तुम्ही नावे ठेवता का?

Submitted by रश्मी. on 27 April, 2015 - 05:53

तुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणा, शालेय जीवनात म्हणा किन्वा कॉलेज मध्ये म्हणा, कोणाला नावे ठेवली आहेत का? नाव म्हणजे फिशपॉन्ड नव्हे, तर त्या मुलीच्या/ मुलाच्या/ शिक्षकान्च्या वागणूकीमुळे त्याना नावे ठेवली का कधी?

शाळेचे मला फारसे लक्षात नाही, पण कॉलेजमध्ये बहार होती. आमच्या कॉलेजमध्ये २ जिगरी दोस्त होते. त्याना आमच्या गृपने बरीच नावे ठेवली होती. राम-श्याम, जाड्या-रड्या ( कारण त्यातला एक खूप जाड व दुसरा एकदम काठीच वाटायचा), लॉरेल-हार्डी. माझी युपीची मैत्रिण एकदा त्याना चकला-बेलन म्हणाली. माझी हसून वाट लागली.
कॉलेजमध्येच २ सरान्चे आपाआपसात पटत नव्हते, त्याना सगळे बोका-ऊन्दीर म्हणायचे. तर यातल्या बुटक्या सराना मुन्गेरीलाल म्हणायचे.:फिदी:

आमच्या कॉलनीत दोन खोडकर बन्धू आहेत. त्याना आम्ही अहीरावण-महीरावण म्हणतो. कारण सगळ्याना भयानक त्रास देतात. माझ्या मैत्रिणीची मावशी नोकरीनिमीत्त काही दिवस त्यान्च्या घरी रहात होती. त्या दोघी बहिणी बाहेर जायला निघाल्या की कॉलनीतले त्याना सीता और गीता म्हणायचे कारण बर्‍यापैकी साम्य होते दोघी बहिणीत.

आठवेल तसे लिहीन, तुम्हाला कोणाला आठवते का असे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नायजेरियात हाऊसमेड्स हा भारतीय बायकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्याबद्दल गप्पा मारणे हे होतेच पण त्यादेखील त्या गप्पांकडे बारीक कान देऊन असतात. त्यामूळे त्यांचे थेट नाव घेता येत नाही. त्यांच्या नावाचे मराठी रुपांतर करूनच अशा गप्पा मारल्या जातात.. काहि उदाहरणे..

जॉय ( आनंदीबाई ), पर्ल ( मोतीबाई ), प्रे ( नमाबाई ) जून ( थोराट बाई )....
एका मेडचे नाव ठेवले होते, सवालाख.. का तर तिच्या चेहर्‍यावर म्हणे आताच सव्वा लाख हरून आल्यासारखे भाव कायम असत.

आमच्या एका गणित शिकवणाऱ्या बाइंचे नाव आम्ही स्टेपलर ठेवले होते.. त्यांच्या दातांमुळे..! तर एक सर त्यांच्या सुटलेल्या पोटामुळे pp होते..

pp= permanent pregnant..:G

यावरुन आठवले. पाकीस्तानात बेनझीर भुट्टोच्या पीपीपी ला,( पाकीस्तान पिपल्स पार्टी ) म्हणजे बेनझीर्ला पर्मनन्ट प्रेग्नन्ट प्राईम मिनीस्टर म्हणायचे.:फिदी: बेनझीर्ला तीन मुले आहेत. नेमकी तिच्या या राजकारणातील हर उमेदवारी च्या काळात ती प्रेग्नन्ट असायची.

आमच्या शाळेत एक साळोखे बाई होत्या, त्या खूप बोलायच्या म्हणून आम्ही त्यांना चिमणी म्हणायचो.
दुसरे एक गणिताचे सर होते त्यांच्या गालावर गोल गोल वण होते (बहुतेक देवीचे) त्यांना आम्ही आंबोळी म्हणायचो.
दुसर्‍या एक बाई होत्या धड्डे बाई. त्यांना अख्खी एज्युकेशन सोसायटी धड्ड म्हणायची, कारण त्या जरा वेगळ्याच होत्या. वर्गात दंगा सुरू असला तरीही शिकवत रहायच्या. मुलं त्यांना अजिबातच भीत नसत (पहिल्यांदा त्या मुलांच्या शाळेत होत्या) मग आमच्या शाळेत आल्या.

आम्ही कंपनीत प्रोजेक्ट लीडरला पेट्नेम ठेवतो म्हणजे त्याचाविषयी बोलताना आजूबाजूला तो किंवा ती आहे की नाही ते बघावे लागत नाही.

एकीचे आडनाव गांधी होतो तिचे पेट्नेम महात्मा ठेवले होते
एकाचे नाव मनोजकुमार होते त्याचे पेट्नेम भारत ठेवले होते
एक विषय सोडून फाड फाड इंग्रजीत बोलायचा त्याचे पेट्नेम कोकाटे ठेवले होते.
एकजण कमी बोलायचा त्याचे पेट्नेम मनमोहन ठेवले होते

<< आमच्या एका गणिताच्या सरांची मान (गळा) एकदम जाडजूड होते. म्हणजे मान नाही म्हणतात त्यातला प्रकार. >>

अशा लोकांना मी नेकलेस म्हणतो.

सही धागाय.. लिहू तितके कमीच..

पिताश्रींच्या नावावरून (किंवा आणखी त्याचाही अपभ्रंश करून) पेटनेम ठेवायचीही एक फॅशन होती, असते..
उदाहरणार्थ माझ्या दोन मित्रांची नावे पक्या होती.. का, तर त्यांच्या वडीलांचे नाव प्रकाश असे होते..

त्यातील एक जो कॉलेजमध्ये होता, त्याच्या घरी मी एकदा फोन केलेला.. लँडलाईनवर.. त्याच्या आईने उचलला.. मी सवयीनेच म्हणालो, "पक्या आहे का??" .. खाडकन माझ्या बाजूला उभ्या असलेल्या मित्राने मला पेटवली आणि मी चूक लक्षात येताच तितक्याच तत्परतेने फोन खाली ठेवला. नशीब चूक लक्षात आली वेळीच, अन्यथा पुढे संभाषण कंटिन्यू केले असते तर सो अँबारसिंग वगैरे म्हणतात तसला मोमेन्ट होता..

सही धागाय.. लिहू तितके कमीच..>> +१

पिताश्रींच्या नावावरून (किंवा आणखी त्याचाही अपभ्रंश करून) पेटनेम ठेवायचीही एक फॅशन होती, असते..>>

आमच्या वर्गातल्या एका मुलाला टोपी हाक मारायचे कारण काय तर त्याच्या बाबांचे नाव होते प्रकाश.... शाॅर्टफाॅर्म पक्या... पक्या उलट लिहिलं की क्याप (कॅप - इंग्रजी).... कॅप म्हणजे टोपी... हे असं शोधणार्या मुलाला मी कोपरापासून हात जोडले होते. Happy

हाहा मजा येत्येय वाचायला..आम्हाला biostats शिकवायला एक temporary lecturer बाई आल्या होत्या. पहिल्याच दिवशी त्या काळे goggles घालून आल्या होत्या आणि ते घालूनच त्यांनी आम्हाला पूर्ण आठवडाभर शिकवले कारण त्यांना नुकतेच डोळे येऊन गेले होते..त्यामुळे त्यांचं नाव पडलं दाऊद Proud आणि आता तेच लक्षात आहे खरं नाव मी विसरून गेलेय!
बाकी माझ्या शाळेत सगळ्यांच्या नावा-आडनावाच्या आद्याक्षरांवरून नावे ठेवण्याची महान परंपरा आहे Happy

शाळेत एक बाई शिकवताना वर छताकडे बघत शिकवायच्या त्यांना एका मित्रानी "धृतराष्ट्र" नाव ठेवलं होतं (तेव्हा दुरदर्शन वर महाभारत लागत असे व त्यातला धृतराष्ट्र अगदी तसाच डोळे वर करुन असायचा)

ज्युनिअर कॉलेजमधे एक बाई बर्‍यापैकी जाड होत्या पण शरीराच्या मानानी त्यांचं डोकं छोटं वाटत असे, म्हणुन त्यांना "भोली" (भोपळ्यावर लिंबू) म्हणायचे.

इंजिनिअरिंग कॉलेजमधे एक तरूण सर होते. ते अतिशय वाईट शिकवायचे. त्यांना साध्या साध्या गोष्टींचे उच्चार नीट यायचे नाहीत, आणि शिकवता तर त्याहुन यायचं नाही. पण एकुणच त्यांच्या दिसण्यावरून का आठवत नाही पण त्यांना "बलबीर" नाव ठेवलं होतं (तेव्हा 'बलबीर पाशा' ची जाहिरात लागायची) मुलं त्यांच्या तासाला "होगा क्या, होगा क्या" असं हळुच म्हणायची.

मेटेलर्जी शिकवणार्‍या एका मॅडमच्या तासाला नेहमी एक पियुन नोटीस घेऊन यायचा. नेमका त्यांच्याच तासाला कसा यायचा देव जाणे. एकदा त्यांचा तास सुरु होता व वर्गाचं दार बंद होतं. (नेहमीप्रमाणे) पियुन नोटीस घेऊन आला व दार वाजवलं. मॅडमनी दार उघडलं आणि बरोबर त्या क्षणी मागच्या बाकावरून कोणीतरी "ईश्श..." म्हणालं (तेव्हा शा खा च्या देवदासमधे माधुरीचं ईश्श जाम फेमस होतं.) सगळा वर्ग हसत सुटला व मॅडमना काय बोलावं कळेना! तेव्हापासुन त्यांना "माधुरी" म्हणायला लागले.

मी एका क्लास ला असताना येक अतिशय बारीक मुलगा होता .तो येक हात कंबरेवर घेवून तिरका उभा राहायचा.. त्याला मोहेंजोदडो आसे नाव पडले होते ( ती मूर्थी आठवली का ?)

येक गावडा नावाचा प्रोफेसर होता त्याला जे नाव होते ते सांगता येत नाही..;०

तसेच अजून येक पोरींना चीक्त्नार्या प्रोफ ला चामटया म्हणायचे.

मुनीर नावाची येक प्रोफ होती - तिला मुन्नीबाई म्हणायचे.

अजून झंड नावाचा येक साहेब होता ला जे नाव होते ते सांगता येत नाही..;०

मला लोक प्रेमाने TIGER - वाघे आडनावाने , टायगरे आणि वाघोबा म्हणायचे.

येक दक्षिणात्य मुलगी भयानक घट्ट कपडे घालायची - तिला सन TV नाव पडले होते !

निधी,
ते पकॅ कॅप टोपी हा फेमस आयटमच आहे.. आमच्या बालपणीही ऐकून झालेय..

फुल्ल वर्जन असे..
प्रूव्ह करा रामा = पक्या

रामा मारा पीटो टोपी क्याप पक्या.. Happy

व्यंगावरून चिडवू नये म्हणतात.. पण मित्रांमध्ये हेच जास्त चालते..
आमच्या कॉलेजला एक काळा मुलगा होता, बरे नुसता काळा नसून चेहरेपट्टीही कावळ्यासारखी होती.. तर त्याला कव्वा म्हणायचे..

एकदा शाळेच्या पालक सभेत एका मित्राचे वडील टकाटक जीन्स टीशर्ट घालून आलेले.. तेव्हा त्यांना देवानंद नाव ठेवलेले.. आणि अर्थातच चिडवले मित्राला जायचे..
आजही आमचा शाळेचा व्हॉटसप ग्रूप एवढे वर्षांनी जमलाय ते त्याला सारे देवानंदच हाक मारतात..

अनंत लोकांना अनंत नावं ठेवली आहे (स्वतःसकट) Lol

शाळेत ड्रॉईंगच्या सरांना अप्पा, पीटीच्या सरांना बंड्या, मराठीच्या बाईंना बाबा बंगाली (त्यांचं आडनाव बंगाली होतं!), एका बाईंना धृतराष्ट्र (वर बघून शिकवायच्या कायम), प्रिन्सीपॉलना भैय्या (आडनाव - वाजपेयी), एका बाईंना पठाण (एकदम धिप्पाड होत्या म्हणून!). कोणी डोंबिवलीकर असल्यास लगेच शाळा ओळखेल Happy

कॉलेजमध्ये गणिताच्या सरांना लाडू (पाटील!), गणिताच्याच दुसर्‍या एका सरांना कमांडो (लश्करी शिस्तीत चालायचे अगदी!), केमिस्ट्रीच्या एका मॅडमना चक्क छमिया (!). (बरोबरीच्या मुलींना ठेवलेल्या नावाची यादी देण्यास सांगू नका Happy )

आतापर्यंतच्या बॉसना टारझन, निंजा हतोडी, अलेक्झांडर, हरी साडू (सगळ्यात फेवरीट :)) अशी अनंत नावं ठेवलीत :).

aamhala ek patil madam hotya ... Tya mulinna don venya bandhun yayala sangayachya ... Ani swata pn don venya bandhun yayachya .... Amhi tyanna "chulbuli" mhanayacho Lol

ग्रॅज्युएशन ला असताना मैत्रिणीला एक सिनिअर जाम आवडायचा .
बोलता बोलता एक्दा त्याच नाव मि. ईन्डीया पडलं.
तो दिसायला खूप छान होता म्हणून नाही ,तर कधी दिसायचा तर कधी नाही . Happy . मध्ये मध्ये गायब व्हायचा म्हणून .

ऑफिसमध्ये दोन ज्यु. होते - (एक मुलगा , एक मुलगी.)
अगदी शाळेत असताना पासून वगैरे दोघे एकत्र होते . त्यामुळे अगदी कमिटेड होते .लग्न ठरलचं होतं
एक्दम अनुरूप - गोरे , बुटके , गोल चेहरा , जरा हेविवेट कडे झुकणारे - नेहमी एक्त्र फिरायचे दोघे ऑफिसात .
त्याना आम्ही बंटी-बबली म्हणायचो .

<< त्याना आम्ही बंटी-बबली म्हणायचो .>>

मायबोलीवरील धागवण पुरस्कार विजेते आणि त्यांची गर्ल्फ्रेंड यांची आठवण झाली. जिथे तिथे सतत सोबत.

ते पकॅ कॅप टोपी हा फेमस आयटमच आहे.. आमच्या बालपणीही ऐकून झालेय..>> ऋन्मेष हो पण आमच्या बालपणी म्हणजे मी चौथी-पाचवीत असताना आमच्या साठी ते नवीनच होतं. Happy

आमच्या शाळेत एका बाईंचे केस तारेच्या घासणीसारखे बेजान व पिंजारलेले असत. त्यांना शाळा घासणी म्हणूनच ओळखायची.
एक सर नव्याने सेमी इंग्लिशला सायन्सला आले होते ते नेहमी मोले..,क्यूू..ल्स असं उच्चारत. त्यांचं नाव मोलेक्यूल.
भूगोलाच्या बाईंचं नाव जठार होतं त्यांना पठार म्हणत असू.
दौलतकर अशा लांब नावाच्या बाई एकदम छोट्या आणि ठेंगू त्यांचं नाव डॉली
मुख्याध्यापिका तुरेकर - तुरीची डाळ
कॉलेजात एक मुलगा डुप्लिकेट अॉफ चाचा चौधरी का साबू होता.
एक उंचीने कमी पण जिम करून एकदम बॉडी कमावलेला असा विचित्र चौकोनी दिसायचा तो पत्र्याचा डब्बा.
लाल लिपस्टिक लावलेली कुणीही पोपट.
असे बरेच लिहीता येईल.

आमच्या एक इंग्रजीच्या बाईंचे चांगले लांबसडक केस होते. अचानक काय सुचलं त्यांना केस छोटे करुन आल्या. तेव्हापासून आम्ही त्यांना टोपली म्हणू लागलो.

आमचे मराठीचे सर कायम पूर्ण पांढरे कपडे घालून यायचे त्यांना बगळा म्हणायचो.
सायन्सच्या मॅडम खुपच सुंदर आणि आवाजही एकदम गोड त्यांना बर्फी म्हणायचे.

आमच्या शाळेत ढमाल्या मॅडम एक-दोघीच होत्या.. बाकी सगळ्या बारीकच होत्या.. हे कारण नाहीये... बुटक्याही नव्हत्या.

मला स्वतःला हे सांगताना काही विनोदी वाटत नाहिये, पण नाव तरी काय काय ठेवतात ह्याचा अजुन एक नमुना... आमच्या कॉलेजात एका मुलीला तिच्या दिसण्यामुळे 'अशोक सराफ' म्हणायचे! (मेकॅनिकलच्या कार्ट्यांचं डोकं दुसरं काय!) नशीब तिला तोंडावर कोणी कधी ते म्हणालं नाही मण पाठीमागे तिचा उल्लेख अशोक सराफच व्हायचा.

Amachya clg la ek maitrininchi jodi hoti, tyat ek khup jadi , unch dhippad hoti n dusri k hup barik lahan angachatichi hoti, amhi tyana maa beti mmhanaycho :B

Pages