तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आयला! पुनर्जन्मात सेम सेम मार्कं मिळतात?
मग आमच्या नशीबी प्रत्येक जन्मी हेच लिहिलेलं आहे की काय Sad Lol

सस्मित.. Happy
मेधावि--- डेसिमल च्या पुढचे...!! Biggrin
हल्ली कोण असे मार्क सांगतं..? जीपीए च असतात बहुतेक...आणि नाहीतर ए ग्रेड..!!

हो ना. नुसतं फस्ट क्लास मिळाला असं म्हणाले असते तरी आइसाहेबांनी तेवढाच आणि तसाच अभिनय केला असता की

काय फालतु आयडिया.. पुनर्जन्म असेल तर मार्क कशे सारखे असतिल.. एकाच माणसाने एकच पेपर दोनदा लिहिला तरी मार्क वेगळे मिळतिल. .. वर इशा जो कोर्स करतिये तोच रा.नंदिनीने केला होता का?
मग मे बी पेपर सेट करणाराचा पुनर्जन्म असेल ईशापेक्शा..
कहाणी, व्हिलन्च्या चाली सही असतिल तरच तो व्हिलन वाटतो नाहितर बावळट वाटतो.. इथे सुभा बावळट्ट वाटतोय अगदी.. इस्टेट मिळवण्याचे १०० मार्ग असताना .. येवढा फाल्तु मार्ग पकडुन , वर जे निमकर त्याला मुर्ख वाटत आहेत तिच ईशा गळ्यात बांधुन घेतलिय..
अगदी ईस्टेट मिळवण्याचा एकमेव आणि सोप्पा मार्ग ईशाशी लग्न करणे असता तरी एखादा व्हिलन विचार करेल की जाउ दे दुसरं काहितरी बघु.. ईस्टेट नाही मिळाली तरी चालेल..

आंनदी, सही एकदम

<<<मग मे बी पेपर सेट करणाराचा पुनर्जन्म असेल ईशापेक्शा..>>>> Rofl

बाकी, सुभा चे लूक बदलले की तेच आहे अजून

मायबोलीकर,केड्या सेफ गेम खेळत नसेल कशावरून?
म्हणजे सुभाची बाळावरची गेले सहा महिन्यांची भडास काढून झाली आणि सोफ्यावर बसून पोट दाखवत व्हिलनसारख हसण्याचा कंटाळा आला की मग त्याला परत ddlj चा शाहारुख बनवण्यासाठी बाळाला अजून काही आठवून देणार नाही केड्या ,आणि मग एकदा शिक्कामोर्तब झाल की लव्हस्टोरी च दाखवायची की मग बाळाला आठवायला लागेल आणि विक्याची नंदू परत येईल ,तुला पाहते रे गाण गात आणि मग दोघ मिळून गेल्या जन्मी नंदूला कोणी मारल ते शोधून काढतील
केड्या आहे तो.सुभाच्या गूड बुकात राहायच असेल तर सुभा बोले ,केड्या लिखे.
कारण आता त्याने प्रचंड गोंधळ घातला आहे.
जरी सध्या विक्या त्याच्या प्लँनमध्ये यशस्वी झाला आणि सगळ्यांनी जरी पुनर्जन्म मान्य केला
तरी कायद्याच बोला.तो कसा पुनर्जन्म, आत्मा मान्य करेल.ईश्टेट बाळाच्याच नावावर राहाणार जी क्लॉजमुळे विक्याला मिळूच शकत नाही.
त्यामुळे सुभाला कंटाळा येईपर्यंत हा अचरटपणा बहुतेक चालू राहाणार.

इशाची तुलना रेणुकाशी केली ना परवा कुणीतरी? >>>
बेबी पुनर्जन्म आहे की नाही हे सिद्ध होण्याऐवजी केड्या इथलं वाचून लिहितोय हे सिद्ध झालंय..

निमकरांना रस्त्यावर आणायचे तर लेखकाला ट्रॅक बदलावाच लागेल बाबांनो, असं काय करतात. आता मालकांनी नोकरीवरून कमी केले....की आलेच निमकर रस्त्यावर आणि नंतर विकूच्या घरात. हां.....

परवा ईशाला मेडल देऊन विसने शालजोडीतले मारले तिला.

म्हणजे नंदूही आॅक्टोबरच्या परिक्षेत पास झाली होती का >>>>>>> परान्जपे म्हणत होते की ईशाने राजनन्दिनी सारख काम केलय. म्हणजे नंदू सुद्दा अश्याच चुका करायची का? नक्की नन्दु कशी होती? म्हत्वाकान्क्षी की बावळट ( म्हणून विसने तिला फसवल असेल.)

विकूच्या ऑफिसमधले खिडकीचे ब्लाईंड्स किती वेडेवाकडे झालेले होते. >>>>>> भगवती,फारएण्ड कित्ती ते तुमच बारकाईने बघण! Lol

मग आता दुकान विकायला निमक्याला अन् विक्या परत ऐकत्र कसे? >>>>>>>>>>>>> विसने दुकानाच्या मालकाकडून राजनन्दिनी साडीची डिलरशिप काढून घेतली तर मग सम्पुर्ण दुकान विकण्याचा प्रश्न येतोच कुठे? निमकरान्च्या साडयान्च्या दुकानात इतर कम्पन्यान्च्या/ ब्रॅन्डसच्या साडया मिळत नाही का?

निमकरान्च्या फॅमिलीपैकी कुणीही सरन्जामे इण्डस्ट्रीशी बिझनेस करु शकत नाही हा नियम विसने निमकर रस्त्यावर यावेत म्हणून केला होता का?

आणि ही मठ्ठ ईशा ' वडिलान्नी मालकपद सोडल' ऐकल्यावर काय म्हणते तर ' तुम्ही खुप चान्गल केलत बाबा' नवर्याला मस्का मारला असता तर त्याने काहीतरी जुगाड केलाच असता ना, शेवटी त्याला प्रॉपर्टी हवीये ना. त्याने त्यासाठी काहीही केल असत.

निमकर एका बाबतीत बरोबर बोलत होते. बाप आणि मुलगी एकाच माळयाचे मणी. दोघान्नाही मालकासारखे वागता येत नाही.

त्या मायरालाही काय त्यात चुका दिसल्या तिलाच माहीत. >>>>>>> तिच्या मते, ईशाने फक्त आधी लिहिलेल्या तपशीलाभोवती बॉक्सेस काढले. अन्डरलाईन्स काढले. असन्ख्य खाडाखोड केली. मेन कन्टेन्ट तिने दिलाच नाही. मायरा म्हणते ' कन्टेन्ट इज इम्पोरटन्ट' येस्स, केडयाला हेच सान्गायची गरज आहे, ' कन्टेन्ट इज इम्पोरटन्ट'

फारएण्डने आता एक कराव, आईसाहेब जेव्हा राजनन्दिनीच्या मार्कशीटची क्लोजअप दाखवतील, तेव्हा त्याच्यात राजनन्दिनीच सरनेम बघाव.

अरे देवा, आता हे आमरस भात हा काय प्रकार आहे?
त्याचा आणि पुनर्जन्म यांचा काय संबंध?
आणि त्या आई साहेब आता इशू बेबीच्या प्रत्येक श्वासागणिक मठ्ठ भासणारे गूढ लूक किती दिवस देणार आहेत.
आणि आपल्या नवर्‍याच्या नावे कंपनीत काहीच नाहिये हे माहिती असून सुद्धा ईशा कसली आणि का मदत करते आहे.
तिच्या फाईल चाळून (अभ्यासून ) झाल्या का?
कोणतेही ट्रेनिंग न घेता कसं काय ब्वा तिला सर्व आकडेमोड (अकाउंटिंग) करता येते?
चकल्याच्या बिझनेसचे काय झाले.
पोळीच्या लाडवाची ब्याद कधी संपणार आहे.
बहुदा ईशा वि सं चा बदला पोळीचे लाडू खायला घालून घेईल.

Light 1 :दि
प्रकाश टाकावा.

मग आमच्या नशीबी प्रत्येक जन्मी हेच लिहिलेलं आहे की काय >>> Lol हे सही आहे.

फारएण्डने आता एक कराव, आईसाहेब जेव्हा राजनन्दिनीच्या मार्कशीटची क्लोजअप दाखवतील, तेव्हा त्याच्यात राजनन्दिनीच सरनेम बघाव. >>> Happy हो ती मार्कशीटही हातानेच कोर्‍या कागदावर लिहीलेली असेल बहुधा. परवा रूपालीने स्क्रीन वर दाखवली तेव्हा युनिव्हर्सिटी असे मोठ्या अक्षरात होते (छापलेले). पण कोणती ते कळाले नाही.

इशाची तुलना रेणुकाशी केली ना परवा कुणीतरी? >>>
बेबी पुनर्जन्म आहे की नाही हे सिद्ध होण्याऐवजी केड्या इथलं वाचून लिहितोय हे सिद्ध झालंय..
Submitted by कच्चा लिम्बू on 23 February, 2019 - 16:46 >>>>>>
स्वस्ति म्हणाल्या / म्हणाले होते रेणुका.
मग तो गुन्हा आहे. केड्या आणि झी दोघांचाही. जे आपल्या बुद्धीचे योगदान नाही त्याबद्दल केड्या लेखक म्हणून श्रेय + आर्थिक फायदा घेत आहेत. आणि झी ते दाखवून प्रेक्षक संख्या पर्यायाने जाहिरात उत्पन्न कमवत आहे.

खेळताना पडलं तर ४ वर्षाच्या मुलांनाही उचलून नाही घेत कोणी. गुडघ्याची माती झटकून कुठे काय काही नाही म्हणत पुन्हा खेळ सुरू करतात. आचरट.

इशाची तुलना बाळा गाऊ कशी अंगाई मधील आशा काळेंशी केली तर? (गुण सारखेच आहेत.) इशाला विहीरीत उडी घ्यायला सांगणार काय?

मला कल्पना नव्हती की मी तेव्हा हम आपके है कौन शी तुलना करण्याचा एवढा मोठा परिणाम होईल..

Sad Sad :अरेरे
नाही तर कल्पना आवरती घेतली असती

अरे,प्रीकँपमध्ये ते बाळ विक्याच्या पाया पडताना दाखवली आहे.
केड्या ,अरे आपण 21 व्या शतकात आहोत रे, अरे किती शिव्या खाशील आमच्या.
आणि हा विक्या काय त्या निमकरांना घरी आणण्याच्या बाता करत आहे,त्याला कुठेतरी नेउन ठेवायच आहे ना,मग कुठेतरी म्हणजे सरंजाम्यांच्या घरात?

इशाच्या नव्या आयड्येला वर्केबल म्हटल्यावर इशानं भर काॅन्फरन्स रुमात विक्याला सवाष्णीची ओटी भरल्यावर करतात तसा वाकून नमस्कार आणि विक्यानंही पाठीवर हात ठेऊन आशिर्वाद दिला...काहीच्या काही..

आज इशानं सर्र आत येऊ? विचारल्यावर तू कधीपासून विचारायला लागलीस असा काऊंटर प्रश्न केलाय विकुटल्यानं. अरे लब्बाडा, रोजच विचारते की ती.

इशाला वीस ने ते खेळणं आणून अभिनंदन केले ते काहीच्या काहीच होत कॉमेडी वाटलं (तस बरोबरच आहे म्हणा बाळासाठी खेळणंच आणणार Wink )
आणि मला एक काळत नाही विस च ध्येय हेच आहे की प्रॉपर्टी हवी मग निमकरांना का घर विकायला लावतोय त्यांना रस्त्यावर आणून याला काय मिळणार उलट निमकरांचा त्याला उपयोगच होत आहे ,या केड्याला झटके येतात बहुधा अधूनमधून म्हणून मधेच अस काहीतरी टाकतो.. आणि तसच होत तर आधी कशाला त्यांचं घर सोडवलं तेव्हाच न्यायचं ना त्यांना त्याच्या घरी..

Pages