तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काल ३ फाईल्स घेऊन आलेली ईशा आज दोन फाईल्स ऑफिसला नेत होती पण जयदीपने मायफ्रेंड वहिनीला सापशिडी खेळायला बसवलं. त्यावरून तिला ऑफिसमधल्या सापांना शोधायची आयडिया मिळाली.
ऑफिसमधे मायरा आणि झेंडे विकूला सिच्युएशन समजावून सांगतात पण विकू, ईशा हे सगळं हॅंडल करेल असे सांगून झेंडेंना आईसाहेबांना फोन करून इथल्या परिस्थितीची कल्पना द्यायला लावतो. आईसाहेब त्यांना ईशा असलेली राजनंदिनीच हा होऊ घातलेला संप मिटवेल असे सांगून १०० साड्या तयार ठेवायला सांगतात.
काॅंफरन्स रुममध्ये असलेली मायरा, राजेश आणि सुधीरला कामगारांच्या घोषणांचा टेपरेकॉर्डर बंद करून यायला सांगते. मग गंभीर सिच्युएशन असल्याने बाकीचे सगळे स्लोमोशनमधे काॅंफरन्स रूममधे येतात. ईशा राजेश सुधीरला सापशिडीचे लाॅजीक सांगून २४ तासात संप मिटला नाहीतर सापांची नावे जाहीर करायची धमकी देते. ह्यावर सगळी सीनियर मंडळी आपण इतकी वर्षे काम करून पण आपल्या कंपनीत फ्राॅड होतोय हे लक्षात कसे आले नाही ह्यावर कुजबूजतात.

सिनियर मंडळींवर आधी action घ्यायला पाहिजे बेबीने.. त्या मोठं कुंकू लावणाऱ्या मॅडम CFO आहेत असं एकदा सांगितलं होतं.. आता ईशाला स्कोप आहे .. 'सूड दुर्गे सूड' मोडमध्ये जाऊन त्यांना काढून टाकायचा

मग गंभीर सिच्युएशन असल्याने बाकीचे सगळे स्लोमोशनमधे काॅंफरन्स रूममधे येतात.>>>>> +++१११ मिटींगचं नाव निघालं की ते चौघे (परांजपे, त्या बाई, मिहीर आणि सपना) विषय काहीही असो येतातच.. मिटींग मिटींग खेळण्याशिवाय काम नाही वाटतं

खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
१.गणित सोडवा-
जर सापशिडीच्या ५मिनिटाच्या खेळातून हेड बाईंना हातात असलेली एकच फाईल वरवर बघून सापाने केलेला घोटाळा लक्षात येतो, तर रात्र रात्र फाईल्स चाळून किती घोटाळे लक्षात यायला हवे होते?
२.कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काही गोष्टी गुप्त ठेवून करायच्या असतात,प्रत्येकवेळी गोलमेज परिषदेची आवश्यकता नसते,हे हेडबाईंना त्यांच्या सासूने का नाही सांगितले,हेडबाईंच्या नवर्याकडून अपेक्षा नाही.
३.सर्वसाधारणपणे ओटी ही बायकांची भरतात,मग माननीय श्रीमती आईसाहेब १०० ओट्या ऑफिसमध्ये का घेऊन आल्या?कामगिर आले होते ना,त्यांच्या बायका नाहीत
४.राजनंदिनीने कधीकाळी कामगारांच्या घरी जाऊन त्यांच्या बायकांच्या ओट्या भरल्या होत्या,ते बहुधा १०० होते,इथे ५०कामगारांचा प्रश्न होता,मग मा.श्रीमती आईसाहेबांनी १०० ओट्या का आणल्या?
५.खात्रीलायक सूत्राकडून समजण्यित येते की नंदिनीचा म्रुत्यू हेड बाईंच्या जन्माच्या १० महिने आधीचा,हेड बाईंचा जन्म ऑक्टोबरचा,तिथून १०महिने मागे म्हणजे जानेवारी महिन्यातला,पण इथे हा म्रुत्यू २८फेब्रुवारीला होता,ते कस काय?
६.अष्टमीच्या दिवशी दचकून जाग्या झालेल्या हेडबाई अंगारा लावल्यावर शाऔत झोपी जातात,हा नियम होता,पण प्रत्यक्ष त्यि दिवशी त्या अंगारा न लावताच शांत झोपी गेल्या,हे कस?
७.गँलिलियो,भास्कराचार्य विभूतींच्या सिध्दांतानुसार,प्र्रुथ्वी सूर्याभोवती फिरताना,तिचि जो भिग सूर्यासमोर येतो,तिथे दिवसच असायला हवा,मग असे असताना,मुंबई आणि कर्जत हे दोन्ही भाग सूर्यासमोर एकाचवेळी येऊनही बरेचवेळा मुंबईत दिवस तर कर्जतला रात्र असते.हे कस?
८. २४ तासांंची मुदत ही मुळात दुपारी सुरु झाली असावी कारण हेडबाईच उशीरा आल्या होत्या,मग कामगार २४तास झालेले नसताना,संपावर कसे गेले?

UP मानलं बुवा तुम्हाला.. किती पद्धशिरपणे सगळे मुद्दे मांडलेत.. एकाच फटक्यात सगळेच पीस काढलेत Happy

सिरीज ला खुनशी ट्विस्ट द्यायचा फॉर्म्युला मला आता लक्षात आला आहे: एरव्ही विक्या जी परोपकारी, सहृदयी कामे करायचा तीच आताही करतो. फक्त सीन झाला की एकदा क्लोज अप मधे खुनशी हसतो. की झाला ट्विस्ट.<< Biggrin Biggrin

घरचे, बाहेर जायचे, झोपतानाचे कपडे वेगळे असतात हे द सरंजामेंना माहीत नसावं. घरातून उठून त्याच कपड्यात ऑफीसला जातात. काल आईसाहेब घरातून उठून तशाच गेल्या ऑफीसला. ती मंदा पण तशीच. जयदीप सोन्या पुष्पा पण. इशा तर आज घातलेला ड्रेस उद्या आंघोळीनंतर धुवायला टाकते. तोवर तो एकच ड्रेस घालूनच वावरते, झोपते , ऑफीसला जाते.

मिटींगचं नाव निघालं की ते चौघे (परांजपे, त्या बाई, मिहीर आणि सपना) विषय काहीही असो येतातच.. मिटींग मिटींग खेळण्याशिवाय काम नाही वाटतं >>>> ते जाऊद्या . यावेळी तर मंदाताई पण होत्या.
,इथे ५०कामगारांचा प्रश्न होता,मग मा.श्रीमती आईसाहेबांनी १०० ओट्या का आणल्या? >>> आता त्या ओट्यांच काय करणार ?? जयदीपकडे काही businesses ideas असतील का?

100 ओट्या ...नवरा बायको दोघांच्या भरतील कदाचित. किंवा मग त्यांच्याच देवळाच्या बाहेर विकतील. बादवे झेडे ओट्या पण अॅरेंज करतो Happy

100 ओट्या ...नवरा बायको दोघांच्या भरतील कदाचित. किंवा मग त्यांच्याच देवळाच्या बाहेर विकतील. बादवे झेडे ओट्या पण अॅरेंज करतो >>>>>>> हसून हसून पुरेवाट !

UP मानलं बुवा तुम्हाला.. किती पद्धशिरपणे सगळे मुद्दे मांडलेत >>> +१ एपिसोड पाहिला नाही अजून पण सही लिहीले आहे. गोलमेज परिषद वाचून तर टोटल लोल.

ओटी म्हणजे काहीतरी लॉस्ट इन ट्रान्स्लेशन झालेले असावे. कामगारांनी ओटी (overtime) मिळत नाही म्हणून तक्रार केली तर हे या ओट्या भरायला घेउन आले. असे दिसते.

कामगारांनी ओटी (overtime) मिळत नाही म्हणून तक्रार केली तर हे या ओट्या भरायला घेउन आले. असे दिसते.>> Rofl

UP, लय भारी मुद्दे. Lol
७वा मुद्दा तर कहर आहे. Biggrin

100 ओट्या ...नवरा बायको दोघांच्या भरतील कदाचित. किंवा मग त्यांच्याच देवळाच्या बाहेर विकतील. बादवे झेडे ओट्या पण अॅरेंज करतो>>> Lol
ओटी म्हणजे काहीतरी लॉस्ट इन ट्रान्स्लेशन झालेले असावे. कामगारांनी ओटी (overtime) मिळत नाही म्हणून तक्रार केली तर हे या ओट्या भरायला घेउन आले. असे दिसते.>>> Lol

एकतर आहेत त्या साड्या खपत नव्हत्या. आता ओटी करुन बनवलेल्या अधिक साड्या कश्या खपवणार?

आत्ताच सापशिडी प्रोमो बघितला, इशाताईंना सध्याचा मिळालेला ट्रॅक जबरदस्त आहे पण त्या सेम पुस्तकी बोलतायेत. एवढा चांगला रोल मिळालाय तर त्यांनी स्वतःत सुधारणा करावी.

Light 1 :दिवा:इथे ५०कामगारांचा प्रश्न होता,मग मा.श्रीमती आईसाहेबांनी १०० ओट्या का आणल्या?>>> up मला माहितीय... ईबाळालाच दोन्ही ओट्या भरायला लागणार होत्या, एक राजनंदिनी म्हणून आणि एक ईशा mam म्हणून.....
अष्टमीच्या रातीला सपनात येऊन राज नंदिनी, आई साहेबांच्या शंभर वेळा वाकून ओट्या भरायच्या प्लॅन बद्दल सांगते...
ती "विचारात" पडते...
तिला काही सुचत नाही...
फक्त सर्रर्रर्रssss अशी हाक मारावी असे वाटते..
इतक्यात तिचा वैचारिक पार्टनर जयदीप भाऊजी येतात.. त्यांच्याबरोबर
सापशिडी खेळताना अचानक फाईल मध्ये पण तिला सापशिडी दिसते.... आणि पुढचा सर्व स्क्रीन प्ले तयार होतो
हुश्श.. किती मेहनतीने लिहिले आहे...केड्याने

फक्त सर्रर्रर्रssss अशी हाक मारावी असे वाटते..
इतक्यात तिचा वैचारिक पार्टनर जयदीप भाऊजी येतात.. >>> Lol हे दोन्ही महान आहे.

बादवे झेडे ओट्या पण अॅ रेंज करतो>>>मेधावी
हसून हसून पुरेवाट झाली.. गाल दुखायला लागले...
घरात पण कारण सांगावेच लागले
सगळे खूप खूप हसलो

Rofl :हहगलो

इतका भ्रष्टाचार असेल तर फक्त साप उडवून मग ते पहिले युनिट बंद न करताच प्राॅफीट सुरु होईल. शिवाय वाचलेल्या शंभर ओट्या व साड्या विकून पण थोडा फायदा होईल.

परवाचा एपिसोड कॅच अप करताना विक्रांत कोहली यांची बॅटिंग सोडून फारसे काही दिसले नाही. एकतर तो संपाचा प्रॉब्लेम निरर्थक आहे. कारण कामगार काढले असते ओरिजिनल प्लॅन प्रमाणे तरी हा प्रॉब्लेम आलाच असता.

विवाहपूर्व प्राथमिक माहिती देण्याबद्दल घोर उदासीनता आहे या सिरीज मधे. ईशा अष्टमीला दचकून जागी होते. ईशा चक्कर येउन पडल्यावर एक डॉक्टर आणि तीन नर्सेस बोलावून इंजेक्शन्स, तीन दिवस गोळ्या वगैरे देणार्‍या कुटुंबाला याची कल्पना द्यायला हवी वगैरे अजून कोणाला सुचलेले नाही. अर्थात हे म्युच्यअल आहे. अजून विक्याने तरी त्या कुटुंबाशी त्याचे काय नाते आहे ते सांगितलेले नाहीच.

जयदीप म्हणे ईशाला ऑफिसला जाउ देणार नाही, आणि कामही करून देणार नाही. यासाठी काही वेगळे प्रयत्न करायची गरज नसावी.

विवाहपूर्व प्राथमिक माहिती देण्याबद्दल घोर उदासीनता आहे या सिरीज मधे. >>>> ++११११११
आणि कोणालाही त्याचं घेणंदेणंनाही. काही माहिती नं देता / मिळवता बिन्धास्त विश्वासाच्या बाता कश्या करतात हे एक कोडं आहे... असं कुठे असतं का ?

विवाहपूर्व प्राथमिक माहिती देण्याबद्दल घोर उदासीनता आहे या सिरीज मधे. >>>> ++११११११...
हो ना...
आणि वरुन आपलं सारखं..." सस्सर्र....आय लव्ह यू पेक्षा आय ट्रस्ट यू म्हणणं महत्वाचं असतं.......माझा तुमच्यावर पूर्ण विश्वासे! "..... मग सर काही का लपवून ठेवेनात....!!!
काहीही.....!!

"संग्रुईच्या राजनंदिनी साडी या यशस्वी ब्रँड नंतर तब्बल वीस वर्षानंतर बाजारात नवीन प्रॉडक्ट दाखल......सापाचा बीमोड करणारी
" ईशा शिडी"..
राजनंदिनी साडी - ईशा शिडी

जमलंय बघा (यमक)
Happy Happy Happy :स्मित

सिनियर मंडळींवर आधी action घ्यायला पाहिजे बेबीने.. त्या मोठं कुंकू लावणाऱ्या मॅडम CFO आहेत असं एकदा सांगितलं होतं.. आता ईशाला स्कोप आहे .. 'सूड दुर्गे सूड' मोडमध्ये जाऊन त्यांना काढून टाकायचा >>>>>>>> +++++++++१११११११

आत्ताच सापशिडी प्रोमो बघितला, इशाताईंना सध्याचा मिळालेला ट्रॅक जबरदस्त आहे पण त्या सेम पुस्तकी बोलतायेत. >>>>>>>> अगदी अगदी अन्जू. पण गायत्रीने बर काम केल मिटिन्गमध्ये. गुळमुळीतपणा दाखवला नाही हे विशेष.

ईशा शिडी, ओटी म्हणजे काहीतरी लॉस्ट इन ट्रान्स्लेशन झालेले असावे. कामगारांनी ओटी (overtime) मिळत नाही म्हणून तक्रार केली तर हे या ओट्या भरायला घेउन आले. असे दिसते. >>>>>>>>>> Rofl

लोकमतने सान्गितलेला पैशाचा घोटाळा हा होता का? Uhoh पुभा मध्ये विसला ' फायनली मी ईशाला राजनन्दिनी म्हणून सिद्द केलच' म्हणून आनन्दी झालेल दाखवल नाही. उलट तो डिसअपोईन्ट दिसला. घाबरलेला दिसला.

मला एक कळत नाही विस बॉस आहे आणि कंपनी स्वतःच्या नावावर करून घेणार आहे मग त्याला स्वतःच्याच कंपनीमध्ये fraud करण्याचं काय काम आहे .. अरे बाबा केड्या अजून किती सोसायला लावणार आहेस पामर प्रेक्षकांना Uhoh
आणि कंपनी मध्ये fraud होतो ते कुणालाच कळत नाही बाकीच्यांच सोडा पण भेंडेना सॉरी झेंडेनापण कळत नाही आणि इशाला एका दिवसात कळत!!!

आणि जयदीपही मालक आहे ना त्या कंपनी चा मग मीटिंग मध्ये त्याला आधी बसायलापण जागा नसावी हे काही पटत नाही तो इशाचा aasistant असल्यासारखा दाखवलाय.. आणि सुरुवातीच्या एपी मध्ये जयदीपला office मध्ये जाताना दाखवलाय म्हणजे सरंजामेंच्या दुसऱ्या ऑफिस मध्ये तेव्हा सगळे घाबरायचे त्याला आणि आता पूर्णवेळ घरीच बसून असतो आणि.. नुसता गोंधळ आहे..
ते ढोल तश्यावर निमकरांची entry काहीच्या काहीच काही काम नाहीयेत वाटत सगळ्यांना Happy फक्त एक fraud उघडकीस आणला तर केबिन मिळाली अजून काही केलं तर कंपनी मिळती की काय Uhoh

फ्रॉड होतोय, फ्रॉड होतोय इतकंच का? नक्कि फ्रॉड म्हणजे काय झालंय ते कुणी बोलतंच नाहीये ना?
मी आज २-३ एपिसोड् वरून लिप मारून एकदम पाहतेय.

Pages