तुम्ही नावे ठेवता का?

Submitted by रश्मी. on 27 April, 2015 - 05:53

तुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणा, शालेय जीवनात म्हणा किन्वा कॉलेज मध्ये म्हणा, कोणाला नावे ठेवली आहेत का? नाव म्हणजे फिशपॉन्ड नव्हे, तर त्या मुलीच्या/ मुलाच्या/ शिक्षकान्च्या वागणूकीमुळे त्याना नावे ठेवली का कधी?

शाळेचे मला फारसे लक्षात नाही, पण कॉलेजमध्ये बहार होती. आमच्या कॉलेजमध्ये २ जिगरी दोस्त होते. त्याना आमच्या गृपने बरीच नावे ठेवली होती. राम-श्याम, जाड्या-रड्या ( कारण त्यातला एक खूप जाड व दुसरा एकदम काठीच वाटायचा), लॉरेल-हार्डी. माझी युपीची मैत्रिण एकदा त्याना चकला-बेलन म्हणाली. माझी हसून वाट लागली.
कॉलेजमध्येच २ सरान्चे आपाआपसात पटत नव्हते, त्याना सगळे बोका-ऊन्दीर म्हणायचे. तर यातल्या बुटक्या सराना मुन्गेरीलाल म्हणायचे.:फिदी:

आमच्या कॉलनीत दोन खोडकर बन्धू आहेत. त्याना आम्ही अहीरावण-महीरावण म्हणतो. कारण सगळ्याना भयानक त्रास देतात. माझ्या मैत्रिणीची मावशी नोकरीनिमीत्त काही दिवस त्यान्च्या घरी रहात होती. त्या दोघी बहिणी बाहेर जायला निघाल्या की कॉलनीतले त्याना सीता और गीता म्हणायचे कारण बर्‍यापैकी साम्य होते दोघी बहिणीत.

आठवेल तसे लिहीन, तुम्हाला कोणाला आठवते का असे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही ११-१२ ला असताना आमच्या वर्गात एक मुलगा होता. तो खूप गोरा होता आणि मुलीसारखा दिसायचा तर त्याच नाव 'लिना' ठेवलं होत.
इंजिनीरिंग कॉलेजचा एक मुलगा कायम होमसायंस डिपार्टमेंट समोर उभा असायचा म्हणून तो 'ड्युटी '. आमच्या कलासच्या CR ला 'दादा'.
कॉलेजचे lovebirds कायम 'भैय्या-भाभी'.

काय मस्त धागा काढलाय.हसुन वाट लागली.आम्ही लहान असताना आजोळच्या घराशेजारी राहणारा माणुस जाम तापट होता म्हणून त्याचं नाव एमपी.....mad person चा शोर्ट फॉर्म.आजीकडे स्टोव्ह रिपेअर करुन देणारा यायचा तो ताई,ताई म्हणायचा बोलतना म्हणून त्याचं नावच ताईताईवाला पडलं.आईच्या लहानपणी त्यांच्या शेजारी एक अशक्य उभ्या चेहर्यची बाई होती तिचं नाव आजोबांनी 'काजुचीबी'असं केलं होतं.

कॉलेजमध्ये माझ्या हसण्यावरुन (सुंदर Happy ) ई.....स्माईल (त्यावेळच्या एका जाहिराती वरुन) असे नाव पाडलेले. पण त्याचा अपभ्रंश होऊन ईस्माईल असे नाव पडलेले. ते नाव नेमके क्लास मधील मुलीच्या वडीलांचे होते. मग त्यांच्या ग्रुप ने याचा सोयीस्कर अर्थ काढलेला.

आम्च्या एका कॉलेजच्या सरांच्या नावाच इनिशिअल s a p होतं .. सतिश ए पाटिल ..सगळे त्याना साप सर म्हणायचे.. ते येवढं रुळलं होत की सगळे आपोआप साप सरच म्हणायचे.. एका मैत्रिणीला माहितीच नव्हत की त्यांच नाव पाटिल आहे.. दुसर्या एका सरांनी तिला पुढ्च लेक्चर कुठलं आहे विचारल्यावर ती म्हणाली साप सरांच.. ते विचारणारे सर कडक होते पण त्यानी तिला असं म्हणु नये असं काहिसं म्हंटल आणि जाउ दिलं

दोन अग दी सारख्या दिसणार्या मैत्रीणी होत्या त्याना आम्ही "तूर डाळ - मूग डाळ" म्हणायचो..एकाला उगाचच "कच्चा निम्बूडा" म्हणायचो..
एक भरभक्कम देह आणि व्यक्तीमत्व असलेल्या ( खडूस) बाईना "छगन भूजबळ" म्हणायचो..

आमच्या जुन्या office मध्ये एक सहकारी होता जो कोणत्याही विषयावर स्वताःच ज्ञान पाजळायचा.... आम्हि त्याला ज्ञानेश्वर म्हनायचो...

आमच्या जुन्या office मध्ये एक सहकारी होता जो कोणत्याही विषयावर स्वताःच ज्ञान पाजळायचा.... आम्हि त्याला ज्ञानेश्वर म्हनायचो...

एक सर रंगाने काळे होते, पण कायम पांढरेशुभ्र कपडे घालायचे,
त्यांना 'दुधुकाला' म्हणायचो...

आमच्या बॉसचं नाव डुक्कर खाताना डुकरासारखा खातो , डुकरासारखा फुगलाय म्हणुन, एका कलिगचं नाव बाळ्या, सांगकाम्या बाळु आहे जितक सांगितलं तितकच आणि तसच करणार अजिबात डोकं चालवाय्चं नाही (जितक आहे तितकही) डोक्टरेट असुनही १००% स्पुन फिडींग लागतं.

मस्त धागा रिमाताई,सगळे प्रतिसाद पण धमाल आहेत.
माझ्या शाळेत एक शिक्षक होते. ते मला विनाकारण लक्ष्य करत असत.त्यांना मी (माझ्यापुरते) 'एकशिंगी गेंडा'असे नाव ठेवले होते. (त्यावेळी माझ्या एका वहीवर एकशिंगी गेंड्याचे चित्र होते त्यावरून सुचलेले) दुसऱ्या एका सरांना वर्गातील मुले बोका म्हणत आणि त्यांच्या तासाच्या आधी आम्ही सर्व म्यांव म्यांव असा आवाज काढायचो.एका madam च्या आडनावावरून त्यांना हत्ती नाव ठेवलेले.त्या हिंदी शिकवत.दहावीत आम्हाला कबरी बिल्लीचा पहिलाच धडा होता.त्यांनी तो एक धडा शिकवायला एक महिना काढला.त्यावरून त्यांना कबरी बिल्ली असे नाव ठेवले. कॉलेजमध्ये एका प्राध्यापकांना टुबुक नाव होते.हे झाले शिक्षकांबद्दल.
मी माझ्या वैयक्तिक शत्रूंना सुचतील तशी नावे देते.त्यात सापटोळी, सोळावा लुई,डुक्कर, जोरू का गुलाम,रक्तबीज,शुंभ-निशुंभ ही काही नावे आहेत

माझ्या एका मित्राचं आडनाव घरटे आहे. त्याला आम्ही nestle म्हणतो... आणखी एकाचं नाव आहे रष्मिन आहे, ज्याला सगळे dustbin म्हणतात...

शाळेत असताना सुनिल जोशी नावाचे सर होते. त्यांच्या साईनमुळे "सुजो" आम्ही त्यांना बोलायचो.
गायनाच्या मॅडमला त्यांच्या गोड आवाजामुळे "कोकीळा".
सायन्स शिकवायला एक शिंदे मॅडम होत्या. शिकवताना शुक शुक करायची त्यांना सवय होती.त्यांना "शिट्टी" बोलायचो.
11th-12th मध्ये असताना मराठी शिकवायला एक मॅडम होत्या. कुठूनही येताना दिसल्या कि "फ्लॉवरपॉट" सारख्या दिसायच्या. (कशामुळे ते विचारु नका Proud )
अजुनही भरपुर जणांची बारशी केलीयेत. पण त्यांची नाव लक्षात नाहीयेत आत्ता.

सध्या आमच्याकडे कोरोना नाव हिट आहे.
छोटा कोरोना आणि मोठा कोरोना असे दोघांचे नामकरण झाले आहे. ज्यात सर्वात जास्त किडे आहेत त्याला छोटा कोरोना हे नाव दिले आहे. जेवढा छोटा तेवढा घातक म्हणून

माझी आई नावे ठेवण्यासाठी जाम पटाईत होती इतकी परफेक्ट नावे तिला कशी सुचायची हेच कळायचं नाही
आमच्या समोर एक बाई होती तिला बोलताना झुलायची सवय होती तिचे नाव पिंगा.
तिच्याकडे जेवायला बोलावलं होते तिने काय घालू ( वाढू) म्हणून विचारले आईने बिनधास्त सांगितले आता पिंगा घाल.
आमची हसून हसून पुरेवाट झाली

माझी मॅनेजर आहे तिला सगळ्या गोष्टी लगेच हव्या असतात. मी आणि माझी कलिग तिला जयकांत शिखरे म्हणतो (अभी के अभी) Happy

कॉलेज मध्ये एक मॅडम होत्या त्यांना आम्ही कॅरम बोर्ड म्हणायचो.
एक सर होते त्यांना वापिलिपी नाव ठेवले होते...

आमचा एक कलिग आहे, त्याला सगळे कंपनीचा थरूर म्हणतात. संदर्भ लक्षात आला असेलच Wink

आणि प्लानिंगला एक बंदा आहे जो मला सगळ्यातल सगळ समजत अशा अविर्भावात असतो त्याला “भगवान”

उर्दू मिडीयम मधून शिकलेला एक मास्तर, लॅबच्या प्लॅटफॉर्मला पिलॅटफाम म्हणायचं, त्याच नाव पिलॅटफाममिया..

९वीत गणिताच्या मॅडमवर एक ३ वर्षं नववीतच बसलेलं पोरगं (राव्ह्ल्या) फुल फिदा होतं.. त्या मॅडमच्या अंतरवस्त्रावरची फुले शोधून काढली होती या महाशयांनी, त्या मॅडमचं नाव फुलवाली ठेवलेलं.. आधी त्याने नाव ठेवलं, जेव्हा ते रुळलं तेव्हा कारण सांगितलं..

डिग्रीला एक मास्तर जोड्या जुळवून द्यायची कामे करायचा, आम्ही पडलो स्टड, आणि नडायचो पण खूप.. म्हणून त्याचं नाव ठेवलं मदन.. (त्याने जुळवलेली एकही जोडी वर्षभर पण टिकत नसे ही गोष्ट वेगळी)

डिग्रीलाच एक मास्तर आमच्या हॉस्टेलवर मुक्कामाला होता काही दिवस.. आम्ही रॅगिंग घेऊ नये ज्युनियरची म्हणून, पण यात त्याचाच बळी गेला. किस्सा असा की मास्तरचं लग्न झालेलं, तेही लव्ह मॅरेज, पण त्याआधी मास्तर आमच्या एका सिनियर वर लै लाईन मारायचा. लग्नानंतर पुन्हा chatting चालू. ती मुलगी याला पद्धतशीर राउंडमध्ये घ्यायची, आणि हा सॉरी सॉरी करत रहायचा. नेमका हॉस्टेलवर असताना आम्ही याला मोकळा सोडत नसू, रात्री ३ पर्यंत गप्पा मारणे, कॅरम व बुद्धीबळ वगैरे चालायचं, एकदा तर कोंडला पण होतं याला.. तर हा चॅट करताना सापडला आम्हाला, नेमका "sorry, first nhi karunga" असा मेसेज.. मग नाव ठेवलं चाट्या. आधी बायल्या होतं.

शाळेत भूगोल मास्तर एकदा चेन उघडी ठेवून आले वर्गात, त्यांचं नाव मुलींनी ठेवलेलं, पोस्ट ऑफिस. आम्ही उंट म्हणायचो.

मी दहावीत असताना आम्हाला भूगोल शिकवायला एक शिक्षक होते. नाव "परबत". पण ते जरा डोळ्याने तिराळे. वर्गात कुणालाच कळत नव्हते त्यांनी नेमकं कुणाला प्रश्न विचारलाय ते.

बारावीला एक शिक्षक होते. नाव आठवत नाही. पण त्यांना आम्ही हिमेश भाई म्हणायचो. कारण ते नेहमीच बेसबॉल कॅप घालूनच यायचे. त्यांची एखाद्याला बावळट म्हणायची खूप विशेष पद्धत. ब वर त्यांचा विशेष जोर असायचा. म्हणजे "ब्बावळ ट".

Pages