तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आजच्या भागात विकू राजनंदिनीची(ईशा) ची री ओढतो आणि राजेश व सुधीरला घालवतो. ह्या मिटींगनंतर पुन्हा आपली आपली मिटींग करायला आईसाहेब, मंदा आणि झेंडे आईसाहेबांच्या केबीनमधे जातात, बाकी सगळे विकूच्या केबीनमधे जातात.
विकू त्याच्या केबिनमध्ये कितने आदमी थे ह्या स्टाईलमधे सगळ्यांना कंपनीत होत असलेला फ्राॅड कसा लक्षात आला नाही ह्यावरून झापतो.
इथे विकू किती वेळाने मिटींग सुरू करतो हे कळत नाही कारण आईसाहेब झेंडेंना त्यांच्या केबिनमध्ये बोलावतात पण झेंडे विकूच्या मिटींगमधे पण हजर असतात. परांजपे आणि इतर किती वेळ मान खाली घालून उभे होते ते कळेना. मी पण जातो असे सांगणारा जयदीप मिटींमधून गायब होतो. असो.
तर मिटींगमधे विकू सगळ्यांना ओरड-ओरड ओरडतो आणि नंतर हाकलून देतो. आता बहुतेक मायरा राजिनामाच देते की काय असे वाटून गेले.
ईशाच्या माहेरी ईशाचे बाबा आणि आई फ्रिज दुरूस्त कसा करावा ह्या विचारात असतानाच जयदीप अचानक तिकडे धडकतो. ईआई त्यांना लगेच फ्रिज दुरूस्त करायला लावते पण ईबाबा तिला भानावर आणून पाणी द्यायला सांगतात. नंतर ईआई चहाचे न विचारता एकदम पपईच का विचारते ते कळत नाही. तर जयदीप सापशिडीच्या खेळाचे नाव काढून ईआईबाबांना न्यायला येतो.
आईसाहेब झेंडेंना ईशाने साड्या का नाही वाटल्या असे विचारतात.( आता मी ह्या साड्यांचे काय करु हा प्रश्न पडला असेल.)
जयदीप नाशिक ढोल वाजवणार्यांना बोलावून ईबाबांना पेढे आणायला लावतो आणि ईशाला तिच्या केबिनमध्ये प्रवेश करायला लावतो.
युनियनवाले मोठया सापाला (जो ९९ वरून २ वर घेऊन येतो.) त्यालाच आता काय करायचं हे विचारायचे ठरवतात.
ईशा विकूला त्याच्याच शब्दात अडकवून भ्रष्ट माणसाचे नाव पुढे येईल हा विश्वास दाखवते.
झेंडे खरच अंधारात आहेत हे नक्की त्यामुळे ईशाच्या हातात वजीर (झेंडे) येवून तिला राजाला मारता येईल. ईशाला आता बुद्धीबळाच्या खेळाचे नियम पण समजावून घ्यावे लागतील.
झेंडेंना फक्त आईसाहेबांना ईशा हीच राजनंदिनी वाटतेय का हेच पडताळायला ठेवले आहे.

बापरे! हे सगळे एका एपिसोड मधे झाले? सहसा वरच्या वर्णनातील प्रत्येक वाक्यातील घट्नांकरता एक एक एपिसोड खातात Happy

हे सगळे एका एपिसोड मधे झाले? >> हो. बाबांनी मायराला, तुमच्यामुळेच ईशा हुशार झाली हे सारखं सारखं सांगून अगदी नको नको केलं. Happy

आईसाहेबांना पण एक केबिन आहे असं कळलं. किती पैसे वाया घालवले आहेत बघा.
विक्यासाठी सद्ध्या वाढत्या मापाचे नवे शर्ट्स अन ब्लेझर शिवलेले दिसतात.
विक्याची दाढी अन केस पूर्वपदावर येऊ लागलेत हे चांगलं झालं. तो चांगला दिसतो त्यात.

मला एक कळत नाहीए...एनी वे आता विक्याने हिच्या शी लग्न तर केलेलच आहे ना. मग इव्हन इफ ती राजनंदिनी नसली तरी काय फरक पडणारे ....आईसाहेब तिला देतीलच इस्टेट आज ना उद्या..... राजनंदिनी तर येणार नाहीच वरुन क्लेम करायला.... विक्याला तर तशीही ती 'ट्रस्ट' करतेच...मग सगळं ऑलरेडी सेट आहेच की....... सरळ घास घ्यायचा सोडून केड्याला असे उलट सुलट आणि इल्लॉजिकल प्रॉब्लेम्स निर्माण करायची हौसच आहे.... Angry
काल पुन्हा कपाळावर पुसटसा किस.......
सुबोध आता कंटाळल्या सारखा वाटतो त्याच त्या अ‍ॅक्शनला.....

तो खरच खलनायक आहे हे पाहिल्यापासून कंटाळतच मालिका पाहिली जाते.

हा प्रोमो पाहून तर अस वाटत आहे की हा केड्या विक्रांत सरंजामेला अण्णा नाईक बनवणार आहे का?
आता हेड बाईंना नंदिनी ठरवायच अस ठरल होत ना मग आता हे काय मधेच

केड्या मानबा चा पार्ट २ बनवतोय वाट्त....... मुर्ख लेकाचा..... एक होती ते कमी होती का ? ते दुसरी पण त्याच मार्ग वर नेतोय..

मालिकेची पिस काढण्यासाठी बघतो आम्ही विनिता Happy मुळात मालिका पाहन ही फक्त एक औपचारिकता आहे खरं तर माबोवर लिहिण्यासाठी बघतो

केड्या मानबा चा पार्ट २ बनवतोय वाट्त....... मुर्ख लेकाचा..... एक होती ते कमी होती का ? ते दुसरी पण त्याच मार्ग वर नेतोय..
>> खर तर केड्याला मानबा 2 च बनवायची असती पण कुणी बघितली नसती म्हणून वेगळं नाव दिल आणि घुमून फिरून त्यावरच आणायचं Wink

ईशा विकूला त्याच्याच शब्दात अडकवून भ्रष्ट माणसाचे नाव पुढे येईल हा विश्वास दाखवते. >>>>>>> आ, ईशा कधी एवढी हुश्शार झाली? Uhoh

झेंडे खरच अंधारात आहेत हे नक्की त्यामुळे ईशाच्या हातात वजीर (झेंडे) येवून तिला राजाला मारता येईल. >>>>>>>> +++++++++११११११११११ असच दाखवायला हव होत केडयाने. पण तो बसलाय मानबा २ खेळत.

भगवती, आज तुम्ही झेंडेला झेंडेच म्हणालात. Lol

ईशाला आता बुद्धीबळाच्या खेळाचे नियम पण समजावून घ्यावे लागतील. >>>>>>>>> Biggrin

नंतर ईआई चहाचे न विचारता एकदम पपईच का विचारते ते कळत ना >>>>>>> मेबी ती पपई शिळी असेल, नशीब जयदीपने खाल्ली नाही ते, नाहीतरी त्याला त्या (त्याच्याच भाषेत क्रॅप) टॉयलेट मध्ये जाव लागल असत. पण आता तिथे सगळ 'वेष्टन' केलय ना.

आईसाहेब झेंडेंना ईशाने साड्या का नाही वाटल्या असे विचारतात.( आता मी ह्या साड्यांचे काय करु हा प्रश्न पडला असेल.) >>>>>>> आईसाहेबान्ना आणि विसला त्या साड्यांन्ची एवढी काय पडलीये. आता ईशा नन्दूचा पुनर्जन्म आहे म्हणून प्रत्येकवेळी तिने नन्दूसारखच वागाव अस का वाटतय हयान्ना.

इथे विकू किती वेळाने मिटींग सुरू करतो हे कळत नाही कारण आईसाहेब झेंडेंना त्यांच्या केबिनमध्ये बोलावतात पण झेंडे विकूच्या मिटींगमधे पण हजर असतात >>>>>>>>> मला पण हाच प्रश्न पडलेला. आईसाहेबान्नी झेंडेंना बोलावून केवढा वेळ झालेला आणि हा कॉफी घेऊन आईसाहेबान्च्या केबिनमध्ये आता शिरतोय?

विस ईशाच्या खुर्चीवर जोरात फटका मारतो मला वाटल, हि आता भोकाड पसरतेय की काय. Lol

बाबांनी मायराला, तुमच्यामुळेच ईशा हुशार झाली हे सारखं सारखं सांगून अगदी नको नको केलं. >>>>>>>>>> छान, मेहनत विसची होती, आणि क्रेडिट मिळतय मायराला.

सुबोध आता कंटाळल्या सारखा वाटतो त्याच त्या अ‍ॅक्शनला... >>>>>>>>> सुबोध नाही, विस कंटाळलाय.

विक्याची दाढी अन केस पूर्वपदावर येऊ लागलेत हे चांगलं झालं. तो चांगला दिसतो त्यात. >>>>>>>> अगदी अगदी फक्त ते दात साफ करायला हवेत. आज क्लोजअपमध्ये क्लीअर दिसत होत. यक्स!

युनियनवाले मोठया सापाला (जो ९९ वरून २ वर घेऊन येतो.) त्यालाच आता काय करायचं हे विचारायचे ठरवतात. >>>>>>>>>>
भगवति, युनियनवाल्यान्ना तो साप चहा वाटत होता ते नाही बघितल तुम्ही?

मग इव्हन इफ ती राजनंदिनी नसली तरी काय फरक पडणारे ....आईसाहेब तिला देतीलच इस्टेट आज ना उद्या. >>> एक्झॅक्टली. ते सगळे एकूणच अनावश्यक आहे.

सुबोध आता कंटाळल्या सारखा वाटतो त्याच त्या अ‍ॅक्शनला..... >>> हो. उगाच खुनशी दाखवायचा म्हणून कायच्या काय करत असतो. व्हिलन लोकांना एक मोटिव्ह असतो. त्यांचे वागणे त्या मोटिव्ह शी संबंधित असते. इथे तेही "लॉजिक रानोमाळ" मधे आहे. मधेच तो त्या एपिसोड मधे ईशाच्या आईवडलांना रस्त्यावर आणतो की नाही बघ वगैरे बडबडतो. आता त्याच्या सगळ्या प्लॅन मधे याचा काहीच संबंध नाही - उलट आला तर अडथळाच येइल. पण आता त्याच्या वाइटपणाच्या फैरी दिसेल त्या दिशेला सुटल्या आहेत. त्यामुळे ती व्यक्तिरेखा हास्यास्पद झाली आहे.

आधी तो एक नॉर्मल वाटायचा या गोंधळात, तरी बॉस म्हणून रूड वगैरे वाटला तरी.

बाय द वे हा बाफ उघडताना पहिल्या पानावर शेवटी "हे बघून तरी ईशा शिकू दे" अशा अर्थाची कॉमेण्ट वाचली. आता तीस पाने झाली तरी ईशा मधे काहीच फरक दिसत नाही Happy

काल कोणी नोटीस केलं का विक्या मायराला झापताना म्हणतो.... लास्ट बट नॉट द लिस्ट.... मायरा कारखानिस्ट Proud

चहाचे न विचारता एकदम पपईच का विचारते ते कळत नाही>>>>>>> फ्रिज खराब झाल्यामुळे ती काही करून संपवायची असेल. ईबाबा विचारतात पण अगं पपई चांगली असेल का?

आज मोठ्या सापाला (जो ९९ वरून २ वर घेऊन येतो तो.) दाखवायचे असते म्हणून रात्री रातकिड्यांच्या किरकिरी सोबत कर्जतच्या बंगल्याच्या ठेवणीतला लूक न दाखवता विकूला युनियनला चहा देताना दाखवले. तिथे जर ईशामॅडमला फ्राॅड करणार्या माणसाचे नाव कळाले तर काय होईल? ही चर्चा चालते त्यावर विकू पुढचा प्लान काय आहे तो सांगत होता पण ढणाणा म्युझिकमूळे काही ऐकू आले नाही. अजूनही रात्र कंटिन्यू असल्याने रातकिड्यांच्या किरकिरीसोबत आता कर्जतचा बंगला दाखवतात. इथे ईशा आपण युनियनसमोर काय बोललो ते आठवत असताना जुन्या फाईलींवरच्या सह्या चेक करत होती तेवढ्यात विकू तिथे येऊन तिने अजून खोलात न शिरावे म्हणून त्या सापाचे नाव शोधायची जबाबदारी स्वत:वर घेतो.
आता पुढे काय करायचं हा विचार करायला विकू झेंडेंना बोलावतो आणि ईशा सापाला शोधायचा कसा पिच्छा पुरवते म्हणून तिला शिक्षा द्यायची ठरवतो.
दुसर्या दिवशी ऑफिसमधे ईशा विकूला मोठ्या सापाचे नाव नाही शोधू शकले तर काय होईल? ही शंका उपस्थित करते पण "स्वत:वरचा विश्वास" ये भी बडी चीज होती है बाबूsss असे विकू सांगतो.
काॅन्फरन्स रूममधे आज झेंडे नवे कोरे जॅकेट घालून आले होते...हं तर विकू राजेश आणि सुधीरला एकही शब्द बोलू न देता सारखं चालते व्हा असे म्हणत होता पण ईशा मधेच अडवून म्हणते की कामगारांना काम "करून" दिले पाहिजे. खरंतर काम करू दिले पाहिजे असे हवे, असो. तर सर तुमचा माझ्यावर विश्वास आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि आपण कामगारांवर विश्वास दाखवला पाहिजे असे सांगून त्यांना काम करू द्यायची परवानगी देते. हे पाहून मायरा ईशाला शिक्षा होणार हे सांगणार्या झेंडेंना I don't trust you असे रागाने म्हणते.‌ बघुया उद्या काय होते ते.

पण आता त्याच्या वाईटपणाच्या फैरी दिसेल त्या दिशेला सुटल्या आहेत.. Lol
हो ना. प्रत्येक चांगल्या ड्वायलॉक नंतर त्याचं ते एक खुनशी हास्य अथवा कटाक्ष असतोच असतो.
पण काल मस्त म्हणाला... " सारखं आपलं स्सर..स्सर...स्स..र ... ए क लगावून द्यावीशी वाटते!!.." Happy

आणि स्वतः च्याच कंपनीत कशाला फ्रॉड करायचा.. ? केड्याचं लॉजिक अगम्य आहे!

लास्ट बट नॉट द लीस्ट -मायरा कारखानिस्ट! हे बेस्ट आहे. Biggrin
(सुभाची स्वतःचीच अ‍ॅडीशन असणार बहुतेक ती!)

पण काल मस्त म्हणाला... " सारखं आपलं स्सर..स्सर...स्स..र ... ए क लगावून द्यावीशी वाटते!!.." Happy :::: >>>>>>>>>>>>>>> हो जे आपल्या ला वाट्त ते त्याने म्हट्ल..

हो जे आपल्या ला वाट्त ते त्याने म्हट्ल>> हो ना अगदी अगदी .. नकळत "नाहितर काय" !!! असं बाहेर पडलाच बघताना माझ्या ..
म्हंटल पहिल्यांदाच आम्हाला पाहिजे तो डायलॉग लिहिला बाबा केड्याने !

लास्ट बट नॉट द लीस्ट -मायरा कारखानिस्ट! हे बेस्ट आहे>> हो !! Lol म्हणजे खरंच तो कारखानिस्ट म्हणाला .. मला वाटलं मलाच तसं ऐकू आलं कि काय

अशी दिशा मिळेल मालिकेला अस वाटल नव्हत. आता इशा आणि मायरा प्रकरण दाखवत असल्यामुळे मालिका पुढे बघेन की नाही माहित नाही.

एपिसोड मधे ईशाच्या आईवडलांना रस्त्यावर आणतो की नाही बघ वगैरे बडबडतो. आता त्याच्या सगळ्या प्लॅन मधे याचा काहीच संबंध नाही - उलट आला तर अडथळाच येइल. +111

एपिसोड मधे ईशाच्या आईवडलांना रस्त्यावर आणतो की नाही बघ वगैरे बडबडतो. >>>अहो ते राग हळूहळू वाढत जाऊन झाले असेल.
तो त्यांना मूर्ख समजतो. त्यात सतत पोळीचा लाडू खायला घालून, सतत पकावू बडबड ऐकवून, सतत स्सर..स्सर...स्सर करून त्यांनी विसचे डोके फिरविले आहे. त्याचा वचपा कधीतरी तो काढणारच.

त्यात सतत पोळीचा लाडू खायला घालून, सतत पकावू बडबड ऐकवून, सतत स्सर..स्सर...स्सर करून त्यांनी विसचे डोके फिरविले आहे. >>> Lol

आधीच काय कमी घोळ होते म्हणून केड्याने अजून घोळ घालून ठेवला मायरा च प्रकरण टाकून..अरे बाबा अजून किती अंत पाहशील सहनशक्तीचा. मला एक कळत नाही विस एवढे वर्ष तर चांगला राहला आणि आता अचानकच असा काय वागत आहे मायरा सोबत..
आणि मायरा ला विस च लग्न झालं तेपण तिने स्वतःहा सगळी arrangement केली तेव्हा काही फारस वाईट वाटलं नाही आणि आता साधं विसने तीच कौतुक केलं तर एव्हड वाईट वाटत हे काही पटत नाहीये..
आजच्या एपीमधे एकच गोष्ट थोडी चांगली वाटली ते म्हणजे सोन्या ने इशाच केलेलं कौतुक..
रच्याकने, आज विसने बाळाला अस म्हटलं ना की "मला तुझं कौतुक वाटत आहे एवढस डोकं.." ते भारी वाटल हसायला आलं

Pages