Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कालचा चिठ्ठी वाचून
कालचा चिठ्ठी वाचून रुमममध्ये येण्याचा प्रकार 'खुबसूरत' मधल्या 'निर्मल आनन्द' वरुन ढापलाय.
विससाठी चिठ्ठी नाही टाकली?
विसला ती चिठ्ठी मिळाली असती तर त्याला हा जालिन्दरचा डाव वाटला असता. 
एरव्ही स्टाईल आयकॉन बनून फिरणार्या सॉन्या ला क्रिकेट खेळताना सुटसुटीत (खेळाचा) ड्रेस आणि शूज घालावेत हे कळू नये? >>>>>>>> अगदी अगदी पण सॉनया काल साडीत क्रिकेट खेळताना छान दिसत होती.
सॉन्याने आपण अपोझिट टिममध्ये असल्याच फार सिरियसली घेतल.
काय तर म्हणे, जयदीप तू अपोझिट टिममध्ये आहेस ना, मग माझ कौतुक का करतोस? आता क्रिकेटमध्ये असा कुठला नियम आहे की प्लेयरने अपोझिट टिममधल्या चान्गल खेळलेल्या प्लेयर कौतुक करु नये? म्हणून जयदीपही पेटून उठला 'मला सॉन्याला आउट करायचे आहे' म्हणत.
जयदीप गोल्फ किव्वा कोम्बडयान्च्या झुन्जी खेळूया नाही बोलला ते नशीब.
बॉबी गाण्यान्च्या मैफलीशी का अडकून राहिलाय ते एक तोच जाणे किव्वा केडया.
सर्जेराव झालेल्या कलाकाराला खरच पायाने चालता येत नाही का त्याचा रोलच तसा आहे?
बर्याच दिवसापासून त्याला त्याच अवस्थेत बघतेय.
सुभाने मुद्दाम आवळली असेल तिची मान >>>>>>>>> कूल विस कूल ! अजून इस्टेट मिळायची बाकी आहे तिच्याकडून. तिला जर अकाली मारल तर तिसरी राजनन्दिनी शोधावी लागेल तुला.
राजनंदिनी अशा पूर्ण नावाने हाक मारतो >>>>>>>> हो ना. त्याने सलमान खान टाईप नंदिनी हाक मारायला हवी होती. मला ' नंदिनी' हाक मारल्यावर तेच आठवत.
विस ईशाला उचलल्यानन्तर वळून झेण्डेला कनिन्ग स्माईल देतो ते जयदीप आणि इतर लोकान्ना दिसत नाही तसेच ते कुशीत असलेल्या ईबाळालाही कळत नाही. आहे की नाही गम्मत!
मधेच जालिंदर ने येउन एक ओव्हर टाकली नाही कोणाला पत्ता न लागता माय फ्रेंड वहिनीला उचलले पाहून माझ्या पोटात आला गोळा.
ऊकडल्या बटाट्यागत धरले दादाने अन वर मारला डोळा. >>>>>>>
त्याला लेडी बॉसचा प्रोब्लेम नाहीये. इशाची कुवत नसताना ती बॉस झाली हा आहे. >>>>>>>> सहमत
नवीन प्रोमो. >>>>>>> UP, प्रोमो काढून टाकलाय.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=H4mZLE7884c हा घ्या प्रोमो . कै च्या कै आहे .
विस ईशाला उचलल्यानन्तर वळून
विस ईशाला उचलल्यानन्तर वळून झेण्डेला कनिन्ग स्माईल देतो ते जयदीप आणि इतर लोकान्ना दिसत नाही तसेच ते कुशीत असलेल्या ईबाळालाही कळत नाही. आहे की नाही गम्मत!>> अगदी.
मधेच जालिंदर ने येउन एक ओव्हर टाकली नाही कोणाला पत्ता न लागता >>
प्रोमो कळला नाही.ती आओरडते तर
प्रोमो कळला नाही.ती आओरडते तर हा काय हसतो.तिला आधीच्या स्वप्नातल दिसत असेल पण मग काही न माहित असताना त्यात एवढ हसण्यासारख काय आहे?
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/BuX_iVMhiEG/?utm_source=ig_share_sheet&igshi...
स्वस्ति वर इन्स्टाग्राम लिंक
स्वस्ति वर इन्स्टाग्राम लिंक दिलेला प्रोमो बघा.
सॉन्याचा बॉबी आणि sony
सॉन्याचा बॉबी आणि sony मराठीवरील ती फुलराणी मध्ये देवयानीच्या बाजूने असणारा चोंबडेपणा करणारा नोकर हे दोन्ही एकच आहेत का... Confused.. कोणी सांगेल का?
कालचा चिठ्ठी वाचून रुमममध्ये
कालचा चिठ्ठी वाचून रुमममध्ये येण्याचा प्रकार 'खुबसूरत' मधल्या 'निर्मल आनन्द' वरुन ढापलाय>>>>अगदी बरोबर...
आणि छडी मारून घेण्याचा सीन आनंदी गोपाळ मधून घेतलाय...
केड्याची नेहमिच ढापाढापी
केड्याची नेहमिच ढापाढापी चाललेली असते, बाकी या प्राण्याला कुणी कन्टिन्युटी हा शब्द शिकवलाच नाहिये बहुधा , प्रचन्ड बोअर झालिये आता , बघण सोडल मी, फक्त इथे वाचते.
बाकी या प्राण्याला कुणी
बाकी या प्राण्याला कुणी कन्टिन्युटी हा शब्द शिकवलाच नाहिये बहुधा >>> सिरीयसली.
विक्या आणि ईशाच्या खोलीमधलं
विक्या आणि ईशाच्या खोलीमधलं ते कपाट म्हणजे अलीबाबाची गुहा वाटते.. जगातली कोणतीही गोष्ट सापडेल तिथे! कामाच्या फाईल्स, औषधे, किल्ल्या आणि छडी!!
मानलं .. थोडे दिवसानी रानं पण येउ शकेल त्या कपाटातून.
सगळ्यांची खोली एकच असावी असं
सगळ्यांची खोली एकच असावी असं वाटतं. आईसाब जयदीप विकीशा...फक्त फ्रेम्स बदलतायत. बाकी ती बोरींग निळी कपाटं अन् पांढरे पडदे सेमच आहेत.
बाकी ती बोरींग निळी कपाटं अन्
बाकी ती बोरींग निळी कपाटं अन् पांढरे पडदे सेमच आहेत.>> नाही जयदीपच्या कपाटाचा रंग पांढरा आहे.
विकूने, ईषा पडल्यावर तिला
विकूने, ईषा पडल्यावर तिला नक्की काय झाले हे न बघताच बॅंडेज लावले. तिच्या कदाचित गुढग्याला लागले असेल पण नाही. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा काहीसा प्रकार होता.
ती वेताची छडी जेव्हा ईषाला मारायला दिली, तेव्हा तिचा पहिला प्रश्न हा हवा होता की तुम्ही अशी छडी का बाळगतात? खरंतर उगाच बॅंडेज लावले आणि खेळात व्यत्यय आणल्या बद्दल त्या छडीने तिने एक फटका मारायला हवा होता. एवढं सगळं तो त्याच्या पास्टबद्दल बोलत होता तरी हिने राजनंदिनीबद्दल काहीच विचारले नाही. तो म्हणे आपल्या प्रेमात तिच्या आठवणी नसाव्यात मग बंद खोलीत तिच्या आठवणी का ठेवलेल्या आहेत?
इकडे जयदीप सारखं राजनंदिनी, राजनंदिनी करत होता खरंतर ताई म्हणायला पाहिजे पण प्रेक्षकांवर राजनंदिनी हे नाव बिंबवायचे असेल.
भेंडे आणि विस गाडीतून जात असताना त्या गाडीच्या काचा दुधी रंगाच्या अपारदर्शक होत्या.
असं कुठेतरी वाटतयं की भेंडे हे आईसाहेबांकडून आहेत.
मिहीरला एवढी चांगली संधी आली होती सीच्युएशन हॅंडल करायची तर तो बिथरला. मायला असं का म्हणाली की जिने ही सीच्यूएशन क्रीयेट केली तिलाच हॅंडल करायला लावू, अगं ती डिपार्टमेंट हेड आहे विसकडे न जाता पहिले तिच्याकडे जायला हवे. असो उद्या काय होईल ते बघायचे.
कालचा भाग तेथेच थांबवला आहे.
कालचा भाग तेथेच थांबवला आहे (बँडेज वगैरे). त्यामुळे उत्कंठा वाढली आहे - कथेबद्दल नव्हे, तर आता यावरही एक डॉक्टर आणि तीन नर्स येउन एक दोन इंजेक्शन्स व तीन दिवस घ्यायच्या गोळ्या देणार (आणि "यांना आरामाची गरज आहे") की काय, याबद्दल.
बॉबी गाण्यान्च्या मैफलीशी का
बॉबी गाण्यान्च्या मैफलीशी का अडकून राहिलाय >>> त्याने कट्यार काळजात घुसली मधे खांसाहेबांच्या मागे गाणार्याचे काम केले आहे बहुतेक. म्हणून इथे त्याला गाऊन दाखवायचे असेल.
चिन्मय पाटसकर नाव आहे त्याचं.
चिन्मय पाटसकर नाव आहे त्याचं. कट्यार नाटकात पण होता तो. माहेरचा माणूस आहे तो (एकाच वाड्यातला)
जयदीप राजनंदिनीला नावानेच हाक
जयदीप राजनंदिनीला नावानेच हाक मारतो का? तो तेव्हा तर लहान होता ना?
विक्या-जयदीप हे भाउ आहेत - असे मधे एका एपिसोड मधे तोच म्हंटला होता. भावासारखा वगैरे नाही. भाऊ
राजनंदिनी ही विक्याची बायको होती - असे एक दोनदा आले आहे.
म्हणजे राजनंदिनी जयदीपची कोण याबाबत सस्पेन्स असण्याचे काहीच कारण नाही. आणि त्याने तिला नावाने हाक मारण्याचेही. फक्त जयदीपच्या डोक्यातील गोंधळ व काहीतरी आठवणे पण नक्की काय आहे ते न कळणे - तो भाग जेन्युइन आहे. त्याआधीचा विक्या-ईशा चा बेडसीन (!) महापकाउ होता - ते रडणे वगैरे.
बाकी सगळे वेळेवर ऑफिसला येतात आणि राजनंदिनी साडीच्या हेडबाई आरामशीर पाहिजे तेव्हा येतात असे दिसते.
लेबर कॉण्ट्रॅक्टर भडकला आहे, मेजर प्रॉब्लेम झाला आहे - नेहमीचे ढोबळ वर्णन सुरू झाले पुन्हा. त्यात मायरा त्या मिहीर पेक्षा जास्त हतबल दिसते. हिला खरेच कोणी एव्हीपी केले कोणास ठाउक. आता ईशा हा ढोबळ प्रॉब्लेम कसा सोडवते पाहू. पुन्हा एकदा उत्कंठा.
काल झेंंडे आईसाहेबांना
काल झेंंडे आईसाहेबांना म्हणाले की ईषा चाळीतली आहे तर नंदिनी राजघराण्यातली होती.म्हणजे तिच माहेरच आडनाव नक्कीच सरंजामे नसणार.जर ती आईसाहेबांची मुलगी नाही असे मानल तर.मग मार्कशीटवर तिच आडनाव का नाही?.
बर,जालिंदर जर तिचा भाऊ मानला तर त्याने हे एका फटक्यात बाळाला का नाही सांगितल?
आणि जर नंदिनी राजघराण्यातली आहे तर मग तिची स्वत:ची प्रॉपर्टी असेलच ना,ती का नाही विक्याने घेतली? ही मुळात गर्भश्रीमंत असूनही सरंजाम्यांकडे काम का करत होती
देवा.....किती ते प्रश्न
मँथेमँटिक्स वालकोणी असेल तर परम्युटेशन अँड कॉंबिनेशन फॉर्म मध्ये हा प्रश्न बसवावा.
आणि लेबर काॅन्ट्रॅक्टरने का
आणि लेबर काॅन्ट्रॅक्टरने का भडकावं? ए मधल्या लोकांना बी घेतलंय ना? कुणी कुठं काम करावं हे पण तोच ठरवतो का?
ए मधल्या लोकांना बी घेतलंय ना
ए मधल्या लोकांना बी घेतलंय ना? >>>>. हो ना. पण त्यामुळे आता बी मध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर्सची गरज नाही. बी मधून आलेला हेडकाऊंट म्हणूनच तर ए मध्ये घेतला.
आणि लेबर काॅन्ट्रॅक्टरने का
आणि लेबर काॅन्ट्रॅक्टरने का भडकावं? ए मधल्या लोकांना बी घेतलंय ना?>> बाकी काही नाही.. लेबर काॅन्ट्रॅक्टरला सुभा ने पेटवलं असणार मुद्दामून .. तो फोन करताना त्याच्या शेजारी उभा असेल
. त्याला इषा ला एकटं पडायचं आहे ना .. म्हणून उगाच खुसपट काढतोय .

देवा.....किती ते प्रश्न>>> UP आता आपण ठरवून टाकलंय ना कि केड्याच लॉजिक रानोमाळ सैरावैरा धावतं .. ?! मग असे लॉजिकल प्रश्न मुळीच आणायचे नाहीत मनात
तर्कवेताळाने ईशा ला प्रश्ण
तर्कवेताळाने ईशा ला प्रश्ण केला:
सांग ईशा, युनिट ए व बी असताना त्याला युनिट क्र १ व २ असे का म्हटलेस?
ईशा: कारण ए, हा बी च्या आधी येतो.
[तर्कवेताळाने ईशा चे पाय धरले.]
जयदीपला राजनन्दिनी आठवत नाही
जयदीपला राजनन्दिनी आठवत नाही म्हणे, कारण तो लहान होता ( लहान म्हणजे कित्ती लहान? :अओ:)
त्याने तिला फक्त फोटोमध्ये पाहिलय म्हणे, मग तो फोटो आम्हालाही दाखवा.
एवढया मोठया बन्गल्यात नन्दिनीचा एकही फोटो नाही!
बॉबी आणि मन्दाने नन्दूला कधी बघितलेच नाही. सर्जेरावला माहितीये तिच्याबद्दल. म्हणजे त्याला विस कसा आहे हेही माहित असेल. मला पहिल्या एपिसोडपासून मन्दा आणि सर्जेराव डाउटफुल वाटत होते.
त्याआधीचा विक्या-ईशा चा बेडसीन (!) महापकाउ होता - ते रडणे वगैरे. >>>>>> +++++++++१११११११
बाकी सगळे वेळेवर ऑफिसला येतात आणि राजनंदिनी साडीच्या हेडबाई आरामशीर पाहिजे तेव्हा येतात असे दिसते. >>>>> अस कस अस कस, बॉसची बायको आहे ना ती.
तर आता यावरही एक डॉक्टर आणि तीन नर्स येउन एक दोन इंजेक्शन्स व तीन दिवस घ्यायच्या गोळ्या देणार (आणि "यांना आरामाची गरज आहे") की काय, याबद्दल. >>>>>>>>> अस काही नाही होणार फारएण्ड, दोघान्च्याही जखमा एका दिवसात बर्या झाल्या. आहे की नाही हा चमत्कार!
त्यात मायरा त्या मिहीर पेक्षा जास्त हतबल दिसते. हिला खरेच कोणी एव्हीपी केले कोणास ठाउक. >>>>>>>> अर्थातच विसने.
विक्या आणि ईशाच्या खोलीमधलं ते कपाट म्हणजे अलीबाबाची गुहा वाटते.. जगातली कोणतीही गोष्ट सापडेल तिथे! कामाच्या फाईल्स, औषधे, किल्ल्या आणि छडी!! खरंतर उगाच बॅंडेज लावले आणि खेळात व्यत्यय आणल्या बद्दल त्या छडीने तिने एक फटका मारायला हवा होता. >>>>>>>>>
असं कुठेतरी वाटतयं की भेंडे हे आईसाहेबांकडून आहेत. >>>>>>> अगदी अगदी
प्रोमो कळला नाही.ती आओरडते तर हा काय हसतो.तिला आधीच्या स्वप्नातल दिसत असेल पण मग काही न माहित असताना त्यात एवढ हसण्यासारख काय आहे? >>>>>> तेच ना. उलट त्याने घाबरायला हव होत. ' हि खरीच राजनन्दिनी निघाली की काय' असा विचार करुन त्याला दरदरुन घाम फुटायला हवा होता. प्रोमो बघताना लॅपटॉप म्यूटवर होता, त्यामुळे पुष्पा विसशी बोलल्यानन्तर लाजून का गेली ते कळल नाही.
बादवे, निशाचर झेण्डेला पहिल्यान्दाच झोपताना बघितले. विस झोपलेल्या ईशासमोरच झेण्डेशी प्लॅनबद्दल बोलतोय. हयाला म्हणे ईशा पाठ झालीये. मग हयाला एवढही कळू नये की आपल्या दुसर्या बायकोला झोपेच सोन्ग घेण्याची जुनी खोड आहे. माठ कुठचा!
हे छडी प्रकरण एपिसोड आटोपले
हे छडी प्रकरण एपिसोड आटोपले की व्हायचे आहे ? कोणाला मारायचेय?
ऑफर अजून ओपन असेल तर मी तयार आहे. यथेच्छ बडवते एकेकाला. छडी पण माझी मी नेईन.
बाकी या प्राण्याला कुणी कन्टिन्युटी हा शब्द शिकवलाच नाहिये बहुधा , >>>>
शिकवलाय प्राजक्ता पण कुठे वापरायचे ते विसरले महाशय. एपिसोड मागून एपिसोड, मालिके मागून मालिका बिनडोकपणाची कन्टिन्युटी ठेवलीय त्यांनी.
प्रोमो बघताना लॅपटॉप म्यूटवर होता, त्यामुळे पुष्पा विसशी बोलल्यानन्तर लाजून का गेली ते कळल नाही. >>>>
सुलू बहुतेक, ईशासाठी विणायला घेतलेला स्वेटर-मोजे मलाच वापरावे लागतील; तेव्हा तुम्ही जरा थांबा असे संवाद असतील.
आणि लेबर काॅन्ट्रॅक्टरने का भडकावं? >>>> मेधावि, त्याचा सीन आधी शूट झाला असेल. कामगार काढणे या निर्णयानुरूप. मग मिहीर-मायरा टेन्शन सीन शूट झाला. मग स्टोरी बदलली. कामगार फक्त इथून तिथे. संकलकाला माहीत नाही. त्याने सीन तसेच ठेवले.
सॉन्याचा बॉबी आणि ती फुलराणी मध्ये चोंबडेपणा करणारा नोकर हे दोन्ही एकच आहेत का >>>>
सुषमा ताई ११. फुलराणीचा एपिसोड क्रमांक द्या ज्यात तो नोकर दिसतो. कोणी तरी तितका सीन बघून सांगतील. फुलराणी बघायचा नवीन ताप नको डोक्याला.
सुषमा ताई ११. फुलराणीचा
सुषमा ताई ११. फुलराणीचा एपिसोड क्रमांक द्या ज्यात तो नोकर दिसतो. कोणी तरी तितका सीन बघून सांगतील. फुलराणी बघायचा नवीन ताप नको डोक्याला.>>>>>>>कारवी, आजच्या एपिसोड मध्ये आहे तो... एपिसोड क्रमांक 170..
:स्मित.. सहमत अगदी अगदी
मी पण नेहमी नाही बघत... पण चेहरेपट्टी सारखी वाटली म्हणून उत्सुकतेने विचारले..
तुम्ही म्हणताय ते खरंय.. नवीन ताप नको
आजच्या एपिसोड मध्ये आहे तो...
आजच्या एपिसोड मध्ये आहे तो... एपिसोड क्रमांक 170.............नाही तो वेगळा आहे , ति पण ताप च आहे , सुरवातीचे काही भाग पाहुन सोडुन दिली पाहण,
आज ईषा अपारदर्शक दुधी
आज ईषा अपारदर्शक दुधी रंगाच्या काचा असलेल्या गाडीत बसून स्वत:शीच बोलत होती. इकडे विस ईषाला सांगतोय की तुझ्या आईच्या हातचा आल्याचा चहा पितोय, मला वाटलं आता म्हणेल पोळीचा लाडू होईपर्यंत आल्याचा चहा पितोय.

तो मिहीर आणि सिद्धी ईषाशी कसेतरीच वागत होते. अरे बाॅस आहे ना तुमची ती?
मायरा काॅन्फरन्स रूम मध्ये युनियनशी बोलताना आधी राजेश, सुधीर म्हणाली मग रमेश, सुधीर.
आवडलं जेव्हा ईआई, "जातो नाही येतो म्हणावं." म्हणते.
विसला आता तरी आश्चर्य वाटायला हवे होते की अष्टमीला ईषाला त्रास होतो आणि अष्टमीलाच राजनंदिनी गेली. अजून एक योगायोग कसा असू शकतो?
तुपारेमधे आज अष्टमी होती आणि राखेचा मधे उद्या अमावस्या आहे.
लेबर कॉण्ट्रॅक्टर चा
लेबर कॉण्ट्रॅक्टर चा प्रॉब्लेम सोडवला का आज? अजून एपिसोड बघायचा आहे.
नाही, ईषाने मागण्या लेखी
नाही, ईषाने मागण्या लेखी लिहून मागितल्या आहे पण लिहायचा कंटाळा आल्याने लेबर कॉण्ट्रॅक्टर संपाच्या मतावर ठाम आहेत.
Pages