तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इशाच्या बाबांना "लाचार लाचार" खेळायला आवडतं. त्यांचं घरदार सगळं जाणार, ते आणि पुष्पा रस्यावर येणार आणी मग कोणीतरी धक्का मारून त्यांना अॅक्चुअल रस्त्यावर आणणार अशी त्यांची फॅन्टसी दिसते. >>>
इशाचा घनघोर अभिनय बघायची आता प्रेक्षकांना संधी मिळणार. >>> Lol

सिरियलमध्ये पाणी घालायच्या नादात लै मठ्ठपणा चालू आहे. आज काहीसे असे संवाद ऐकले.

ईशा - राजनंदिनी साडीची आपली 2 युनिट आहेत. पहिलं युनिट ए जे छोटं युनिट आहे त्याला आपण युनिट 1 म्हणू. जे मोठं आहे ते युनिट बी आपण त्याला युनिट 2 म्हणू! (हे सगळं व्हाइटबोर्डावर मार्कराने खरडून पण दाखवते)

ईबाळा, युनिट ए आणि युनिट बी अशी नावं असताना पुन्हा 1 आणि 2 काये?

शिवाय पुढे ती ए आणि बी असाच उल्लेख करते. मग ते वन टू काय परवचा लिहितेयस बोर्डावर?

खरच काहीही दाखवतात.
आणि जर विक्रांत ने घोटाळा केला आहे वर दिलेल्या लिंक नुसार तर तो तसाच घोटाळा करत राहिला असता तरी चाललं असतं ना.. पळून गेला असता परदेशात नंतर.. किंवा काही तोटा दाखवून नामानिराळा राहिला असता

ईशा - राजनंदिनी साडीची आपली 2 युनिट आहेत. पहिलं युनिट ए जे छोटं युनिट आहे त्याला आपण युनिट 1 म्हणू. जे मोठं आहे ते युनिट बी आपण त्याला युनिट 2 म्हणू! (हे सगळं व्हाइटबोर्डावर मार्कराने खरडून पण दाखवते) >>> कठीण आहे... अग ईशा माठे... कशासाठी?
खरचं ह्या लोकांन्नी कधीच्च् काॅर्पोरेटमधे काम केल नसेल अस वाटतं.
मायरा आणि समद्या टीमला इतका (!!!) अनुभव आहे तरी ईबाळाने सुचवलेला उपाय सुचला नाही.. काय पण !
आणि ही बावळट पाया काय पडते.. यक्

मिटींग नोटीस अशी तोंडी असते का? इ स पू काळात वावरत आहेत बिच्चारे...

ईशा - राजनंदिनी साडीची आपली 2 युनिट आहेत. पहिलं युनिट ए जे छोटं युनिट आहे त्याला आपण युनिट 1 म्हणू. जे मोठं आहे ते युनिट बी आपण त्याला युनिट 2 म्हणू! >>> Lol

युनिट ए ला युनिट १ म्हणून ईशाने काहीतरी रीइंजिनिअरिंग केलेले दिसते. त्याचे कौतुक कसे झाले बघायला हवे Happy

ईषाने संध्याकाळी ५ वाजता मिटींग बोलावली. आता मिटींग तास-दिडतास तरी चालेल ‌. मग ही कर्जतला घरी पोहोचेल कधी? एसीवाली गाडी असली तरी चालणार त्याच रोडवरुन आणि जाणार त्याच ट्रॅफिकमधुन. आईसाहेबांकरिता फळं घेणार कधी? (सोलेल तिच्या वाघनखांनी) रात्रीचा स्वयंपाक करणार कधी? अशाने आईसाहेबांना पित्ताचा त्रास व्हायचा.
मिटींगला विस आला तर त्याच्या चेहऱ्यावर आता काय ही बाई बोलणार आहे, असाच होता.
मिटींगमध्ये युनिट ए हे युनिट १ आहे आणि युनिट बी हे युनिट २ आहे म्हणजे बघा हं , युनिट १ हे युनिट २ सारखे नाही कारण ए हे बी सारखे नाही असे काहीसे पटवून देत होती.
खरंतर ईषा राजनंदिनीची हेड आहे तर बाकीचे तिच्या डिपार्टमेंटचा निर्णय का घेत आहेत? त्या मायराला घशाच्या शिरा ताणून सांगायचा काय अधिकार आहे? अगं ईषाच्या सहीशिवाय गाडी पुढे जाणार नसेल तर ती काय म्हणतेय ते ऐकून तर घ्या. फक्त त्या एफएमनेच सांगायचे बाकी राहिलं होतं की सही करा.
युनिट ए(१) च्या खर्चामधे कच्च्यामालाचा पण खर्च आहे म्हणजे घ्या युनिट ए बंद केले तर साड्या तयार कशा होणार?..... युनिट ए हे युनिट बीमध्ये विलीन करणार म्हणजेच युनिट ए अधिक युनिट बी इज इक्वल टू युनिट सी.....आयला फाॅर्मूलाच तयार झाला ना बाबो. हे म्हणजे ईषाने टार्गेटला कागदाचा बोळा मारल्या सारखेच आहे.
आज जयदीप आणि साॅन्यामधे पहिल्यांदा केमिस्ट्री दिसली.

युनिटे मर्ज करणे अगदी बेसिक आहे.
जयदीप सॉनिया सीन एकद्म गोड व केमिस्ट्री युक्त . कपल असे हवे.

एफ एम चा फुल फॉर्म काय आहे हो? मला संत्रे सोलून सांगा. आमच्या डिपार्ट्मेंट चा पण तो शॉर्ट फॉर्म आहे म्हणून मला दरवेळी राग येतो चायवाल्याला आमचे नाव कशाला म्हणून.

पहिलं युनिट ए जे छोटं युनिट आहे त्याला आपण युनिट 1 म्हणू. जे मोठं आहे ते युनिट बी आपण त्याला युनिट 2 म्हणू>>> Biggrin
जो रविना है वो रविना नही करिश्मा है.. असं काहीसं असणार बाळाच्या डोक्यात ! Wink

इशाच्या बाबांना "लाचार लाचार" खेळायला आवडतं.>>>> Lol
पहिलं युनिट ए जे छोटं युनिट आहे त्याला आपण युनिट 1 म्हणू. जे मोठं आहे ते युनिट बी आपण त्याला युनिट 2 म्हणू>>> अग बाई धन्य! Lol
जयदीप आणि साॅन्यामधे पहिल्यांदा केमिस्ट्री>>>> दोघेही छान आहेत. मला आवडतात. अ‍ॅक्चुली मला सगळ्या झीसिरीयलीतले मेन लीड्स सोडुन बाकी सगळे आवडतात. Happy

मेंटेनन्स आणि कामगार खर्च हा मिळणार्या उत्पन्नापेक्षा जास्त होतोय तर ते युनिट बंद करावे हे सुचवायला मिटींग? प्रोसेस कंपनीमधे इकडचे कामगार तिकडे मर्ज केले तर तिकडचे उत्पन्न वाढेल ही आयडीया? बरोबरच आहे. निमकरदुहीते कडून अजून वेगळी काय अपेक्षा करणार? (हे सोल्युशन जर परफेक्ट असेल तर ह्या शिरीलीतले कामगार रानादा च्या शिरीलीत घुसवून हितं टाळं ठोकावं काय? Happy )

निमक्यानं असता तर त्यानं सगळे प्लांटस् विकले असते अन् सर्वच्या सर्व मेंटेनन्स व पगार वाचवून मग कोकणात निघून गेला असता.

२ एपिसोड मागे आहे.

माकड?!!! आधीचे बोअर संवाद झाल्यावर माकड दिसले आणि त्यापेक्षा आधीचे संवाद बरे होते असे वाटले. आता काय त्याची बॅटरी संपली की ईशा भोकाड पसरणार आणि मग विक्या बॅटरी बदलून देणार वगैरे असे प्रसंग अधूनमधून दिसणार की काय.

ईशा आणि सर यांच्यातील सीन घरी आल्यावर आपल्याला दाखवल्यामुळे ते अभिनंदनही तेव्हाच झाले. हे दोघे दिवसभर ऑफिसातच होते ना? नंतर एकत्र घरीही आले असावेत. व्हीटी-कर्जत प्रवासात वेळ घालवायला तरी अभिनंदन करून घ्यायचे?

बायकोच्या आवडीनिवडी स्लॅमबुक मधून? अरे लेका लग्न झाले आहे तुझे. बेडरूम मधे दोघेच आहात. नाहीतरी तुम्ही तेथे दुसरे काही करणारच नाही. आणखी कसली वेगळी स्लॅमबुक भरणार. ते काय लीगल डॉक्युमेण्ट आहे काय.

आजच्या माहितीनुसार परांजपे यांचा हुद्दा "Legal Document Head" हा आहे. पण ईशाला ज्या "लीगल डॉक्युमेण्ट्सवर" सही करायची आहे ती डॉक्युमेन्ट्स झेंडे घेउन बसला आहे शिक्के मारत. झेण्डेचा हुद्दा "हरकाम्या विभाग हेड" असावा बहुधा. लीगल गोष्टींवर डिपार्टमेण्ट हेड सह्या करताना लीगल डॉक्युमेण्ट हेड सोडून बाकी सगळे तेथे आहेत, मुळात लीगल डॉक्युमेण्ट हेड हा काय हुद्दा आहे हे अगम्य असले तरी.

ते सही ला विरोध आणि विश्वास नसणे वगैरे सगळे निरर्थक आहे. एकतर ईशा एका रात्रीत १०-१५ वर्षांचा हजेरीपट खाउन त्यातून "सुंदर काम करते", तिला ४-५ पेपर्स वाचायला किती वेळ लागणार आहे. आणि इतके मोठे निर्णय घेताना त्या विभागाच्या हेड ला असे डेली अलाउन्स घ्यायला बोलावल्यासारखे करून सही कर व जा करत नाहीत.

आता मला विक्याच्या कुवतीबद्दलही शंका येउ लागली आहे. पूर्वी संप झाला होता तेव्हा म्हणजे दादासाहेबांना सल्ला दिला होता की सगळ्या मागण्या मान्य करून टाका.

निमकरांच्या दुकानाचा तो सो कॉल्ड 'मालक' आहे तो जेव्हा निमकर खुद गब्बर असतात तेव्हा त्या दुकानात काय रोल करतो? का तेथेही कधी निमकर मालक तर कधी तो मालक असे खेळताना राज्य आल्यावर होते तसे चालते?

निमक्यानं असता तर त्यानं सगळे प्लांटस् विकले असते अन् सर्वच्या सर्व मेंटेनन्स व पगार वाचवून मग कोकणात निघून गेला असता. >>> Lol

आज पहिल्यांदा सॉन्या चालू प्रसंगाशी संबंधित एक्स्प्रेशन देउ शकते हे दिसले. जयदीप १००० रू चे घड्याळ सुद्धा वेळ दाखवण्याचे काम करते वगैरे म्हणत असताना "यांची गरिबीची तारीफ सुरू झाली परत" टाइप जे ती बघते ते पहिल्यांदा चपखल वाटले. इतके दिवस रिलेव्हण्ट असो वा नसो ती उगाचच तुसडा चेहरा करून फिरत होती.

हे सॉन्याचे काय झाले आज? एकदम हृदयपालट? आईसाहेबांना वाटायचे की सॉन्याच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. अजून एका ट्विस्ट ची सोय.

आहाहा! कॉन्फरन्स रूम मधे ५ वाजताची मीटिंग सुरू होत आहे. सरांसकट सर्वांचे स्किड्यूल ५ वाजता मोकळे आहे हे गृहीत धरून ईशाने ठरवलेली. अब आयेगा मजा खेलका.

तो नवीन चम्या कोण आला आहे? ती एक चमी गेल्या एक दोन भागात पाहिली. झेण्डे व मायरा उभे आणि सगळे ज्यु. चम्या-चमी बसलेले ही नवीन हायरार्की दिसत आहे. ते सगळे दाराबाहेर दबा धरून होते की काय? एफएम ने बोलावल्यावर एकदम सगळे आले.

भारतातील व जगातील एकापेक्षा जास्त प्लाण्ट्स असलेल्या सर्व कंपन्यांचे मालक कोणालाही न सुचलेली आयडिया ईशामॅमना सुचली आहे. एक युनिट सोडून बाकी सर्व बंद करायची व सगळे कामगार एकत्र करून एकाच युनिट मधे आणायचे. सिम्पल! मग इतकी वर्षे दोन युनिट का चालवत होते हे विक्यालाच माहीत. आता पहिल्या युनिट मधली यंत्रे विकून टाकल्यावर ते कामगार दुसर्‍या युनिट येउन कसे काम करणार ते ही ईशालाच माहीत. का तेथे ऑलरेडी काम करणार्‍या कामगारांच्या हाताला हात लावून ते उभे राहणार व केवळ तसे केल्याने उत्पादन वाढणार कोणास ठाउक.

आणि भर ऑफिस मधे पाया पडणे? "सर तुमच्यामुळेच मला हे सुचले" - अरे किती पकवाल. नुसते प्रेझेण्टेशन दिल्याचे एवढे काय? आणि हे विक्याने कसे सुचवले? तर ईपालक स्वतःचे घर विकून सासुरवाडीला येउन राहतील हे सुचवून.

ईशा आणि जयदीप भावोजी विचार करतायत. मला जंगल बुक मधला संवाद आठवला. "That shouldn't take long" Happy

कालचा भाग पाहताना,मला वाटल की बाळ चुकून विसरल की काय की ती विक्याची बायको आहे.कारण काय ते जयदीपवर लाडात रागावण,जा तुम्ही" अस लाडात बोलण.आणि जयदीप पण अशा मूडमध्ये होता की मला वाटल की आता हा गाईल
अगं,नच सुंदरी करु कोपा,मजवरीधरि अनुकंपा,रागाने तव तनु ही पावत करि कंपा,मजवरी धरि अनुकंपा
बाळ नाहीतरी नेहमी"आम्ही नाही जा,इकडच्या स्वारींनी याव"याच काळात आहे.

मी फार फार पूर्वी १९९४ - १९९५ मध्ये एका फिल्म कंपनीत स्क्रिप्ट रायटर होते तेव्हा विजय टेक्स्टाइल्स लिमिटेड कंपनीची आम्ही पब्लिक इशू फिल्म बनवली होती तेव्हा सारी मॅन्युफॅक्चरैंग युनिट ला गेले होते. पूर्ण मेकनाइज्ड प्रोसेस असते व प्रिं टे ड डिझाइन लांबड्या यार्न च्या पट्ट्यावर उमटत राहते व स्पेसिफिक लेन्घ्त ला कापतात. झाली साडी मग फिक्सेटिव वगैरे लावत असतील. हे अगदी लो कॉस्ट पराग साडी टाइप ऑपरेशन आहे .

राजनंदीनीची इमेज काय हाय व्हॅल्यु ब्रँडेड आयटेम. हा वोव्हन व डिझाइन्ड पाहिजे. म्हणजे एक्स्क्लुझिव होईल. नाहीतर मास प्रोड्युस्ड मशीन मेड
साड्या ज्या गरीब स्त्रिया नेसतात व कामावर जातात ही मेन चूक आहे. ब्रँडिन्ग वेगळे आहे व प्रॉडक्षन प्रोसेस वेगळी आहे. अ‍ॅक्चुअली सिल्क साडी वीवर्स डिझायनर्स, मेकनाइज्ड वीवीग असेल. तर ते खूप स्पेशलाइ ज्ड अफेअर आहे. एकदाही कोणी कामगार ह्या पलिकडे बोलत नाही.

प्र्त्येक प्रॉडक्षन युनिटला मागे हेड ऑफिस मध्ये एक बॅक ऑफिस काम करत असते जे सूचना देणे , रोजचे प्रश्न सोडवणे वगैरे करत असते.
पॅटर्न, डिझायनिन्ग डिपार्ट मेंट फार सेन्सिटिव असून ते नेहमी बॉसला रिपोर्ट करतात टॉपच्या. कारण पूर्ण प्रॉडक्ट इमेज त्यावर अवलंबून आहे.
१०० - १५० लेबर रस असलेले युनिट नक्की काय साडी छापते? ह्याबद्दल शब्द नाही. इशातर फिलिप कोटलर , व इतर मँ ने ज मिंट गुरूंनाही मागे टाकेल अशी सोलुशनस शोधून काढते आहे. काय बोलावे. शी डिझर्वस इटी अवार्ड. तिथे पण सर्वांच्या पाया पडेल.

ओह! फार एंड असं आहे का ते..? कसं सुचलं ते......!!!! धन्य अ‍ॅनालॉजी आहे. !
आय मीन तोट्यात चलणारा लहान कारखाना म्हणजे निमकरांचे घर, ते विकून त्यांनी मोठ्या युनिट मधे (म्हणजे सरंजामे हाऊस मधे) शिफ्ट व्हायचे....! आणि अशा रितीने नफ्याचा व्यवहार करायचा.....
काय आयडिया!!!!!

मला एका प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकेल काय??.. 3 4 एपिसोड पुर्वी तो दुकानातून एक माणूस निमकरना भेटायला घरी येतो, काम शोधा त्याच्यासाठी म्हणुन. तेव्हा तो सांगतो की राजनंदिनी साडयाची dealer ship गेली आणि ग्राहक तिच साडी घ्यायला येतात.. दुसर्या साड्या नाही.मग याचा अर्थ असा की, राजनंदिनी साडीला मार्केट मध्ये खूप demand आहे..मग अस असताना कारखाना तोट्यात कसा चालला आहे???

अमा,
अहो रा.नं साडीचे 2 3 प्रोडक्ट असतील, स्वस्त, मिड आणि डिझायनर उगाच किती अपेक्षा ठेवायच्या झी च्या टीम कडून,

एफ एम चा फुल फॉर्म काय आहे हो? मला संत्रे सोलून सांगा. आमच्या डिपार्ट्मेंट चा पण तो शॉर्ट फॉर्म आहे म्हणून मला दरवेळी राग येतो चायवाल्याला आमचे नाव कशाला म्हणून<< अमा आपण माबोकरच नाव ठेऊयात एफ एम च, मग आपलं बघून केड्या तेच ठेवेल तशी तो इथन कल्पना घेतोच की

खरचं ह्या लोकांन्नी कधीच्च् काॅर्पोरेटमधे काम केल नसेल अस वाटतं.
मायरा आणि समद्या टीमला इतका (!!!) अनुभव आहे तरी ईबाळाने सुचवलेला उपाय सुचला नाही.. काय पण !
आणि ही बावळट पाया काय पडते.. यक्

मिटींग नोटीस अशी तोंडी असते का? इ स पू काळात वावरत आहेत बिच्चारे...<< खरच कॉर्पोरेट जगाबद्दल काहीच ज्ञान नाहीये अस कुठे मीटिंग तोंडी असते का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी आवडत पण नसाल तरी अस समोर समोर राग दाखवता येत नसतो आणि त्यातल्या त्यात ईबाल तर राजनंदिनी साड्यांच्या department ची हेड आहे आणि बॉस ची बायको मग तर तोंडपूरत तरी चांगलंच राहावं लागतं..आणि पाया पडण्याचं तर काहींच्या काही.. पण नशीब पायाच पडली मिठी नाही मारली Wink

एफ एम चा फुल फॉर्म काय आहे हो? ....... मला दरवेळी राग येतो चायवाल्याला आमचे नाव कशाला म्हणून.
Submitted by अमा on 26 February, 2019 - 06:29 >>>
श्री फणिंद्र मुकादम -- संदर्भ एपिसोड क्र १४, ऑगस्ट २०१८

अजून एक गंमत -- १४ व्या एपिसोडमध्ये सगुऑई जॉईन करताना Bachelor in Business Administration च्या फायनल वर्षाला असणारी ईषा १७० व्या एपिसोडमध्ये Bachelor in Management Studies मध्ये पास झाली.

ई !! श्या !! ७८.६ टक्के मिळवून पास झाली ? डिस्टींक्शन शब्द एक्स्टिंक्ट झाला का?
की BBA / BMS ला ७५% ला पासिंग असते ?

अमा, जाऊ दे, किती शिणाल.... हातमाग नको, मशीन फॅब्रिक नको. तिला क्रोशाच्या सुईने साड्या विणू दे.

बापरे खरच लवून नमस्कार +++१११११२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२

.... जास्तीच जास्त चागली पिस काढता यावी यासाठी .. आपण पिसे काढणारे च मालिका खुप मन लावुन बघतात अस दिसत आहे.....
Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy

मेधावि,देवकी Happy करा करा गरीबाची थट्टा...
अभ्यासू वगैरे काही नाही हो. मी तो एपिसोड पाहिला होता. नवीन जॉईन होतानाच्या वेळचा. तेव्हा एफएमने नाव सांगितले होते.
फणिंद्र आठवत होते पण आडनाव विसरले म्हणून तेव्हढा स्पॉट पाहिला तर इ श्या ची बदललेली डिग्रीही सापडली..

Pages