तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फारएण्ड Rofl

लव्ह यु म्हणा म्हणा म्हणा करणारी.. >>>>>>>>> नैतर काय. इथे विसलाच 'मला आय लव यू म्हण' म्हणून विचाराव लागतय. अस वाटतय की ईशा पुर्वीसारखी वागायला लागावी म्हणून विस व्हिलन झालाय. झेन्डेला उल्लू बनवतोय.

तिने कामगारांना कमी करायचे ठरवले, की त्याशिवाय राजनंदिनी साडी नफ्यात आणण्याचे सिक्रेट त्या फाइल मधे लिहून आणले की फक्त ते नफ्या-तोट्याचे आकडे स्वहस्ते लिहीले, काही पत्ता नाही. >>>>>>> आ, त्या फॅक्टरीच काम झाल सुद्दा? Uhoh

विस जयदीपला 'ईशा तुला जबरदस्तीने गोळया घ्यायला लावेल' बोलतो तेव्हा त्याने म्हणायला हव होत, ' पण दादा, माय फ्रेन्ड वहिनीने तर मला गोळया न घेण्याची जबरदस्ती केली आहे' का तेही विसरला? Uhoh

विस महाआळशी झालाय. सगळा स्ट्रेस बायकोवर टाकून स्वतः डाराडूर झोपतो काय, ऑफिसमध्ये आरामशीरपणे सोफ्यावर बसून राहतो काय. पोट वाढणार नाहीतर काय होणार.

हम आपके है कौन मध्ये रेणुका चं सुद्धा झालं नव्हतं. तिने दाखवण्यासाठी तरी सुरी हाती घेतली होती.. >>>>>>>> ++++++++११११११११ हि
विसला भोसकण्यासाठी सुद्दा सुरी हातात घेणार नाही. डाळीम्ब सुरी न वापरता कापणे हि एक कला आहे आणि ती ईबाळालाच जमते.

सिईओ च्या बायकोशी कोण अस बोलतं? तुम्हाला ती व्यक्ती आवडो किंवा न आवडो, पण ऑफिसचे काही किमान नियम तरी पाळाल कि नाही ? >>>>>>>>> अगदी अगदी निदान त्या सीईओने नाटक म्हणून का होईना स्टाफला सान्गायच ना, 'बाबान्नो, माझ्या बायकोशी नीट वागा, नाहीतरी कामावरुन काढून टाकेन.'

ती मायरा बॉसच्या बायकोला असं येता जाता कसं काय झाडु शकते . >>>>>>>>>> सहमत पण बॉसच्या बायकोला अक्कल नाहीये का, सर्वान्समोर नवर्याशी गुलूगुलू बोलतेय. ऑफिसमध्ये सेपरेट पॅसेज नाहिये का?

२०१७ व २०१८ ची फायनान्शियल रेकॉर्ड्स >>>>>> एका रेकॉर्ड्सची थैली विसच्या पलन्गावर होती. Lol

चाळीत विसला खाली झोपायचं होतं तरी हट्टाने कॉटवर पाठवलं, स्वयंपाक नको करू म्हटलं तरी मीच करणार, विक्या म्हणतोय झोप तर तिथेही हट्टीपणा मला आत्ताच रेकॉर्ड बघायचेत.
ती आता प्रेयसी नसून बायको झाली आहे तेव्हा... चालायचेच... होईल विस ला ही हळूहळू सवय. >>>>>>> नाहीतरी त्याला तरी कुठे तिच्यात इन्टरेस्ट आहे म्हणा. आपल काम साधून घेण्यासाठी तिच्याशी खोट खोट रॉमेन्टिक वागतोय झाल.

विसच खर रुप कळल्यावर ईशा त्याच सुरीने त्याला भोसकेल का? नाही, कारण ईबाळ सुसन्सकारी, गुणी, आदर्श वै वै आहे ना.>>>> हो ती वाल्याचा वाल्मिकी करणार असे दाखवतील. >>>>>>>>>> +++++++++२२२२२२२२२

सरंजामे कंपनी मध्ये झेंडें ची नक्की पोस्ट काय आहे? पोहोच तर वरपर्यंत दिसतेच आहे... पण कधी नेमके त्यांच्या पोस्ट चा ऊल्लेख झालेला आठवत नाही.
anyone?

अलिखित्/अघोषीत अशी पोस्ट आहे--- विसचा उजवा हात. पण कधी कधी विस डाव्या हातचे उजव्या हातालाही कळू देत नाही असे दिसते.

धन्यवाद लोकहो. कालचा एपिसोड बघायला जाम मजा आली Happy

फक्त एक फारएंडच या सिरीयल ला सिरीज म्हणतात....!!!! सिक्वेंस अँड सिरीज मधल्या सारखं...!! >>> आंबट गोड, नोटेड Happy

झेण्डे सिक्युरिटी हेड वाटायचा सुरूवातीला. मग त्याने बरीच प्रगती केली असावी. शाळेत व्हाइस प्रिन्सिपॉल लोक विद्यार्थ्यांना दरडावत फिरत असतात तसे ऑफिस मधे अनेकदा लोकांना कामाला लावत फिरतो तो.

नूडल्स खाऊन ७८.६ % Lol काहीही बोलतो विस
इबाबा आता काही काम-धंदा करत नाहीत का?

एक निरिक्षण असं की जेव्हा चाळीतला सीन दाखवायचाय ईआईबाबांचा तेव्हा कायम असाच सुरू होतो
ईआई पाठमोरी किचनमधे चहा, पोळीचा लाडू, पोहे असं काहीतरी बनवता बनवता निमकरांशी बोलते कॅमेरा ऑन निमकर नेहेमी शर्टाचे वरचे बटण लावता लावता डायलॉग म्हणतात.

Lol हे सही आहे. आता चाळ सीन आला की लक्षात राहील.

ते कर्जत हाउस असेच. फ्रण्ट व्ह्यू व दिवस असला की पक्ष्यांचे आवाज, रात्र असली की रातकिडे. ती एकच क्लिप वाजवतात बहुधा.

>>>विसला भोसकण्यासाठी सुद्दा सुरी हातात घेणार नाही.
एंटर द ड्रॅगन मधला कोथळा काढणारा ब्रुस-ली आठवला Lol
फा, सॉलिड हाणलाय Rofl

आजचा भाग झेपलाच नाही. ईषा जुनी बाडं घेऊन मागचा इतिहास चाळत होती ना? मग त्यावर हे आजचे प्रेझेंटेशन होते का? कारण ती घरी येऊन नीट रिपोर्ट बनवला नाही म्हणून परत तीच जुनीच कागदपत्रं चाळत होती.
चोवीस तास एवढ्या मोठया घराण्याची सून.... पण एकच ड्रेस घालते, आपली जानू तरी घरी आल्यावर गाऊन घालायची.

ते कर्जत हाउस असेच. फ्रण्ट व्ह्यू व दिवस असला की पक्ष्यांचे आवाज, रात्र असली की रातकिडे. ती एकच क्लिप वाजवतात बहुधा.>> ट्रॅफिक सर्कलमध्ये इतर वाहनांनबरोबर बस वळवतांना दाखवली की विकूचे ऑफिस आणि नुसती काचेची इमारत दाखवली की मिटींग (काॅन्फरंस) रूम. एक मुलगा आणि एक मुलगी चाळीत जातांना दाखवले की ईआई आणि ईबाबांचा सीन असे दाखवतात.

रूपालीला आणि तिच्या मामेभावाला ईषाने आपल्या ऑफिसमध्ये नोकरी द्यावी म्हणजे तिकडे वीस, मायरा आणि झेंडे, इकडे ईषा(शा), रूपाली आणि बिपीनराव.

ट्रॅफिक सर्कलमध्ये इतर वाहनांनबरोबर बस वळवतांना दाखवली की विकूचे ऑफिस आणि नुसती काचेची इमारत दाखवली की मिटींग (काॅन्फरंस) रूम. >>> Happy हो या दोन्हीचा सिग्निफिकंस मला समजला नव्हता इतके दिवस, नक्की केव्हा कोणते असते Happy

जेव्हा चाळीतला सीन दाखवायचाय ईआईबाबांचा तेव्हा कायम असाच सुरू होतो
ईआई पाठमोरी किचनमधे चहा, पोळीचा लाडू, पोहे असं काहीतरी बनवता बनवता निमकरांशी बोलते कॅमेरा ऑन निमकर नेहेमी शर्टाचे वरचे बटण लावता लावता डायलॉग म्हणतात.>>आणि ते चाळीसाठी वाजवायचं वेगळं म्युझीक पण असतं मागे अष्टसात्विक भाव जागे करणारं , निमकर देवाची पूजा पण करताना दाखवतात बरेचदा. त्यांची ती डब्याची निळी पिशवी आठवली परवा. आता दुकानात जात नाहीत तर धुतली असेल का ती?

एक तांत्रिक शंका.. डिग्रीचा रिझल्ट असा भलत्याकडे कसा काय दिला.. की authority letter ईशाने आधीच दिले हे इतर अनेक अद्भुत गृहीतकांपैकी एक..
आपल्या कडील आईबाबांना आणि नातेवाईकांना आपल्यापेक्षाही रिझल्ट (डिग्री) बद्दल उत्कंठा व जाहीर कधी होणार याबद्दल माहिती असते.. इथे पन्नास च्या दशकातील आईवडिलांनी अनभिज्ञ असावे तसे ईशाच्या आईबाबांचे वागणे आहे..
एकच गोष्ट प्रकर्षाने कधी नव्हे ते वास्तविक दाखवली काल.. ईशाला (लायकीपेक्षा) खूपच गुण मिळाले हे आईबाबांनी स्पष्ट बोलून दाखवले.. हेच ते वास्तववादाशी नाते जोडण्याचे दिग्दर्शकीय कसब..

कालचं वेळेचे गणित काहीतरी गंडलं होते का मलाच असं वाटतंय. काल रात्रि इशा पुन्हा फाइल्स घेऊन अभ्यास करत बसली होती आणि पुध्च्या सीनमध्ये पुन्हा विकि आणि झेंडे बोलत असताना विकीचा तोच ड्रेस दिसला. कालच्या एडिटींग मधे काहितरि गडबड वाटलि.

रिझल्ट लागल्यानंतर इशाला तो सांगायची काहिच घाई नाहि.

शाळेत असताना अशा प्रकारे पालक रिजल्ट घेऊन येतात आणि आमचं पोरगं पास झालं असे सांगून पेढे वाटतात ... अपेक्षेपेक्षा जास्तच गुण मिळवले बरं का.. असेही सांगतात.... नक्की ईशाचा कॉलेज च्या परीक्षेचा निकाल लागला आहे की दहावी बोर्डाचा
Biggrin Biggrin

<रिझल्ट लागल्यानंतर इशाला तो सांगायची काहिच घाई नाहि.>
ती अशीही लेट च असते. एखादा प्रसंग घडला की लगेच प्रतिक्रिया नाही.

<काहीतरी ट्विस्ट येतो> . सुभा जोमात. सगळे प्रेक्षक "बापरे! Finally काहीतरी!! सरसावून बसतात.
बाई ढिम्मच.

तिची script ka screenplay asa asawa-

म्हणजे बाई स्लोमो मध्ये जिना उतरणार .. जिन्याची दांडी धरून... चेहेऱ्यावर "मैं कौन हुं?" भाव...

"बा बा A म्ह णा ले." (मैं कौन हुं भाव)
"प ण स र त र B म्ह ण ता य त. " (ईशा मान डोलव)
"न क्की का य को डं अ से ल? " (मैं काहा हुं?)
"त्यांना परत विचारावं का? " (Smell the *art)

Finally what she does is :
" जयदीप भाऊजिंशी बोलूया "

इकडे farend, अमा वगैरे बिचारे Uhoh
चला उघडा मायबोली..

Finally what she does is :
" जयदीप भाऊजिंशी बोलूया >>> मोस्ट युसलेस लाइन ऑफ अ‍ॅक्षन इन एनि इव्हेंट.

मध्यंतरी ते ओठ मुडपून स्वतःशीच सुखी असल्यासारखे हसणे. म्हणजे खळ्या पडतात बहुतेक. विथ झीरो इफेक्ट.
घरी असल्यास लहान मुले फिश टॅक मध्ये डोकावून बघतात ए तो बघ फिश हलतोय तसे बेडच्या हेडर वरून सर्झोपलेत म्हणून कृतकृत्य चेहरा करून बघायचे.

आयर्न मॅनचा हॅपी म्हणून सिक्युरिटी हेड आहे ज्याला आयर्न मॅनची सर्व अंडिपिल्ली माहीत अस्तात. कधी कोणत्या बाईवर लाइन मारली वगैरे.
पेपरच कशी चांगली वगैरे. त्यावर झेंडेपात्र बेतले असावे. सॅडली विक्या इज नो आयर्न मॅन. विथ झीरो चार्म इफ यू आस्क मी. लोद्या आता
थकल्यावाणी डेस्क पाशी बसून छद्मी हसतो नाहीतर घरी जाउन झोपतो. ती सीक्रेट रूम पण सॉन्याने आवाज काढल्यापासून उघडलेली नाही.

रूम मध्ये काय असेल लॉटरी खेळ परत खेळू चला.

१) जिम इक्विपमेंट.
२) फोनचा चार्जर
३) हस्तर व सोन्याच्या मोहरा
४) दुसर्‍या विश्वात जाण्याचे पोर्टल.
५) राजनंदिनीची बॉडी.
६) दादा साहेब जिवंत = रान प्लान यशस्वी झाला नाहीच तर विल बदलून घ्यायला.
७) वडापावची गाडी आउट ऑफ नॉस्टाल्जिआ
८) पुण्यास पलायन करायचे गुप्त भुयार
९) हेलिकोप्टर चे स्पेअर पार्ट्स.
१०) माबोचा सर्व र.

"सर मला काही दिवस तरी घरात काम करण्याची परमिशन द्या ना!" काय लाडिक मागणी. हिच्यापुढे ७० च्या दशकातील स्त्रिया म्हणजे फारच मॉडर्न वाटतील. कारण ही ज्या ऑफिसात नवराच बॉस आहे, त्याच ऑफिसचे काम घरी करण्याची परवानगी त्याच्याच कडून मागत आहे. यात चुकीच्या गोष्टी शोधायला जाण्याच्या भानगडीत पडू नये. There are so many things wrong about that.

ऑफिसमधले मेडल वाले सीन्स त्याहून भयंकर. काल मारलेल्या जोक पेक्षा कथानक जास्त विनोदी असेल अशी शंका काल आली नव्हती. ईशाच्या कामात म्हणे चुका होत्या. त्या कोणीतरी परस्पर दुरूस्त केल्या. काय दुरूस्त केले? तर मूळच्या मजकुराभोवती छान बॉर्डर वगैरे काढली. बास. त्यावर मेडल देउन झाले. लोकांना "किती छान काम केले आहे बघा" सांगून झाले. अरे पण त्या कारखान्याचे काय?

सगळ्यात गंमत म्हणजे आत्तापर्यंत दाखवलेली कागदपत्रे व त्यातील ते नंबर्स खरे धरले तर राजनंदिनी कंपनी तोट्यात नाही. फायद्यातच आहे!

काय दुरूस्त केले? तर मूळच्या मजकुराभोवती छान बॉर्डर वगैरे काढली. बास. >>>
दुसरीत असताना आमच्या बाई घरचा अभ्यास असा तपासायच्या

मला तर ते स्केच पेन ने रंगविलेल्या फाईल्स चे काही कळलेच नाही !
त्या काय विक्या ने करेक्ट केल्या होत्या? .. अशा?
आणि त्या बद्दल बेस्ट एंप्लॉयी अ‍ॅवार्ड...? विक्रांत समोर ती अगदी एव्हढीशी दिसत होती काल......!!

Pages