर्गातल्या नव्या मुलीमुळे आपली मैत्रीण दुरावेल म्हणून एखादी मुलगी पझेसिव होवू शकते, बॉयफ्रेंड्/गर्लफ्रेंड पझेसिव होवू शकतात. नवरा-बायकोच्या नात्यात किंवा पालक आणि मुलांच्या नात्यात पझेसिवनेस वेगवेगळ्या कारणाने येवू शकतो. आजी-आजोबा आणि नातवंडांच्या नात्यातही पझेसिवनेस बघायला मिळतो. दर वेळी उघड अंकूश असेल असे नाही, आपले नाते सगळ्यात घनिष्ठ असावे म्हणून त्या व्यक्तीची इतर नाती कमकुवत करण्याचा प्रयत्न देखील पझेसिवनेसचाच भाग झाला.

स्वाती२,
दोन्ही पोस्ट आवडल्या.

===
इनामदार,
> पझेसिव्ह किंवा मालकी हक्क गाजवणे नैसर्गिक नाही. हा पुरुषप्रधान संस्कृतीचा परिणाम आहे.
मालकीहक्क/पजेसिव्हनेस आपल्याइकडे वाजवीपेक्षा जास्त आहे आणि त्यात प्रेम दहा टक्के व "समाज काय म्हणेल" हि भावनाच नव्वद टक्के असते. काळाच्या ओघात ओघानेच स्त्रियांना सुद्धा पजेसिव्ह व्हावे लागले. त्यात दहा टक्के प्रेम आणि नव्वद टक्के "असुरक्षिततेची भावना" असते. >
अगदी हेच लिहले होते मी माझ्या सुरवातीच्या दोन प्रतिसादात. पझेसीव्ह असण्याला उगाच प्रेम वगैरेचा मुलामा देऊ नका. 'प्रेम असते कि नाही हे डिबेटेबल आहे. पण विश्वास नक्कीच नसतो आणि असुरक्षीतता, जेलसी, इन्फिरिरिटी कॉम्प्लेक्स असतो....'

===
मानव,
> याचा पझेसिव्हनेसशी काय संबंध?
तुम्ही केलेली तुलना ही पुरुष प्रधान संस्कृतीमुळे समाजाचे झालेले ब्रेन कंडिशनिंग / ब्रेनवॉश दर्शविते. >
पान ५ वरचे सुरवातीचे, माझा प्रतिसाद येण्याआधीचे प्रतिसाद वाचा. या असल्या बातम्या देऊन, भय पसरवून, पझेसिव्ह असणेच कसे योग्य आहे, ज्या बाईला स्पेस हवीय तिने आपलंआपलं बघून घ्यावं पण डिफॉल्ट वागणुकीत पुरुषाने बाईला कंट्रोल करणंच कसं योग्य आहे हे सांगितलं/ सुचवलं गेलंय (अपवाद सस्मित).

पझेसिव्हनेस चा अर्थ एण्व्ही, असुरक्षितता एव्हढाच घेतला जात आहे.

पझेसिव्हनेस प्राण्यात सुद्धा पहायला मिळतो. पाळीव प्राण्यांच्या बाबतीत तर अनुभवाला येतो. आपल्या पाळीव प्राण्याला दुस-या प्राण्याला आपण हात लावलेला चालत नाही. त्याचं प्रेम वादातीत असतं. पण आपण त्याच्या वाट्याचं प्रेम दुस-या प्राण्याला दिलेलं त्याला चालत नाही. याट थोडीशी असुरक्षितता बहुधा तो आपल्यावर अवलंबून असल्यामुळे येत असावी.

लहान मुलाच्या बाबतीत ते एखाद्या खेळण्याच्या बाबत पझेसिव्ह असल्याचे आढळून येते. मात्र त्यावर ते अवलंबून नसते. एखादे मूल त्याच्या आवडत्या खेळण्याबाबत दुस-याला ते खेळायला देऊ शकते किंवा एखादे अजिबात देत नाही. पझेसिव्ह दोन्ही मुलं असतात. पण स्वभावातला हा फरक असतो.

जोडीदार हे अर्थात काही खेळणे नाही. काही मर्यादेत मोकळेपणा मान्य करूनही पझेसिव्ह राहणे हे होऊ शकत नाही का ? अजिबातच जोडीदाराला दुस-या कुणाशी बोलू न देणे या मधे पझेसिव्ह असण्यापेक्षा इगो, सामाजिक प्रतिष्ठेच्या कल्पना यांचा प्रभाव जास्त असावा. काही काही घरात घरातली बाई समोर आलेली चालत नाही. पदर डोक्यावर घ्यावा लागतो. यात प्रतिष्ठा आड येत असेल. पझेसिव्हनेस, प्रेम यांचा अंश औषधाला सुद्धा नसतो. मूल झाले नाही तर सरळ दुसरी पाहून लग्न उरकताना पाहीले आहेत. कायदा बियदा लांबच. ही टोकाची उदाहरणे आपण टाळूयात. यांना माणसात यायला दोनशे वर्षे सहज लागतील.

पझेसिव्ह असणे म्हणजे जेलसी , एण्व्ही एव्हढाच अर्थ आपण घेतोय का ही शंका आहे.

पझेसिव्हनेस चा अर्थ जेलसी,एण्व्ही नाही.

पझेसिव्हनेस म्हणजे मालकीहक्क गाजवणे.
जेलसी, एन्व्ही म्हणजे मत्सर.
असुरक्षितता म्हणजे insecurity.

मालकीहक्क बायकोवर/ जोडीदारावर गाजवला जाणार,
मत्सर त्रयस्थ पुरुष/ स्त्रीबद्दल असणार कारण उसकी कमीज मेरे कमीज से सफेद है,
मेरी कमीज कमी सफेद असल्याने/ आहे अशी माझीच समजूत असल्याने मला असुरक्षित वाटणार.

प्रॉब्लेम लक्षात घ्या विश्वास जी व्यक्ती मालकीहक्क गाजवू पाहतेय तिच्यात इन्फिरिरिटी कॉम्प्लेक्स आहे, म्हणून तिला त्रयस्थ व्यक्तीबद्दल जेलस वाटतेय, आपले जोडीदाराशी नाते असुरक्षित आहे वाटतेय आणि म्हणून स्वतःच्या जोडीदारावर मालकीहक्क गाजवू पाहतेय.

पान ५ वरचे सुरवातीचे, माझा प्रतिसाद येण्याआधीचे प्रतिसाद वाचा. या असल्या बातम्या देऊन, भय पसरवून, पझेसिव्ह असणेच कसे योग्य आहे, ज्या बाईला स्पेस हवीय तिने आपलंआपलं बघून घ्यावं पण डिफॉल्ट वागणुकीत पुरुषाने बाईला कंट्रोल करणंच कसं योग्य आहे हे सांगितलं/ सुचवलं गेलंय (अपवाद सस्मित).>>> तुम्ही असा अर्थ काढाल असे वाटले नव्हते.
जगात असेही लोक आहेत जे मित्र-मित्र म्हणवतात आणि घात करतात. नवर्‍याला जर एका व्यक्तीबद्दल वाईट फिलींग येत असेल आणि तसे बायकोला सुचविले असेल तर त्यात पझेसिव्हपणा आहे का काळजी ते आपण कसे ठरवणार. हा माणूस आपल्याला प्रत्येकवेळी असाच करतो आणि त्यामुळे मला त्रास होतो असे त्याच्या बायकोला वाटत असेल तर त्याविरोधात तिनेच पहिले पाऊल उचलायला हवे ना, कि तिसर्‍याने 'बघ बाई तुला बंदी घालतो म्हणजे तो वाईटच, तुला काही स्पेसच नाही' असे सांगून फूस लावायची .

पझेसिव असण्याचा एक भयानक प्रकार गेल्या रविवारी ऑस्ट्रेलियात घडला. प्रीती रेड्डी नावाच्या डेन्टिस्टचा खून तिच्या हर्षवर्धन नारदे नावाच्या पहिल्या डेन्टिस्ट मित्राने केला. प्रीतीचे अनेकदा भोसकलेले व एका सुट्केसमधे कोम्बलेले शव दोन दिवसानी पोलीसाना मिळाले. प्रीतीने सहा महिन्यापूर्वी हर्षवर्धन बरोबरचे सम्बन्ध तोडले होते व आता ती दुसर्या बरोबर लग्न करणार होती. नारदेने एका ट्रकवर आपली कार समोरून आपटवून आत्महत्त्या केली आहे. हर्षवर्धनच्या पझेसिव असण्यामुळे दोन प्रोमिसिन्ग करीयर नष्ट झाली व त्यान्च्या कुटुम्बियाना अति मन;स्ताप झाला आहे. तेम्व्हा अती पझेसिवनेस वाईट नाशकारी आहे.

पझेसिव्हनेस म्हणजे मालकीहक्क गाजवणे >>> हाच अर्थ घेऊन मागचे काही प्रतिसाद आले आहेत.
लिमिटेड पझेसिव्हनेस म्हणजे जोडीदाराचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे, आपल्याकडे लक्ष द्यावे ही अपेक्षा ठेवणे याला मालकीहक्क हा शब्द जरा जास्त वाटतो. विवाह हे बंधन आहे. त्यात या अपेक्षा अनैसर्गिक वाटत नाहीत. अर्थात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी त्रासदायकच असतो.

प्रेम असल्याशिवाय पझेसिव्हनेस असणार नाही. निरपेक्ष प्रेम वगैरे या बोलायच्या गोष्टी आहेत. प्रेमाच्या बदल्यात प्रेमाची/ अटेन्शनची अपेक्षा ठेवणे म्हणजे पझेसिव्ह होणे असा अर्थ मी घेतला होता. त्यामुळे जोडीदाराबाबत स्पेस देतानाही काही वर्तुळं आपोआप आखली जातात. ती किती नॅरो किंवा विशाल आहेत हा डिबेटचा मुद्दा असायला हवा. हे स्वभावानुसार, शिक्षण, एक्स्पोजर यामुळे वेगवेगळे ठरेल. काहींना जोडीदाराने पझेसिव्ह असणे आवडते. मग ते वर्तुळ कसे का असेना .. कारण त्यामुळे आपल्याकडे अटेण्शन दिले जाते असे वाटते. अशा व्यक्तींना त्यासोबत येणारी बंधने जाचाची ठरत नाहीत.

दोघांच्या पार्श्वभूमी भिन्न असतील तर एकाला या गोष्टीचा त्रास निश्चित होईल.

कोणत्याही ही बातमी मध्ये ज्या घटनेचा वर्णन केले आस्ते ते सत्य आसलं .
तरी त्यांच्या पूर्वायुष्यात बऱ्याच घटना घडलेल्या आसतात त्या आपल्याला माहीत नसतात .

शुद्धलेखनकार सर
कोनत्याहि भासेत आसलं तर ते डोले वाचत. असल्यानं ते मेंदू.
ला समजलं तर आसं काहिअत्रि जमलं तर सोपं आसलं.
तर होईल का असं लिहालं तर समजलं.

सोनाली,

एका व्यक्तीला तुम्ही काही महिने ओळखता आणि आता तुमची बर्यापैकी मैत्री झालीय. त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काही वाईट ऐकायला मिळालं तर तुम्ही काय करणार? वाईट सांगणारा
१. तुमचा जोडीदार आहे
२. फार जवळचा, जुना मित्र, मैत्रिण आहे
३. थोडीफार ओळख असणारी व्यक्ती आहे
४. अगदीच अनोळखी व्यक्ती आहे

अ. लक्षात घ्या एका व्यक्तीला दुसर्याकडून वाईट अनुभव आला म्हणून सगळ्यांनाच त्याच्याकडून वाईट अनुभव येईल असे नाही.
ब. सांगणारा स्वतःचा वाईट अनुभव नसताना केवळ ऐकीव माहितीवर बोलत असू शकेल.

---
आता दुसरी केस
तुमच्या जोडीदाराने, मुलगा/गीने , जवळच्या मित्र/मैत्रिणीने 'हा माझा अतिशय जवळचा नवीन मित्र आहे' अशी एकाची ओळख करून दिली.
१. तुम्हाला स्वतःला त्या व्यक्तीचा वाईट अनुभव आहे
२. तुम्ही ऐकले आहे कि ती व्यक्ती वाईट आहे ( इथे परत कोणाकडून ऐकले आहे याचे वेगवेगळे सिनारीओ येतात)

अ. तुम्ही काय करणार?
ब. तुम्ही माहिती सांगितल्यावर त्या व्यक्तीने काय करावे अशी तुमची अपेक्षा असणार?
क. तुमच्या अपेक्षेनुसार ती वागली नाही तर तुम्ही काय करणार.

---
माझ्यामते सगळ्याच केसमधे जर प्रौढ व्यक्ती असतील तर त्याना फक्त FYI सांगावे आणि निर्णय त्याचत्याला घेऊ द्यावा. अगदी जोडीदार असला तरी!

===
किरण,

> जोडीदाराचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे, आपल्याकडे लक्ष द्यावे ही अपेक्षा > यासाठी वेगळे शब्द आहेत attention seeking, giving attention, काळजी घेणे वगैरे.

प्रेम, काळजी, गरजांकडे लक्ष देणे, त्या पुरवणे वगैरे सगळ्याच धन भावना झाल्या.

पझेसिव्ह असणे ही ऋण भावना आहे. षटरिपूसारखी.

ओके.

महिलादिनाच्या शुभेच्छा सगळ्यांना.
आपल्या कुटुंबातील सगळ्याच महिलांना सबल, सक्षम होण्यासाठी सपोर्ट करा.

पझिसिवनेस हा नात्यातला अविभाज्य भाग आहे.
प्रत्येक जण आपल्या जोडीदारासाठी पजेसिव असतोच.
म्हणुन आपापल्या जोडीदाराला कुणी गुलाम/कैद्यांची वागणुक देत नाही.
स्पेस देणं/किती स्पेस देणं/पजेसिव असणं/किती पजेसिव असणं हे व्यक्तीस्वभावसापेक्ष आहे.
स्वाती, पोस्ट आवडली.

Pages