तुम्ही नावे ठेवता का?

Submitted by रश्मी. on 27 April, 2015 - 05:53

तुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणा, शालेय जीवनात म्हणा किन्वा कॉलेज मध्ये म्हणा, कोणाला नावे ठेवली आहेत का? नाव म्हणजे फिशपॉन्ड नव्हे, तर त्या मुलीच्या/ मुलाच्या/ शिक्षकान्च्या वागणूकीमुळे त्याना नावे ठेवली का कधी?

शाळेचे मला फारसे लक्षात नाही, पण कॉलेजमध्ये बहार होती. आमच्या कॉलेजमध्ये २ जिगरी दोस्त होते. त्याना आमच्या गृपने बरीच नावे ठेवली होती. राम-श्याम, जाड्या-रड्या ( कारण त्यातला एक खूप जाड व दुसरा एकदम काठीच वाटायचा), लॉरेल-हार्डी. माझी युपीची मैत्रिण एकदा त्याना चकला-बेलन म्हणाली. माझी हसून वाट लागली.
कॉलेजमध्येच २ सरान्चे आपाआपसात पटत नव्हते, त्याना सगळे बोका-ऊन्दीर म्हणायचे. तर यातल्या बुटक्या सराना मुन्गेरीलाल म्हणायचे.:फिदी:

आमच्या कॉलनीत दोन खोडकर बन्धू आहेत. त्याना आम्ही अहीरावण-महीरावण म्हणतो. कारण सगळ्याना भयानक त्रास देतात. माझ्या मैत्रिणीची मावशी नोकरीनिमीत्त काही दिवस त्यान्च्या घरी रहात होती. त्या दोघी बहिणी बाहेर जायला निघाल्या की कॉलनीतले त्याना सीता और गीता म्हणायचे कारण बर्‍यापैकी साम्य होते दोघी बहिणीत.

आठवेल तसे लिहीन, तुम्हाला कोणाला आठवते का असे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या शाळेत भूमिती शिकवायला एक घोलप मॅडम होत्या पण आम्ही तिला बुल्डोजर म्हणायचो Biggrin कारण त्या खुप जाड आणि बुटक्या, गो-यापाण होत्या त्यात कुरळ्या केसांचा बॉबीकट केलेला शिकवायला वर्गात आल्या कि हळूहळू डूलत डूलत यायच्या आणि थोडंस बोलून डायरेक्ट फळ्यावर गणितं सोडवायच्या आणि
म्हणायच्या कळलं ना हे कसं सोडवलं ते???
आम्हाला कळलं कि नाही याच्याशी काही एक घेणंदेणं नसल्यासारख्या huh!!

आणि एक हजारे मॅडम होत्या काळ्यासावळ्या होत्या एकदा शाळेतल्या हळदीकुंकूच्या वेळी dark हिरवी साडी आणि लालभडक लिपस्टीक लावून आल्या होत्या तेव्हापासून त्यांना "हिरव्या रानातली काळी म्हैस" म्हणायचो आम्ही

कॉलेजमधे Economics ला young असे एक केसकर म्हणून सर आले होते शिकवायला , त्यांना first tym पाहूनच मी फिदा झाले होते तेव्हापासून अख्ख्या कॉलेजमधे मला Mrs.Economics चिडवत होते सगळे, हे त्यांनाही माहित होतं , नंतर कळलं कि ते married होते. Uhoh

माझी एक मैत्रिण होती तिचे होठ खुप बारीक होते त्यात ती लालभडक लिपस्टीक लावायची एकंदर तिचा मेकअप १९९० च्या गावच्या करीश्मा दिव्या भारतीसारखा असायचा त्यामुळे काही मुलींचा ग्रूप तिला गावठी करीश्मा म्हणायचा, मला त्या मुलींकडून कळलं तेव्हा हसून हसून वाट लागली आमची Biggrin Biggrin आणि ती नेहमी जास्तकरून लाल रंगाचे ड्रेस घालायची त्यामुळेपण आम्ही तिला "लालटेन किंवा red signal " बोलायचो

आमच्या शाळेत भूमिती शिकवायला एक घोलप मॅडम होत्या पण आम्ही तिला बुल्डोजर म्हणायचो Biggrin कारण त्या खुप जाड आणि बुटक्या, गो-यापाण होत्या त्यात कुरळ्या केसांचा बॉबीकट केलेला शिकवायला वर्गात आल्या कि हळूहळू डूलत डूलत यायच्या आणि थोडंस बोलून डायरेक्ट फळ्यावर गणितं सोडवायच्या आणि
म्हणायच्या कळलं ना हे कसं सोडवलं ते???
आम्हाला कळलं कि नाही याच्याशी काही एक घेणंदेणं नसल्यासारख्या huh!!

आणि एक हजारे मॅडम होत्या काळ्यासावळ्या होत्या एकदा शाळेतल्या हळदीकुंकूच्या वेळी dark हिरवी साडी आणि लालभडक लिपस्टीक लावून आल्या होत्या तेव्हापासून त्यांना "हिरव्या रानातली काळी म्हैस" म्हणायचो आम्ही

कॉलेजमधे Economics ला young असे एक केसकर म्हणून सर आले होते शिकवायला , त्यांना first tym पाहूनच मी फिदा झाले होते तेव्हापासून अख्ख्या कॉलेजमधे मला Mrs.Economics चिडवत होते सगळे, हे त्यांनाही माहित होतं , नंतर कळलं कि ते married होते. Uhoh

माझी एक मैत्रिण होती तिचे होठ खुप बारीक होते त्यात ती लालभडक लिपस्टीक लावायची एकंदर तिचा मेकअप १९९० च्या गावच्या करीश्मा दिव्या भारतीसारखा असायचा त्यामुळे काही मुलींचा ग्रूप तिला गावठी करीश्मा म्हणायचा, मला त्या मुलींकडून कळलं तेव्हा हसून हसून वाट लागली आमची Biggrin Biggrin आणि ती नेहमी जास्तकरून लाल रंगाचे ड्रेस घालायची त्यामुळेपण आम्ही तिला "लालटेन किंवा red signal " बोलायचो

गावठी करिष्मा Proud आमच्या कॉलेजमध्ये पण एका मुलाला आम्ही गावठी अमिर खान किन्वा झोपाळु अमिर खान म्हणायचो. कारण कॉलेज सकाळी ८ वाजता होते तर हा मुलगा कॉलेज च्या मागच्या कॉलनीत रहायचा. हा कायम अन्घोळ वगैरे न करता येत असावा अशी आम्हाला दाट शन्का होती.

आमच्या शाळेतील एक करमरकर MADAM त्यांना आम्ही डू डाय डू म्हणायचो.
>>
सेम पिंच..
कही तुमच्या करमरकर बाई संस्कृतच्या तर नव्हत्या ..

एकसे एक धम्माल नाव..

माझी एक मैत्रीण होती..ती पण चालताना फतक फतक पाय मारत हलत डूलत चालायची..लठ्ठ सुद्धा होती थोडी..
सगळे पोर तिला बद्दक म्हणायचे Lol
तिला आंबे सुद्धा खुप आवडायचे..म्हणून ती खुप फ्रुटी प्यायची..आणि तीच फ्रुटी ची छोटी बॉटल कॉलेज मधे आणायची पाणी प्यायला..हरेक लेक्चर नंतर ती ती बॉटल भरुन आणायची..त्यामुळे तिला फ्रुटी असपन नाव पडलेल..

शाळेत गणिताच्या बाईंनाडाव्या हातात उजवा हात घेऊन घुसळायची सवय होती त्यांना आम्ही भांडेवाल्या बाई म्हणायचो..

एक सर होते इतिहास शिकवणारे.. लाल पांढरे दात असायचे पान सतत खाल्ल्यामुळे.. बुटके होते आणि अ‍ॅटलस सायकल वर यायचे.. विचित्र चेहरा होता..त्यांना गोरीला म्हणायचो.. Proud

आणखी एक नावडती संगीताची शिक्षिका होती..काळी आणि चेहर्‍यावर मुरुमाचे खड्डे..अजिबात चांगली वागवायची नाही पोरींना..पण आवाज गोड होता त्यांचा.. त्यांना कोकीळ Wink

सेम पिंच..
कही तुमच्या करमरकर बाई संस्कृतच्या तर नव्हत्या ..>>>>>>>

सॉरी............. तेवढ नाही आठवत ....... बघते कुणाला तरी विचारून तसे मायबोलीतल्या 'वेल' आयडी आमच्या (पार्ले टिळक विद्यालय) शाळेतल्या आहेत त्यांना माहित असेल.

माझे बरेचदा पोरांशी पटायचे नाही ११ १२वी मधे.. त्याआधी १ली ते ४थीत असताना खुप मारामारी करायची Lol
५वी ते १०वी मुलींच्या शाळेत होती.. १२वी नंतर रिपीट केल मेडीकल साठी आणि मग हवी ती स्ट्रिम न मिळाल्यामुळे अभियांत्रीकी महाविद्यालयात दाखल झाली.. तिथे क्रॉस रॅगिंग चालायची .. म्हणजे सिनीयर पोर ज्युनीयर पोरींची रॅगिंग घेणार.. माझे ११वी १२वीतले काही वर्गमित्र मला सिनीयर होते म्हणून त्यांना पाहिल कि सतत माझ्या कपाळावर आठ्या राहायच्या आणि कुणी रॅगिंग घ्यायला गेल की मी टशन द्यायची.. त्यामुळे मला डॉन म्हणत Proud

रश्मी, मस्तं धागा आणि प्रतिसाद पण एक से एक मजेदार.

कॉलेज मधे चिडचिड्या शिक्षीकेला आम्ही म्हणायचो ' परेशान आत्मा '.
एखाद्या बर्‍यापैकी चोकोलेट हीरो टाईप मुलाविषयी बोलतांना ' अरे वो अपना ग़रीबोंका आमिर ख़ान' इत्यादि....

amche ganitache sir...Beryl..ka tar aavaj nd share..9th la history la madam gotta tyana bhandiwali ...tassach ditto avatar..
3.mala sagle senior mhantal
4.maja coligue..security..ka tar banket to security updation vagtoy..
5.tiger..becoz her name is Ekta
6. amchyakade boss la sardar..every month endla kitne cases hue hi tharleli line
7. maja mitra..item ka te vicharu naka
8.ekala honeymoon..bapache naav madhukar..it's kar madhu and in fortunately tyache naav Shashank ahe( chandra- moon)

आमच्या शाळेत एक मुलगा थोडा मुलींसारखा वागायचा अम्हि त्याला "कमळी" नाव पाडलेलं ।

कॉलेज मध्ये असताना ,
एक मुलगी फार सुंदर दिसायची ,तिला आम्ही "सुंन्द्रि " म्हणायचो .
एक मुलगा फार अंग चोरून चालायचा , त्याला आम्ही " compressor " म्हणायचो Lol
civil शिकवणारे सर स्वताला खूप भारी समजायचे , त्यांना "मदन " म्हणायचे सारे ....

आम्हाला एक मॅडम maths शिकवायला होत्या ..आम्ही त्यांना Chennai express म्हणायचो. Nonstop शिकवत होत्या.

माझ्या शाळेत इतिहासाच्या बाई होत्या सोहनी म्हणून..खूप टापटीप असायच्या आणि खूप सेंट लावून यायच्या...म्हणून त्याचं नाव सेंटेड सोहनी.

अर्रे कसला धमाल धागा आहे हा... Rofl
आम्ही काय नावं ठेवलीच नाहीत बहुतेक. एकच आठवलं कॉलेजला असताना एका सरांना कपाळावर कायमच एक मोठं टेंगुळ असल्यासारखं होतं त्यांना 'हेडलाईट' म्हणायचे.

आमच्या एका क्लासमेटला मुलींच्या बाजूने पुढे जायची सवय होती, त्याला 'ओव्हरटेक' नाव दिलेले Happy

एक ग्रुपमेट डुलत डुलत चालायचा, त्याला आम्ही गाणं म्हणायचो...मी डोलकर डोलकर .... Happy
एका सरांचे नाव बडगुजर होते....त्यांना लेक्चरला यायला उशीर झाला की माझी एक मैत्रीण गाणं म्हणायची...ये रे ये रे बड्गु Lol

धमाल धागा!!
आमच्या शाळेतल्या शिक्षकांची नावं (आपण ठेवलेली) पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती.
PT च्या सरांना डॉबरमॅन म्हणायचे.. हे नाव का आणि कधी पडलं हे कोणालाच माहीत नाही.

डेक्कनच्या चितळेजवळ जो छोटासा ब्रिज (पुतळ्याजवळचा, जिथे अंडरग्राउंड वॉक वे आहे), तो बहुतेक गरवारेंनी बांधला /फायनान्स केला आहे, त्यामुळे त्याचं नाव आबासाहेब गरवारे ब्रिज आहे. खरं तर तो ब्रिज किंवा फ्लाय ओव्हर नाही वाटत, तर नुसताच रस्त्याला आलेला उंचवटा वाटतो, त्या उंचवट्याला SP कॉलेज मध्ये, आबाचं टेंगुळ म्हणायचे. Lol

आमच्या ऑफिस मधील एक सहकारी आहेत त्यांचे वागणे बोलणे अगदी बायकी आहे आम्ही त्यांना केजो (करन जोहर ) म्हणतो.
अजून एक सिनियर आहेत टक्कल असलेले त्यांना चंपक म्हणतो

सगळे प्रतिसाद मस्तच
मला आजवर वाईट वाटे की आमच्या घरात सगळे नावे ठेवण्यात पटाईत आहेत.. परनिंदा वगैरे.. आता मस्त वाटलं.. तर मी तज्ञ ही पण माझा भाऊराया अगदी चपखल नावे ठेवतो.. आईच्या मैत्रिणीला त्यांच्या अतिटापटीप राहण्यावरून इस्त्री, *तुरुतुरु चालणाऱ्या ओळखीच्या काकांना उंदीर, माझ्या मुलाची जी नेमके अडचणीचे प्रश्न विचारायची सवय आहे त्यावरून त्याला मार्मिक इ.
बरीच यादी आहे

मीरा , तुम्ही एस पी मधे होता काय ? मग तुम्हाला Physics चे 'नीलमपरी' (दाते) , Chemistry चे 'घार्या' (परांजपे) , English च्या 'तारा' थोरात ( T R Thorat) ही नावे आठवतात का ?

आमच्या इथे एका पवार नावाच्या कामगाराचा हाताच्या अंगठ्याला काम करताना अपघात झाल्याने अंगठ्यावर बरेच ऑपरेशन्स झाले होते. कालांतराने अंगठ्यावर चांगलेच मांस चढून तो आकाराने कायमचा दुप्पट मोठा झाला होता. तो तसाच मोठ्या अंगठ्याने काम करी. त्याला सर्वजण 'थम्पसअप पवार' ह्या नावाने ओळखत.

दुसरे एक 'उघाडे' नावाचे सहकारी होते. इंग्रजीत त्यांच्या नांवाचा उच्चार 'उघडे' असाही होत असल्याने आणि सर्वांना 'उघडे' ही संकल्पना चांगलीच परिचित असल्याने सर्व त्यांना कायम 'उघडेनागडे' असंच हाक मारीत. महिन्यातून चार पाच वेळा तरी ते आमच्या ऑफिसात येत. ते स्वतःचे 'उघाडे' आडनांव विसरून गेले होते. इतके की त्यांना पाहून कोणी जरी म्हटले की "हे पहा उघडे आले." तर ते स्वतःच पुढे म्हणत "हो! हो! उघडेनागडे आले" त्यांनीही आपल्या आडनांवाचा अपभ्रंश खेळीमेळीत मान्य केला होता.

Pages