तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जयदीपच्या गोळ्या सद्ध्या केड्या घेतोय बहुतेक . Wink
वाडकर अन् परांजपैन्ना कामं करा असं झेंड्यानी सुनावलं ते कसलं फनी वाटलं. अरे तुमचे मोस्ट शिणिअर मॅणेजर ना ते?

वाडकर अन् परांजपैन्ना कामं करा असं झेंड्यानी सुनावलं ते कसलं फनी वाटलं. अरे तुमचे मोस्ट शिणिअर मॅणेजर ना ते? >>> हे लोक ऑफिस ऑफिस खेळताना कोणावर तरी राज्य येतं. मग तो सर्वांना हुकूम सोडतो.

आज विक्याचा डाएट कंट्रोल पुन्हा चर्चेत आहे.

सर शांत झोपलेले आहेत. त्यांचा स्ट्रेस कमी झाला आहे. ईशा हसून ५-१० मिनीटे नुसतीच त्यांच्याकडे बघत आहे, व जागरणाबद्दल लाडिक तक्रार करत आहे. खाली येउन "आज सर बहुधा उशीरा उठतील" असे सांगत आहे. असे काय झाले असेल बरे रात्री?

बरोब्बर ओळखलेत! ईशाने राजनंदिनी साडी विभागाच्या सर्व फाइल्स चा फडशा पाडला असावा Wink

२०१७ व २०१८ ची फायनान्शियल रेकॉर्ड्स "हस्तलिखीते" स्वरूपात आहेत. लेटर हेड नाही, कॉम्प्युटर प्रिण्ट तर सोडाच, टाइपरायटरने टाइप केलेलेही नाही.

त्यात आर्थिक क्षेत्रात क्रांती करणारे एक पान दिसले. एकाच डीलर अकाउंट कडून त्यांना एकाच वर्षी प्रॉफिट, आणि लॉस दोन्ही झाले आहेत!

तिकडे हापिसात सर अजून आलेले नाहीत म्हणजे नक्की लेट झालेत इतकाच अर्थ काढला जात आहे. अरे लेको. तो सीईओ आहे. त्याला आधीच मीटिंग्ज वगैरे असू शकतात. कारखाने, डीलर्स, ग्राहक, इन्वेस्टर्स कोणाकडेही गेला असेल तो. तुम्हाला सांगून जाणार आहे काय? पण यांच्या सिरीज मधले सीईओज इतकी कामे करतानाच कधी दाखवलेले नाहीत, तर यांना तरी कसे कळणार.

विक्याचा सगळा ईशा-राजनंदिनी प्लॅन भर कॉरिडॉर मधे झेंडे बोलून दाखवतोय. खुद्द त्यानेच ५ मिनीटांपूर्वी दुसर्‍यांचे बोलणे लपून ऐकलेले असताना. यांना व्हिलन सोडा, साइड व्हिलन सुद्धा कोणी करणार नाही.

अरे तो एफएम थोड्या वेळापूर्वी सर्वांना कॉफी देउन गप्पा वगैरे मारून गेला ना? पुन्हा काय गुड मॉर्निंग करतोय सर्वांना. काल तर "ईशा ताई सरंजामे, तुमच्यासाठी कायपन" चा फ्लेक्स लावायचा बाकी होता. आज लगेच सकाळी तो ओळख ही देत नाहीये? त्याला शंखपुष्पी च्या डबल मात्रेची गरज दिसतेय.

आणि सर झोपलेत म्हणून त्यांना उठवले नाही वगैरे ची जाहीर चर्चा सुरू आहे हॉलवे मधे. कायच्या काय सुरू आहे.

ईशाने म्हणे त्या फाइल मधे "खूप चांगले काम केले आहे". पाच मिनीटे कौतुक चालले होते. म्हणजे काय तिने कामगारांना कमी करायचे ठरवले, की त्याशिवाय राजनंदिनी साडी नफ्यात आणण्याचे सिक्रेट त्या फाइल मधे लिहून आणले की फक्त ते नफ्या-तोट्याचे आकडे स्वहस्ते लिहीले, काही पत्ता नाही. बहुधा पहिला दिवस म्हणून तिला कारखान्याचे चित्र काढून दिले होते रंगवून आणायला आणि तिने ते काम सुंदर केले.

यांच्या खाजगी गप्पा आजूबाजूचे ज्यु चम्या/चमी ऐकतात ते ठीक आहे. मायराला उद्योग नाही का.

सर्वात महान प्रकार हा आहे की इतके दिवस विक्याचे ऑफिसातील लोकांशी जसे वागणे होते, त्यापेक्षा आता बळंच ते खुनशी वगैरे झाले आहे. कथेत काय बदल झाला आहे नक्की? काहीच नाही. त्याचा खुनशी (आणि निरर्थक) प्लॅन फक्त प्रेक्षकांना कळाला आहे. त्याचे तेथील वागणे बदलायचे काहीच कारण सिरीज मधे नाही. उलट ऑफिस मधल्या लोकांनाच वाटायला हवे की लग्न झाल्यावर हा बायकोशी पटत नसल्यासारखा का वागतोय ऑफिसमधे Happy

एकाच डीलर अकाउंट कडून त्यांना एकाच वर्षी प्रॉफिट, आणि लॉस दोन्ही झाले आहेत! >>> Biggrin

पहिला दिवस म्हणून तिला कारखान्याचे चित्र काढून दिले होते रंगवून आणायला आणि तिने ते काम सुंदर केले. >>> याला तर बेक्कार हसले Rofl Rofl

फारेंड.. Biggrin
त्याचा खुनशी (आणि निरर्थक) प्लॅन फक्त प्रेक्षकांना कळाला आहे. त्याचे तेथील वागणे बदलायचे काहीच कारण सिरीज मधे नाही......
इथे...आपण नेहमी जसे म्हणतो..की जेव्हा प्रेक्षकांना दिसते तेव्हाच सिरीज मधल्या पात्रांना दिसते... त्याच लाईन्स वर असे म्हणता येईल की जेव्हा प्रेक्षकांना कळते तेव्हाच सिरिज मधल्या पात्रांना कळते.... Happy ....
ईशाने म्हणे त्या फाइल मधे "खूप चांगले काम केले आहे". -- हे अगदीच लोल!! काय काम करायचे असते फाईलीं चा गठ्ठा उघडून...? पाचवीतल्या मुलीने गृहपाठ केल्या सारखे?
कैच्या कैच आहे केड्याचे सामन्य ज्ञान!

चित्र काढून दिले होते रंगवून आणायला आणि तिने ते काम सुंदर केले>>>>साडीचा पदर टाईप रांगोळी काढतात, तशी तिने राजनंदिनी साडीच्या पदराची रांगोळी काढायला पाहिजे

सुबोध खूपच झालाय सद्ध्या. असा अस्वलासारखा चालतो. परवा तो केबिनमधे चालत चालत येताना दाखवला तेव्हा बराच वेळ त्याचा कोट व मागोमाग पोट येत होतं. बर्याच वेळा नंतर सुबोध आल्यासारखं वाटलं.

अजून एक..!! फक्त एक फारएंडच या सिरीयल ला सिरीज म्हणतात....!!!! सिक्वेंस अँड सिरीज मधल्या सारखं...!!
Happy
मी तर प्रतिसादांसाठीच बघते मालिका......!
अरे...!! इतक्या 'डायमंड कट' लॉजिक ने तर खर्‍या कंपन्या ही चालत नसतील... ही तर 'सिरीजच' आहे!!
Happy

<ऑफिस मध्ये सगळे एकाच ठिकाणी काय घोटाळत असतात, आणि दिवसागणिक यांच्या लेवल्स बदलतात, कोणी कोणाला 'कामं करा' हे सुनावायचं ते ही बदलतं >>> लोल एक्झॅक्टली! सर सोडून इतर सर्वांना कामे फर्मावण्याची लेव्हल असलेली मायरा मधे एकदा झेंडेकडून सूचना लिहून घेत होती.>
Zee agile ahe watata te Lol

मला सांगा, ईशासाठी झोकात केबिन केली होती ना? मग ती अशी बाहेर इतर स्टाफ बरोबर बसून का काम करत होती ? आणि सिईओ च्या बायकोशी कोण अस बोलतं? तुम्हाला ती व्यक्ती आवडो किंवा न आवडो, पण ऑफिसचे काही किमान नियम तरी पाळाल कि नाही ?

ईशासाठी झोकात केबिन केली होती ना? मग ती अशी बाहेर इतर स्टाफ बरोबर बसून का काम करत होती ? >>>
त्याग त्याग खेळते ना ती

फारएण्ड, तुफान फटकेबाजी.. Lol पार स्टेडियमच्या बाहेर गेला बॉल

सुभा सायको / व्हिलन झाल्याच्या एपि नन्तर येवढं फुसकं लॉजिक आणि सिक्वेन्स आहेत की बघायची हिंमतच होत नाहिये..
येता जाता दिसली तर ईशाच्या चेहर्यावरचे अतीअतीअती सात्विक भाव बघुन पळुनच गेले.. हिच का ती सोकॉल्ड अल्लड दाखवलेली मुलगी .. सराना लग्नाआधी मिठ्या मारणारी.. लव्ह यु म्हणा म्हणा म्हणा करणारी.. लग्न झालं की एकदम इस्त्री केल्यासारखी सरळ झालिये.. आणि ती मायरा बॉसच्या बायकोला असं येता जाता कसं काय झाडु शकते ... वरचे सगळे प्रतिसाद तुफान..फारेन्ड यांचे प्रतिसाद हहपुवा
प्रतिसादांकडुन प्रेरणा घेउन परत बघायला सुरु करणार.. Lol

बाकी या सिरिअल मधलं ऑफिस्च एकुण वातावरण किंवा बट्याबोळ, फारेन्ड यान्चा फेव्हरिट असल्याने.. ते एकदम फॉर्म मधे आहेत ..

मला तर वाटायला लागलंय की फारेंडच्या प्रतिभेला धुमारे फुटावेत व बहर यावा ह्यासाठीच तुपारे चाललीये. केड्या आणि सुबोध ह्याचसाठी सगळा पांचटपणा करत असतात. एपिसोड झाला रे झाला की आख्खी तुपारे टीम, फारेंडची तुफानी फटकेबाजी बघायला धावत धावत येऊन टीव्हीसमोर कोंडाळं करून बसत असणार. झीपेक्षा इथला ट्यार्पी जास्त होतोय. Happy
यंदाच्या वर्षीपासून झी नं बेस्ट व्ह्युअर/ बेस्ट सोलाणं अवाॅर्ड चालू करायचा विचार केला तर चहयेद्या आणि फा यांच्यात टसल असेल.

कुणी पाहिले का काल सकाळी नाश्ता या संवादातील घोळ? ईशा किचनमधे येण्यापूर्वीच इडल्या तयार आहेत.. फळं फ्रीजमध्ये ठेवून दिली आहेत.. तरीही सुभा आल्यावर आईसाहेब त्याला ईशाने नाश्ता बनवल्याचं कौतुकाने सांगतात.
एवढं कौतुक तर हम आपके है कौन मध्ये रेणुका चं सुद्धा झालं नव्हतं. तिने दाखवण्यासाठी तरी सुरी हाती घेतली होती..

बरं ती फुलावर फुलं कधी बुआ आपटणार ????
महत्वाकांक्षी ईशाई आता "बाळ आल्यावर ईशाने...." पर्यत पोचलीय !!

रजनंदिनीला बाळ झाले होते का? नाही तर इषाला पण नाही होउ देणार. विक्याचे माशी टू माशी कॉपी लॉजिक्स आहे.

विक्याचे माशी टू माशी कॉपी लॉजिक्स आहे. >>> हो ना तो खोटे मेडिकल रिपोर्ट्स ही आणेल .
मग आईसाहेबांचा आण्खि विश्वास बसेल ... रा.न. आणि ईशाचा मेडिकल प्रोब्लेम पण सेम आहे म्हणून.

Pages