चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी काळसेकर निल मुकेश च्या जॉनी गद्दार मधे होती... जिच्या हातून शेवटी जॉनी मरतो Proud

किती सिनेमे पहायचे राहिलेत माझे.... वर उल्लेख आलेल्यात एकही पाहिला नाहिये...
जॉनी गद्दार, लव आज कल, न्युयॉर्क etc etc

बाकि परवा तेजाब पाहिला... नवर्‍याने पाहिला नव्हता(कस शक्य आहे हे??) म्हणुन मुद्दाम शोधला.
लोट्या पठाण, मुन्ना, मोहिनी.. मजा आली. Happy शाळेत असताना नजरेआड झालेल्या बर्‍याच चुका दिसल्या.. Wink

मी दिवाळीच्या सुट्टीत जोगवा पाहीला.
मस्त सिनेमा आहे.
त्यातील "झुलवा लावणे" या वाक्याचा अर्थ काय होतो, कुणी सांगाल का ?

व्हॉट्स युअर राशी सुरवातीला पहाताना चांगला जमेल असं वाटलं होतं पण नंतर गडबड झाली गोवारीकरांची !
सर्वात मोठी गोची: हा मुलगा लग्ना साठी पोरी बघायला सुरवात करतो, तर जरी १२ राशीच्या ( १२ भिन्न टाइप च्या) मुली बघत असला तरी किमान बेसिक आपेक्षा सेट केलेली नको का यानी?
म्हणजे १२ मुलींचे स्वभाव,appearance, अर्थिक परिस्थिती वेगळे असले तरी निदान शिक्षण, प्रोफेशन, वय या बाबतीत तरी याच्या समान आपेक्षा सेट नसतात का , त्या मधे एवढी तफावत असलेल्या मुली सिलेक्टेड १२ मधे कशा काय पाहतो हा येडा? Happy
म्हणजे एक डॉक्टर, एक मुलगी एकदम दहावी पास किंवा डुइंग नथिंग टाइप्स मुली , एखादी कॉलेज मधे शिकणारी, एखादी एकदम बिझनेस वुमन, एखादी डान्सर,काही नुसत्याच श्रीमंत बापाच्या मुली , काही टोकाच्या मॉडर्न तर काही अगदीच दोन वेण्या साडी वाल्या टाइप :फिदी:, उगीच अपल्या १२ राशीच्या मुली पहायच्या म्हणून निरनिराळ्या पोरी पहात असतो , काही प्रि सिलेक्शन प्रकार च नाही, हे एकदम अ. अणि आ. वाटलं !
अजुन काही अ. आणि आ. प्रसंग :
त्यातली ती भविष्य पहाणारी पोरगी आणि पुनर्जन्मा वर विश्वास ठेवणारी पहिल्याच भेटीत हर्मन बवेजाला सिड्युस करायला सुरवात करतात , पहिली गावंढळ मुलगी केवळ अमेरीकेचा मुलगा आहे म्हणून मुद्दाम त्याच्या समोर सिगारेट फुंकून दाखवते, श्रीमंत बापाची पोरगी पण वेडेपणाचं नाटक करायचं म्हणून याच्या गळ्यातच पडते, काही पण Biggrin
प्रियांका चोप्रा बाकी काम छान करते आणि मेक ओव्हर चांगले झालेत पण त्या संजना आणि अजुन एक दोन कॅरेक्टर्स मधे भयानक अन इव्हन रेड हायलाइट्स डोळ्यात खुपतात !
मेक ओव्हर मधे पहिली पोक काधलेली मेषकन्या, मिस परमार आणि शेवटची नाबालिक प्रियांका चे गेट अप मस्त जमलेत.
हर्म बवेजा ओके !
गाण्यां मधे ते वृषभ कन्येचं 'सूं छे ' गाणं लक्षात रहातं, बाकी अगदीच साधारण !
एकंदरीत गोवारीकरांचा क्वालिटी मधे उतरता आणि चित्रपटाच्या लांबी मधे चढता ग्राफ चाल्लाय, बाकी काही नाही !

,

डीजे, Happy
मुळत, ज्या लोकानी घरातच एक ज्योतिषेए आधी ठेवलाय ते लोक आधी पत्रिका जुळवून मगच लग्न करतील ना?? की फक्र राशेए बघून लग्न करतील?? >>>

हर्म बवेजा ओके !>>> इथे सैफ असता तर त्याने धमाल केली असती,

अश्विनी काम चांगलं करते, रोल लहान असला, तरी प्रभावी करते. तिने डेब्यू सोनीच्या 'सीआयडी'मधून केलं, पण त्यात आत्ता आहे त्याच्या बरोब्बर निम्मी होती. मध्यंतरी सांस-बहू सीरीयलीतही कपाळभर कुंकू लावून होती. 'खाकी'मध्येही हवालदाराच्या बायकोचा अगदी २ सीनचा रोलही तिने मस्त केला होता. 'ऑल द बेस्ट'मध्ये तर तिला जवळपास बिपाशाइतका आणि मुग्धापेक्षाही जास्त रोल दिलाय आणि तिने धमाल केल्ये त्यात..

वर मी चुकून तिचं आडनाव 'काशीकर' केलं, मग लक्षात आलं, की अश्विनी काशीकर नावाची एक मायबोलीकरीण आहे Proud

अश्विनी काम चांगलं करते, रोल लहान असला, तरी प्रभावी करते>>>> हो पूनम, त्यातूनही ती विनोदी काम छान करते

फूक हा एक अविस्मरणीय सिनेमा आहे Proud

आज मी ऑल द बेस्ट बघणार!!

ज्यांना बदला/ खुन्नस काढायचा असेल जवळच्या शत्रुंवर, त्यांनी आपल्या या मंडळीना ऑल दि बेस्ट हिन्दी फिल्मची तिकिटे द्यावी...

ज्यांना बदला/ खुन्नस काढायचा असेल जवळच्या शत्रुंवर, त्यांनी आपल्या या मंडळीना ऑल दि बेस्ट हिन्दी फिल्मची तिकिटे द्यावी... >>> राजु तुला शत्रु शी मांडवली म्हणायचं आहे का ? Proud
येवढं हसल्यावर कदाचीत मांडवलीच होईल .

काल इथले वाचुन ऑल द बेस्ट बघायला घेतला ऑनलाइन. काही विनोद सोडले तर एकदम सुमार वाटला, हॉल मध्ये जाऊन मोठ्या पडद्यावर बघीतला असता तर किंचीत जास्त आवडण्याची शक्यता होती. त्या फरदीन ऐवजी अक्षयकुमार घेतला असता तर हेच विनोद जास्त चांगले वाटले असते. माझ्याकडून २ तारे.

ऑल द बेस्ट घरीच बघायचा सिनेमा आहे. ह. ह. ग. लोळण्यासारखे विनोद नाही आहेत पण तरी बोर होत नाही. मित्रांसोबत घरी मस्ती करताना पाहायला ठीक आहे.

संजय दत्त, अजय देवगण यांचं टायमिंग चांगलं आहे, त्याचप्रमाणे जॉनी लिवर आणि विजय पाटकर चे टायमिंग चांगलं आहे. अतुल परचुरे आणि आर्. जी. वी. (खरं नाव माहित नाही) यांचे काम देखिल चांगलं आहे.

बिपाशा, मुघ्धा यथा तथाच पण अश्विनी काळसेकर मल्लू नोकराणीच्या भूमिकेत धमाल करते.

थोडक्यात जास्त विचार न करता पाहिला तर आनंद मिळू शकतो.

अतुल परचुरे आणि आर्. जी. वी. (खरं नाव माहित नाही) यांचे काम देखिल चांगलं आहे.>>> मला या दोघाचेच काम आवडले आणि अश्विनीचे पण, सही दिसते ती!! "धोंडू, जस्ट चिल"

अजय देवगण निर्माता असला तरी भाव खाऊ भूमिका संजय दत्तच्या वाट्याला आलेली आहे. फरदीनला कॉमेडी अज्जाब्बात जमत नाय, (तसं त्याला काहीच जमत नाही)

संजयचा एक डायलॉग पैसा वसून होता.. "कॉमेडी तो अभि कर रहा हू, अ‍ॅक्शन तो तीस सालोसे कर रहा हू!"

गोलमालचा भरपूर प्रभाव जाणवत राहतो (जुना गोलमाल नव्हे!!) गोवा, बीचवरचे गाणे, कार रेस, मारामारी इत्यादो इत्यादि.

खरंतर हा अजून विनोदी झाला असता पण स्टायलिशपणाम्धे बराच पिक्चर फुकट गेलाय. मुगधा पिक्चरमधे आहे की नाही तेही समजत नाही. बिपाशा ठिक ठाक!

ऑ.दी.बे. मध्ये संजय दत्त किती जाडा दिसतोय,कसातरीच दिसतोय.
मला फक्त अश्विनी आणि तो आर. जी. वी. हे दोघेच आवडले. बाकि सिनेमा सुमार.आश्चर्य (की वाईट )ह्याचच वाटतं कि काडिचाहि अभिनय न येता हे लोकं किति पैसा कमवतात.

टी.पी. आहे ऑ.दि.बे एकदम, मला आवडला(अजय देवगण आणि फर्दीन मुळीच आवडत नसले तरीही) !
डॉयलॉग्स धम्माल आहेत :).
संजय दत्त अतिशय विचित्र आडवा तिडवा झालाय अ‍ॅबनॉर्मल, पण त्याला नेहेमी प्रमाणे भाव खाउन जाणारा रोल मिळालाय !
अजय देवगण्-फरदीन बद्दल कही न लिहिलेलच बरं !
बिपाशाला असे का मॅटर्निटी स्टाइल ड्रेस दिलेत Proud , लठ्ठ दिसते त्यामुळे !
मुग्धा गोडसे अति सामान्य, इतके केस मागे गेले असून काय सारखे ओढून पोनी टेल बांधते , टकली दिसते चक्क !

अतुल परचुरे आणि तो रा.गो.व. स्लम डॉग मिलिओनर सही :).
क्वलिटी वगैरे काही खास नसली तरी गोविंदाच्या सिनेमा सारखी मजा आली बघताना !

तो फरदीन तेवढ ऑ.द्.बे. मधून गायब झाला, तर आत्ता जातो हा सिनेमा बघायला.

ते फरदीन म्हण्जे लईच विचित्र रसायन जन्माला आलं आहे. बाप काय, पोरगा काय.

व्हाट्स योर राशी अतिमहाभयानकटुकारसिनेमा आहे. आ.गो. ला रा.गो.व. सारखंच वेड लागलं आहे.

"धोंडू, जस्ट चिल"
>>
म हा न डायलॉग आहे हा...

हा कलाकार अनेक सिनेमांमधे थँकलेस रोल्स मधे छाप सोडून गेलाय...
१२३, आलू चाट हे सिनेमे तर फक्त याच्यासाठी पहा...

बाकी ऑदबे मधे टिपीकल कुमार मंगत स्टाईल गाड्या उडवणं (शब्दशः उडवणं), गोवा बीचेस वगैरे गोष्टी आहेतच...

हे लिहिणारी मी एकटीच का बहुतेक : मला तरी Blue आवडला :).
प्रेडिक्टेबल होता पण शेवट पर्यंत पहाताना मजा आली, टेक्निकल लेव्हल वर मस्त !
फिरोज खान च्या अ‍ॅक्शन पटांची किंवा धूम चा फील येत होता पहाताना.
अक्शय कुमार झकास, संजत दत्त ठिक.
लारा च्या फॅन्स ना मेजवानी आहे :फिदी:, कट्रिनाला अगदीच १५ मिनिटांचा रोल आहे !
फक्त त्या झायेद खान च्या जागी जॉन अब्राहम असता तर मजा आली असती, त्याच्या बाइक उडवण्याच्या सीन्स मधे तर जॉन चीच आठवण येत होती !
रेहमान ची गाणी बकवास एकदम, पाट्या टाकल्यायेत !
गाणी फॉरवर्ड करून एकदा एंजॉय करण्या सारखा नक्कीच आहे ब्लु :).

गाणी फॉरवर्ड करून एकदा एंजॉय करण्या सारखा नक्कीच आहे ब्लु>> गाणीच कशाला ? सगळेच फॉरवर्ड करून एंजॉय करता येईल Lol (अगदीच बोटे दुखली तर लाराचे shots सोडून द्यावे Wink )

आगे से राईट पाहिला . श्रेयश तळपदे , के के , केरळी अण्णाची कामं चांगली झालीयेत पण सिनेमा म्हणावा तशी पकड घेत नाही .

whats your मधे शेवटी तर मी गोंधळूनच गेले. कित्ती त्या प्रियांका... मग नक्की कोण कोणत्या राशीची आहे आणि नक्की त्याला कोण कुठे भेटली काहीच कळेनासे झाले. एकीबरोबर असताना दुसरी भेटली तर अजूनच गोंधळ.. मला फक्त ती दोन वेण्यावाली लक्षात राहिली. :p

हो ना,
त्यात ती संजना, हंसा पारेख आणि झवेरी बाजार वाल्याची मुलगी एक सारख्याच होत्या, काही लुक मधे फरक च नाही !

मी काल Blue नावाचा प्रकार पाहिला. १ तास २६ मीनटाच्या चित्रपटात लाराला दाखवलच किती ??? तिच्या कोणत्या लुक्स बद्दल इथे चर्चा सुरु आहे??? माझ्या माहिती नुसार मी Blue च पाहिला आहे चुकुन दुसरा कुठला चित्रपट नाही Happy

मि पण ब्लु अर्धाच पाहिला. काही गाणि बरि होति. तो अक्षय कुमार सारखा सारखा शेठजि शेठजि म्हणत असतो. कित्ती बोर होत ते!!

मी पण. इन्टर्वल नंतर झोपच आली. ते शेवटीच उठले. मला आता कतरिनाच्या एकसंध गोड दिसण्याचा व आक्टिन्ग न करण्याचा कंटाळा आला आहे. २४ तास नुसती बर्फीच समोर. आम्ही काही म्हणा स्मिता पाटिल वाले. कायली चे गाणे बेकार आहे. ६ कोटी खर्च कुठे झाले. झायेद खान टुकार. लारा भिकार, अक्षय कुमार, संजय दत्त म्हातारा. त्यात टेक्निकल चुका खूपच आहेत. डीप सी डायविन्ग म्हणे आणी समुद्र एकदम स्वच्छ. एक तरी
क्लाइव कसलर चे पुस्तक वाचायचे होते डायरेक्टर ने. आमच्या कडे एक शार्क चे स्ट्फ्ड टॉय आहे ते कुत्र्यांच्या वरून उड्वून ब्लू ब्लू असे ओरडायचे असा नवीन खेळ आम्ही या आठ्वड्यात खेळत आहोत.

नावे तरी काय ठेवतात शिंचे पिक्चरची. म्हणे ब्ल्यू. चिरंजीव ब्ल्यू ही फिल्म पहायला गेलेत हे आमच्या कुटुम्बाने मला ऐकवल्यावर काही क्षण चक्करच आली बघा....

>>चिरंजीव ब्ल्यू ही फिल्म पहायला गेलेत हे आमच्या कुटुम्बाने मला ऐकवल्यावर काही क्षण चक्करच आली बघा....

का ? तर रॉबिनहूड चे चिरंजीव ब्ल्यू फिल्म पाहून आले म्हणून? Happy

Pages