तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इशाला वीस ने ते खेळणं आणून अभिनंदन केले ते काहीच्या काहीच होत कॉमेडी वाटलं (तस बरोबरच आहे म्हणा बाळासाठी खेळणंच आणणार Wink )>>> खेळण्याची काय भानगड आहे? इआईने नातवाची मागणी केली का? कि विआईने?
ईशा विक्याच्या पाया पडते>>> का?

ते गाढ्या प्रेक्षकांसाठी मी चुकुन गाढव प्रेक्षकांसाठी अस वाचलयं .... फिदीफिदी न दिवे घ्या. सगळ्यांना _/\_ . भारीच लिहिताय.... लगे रहो !!
बाकी इथे केडयाला फार आयडिया देऊ नका प्लीज.

एक मटका चालू करुया.

अरूण निमकर आता पुढचे काय फुंकून टाकतील? घर अजून हातात आहे, त्यातील फर्निचर, कणकवलीचे घर. हाइट ऑफ इडियो सी आहे.
जर एजन्सी गेलीतर काळाला अनुसरुन त्या साडीच्या ऐवजी वेस्टर्न ड्रेसेस चे दुकान टाकले असते तर जोरात चाललेच असते. बरं नुसते माझ्याकडे मालकी नाही व मी फक्त तिथे जॉब करतो आहे. असे फेक डॉक पण चालले असते स ग्रूई ला.

ईशा निर्णय घेणार होती ना कामगारांना काढायचा? मग तो असा साइन्ड अ‍ॅण्ड सील्ड तयार कसा झाला एकदम? अगदी कॉम्या अपर लोअर साठी डिरेक्टर लोक ड्राफ्ट बदलवून पक्का करून घ्यायला लावतात. वर्कर युनिअन शी वाटा घाटी असतात. पण हिने कुठले पेपर २५ वर्शपासूनचे वाचून अभ्यास केला व निर्णय असा तिला रेडिमेड हातात दिला सही करायला?

मायरा जरा जासतच नाकाने कांदे सोलते का? बॉसने आय वाँट टू गो थ्रु धिस म्हटल्यावर तुमचा विश्वास नाही वाट्ते आमच्यावर. हिचे कधीच अप्रे झल झाले नाही काय?

विकी घरी येउन बाथरुमातून बाहेर येतो व खेळणे व्हास मागे लपवून ठेवतो पण ते चालूच असते की. मग इशाल आवाज येत नाही वाटते.

त्यांची केमिस्ट्री किती धन्य आहे. मिठी मारली तरी ऑडिअन्स ला काही ही फील होत नाही.
तिचे सर्व संवाद १९६० मधल्या बायकोचे असतात. मग सीरीअसली स्लॅम बुक भरत बसते बाळ बेडरुमात. ही ही हीही.

विकी घरी येउन बाथरुमातून बाहेर येतो व खेळणे व्हास मागे लपवून ठेवतो>>>
विक्याने दिलेलं माकड हे ईबाळाचं रूपक आहे -इति आमच्या मातोश्री

अहो, मित म्हणाले ना मी हाडाचा अकाउंटंट आहे?!
त्यांचे आणि मालिकेतील अकाउंटस ज्ञान जुळत नाहीये.
. ते बरोबर असतील तर मग हाडे. कदचित हाडात अकाउंटन्सी डेफिशियन्सी असेल ?>>>>अच्छा अच्छा ! संत्रे सोलून मिळाले.

विक्याने दिलेलं माकड हे ईबाळाचं रूपक आहे -इति आमच्या मातोश्री>>>> अगदी अगदी!

सगळ्या कमेंट्स लोळ आहेत.
धन्य धन्य माबोकर.
तुम्ही सगळ्यांनी मिळुन रोज एकेकाने कथा (STY सारखी) आणि डायलॉग्ज लिहुन दिलात तरी सिरीयल लॉजिकल होईल आणि हिटही.

STY- spin the yarn मायबोली गणेशोत्सवात अनेकदा अशी स्पर्धा झाली आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. देवकी, जुने गणेशोत्सवाचे धागे चाळून पहा.

त्यांची केमिस्ट्री किती धन्य आहे. मिठी मारली तरी ऑडिअन्स ला काही ही फील होत नाही. >>>
अमा Happy पण केमिस्ट्रीत इनर्ट गॅस असतात की हो. हे नवीन दोन.
एक स्वयंभू इनर्ट, दुसरा बहुतेक सिनीयर दातारांच्या भीतीने इनर्ट झालाय.

आणि फीलिंग ते काय यायचेय. रोजच्या बघण्यातले दृश्य तर आहे.
रात्री खाली अंथरलेली गादी सकाळी कॉटवर टाकताना गादीची वळकटी धरलेला माणूस असाच दिसतो.
तेव्हा काय फीलिंग येते? काही नाही.

दातार कोण? Submitted by आंबट गोड on 25 February, 2019 - 14:51 >>>
नवोदित / अविवाहित हिरॉईनची मम्मी सेटवर येत असेल तर असे सीन्स घ्यायला आक्षेप घेणे / मर्यादा घालणे हे प्रकार होऊ शकतात ना.

पुनर्जन्मातला final result, मागच्या जन्मातील final result शी ताडणार, असं आपलं गृहीत धरलं. >>>>> आपण गॄहितकातच जगायच Happy
केड्याने आपल्याला धरलयं.

रात्री खाली अंथरलेली गादी सकाळी कॉटवर टाकताना गादीची वळकटी धरलेला माणूस असाच दिसतो>>>. तोडलंस मैत्रिणी.

महिरणे,, ओ ष्ठ थर थरणे असे प्रकार हा रोमान्स बघून होणे अशक्यच वाटते मला बुढीला. निओ ट्रिनि टी ला बघून हसतो किंवा तिला ट्रिन म्हणतो तेव्हा अगदी अगदी तिच्या जागी असावे व कीनू रीव्ह्ज कडून प्रेम करवून घ्यावे असे वाट्ते तसे ह्या सुजकट कडे बघून काही वाटत नाही. दूर पळून
जावे असे फील्स येतात. तंबाकू फिल्ड हसू बघून त्याला गुलाबी रंगाचा टूथब्र श गिफ्ट करावे असे वाट्ते.

रात्री खाली अंथरलेली गादी सकाळी कॉटवर टाकताना गादीची वळकटी धरलेला माणूस असाच दिसतो>>> भर मीटीन्ग मध्ये अशक्य हसू फुटलं .
खोकल्याच्या उबळीमध्ये लपवावं लागलं .

रात्री खाली अंथरलेली गादी सकाळी कॉटवर टाकताना गादीची वळकटी धरलेला माणूस असाच दिसतो.>>
सरंजामेंचे आता पार वळकटे झाले Biggrin

भारी लिहीताहेत सगळेच.. Proud
विकीशा मध्ये अजूनही केमिस्ट्री शोधतय पब्लिक, हे वाचून वाईट वाटले.
ईथल्या आईसाहेबांची शून्यमुद्रा राखेच्या माधव सारखी भासते..
तर्कवेताळ खुलासा: विक्रम वेताळ तसे.. विक्रांत वेताळ. अर्थातच तर्कसुसंगत प्रश्ण विचाराय्चे काम वेताळाकडे असल्याने, नाव तर्कवेताळ. बाकी काही नाही.

अबोल, UP, रेणू धन्स. Happy

आणी त्याने मार्क चेंज केलेच नव्हते... झेंडे जेव्हा फाेन करतो ..विस काही तरी बाेलायला जातो पण तितक्यात आई येतात सो तो फोन कट करतो >>>>>>>>> सहमत मी हे एपिसोड बघण्याआधी पोस्टल होत.

एका भागात विक्या परत शाहारुख..विक्याला कंटाळा आला व्हिलन व्हिलन खेळून की परत शाहारुख मोडवर नेईल केड्या. >>>>>>>> व्हिलन असतानाही त्याला बाजीगरचा शाहरुख केलय.

tyala vadapaav khayala deun blackmail karat asavaa >>>>>>>> Rofl पण पोळीच्या लाडूपेक्षा वडापाव कधीही बेस्ट.

पण आईसा कशाला करेल असे? ती कामकाज बघत नाही, तिच्या नावावर काही मालमत्ता आहे, चांगल्या घरात आरामात राहते. संत्री सोलायचाच काय तो त्रास. >>>>>>>>>>+++++++++++११११११ आणि त्यान्ची सून डाळिम्ब सुरीशिवाय सोलते.

तेे मेडल घालून तिला पाठीशी घातलं की तिचा अपमान केला >>>>>> चम्पा, ईशाला वाटल, पाठीशी घातल, पण विसने तिचा अपमान केला. आपला नवरा आपल्याला चुकीच्या कारणासाठी प्रोटेक़्ट करतोय म्हणून ती बाहेर येऊन रडली आणि नन्तर विसला झापल. मायरा तिला टोमणे मारायलाच बाहेर आली होती.

ते गाढ्या प्रेक्षकांसाठी मी चुकुन गाढव प्रेक्षकांसाठी अस वाचलयं >>>>>> Lol

पण कालच्या बेडरुममधल्या रोमान्सच्या वेळी विस खरा वाटत होता.

विसने गिफ्ट दिलेले स्लॅमबुक दैवी आहे का? त्या स्लॅमबुकमध्ये लिहायला घेताच ईशामध्ये नन्दूचा आत्मा घुसला की काय? ईशा चक्क स्वतःच डोक वापरु लागली. फाईल्स नीट वाचल्यावर सही करणार नाही म्हणाली. Uhoh

आता हे आमरस भात हा काय प्रकार आहे?
त्याचा आणि पुनर्जन्म यांचा काय संबंध? >>>>>>>>> सुषमाताई, राजनन्दिनीला आमरसभात आवडतो म्हणून ईशालाही आवडतो. विसने पहिल्यान्दा हे कळल तेव्हा त्यालाही धक्का बसला होता. ईशाच स्लॅमबुक वाचल्यावर विसच काय होईल देव जाणे. Biggrin

फॅक्टरीमधले कामगार हे ईशासारखे चाळीमधून आलेले आहेत. ईशा त्यान्च्याशी ईमोशनल अटॅचमेन्ट करेल त्यात राजनन्दिनीच कनेक्शन कुठून आल? मला हे विस लॉजिक कळल नाही.

दुकानच्या मालकात एवढा चान्गुलपणा कुठून आला? कालपरवापर्यन्त धक्के मारणारा मालक आज निमकरान्ना पगाराबरोबर राजनन्दिनी साडीच्या प्रॉफिटमधल परसेन्टेज देणार म्हणे. विसने सान्गितल की काय तसे करायला?

ही मेडलची काय भानगड आहे? कोणी सविस्तर सांगणार का?
ते कळत नाहिये आणि त्यामुळे इथली पिसे नीट एंजॉय करता येत नाहीत.

कारवी, लोल.
वळकटी - वळ्यायुक्त कटी Happy

इशाच्या बाबांना "लाचार लाचार" खेळायला आवडतं. त्यांचं घरदार सगळं जाणार, ते आणि पुष्पा रस्यावर येणार आणी मग कोणीतरी धक्का मारून त्यांना अॅक्चुअल रस्त्यावर आणणार अशी त्यांची फॅन्टसी दिसते.
आजकाल त्यांना धक्का सुद्धा मारायला लागत नाही. फुंकर मारली तरी धक्का खाऊन पडल्यासारखे पडताय.

>>>इशाच्या बाबांना "लाचार लाचार" खेळायला आवडतं. त्यांचं घरदार सगळं जाणार, ते आणि पुष्पा रस्यावर येणार आणी मग कोणीतरी धक्का मारून त्यांना अॅक्चुअल रस्त्यावर आणणार अशी त्यांची फॅन्टसी दिसते.
जेव्हा कधी पुष्पा निमकर ईषा च्या पा ना पुश करतील तोच सुदिन Lol

बाळ आता पलटवार करणार म्हणजे आता बाळ आणि विक्या यांच्यात t20 चालू होणार.आता DRS घ्यायची वेळ येईल, तेव्हा नंदू येणार
तोपर्यंत केड्या छळणार

Pages