तुम्ही नावे ठेवता का?

Submitted by रश्मी. on 27 April, 2015 - 05:53

तुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणा, शालेय जीवनात म्हणा किन्वा कॉलेज मध्ये म्हणा, कोणाला नावे ठेवली आहेत का? नाव म्हणजे फिशपॉन्ड नव्हे, तर त्या मुलीच्या/ मुलाच्या/ शिक्षकान्च्या वागणूकीमुळे त्याना नावे ठेवली का कधी?

शाळेचे मला फारसे लक्षात नाही, पण कॉलेजमध्ये बहार होती. आमच्या कॉलेजमध्ये २ जिगरी दोस्त होते. त्याना आमच्या गृपने बरीच नावे ठेवली होती. राम-श्याम, जाड्या-रड्या ( कारण त्यातला एक खूप जाड व दुसरा एकदम काठीच वाटायचा), लॉरेल-हार्डी. माझी युपीची मैत्रिण एकदा त्याना चकला-बेलन म्हणाली. माझी हसून वाट लागली.
कॉलेजमध्येच २ सरान्चे आपाआपसात पटत नव्हते, त्याना सगळे बोका-ऊन्दीर म्हणायचे. तर यातल्या बुटक्या सराना मुन्गेरीलाल म्हणायचे.:फिदी:

आमच्या कॉलनीत दोन खोडकर बन्धू आहेत. त्याना आम्ही अहीरावण-महीरावण म्हणतो. कारण सगळ्याना भयानक त्रास देतात. माझ्या मैत्रिणीची मावशी नोकरीनिमीत्त काही दिवस त्यान्च्या घरी रहात होती. त्या दोघी बहिणी बाहेर जायला निघाल्या की कॉलनीतले त्याना सीता और गीता म्हणायचे कारण बर्‍यापैकी साम्य होते दोघी बहिणीत.

आठवेल तसे लिहीन, तुम्हाला कोणाला आठवते का असे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही शाळेत असताना गणिताच्या सरांना कांगारु म्हणायचो. ते पुस्तकातली गणित सोडवुन दाखवताना पहील्,चौथ, दहाव अश्या उड्या मारत सोडवायचे. उरलेली गणित होमवर्कला..

शाळेत आमच्या रसायनशास्त्राच्या मॅडम खूप गोर्‍या होत्या आणि बोलताना त्यांचे ओठ एका विशिष्ठ पद्धतीने हलायचे. त्यावरुन त्यांना आम्ही "बदक" असं नाव ठेवलं होतं.

आमचे एक सर होते धर्माधिकारी.

एक म्याडम कायम स्लीवलेस घालुन त्यांच्याबरोबर फिरायच्या. म्हणुन त्यांचे नाव दंडाधिकारी ठेवले होते.

आम्हाला मराठी शिकवणार्‍या बाईंना सारखं नाकात बोट घालायची सवय होती आम्ही त्यांना 'गिरमिट' नाव ठेवलं होत.

आमच्या एका इकोच्या सराना पोपटनाक्या म्हणायचे, त्यान्चेच छोटे भाऊ सायन्सला शिकवायचे. पण पोपटनाक्या सराना राग फारसा यायचा नाही. मुल दन्गा करो, वा मुली बडबड करो, ते आपले एक सुरात, एका लयीत शिकवतच रहायचे.:फिदी:

गिरमीट, बखर.:फिदी:

..

.

आमच्या एका गणिताच्या सरांची मान (गळा) एकदम जाडजूड होते. म्हणजे मान नाही म्हणतात त्यातला प्रकार. आम्ही त्यांना बेडूक म्हणायचो..
कारण आमच्या प्राथमिक शाळेतील कुठल्याशा पुस्तकात बेडकाला मान नसते असे वर्णन होते Proud

वरील दोन चुकून आले होते.. ते घालवले .. क्षमस्व ..

आमचे एक सर मोठ्ठी जांभई देत आणि नंतर "अरे देवा, परमेश्वरा, पांडुरंगा, विठठला" असा गजर करत. आम्ही त्यांना संत एकनाथ म्हणायचो.

रश्मी, आम्हाला गुंजीकर म्हणून एक प्रोफेसर होते, ते असे होते. आणि त्यांना कायम अ‍ॅंड सो ऑन, म्हणायची सवय होती.. आम्ही त्यांना तेच नाव ठेवले होते.

प्रा. रिटा डिसोझा या नावाला अगदी विपरीत असे रुप असणार्‍या ( लांबलचक केस, मोठे कुंकू, गोरापान रंग) प्राध्यापिकांना आम्ही झाशीची राणी म्हणत होतो.

पण तरीही आमचे ९८ % प्राध्यापक ( पोद्दार कॉलेज ) अगदी मन लावून शिकवत असत. त्यांना नावे ठेवायची वेळच आली नाही. बी कॉम परीक्षेला तर मी आर्टिकलशिप करत असल्याने, अभ्यासाला वेळच नसायचा. तरी या सर्व प्राध्यापकांच्या शिकवण्यामूळे मी उत्तम रितीने पास झालो. प्रा. भानू श्रीनिवासन यांच्या वर्गात जागा मि़ळावी म्हणून भांडणे होत असत. त्यांनीच आम्हाला अमूक विषय शिकवावा म्हणून आम्ही आंदोलनही केले होते. शांततापूर्ण निषेधाला आमच्या कॉलेजने कधीही विरोध केला नाही. उलट प्रिन्सिपल व्ही. जे. जोशी याला प्रोत्साहनच देत असत.

माझे एक्स बॉस आणि एक सहकारी यांचा ३ व ६ चा आकडा होता. बॉस म्हणेल त्याच्या विरुद्धच याला वाटायचं आणि तसंच हा करायचा आणि मग रोजचा वाद ठरलेला. त्या दोघांना आम्ही टॉम आणि जेरी म्हणायचो. तो सहकारी नेहमीच बॉसला डोईजड व्हायचा व बॉसची फजिती व्हायची, अगदी टॉम-जेरीसारखेच.

नशीबवान आहात दिनेशजी तुम्ही.:स्मित:

शाळेत मात्र आम्हाला जे रसायन शास्त्राला सर होतेच त्यानी आणी भुगोलाच्याच सरानी मन लावुन शिकवले. बाकी सर व मॅडम लोक्स कायम घाईत असायचे.

माझ्या नवर्‍याला खूप सवय आहे अशी नाव ठेवायची.. त्याच्या एका बॉसच आडनाव रोझारीओ होत तर ह्याने त्याच गुलाबराव करुन टाकल होत. आत्ताच्या बॉसचे बॉस आहेत त्यांना "आका" म्हणतो.. त्याच्या ऑफीसमध्ये ८ दायरेक्टर्स आहेत ज्यांना आठवड्यातुन एकदा विकली रिपोर्टिंगसाठी मिटिंग असते, तर त्या ८ जणांना हा अष्टविनायक म्हणतो आणि त्या विकली रिव्ह्यु मिटींगला "अष्टविनायकांचा दरबार" म्हणतो...

शाळेत असताना स्लीव्ह्लेस = "मधू दंडवते".

एका अतिशय गोर्‍या दिसणार्‍या मॅडमना 'स्टेफी ग्राफ', अतिशय उंच सरांना 'बच्चन', लांब मान असणार्‍या सरांना 'बगळा', निळू फुलें सारखा आवाज असणार्या सरांना 'वाड्यावर या', बोलता बोलता झटकन फळ्याकडे वळण्यासाठी गिरकी घेणार्‍या अभियांत्रिकीच्या सरांना 'शक्तिमान'....अशी बरीच नावे होती.

Sagale fakt shikshakanbaddalch lihitayet almost....
Apavad ahetch

मी जिथे पहिल्यांदा नोकरीला लागलो तिथे माझ्या इमिजियेट बॉसचे नाव मिरचंदानी असे होते. त्याच सुमारास रेडिओ मिर्ची नावाचे रेडीओ स्टेशन सुरू झाला होता. त्या बॉसने काहीही बोलायला सुरवात केली की रेडिओ मिर्ची लागलंय असं आम्ही म्हणायचो.

शिक्शकांबद्दल Happy

वर्गातल्या एका उंच मानेच्या मुलीला आम्ही बगीरा नाव ठेवलेलं.

आणि इकोच्या हॅन्ड्सम सरांना 'सुभानल्ला' Happy

मी आहे न अपवाद रीया.

१९९९२-९३ च्या सुमारास रामजन्मभूमीवरुन जो वाद उठला होता त्या सुमारास बर्‍याच ठिकाणी कर्फ्यू किंवा जमावबंदी लागू करत. पोलिसांची गस्त तर कायम असे. मी तेव्हा चुनाभट्टीला रहायचे. आमच्या कॉलनीतील २ इसमांनी पोलिसांशी हुज्ज्त घातली, तुम्ही हप्ते घेता वगैरे काही-बाही बोलले. रात्री पोलिसांनी जमावबंदी लागू केली आणि या दोघाना अटक केली. २ रात्री लॉकाअपमध्ये ठेवून मग सोडले. तेव्हापासून आम्ही त्यांना क्रांतिकारक बोलू लागलो.

>>>> तुम्हाला कोणाला आठवते का असे? <<<
हो बरीच आठवतात....
पण त्याहून महत्वाचे आठवते ते म्हणजे, अशी "ठेवलेली खास ठेवणीतली नावे" त्या त्या व्यक्तिला जाऊन, तुला हे हे नाव आम्ही ठेवले आहे असे सांगण्याची हौसही होती! Proud
तुम्ही पाठीमागुन "नावे ठेवत असाल", मी तोन्डावरच नावे ठेवण्यावर विश्वास ठेऊन होतो/आहे. Proud

एक बाई आहे ऑफिसात तिचे रोज अगदी डोक्यापासून पायापर्यंत मॅचिंग असते. म्हणजे फक्त ड्रेस, अ‍ॅक्सेसरीज इतकेच नाही, तर पर्स आणि डबा ठेवायची बॅगही. तिला आम्ही "मॅचिंग सेंटर" असेच बोलतो.

आमच्या तंत्रनिकेतनात , एक प्राध्यापक शरीराने अतिशय बारके होते. त्यांना क्लास मध्ये शिकवीत असतांना , आपापसात बोललेले अजिबात खपत नसे. मग ते तोंडातल्या तोंडात , रागाने , पुटपुटत असत, बहुतेक आम्हाला शिव्याच देत असत, असे वाटायचे. त्यांना गॅदरिंग मध्ये फिश पाँड देण्यात आला होता.
" A boiler , without water ".

त्याचप्रमाणे , कधी नव्हे तर त्यावर्षी , एका मुलीने , धुळे येथील तंत्रनिकेतनात ,प्रवेश घेतला होता.आमच्या द्रुष्टिकोनातुन ती म्हणजे ' वाळवंटातील हिरवळच ! ! ' त्याकाळी सहसा मुली तंत्रनिकेतनात प्रवेश घेत नसत.सर्व मुलींचा भरणा आर्ट्स अगर कॉमर्स शाखेकडे असायचा ! तीने मे़कॅनिकल शाखेत प्रवेश घेतला होता.त्यामुळे प्रत्येकाला वाटे की त्या मुलीने आपल्याशी संवाद साधावा. प्रत्येकाची धड्पड त्यासाठीच असायची. ती मात्र सर्वांशी बोलायची.( मी ईलेक्ट्रिक शाखेत होतो.) त्या एकमेव मुलीला फिशपाँड मिळाला होता. " A train , stopping at every station."

आमच्या ऑफिसमधे तर नाव न ठेवताही "निव्वळ कृती"/"हावभाव"/हाताची अ‍ॅक्शन करुन अमक्यातमक्या व्यक्तीचा उल्लेख करुन बाकी उघड बोलले जाते.....

आर्टिकलशिपच्या दिवसांत आम्ही टिळकरोडवरच्या 'तिलक' वर बर्‍याचदा सांडलेले असायचो. एक काका नेहमीच त्या परिसरात दिसायचे. चेहर्‍याने आम्हाला ते माहित झाले होते. एकदम हसरा चेहरा होता त्यांचा. आम्ही त्यांना हका नुडल्स नाव ठेवलं होतं (हका= हसरे काका).
आमच्याच बाजूच्या ऑफिसमधल्या बॉसचा आवाज घोगरा, चिरका होता. जरा ऑफिसात शांतता असली की जाणवण्या इतपत! त्याला आम्ही ज्ञारे म्हणायचो (ज्ञारे=ज्ञानेश्वरांचा रेडा).

व्यावास्तापान्शास्त्र (management ) शिकताना येका मित्रा ला राका B नाव पडले.
राकेश नाव असल्याने त्याला आधी राका बोलायचे . तो येकदा मोठ्या व वर्गातल्या मित्रांबरोबर असताना म्हणाला कि " भे XXXX येह राका नाम मुझे बिलकूल पसंद नाही ." परत परत हे म्हणाला.
येक सीनिअर वैतागून म्हणाला " बराबर है... राका क्या नाम है!.. आज से तर नाम राका भ XXX ."
त्याचे लघुरूप होऊन तो राका बी झाला.

माझ्या भावाच्या अभियांत्रिकी विद्यालयात येक दलाल नामक शिक्षक होता . त्यावेळी मिथून च्या दलाल चीत्रापातील - गुटर गुटर - चढ गाय उपर रे - गाणे गाजत होते . ते त्या प्रोफ ला गुटर बोलायचे .
तसेच येक मंदार नामक मित्र ला ते प्रेम ने मदार बोलायचे.

शाळेत येका शिक्षिकेला "चिमणी" आणि येका कभिन्न सरना कावळा म्हणायचे . योगायोगाने चिवू काऊ येकच दिवशी निवृत्त झाले ..

Pages