तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळ्यात गंमत म्हणजे आत्तापर्यंत दाखवलेली कागदपत्रे व त्यातील ते नंबर्स खरे धरले तर राजनंदिनी कंपनी तोट्यात नाही. फायद्यातच आहे!>>

फा, किती मन लावून बघता सिरेल! सगळे बारकावे टिपता! तुम्हाला प्रेक्षक ऑफ द इयरचा झी चा पुरस्कार मिळायलाच हवा! असा पुरस्कार देत नसतील तर झीच्या चन्द्रा साहेबांना सांगुयात सगळे माबोवाले मिळून!
(मला दुसरा एक संशय येतोय तुम्ही त्या सिरेलच्या निर्मात्यां दिग्दर्शकांना सामिल नाहीत ना? Wink )

मला दुसरा एक संशय येतोय तुम्ही त्या सिरेलच्या निर्मात्यां दिग्दर्शकांना सामिल नाहीत ना? >>> Lol

फा, किती मन लावून बघता सिरेल! सगळे बारकावे टिपता! तुम्हाला प्रेक्षक ऑफ द इयरचा झी चा पुरस्कार मिळायलाच हवा! असा पुरस्कार देत नसतील तर झीच्या चन्द्रा साहेबांना सांगुयात सगळे माबोवाले मिळून!>>>>>> +१.

मायबोलीकरांनु माका उत्तर देवा
कोण कोणास म्हणाले
"चेहराही तुच माझा,तूच माझा आरसा,तुला पाहते रे."
पर्याय
1बाळ विक्याला
2नंदू विक्याला
3विक्या दोघींना
4यापैकी काहीच नाही.
माका गावतच नाही उत्तर.

मला दुसरा एक संशय येतोय तुम्ही त्या सिरेलच्या निर्मात्यां दिग्दर्शकांना सामिल नाहीत ना? >>> फा त्या गुप्त खोलीत बसूनच लिहीतात बहुतेक. Happy

सुभा चे हिरो ते व्हिलन हे ट्रांसफॉर्मेशन ज्या गतीने व अ आणि अ पध्दतीने दाखवत आहेत ते पाहता पुढील चार भागात ईशा ची १००% राजनंदिनी करून टाकतील बहुतेक. आता मूळ राजनंदिनी मालिकेत येण्याची गरज आहे का?
खेरीज सुभा च्या तोंडचे संवाद तर अक्षरशः अगम्य आहेत... म्हणे " ते निमकर सगळे मूर्ख आहेत... बघ त्यांना कसे रस्त्यावर आणतो ते वगैरे..." अरे बाबा तुला फक्त सगळी ईस्टेट हवी आहे ना सरंजाम्यांची? मग निमकर कुठे का असेनात// असेही ते घरातून रसत्यावर आलेच होते. काहीही...

या मालिकेच्या लेखकाने थ्रिलर व सस्पेंस च्य प्रयोगासाठी प्रेक्षकांचा गिनीपीग केला आहे.. आता भोगा. Sad

अगदी बरोबर योग इथे निमकरांना रस्त्यावर आणण्याचा प्रश्न येतोच कुठे..
अजून एक गोष्ट ईबाळाने ती file आधी परंजपेना दिली होती आणि त्यांनी ती नीट स्टडी पण केली होती जर त्यात एवढ्या चुका होत्या तर त्यांना कळलं कस नाही..

अगदी बरोबर योग इथे निमकरांना रस्त्यावर आणण्याचा प्रश्न येतोच कुठे..
अजून एक गोष्ट ईबाळाने ती file आधी परंजपेना दिली होती आणि त्यांनी ती नीट स्टडी पण केली होती जर त्यात एवढ्या चुका होत्या तर त्यांना कळलं कस नाही..

" ते निमकर सगळे मूर्ख आहेत... बघ त्यांना कसे रस्त्यावर आणतो ते वगैरे..." अरे बाबा तुला फक्त सगळी ईस्टेट हवी आहे ना सरंजाम्यांची? मग निमकर कुठे का असेनात// असेही ते घरातून रसत्यावर आलेच होते. काहीही... >>> खरतर ते मुर्ख आहेत म्हणुनच विक्याच्या कामाचे आहेत. त्यामुळे त्याने त्यांचे आभारच मानायला पाहिजेत.

>>नी ती नीट स्टडी पण केली होती जर त्यात एवढ्या चुका होत्या तर त्यांना कळलं कस नाही..
तर्कवेताळाने विक्रांत ला प्रश्ण केला: सांग विक्रांत, परांजपें ना त्या फाईलीत चुका आहेत हे कसं कळलं नाही?
त्यावर विक्रांत फक्त छद्मी हासला.
तर्कवेताळाने झेंडें ना प्रश्ण केला:
सांग विलास, वडापाव खाता खाता तू एव्हड्या मोठ्या पदावर कसा पोहोचलास?
झेंडे: आमच्या गावाकडं एक म्हण आहे- ज्याच्या वड्यावर पाव त्याच्याच घोड्यावर भाव.
वेताळाला ऊत्तर झेपलेले नाही त्यामूळे तो तिथेच बसून आहे.
एकदा तर्कवेताळाने ईशा ला देखिल प्रश्ण विचारायचा प्रयत्न केला होता.
सांग ईशा, ऑडीशन मध्ये नक्की कशामूळे सिलेक्शन झाले?
ईशा ने ऊत्तर द्यायला तीचा फेमस 'ओठबोट' चंचू केलाच मात्र ते पाहून वेताळ आधीच ऊडून गेला.
शेवटी तर्कवेताळाने लेखकाला प्रश्ण केला:
सांग केड्या, ईशा हीच राजनंदिनी आहे याचा २००% पुरावा काय?
लेखकाच्या प्रतीभेला तिथेच एक नवा कालवा फुटला आणि त्याने ऊत्तर दिले: पुढील भागात ईशा विक्रांत ला अंगाई गीत गाणार आहे जे फक्त नंदू च गायची " भिरभिरतो..बोलावतो.. खिडकीत.. काऊ... "
आणि वेताळ ढसाढसा रडला..

(मला दुसरा एक संशय येतोय तुम्ही त्या सिरेलच्या निर्मात्यां दिग्दर्शकांना सामिल नाहीत ना? Wink ) >>>
फा त्या गुप्त खोलीत बसूनच लिहीतात बहुतेक. >>>> Lol

अजून एक गोष्ट ईबाळाने ती file आधी परंजपेना दिली होती आणि त्यांनी ती नीट स्टडी पण केली होती जर त्यात एवढ्या चुका होत्या तर त्यांना कळलं कस नाही.. >>> हो हे ही खरे. शिवाय मायरालाही तिला मदत करायला सांगितली होती. त्या मायरालाही काय त्यात चुका दिसल्या तिलाच माहीत. ईशा कसला रिपोर्ट वगैरे बनवत नव्हती. एका आजारी कारखान्याला कसे वाचवता येइल यावर ती काम करत आहे. त्याबद्दल बोलताना सगळे लोक जे रिमार्क्स देत आहेत ते आणि ईशाला दिलेले काम याची अजिबात संगती लागत नाही.

ते नंबर इतक्या बारकाईने बघितले कारण प्रॉफिट आणि लॉस एकाच अकाउण्ट कडून कसे झाले चेक करताना नक्की काय लिहीले आहे बघत होतो. तेथेही "लॉजिक रानोमाळ" अवस्था आहे:
- प्रत्येक डीलर कडून असलेले प्रॉफिट चे आकडे लॉस च्या आकड्यांपेक्षा जास्त आहेत. म्हणजे किमान त्या बाबतीत तोटा नाही
- त्या कागदावरचे नंबर्स बघितले तर आधीच्या पानावर कंपनीचा ताळेबंद आहे, त्यातल्या नंबर्स पेक्षा ते बरेच जास्त आहेत. म्हणजे कंपनीच्या एकूण रेव्हेन्यू व खर्चात डीलर्स शी संबंधित नंबर्स "बसले" पाहिजेत. इथे कंपनीचे एकूण ग्रॉस उत्पन्न डीलर्स कडून मिळणार्‍या प्रॉफिट पेक्षा कमी असला अचाट प्रकार आहे.
- एक मिनीट मला वाटले याच "चुका" मायराला दिसल्या (पण परांजप्यांना नाही). पण तुपारे लॉजिक असे सोपे नसते. या चुका दुरूस्त झाल्या म्हणजे ते नंबर्स बदलले नाहीत - त्याभोवती रंगीत महिरप आली फक्त.
- दुरूस्त केलेल्या कागदा मधे एक तिसरा कॉलम आला होता. त्यात सर्व एण्ट्र्या " --ll-- " असे जे आपण "वरच्या ओळीसारखेच" दाखवताना करतो तसे लिहीलेले होते. पण "वरती" काहीच नव्हते. कॉलम कसला आहे ते ही नव्हते Happy

ऑनलाइन बघताना कुतूहलाने पॉज करत बघितल्याने इतके सगळे बघता आले.

मला दुसरा एक संशय येतोय तुम्ही त्या सिरेलच्या निर्मात्यां दिग्दर्शकांना सामिल नाहीत ना? >>>> फारएण्ड तुम्ही हसता नुसते, कोणी असे विचारले की.... नाही काही म्हणत नाही कधी Happy . त्या चपटे केस + चष्मावाल्या माणसाला बोलावले पाहिजे, लोकांच्या अदालती घेतात ते. नाव विसरले.

परांजपे का बघतील फाईल? ते लीगल वाले होते ना? फार तर लेबर लॉ, कामगार वि कंपनी खटले हे विषय ते बघतील. मुद्दा जर नफ्या-तोट्याचा आहे. तर फायनान्स, अकाउंटस, ऑपरेशन्स, मार्केटिंग, इन्व्हेन्टरी वाले बघतील फार तर. की साडेतीन हजार कोटीचे स्टार्टप आहे का सगुऑइं?

जर तोटा झालाय हे कन्फर्म आहे तर पुन्हा आकडे कशाला मांडायचे?
रिपोर्टमध्ये तोट्याची मुख्य आणि क्षुल्लक कारणे, उपाययोजना शक्यता आणि टप्पे, उपाय यशस्वी ठरण्याची कारणमीमांसा, काय क्रमाने कृती करायची हे हवे ना?

>>ऑनलाइन बघताना कुतूहलाने पॉज करत बघितल्याने इतके सगळे बघता आले.
असे पॉझ करून बघणे इज नॉट फेयर हा... Proud
नशीब तरी आकडेमोडी चे कागद दाखवले. तर्कवेताळाला तेव्हडं पुरतय.. Proud

बाकी काल ईशाबाळाने मान विस च्या कुशीला अन हात ऊशीला (पोट) घातला ती पोझ फ्रेम करायला हवी. Happy

आज शुक्रवार, वीकान्त आला!
म भा दि उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी माबोकर नेहमीच उत्सुक असतात.
लेख लिहायला आणि साहित्य वाचनासाठी ध्वनिचित्रमुद्रण करायला वेळ मिळावा म्हणून खुप आधीच म भा दि उपक्रम जाहिर करण्यात आले. तरीही साहित्य वाचन आणि गोजिरे बोल ह्या उपक्रमासाठी साहित्य पाठवण्याची मुदत २५ तारखेपर्यन्त वाढवत आहोत.
आता एकच वीकान्त राहिलाय मंडळी!
शिवाय मोरपिसारा आणि विज्ञानभाषा मराठी हे उपक्रम तुमच्या लेखांची वाट पाहत आहेत!!
साहित्य पाठवण्याची तयारी करताय ना?

योग, ऋयाम, अमा, सगळे जण सरळ नवीन एपिसोड लिहा इथे. मोजून १५ ओळी तर लागतात.
त्यांना आयते मिळाले तर तेच दाखवतील. प्रेक्षकांचा दुआ घ्या.
तर्कवेताळ जयदीपला भेटला तर तपाला बसेल. वेताळ योनीतून सुटण्यासाठी

मायबोलीकरांनु माका उत्तर देवा. कोण कोणास म्हणाले ...
"चेहराही तुच माझा,तूच माझा आरसा,तुला पाहते रे." >>>>>
विसं बीन बॅगला
ईषा पार्टीकल बोर्डला
मायरा अ‍ॅक्रिलिक ट्रॉफीला
पुष्पा पोला/फोभा ला
सॉन्या फेसपॅकला
जयदीप शेखचिल्लीला
झेंडे क्रेनला
यापैकी काही चालेल?

Submitted by किल्ली on 22 February, 2019 - 20:44 >>> किल्लीने लिहून कसे चालेल? मभादि संयोजक हवेत. लोक लास्ट वीकेंडलाच करून पाठवतात बहुतेक.
अबोली अनारकली दीड महिन्यानी धुवायला पडला ?.... Happy मला दिवे देता येत नाहीत. दिले असे अझ्यूम करा प्लीज

परांजपे का बघतील फाईल? ते लीगल वाले होते ना? फार तर लेबर लॉ, कामगार वि कंपनी खटले हे विषय ते बघतील. मुद्दा जर नफ्या-तोट्याचा आहे. तर फायनान्स, अकाउंटस, ऑपरेशन्स, मार्केटिंग, इन्व्हेन्टरी वाले बघतील फार तर. की साडेतीन हजार कोटीचे स्टार्टप आहे का सगुऑइं? >>> यस! कोणीही कोणत्याही क्षेत्रातील काम करते यांच्यात. नाहीतरी नुसत्या महिरपीच बघायच्या असतात.

बाय द वे सगुऑइं नाव जबरी आवडले. त्याचाच लोगो बनवायला हवा त्यांनी. कोरियन्/जपानी कंपनी आहे असाही समज होईल पब्लिकचा. तसेच तोंडात (पोळीचा) लाडू कोंबून "सरंजामे" म्हणायला गेलो तर साधारण तसाच उच्चार होईल Happy

फारएण्ड तुम्ही हसता नुसते, कोणी असे विचारले की.... नाही काही म्हणत नाही कधी >>> इथे मला जॉन ऑलिव्हर ची एक कॉमेण्ट आठवली. अ‍ॅण्डी झाल्ट्झमन आणि तो एक पॉडकास्ट करत पूर्वी, त्या अ‍ॅण्डीबद्दल. तपशील थोडे विसरलो, पण साधारण अशी होती Happy

".... there are rumors that Andy is going to inaugurate the Olympics this time. Those could be true, because Andy has not officially denied it"

Those could be true, because Andy has not officially denied it >>> हो का, बरं बरं Happy

कोरियन्/जपानी कंपनी आहे असाही समज होईल पब्लिकचा. >>>>>
नको हो नको. काढून टाका बरं ते. काय भरवसा नाही त्या लोकांचा.
साडी कारखान्याचा प्रॉब्लेम सोडवायला जपानी थिअरीज वापरणार असे दाखवतील. मग जपानी कन्सल्टंट व्हिजीट. सगळा सगुऑइं पागलखाना पंखे घेऊन कमरेत झुकत एपिसोड मागून एपिसोड टोलवणार.

@मेधावि --- सगुऑइं म्हणजे सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे लघुरूप
तर्कवेताळ मी विसं वरून विक्रम-वेताळ वाला धरला? तसे नाहीये का? मग कोण फारएण्ड ?
की ( फारएण्ड + अमा + UP + लॉजिक शोधून भागलेले बाकी सगळे अभागी जीव ) यांचे संयुक्त नामकरण?

मग कोण फारएण्ड ?>> Happy

बाकी काल ईशाबाळाने मान विस च्या कुशीला अन हात ऊशीला (पोट) घातला ती पोझ फ्रेम करायला हवी. >> होहो मी पण ऑब्जर्व केलं ते.

धमाल लिहिताय सगळे, मालिका बघायचं बंद करून युगे लोटली पण इथल्या कमेंट्स न वाचता एक हि दिवस जात नाही, लगे रहो माबो कर्स Wink

धमाल लिहिताय सगळे, मालिका बघायचं बंद करून युगे लोटली पण इथल्या कमेंट्स न वाचता एक हि दिवस जात नाही, लगे रहो माबो कर्स +१११

एकदा तर्कवेताळाने ईशा ला देखिल प्रश्ण विचारायचा प्रयत्न केला होता.
सांग ईशा, ऑडीशन मध्ये नक्की कशामूळे सिलेक्शन झाले?
ईशा ने ऊत्तर द्यायला तीचा फेमस 'ओठबोट' चंचू केलाच मात्र ते पाहून वेताळ आधीच ऊडून गेला.
शेवटी तर्कवेताळाने लेखकाला प्रश्ण केला:
सांग केड्या, ईशा हीच राजनंदिनी आहे याचा २००% पुरावा काय?
लेखकाच्या प्रतीभेला तिथेच एक नवा कालवा फुटला आणि त्याने ऊत्तर दिले: पुढील भागात ईशा विक्रांत ला अंगाई गीत गाणार आहे जे फक्त नंदू च गायची " भिरभिरतो..बोलावतो.. खिडकीत.. काऊ... "
आणि वेताळ ढसाढसा रडला Lol

मालिका कधीच बघितली नाही.. हीच काय कोणतीच मराठी झी मालिका बघितली नाहीये.. पण इथे नियमित वाचनाचा आनंद घेतीये.. Lol

आज एपिसोड मधे पाणी भरण्याची नवीन पद्धत दिसली. ईशा आणि आईसाहेब यांच्यात चर्चा. मग ईशाने ती काय चर्चा झाली ती पुन्हा आई व निमकरांना सांगायचे. मग त्यांच्या प्रतिक्रिया. तिकडे निमकर आणि सर यांच्यात चर्चा. मग निमकरांनी ती चर्चा ईशा आणि आई समोर उलगडायची. त्यावर ईशा आणि आईच्या प्रतिक्रिया. पूर्ण एपिसोड मधे निमकरांचे त्यागमुर्ती बालक होणे व ईशाची मार्कशीट पाहून आईसाहेबांना कसली तरी आठवण होते हा गूढ सीन इतकेच होते. बाकी सगळे पाणी.

आता मलाही शंका येउ लागली आहे की हे ओम शांती ओम सारखे असावे. पण वाटीभर भाजी पिंपभर पाण्यात घालून वाढवली आहे त्यामुळे हे कळायला अजून शंभर एपिसोड्स लागतील.

दुकान होतं, तर निमक्यानं घर का विकलं? विकलं तर विकलं, मग विक्यान ते परत का घेतलं? आणि मग आता दुकान विकायला निमक्याला अन् विक्या परत ऐकत्र कसे? श्या! फारच बाबा शंका.
आईसायबांना नंदुचे मार्कंस बरे लक्षात आहेत. एरवी तर इशाच्या थोबाडीत मारतील असे मंद न मठ्ठ भाव धारण करून हिंडत असतात. आणि मुद्दाम राउंड अप करून टक्के न सांगता डेसीमलच्या पुढचे पण मार्क्स सांगत आहेत सगळे म्हणजे मग ते नंदुच्या मार्कांशी जुळले की सगळ्यांना हुश्श होईल.

Pages