तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

- माझं शोनुल, छकुल फिचरिंग मायरा = विक्रांत आणि झेंडे = ईबाळ. ईबाळ अंगठा चोखत असतं, आणि शेवटी जगप्रसिद्ध भोकाड पसरतं. >>>> हा कुठला महत्त्वाचा प्रसंग होता , lovestory मधला.? आणि लोक खिदळत होती. बाबू आणि बाळ दोघे कौतुकाने हसत होते. Its embarrassing -- Targeting age difference .

हे मात्र खर आहे की सुभाचा अभिनय आता हळूहळू क्रुत्रिम होत चालला आहे.बेबीला स्वप्न पडल हे इथे वाचून लगेच आज अँपवर भाग पाहिला.दोघेही आवडले नाहीत.
बेबीला केवढा वाव होता अभिनयासाठी.स्वप्नातून दचकून जाग होण,ह्रुदयाची वाढलेली धडधड दाखवण,घसा कोरडा पडल्याच दाखवून पाणी शोधण,घाबरून बाहेर येण,विआईने शाल देण्याच्या आधी थंडीने शहारल्याचा अभिनय करण,हिला काहीच जमल नाही.अगदी ठोकळा.बर आवाजात काही चढउतार ते ही नाहीत.
शितुचा संबंध हिच्याशी असल्याने आणि एकंदरीत अभिनयातला हिचा अंधार पाहता मालिका लवकर गुंडाळतील अस वाटत आहे.
काल बेबी निघून गेल्यावर हसणारा सुभा,झेंडेंशी बोलून झाल्यावर खिशात हात घालणारा सुभा क्रुत्रिम वाटला.

पौष महिन्यात लग्न करत आहेत! ऑलमोस्ट संक्रांतीला!? >>> symbolic असेल. विक्रांतच्या आयुष्यात संक्रांत येणार, त्याने आधी कोणावर तरी संक्रांत आणली असणार म्हणून. मी बघत नसले तरी खरंचं असं काही असेल तर इशाताई कशी करणार ही भूमिका, असा उगाच प्रश्न पडलाय.

अगदीच रसभंग करणारा महा ए. सो. Uhoh
आणि तथाकथित व्हीआयपी कुठे दिसले नाहीत.. किंवा निमकरांना दडपण येईल म्हणून सुभाने त्यांची वेगळी सोय केली असावी

Grand wedding म्हणतात सगळे नेहमी तस तर काही वाटलं नाही.. आणि लग्नात आधी होम पेटवला कन्यादान आणि नंतर मंगलाष्टक..केड्याला म्हणावं लक्षात येण्याऐवड्या चुका नको करू

मी हा सगळा मूर्खपणा फक्त २४ मिनिटे बघू शकतो,
म्हणून आजचा भाग नाही बघितला.
त्यामुळे आज माझ्याकडून काहीही रसग्रहण नाही Wink

मला तो फारेण्ड चा (?) Dialog आठवला.. सर हे helicopter खरं आहे? उडत का ??> >>

लोकहो, इथल्या चांगल्या कॉमेण्ट्स माझ्या नावावर जमा होत आहेत याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही Wink पण ही सुद्धा कॉमेण्ट (बहुधा) माझी नाही Happy नक्की कोणाची ते लक्षात नाही, पण मजेदार आहे.

बाकी सिरीयल पाहण्यात ७-८ दिवस मागे आहे आणि इथल्या डिटेल प्रतिक्रिया वाचण्यातही.

ते भेंडे, विसला असे का म्हणाले की मी इशामॅडमला लग्नानंतर काय बोलू? असे म्हणायला पाहिजे ना की लग्नानंतर मी इशामॅडमला काय म्हणू?

हो तू म्हणतेयस तसंच विचारायला हवं होतं, भगवती. पण ही हल्ली सर्रास ऐकू येणारी नविन मराठी भाषा आहे. सांगणं, म्हणणं, बोलणं ह्याला एकच बोलणं क्रियापद ऐकायला मिळतं.

विस म्हणाला की इशाच्या आईशिवाय लग्न करणार नाही, मी क्षणभर दचकले म्हटलं विसचा विचार बदलला की काय Wink

मलाही तसंच वाटलं. इशाईला विसाव्या वर्षी मुलगी झाली असेल तर ती विक्याएवढीच की. विक्याचं अंतर 26 असेल तर इशाईच लहान असेल.
आणि विक्याच्या आईला सुद्धा अगदी विशीत विक्या झाला असेल तरी ती 66 कुठे दिसते?

आईसाहेब विक्याची सावत्र आई असावी असं वाटतंय.
ईशा नंदुचा पुनर्जन्म आहे याच्या अनेक हिंट्स दिल्या काल.. ईशाला आवडणारा पदार्थ सांगताना विक्याचे expressions एकदम बदलले.. आणि ते ऐकल्यावर आईसाहेब पण शॉक झाल्यासारख्या वाटल्या.
ईशाच्या तोंडी मी प्रत्येक जन्मी तुमची साथ देईन अशा अर्थाचा डायलॉग होता.

सुभाच्या अभिनयाचा जीव त्याच्या पांढऱ्या केसांत होता बहुतेक. Wink

सुभाच्या अभिनयाचा जीव त्याच्या पांढऱ्या केसांत होता बहुतेक. >>हो ना. आणि प्रेक्षकांचाही Wink

त्याची सफाचट दाढीही काहीशी विचित्र होती कालची. पांढरं पांढरं काहीतरी लागलं होतं चेहेर्याला.

कच्चा लिंबू 100 % सहमत. काल editing च्या कित्ती चुका होत्या़. वैताग आला. आणि ते विक्रांतच चक्कर येणं संबंध काय?

कच्चा लिंबू 100 % सहमत. काल editing च्या कित्ती चुका होत्या़. वैताग आला. आणि ते विक्रांतच चक्कर येणं संबंध काय?

कच्चा लिंबू 100 % सहमत. काल editing च्या कित्ती चुका होत्या़. वैताग आला. आणि ते विक्रांतच चक्कर येणं संबंध काय?

मी ते मिस केलं...काय पदार्थ सांगितला तिच्या आवडीचा? वांग्याची कोशिंबीर का काय असं ते आधी म्हणत होते...मग काय झालं?

कच्चा लिंबू 100 % सहमत. काल editing च्या कित्ती चुका होत्या़ .. हो..... खुप .... म्हणजे खुप ... खुप सीन पण कट केले अस जाणवत होत
advertisement ch jast kelya tyani... so scene cut kele...

मी ते मिस केलं...काय पदार्थ सांगितला तिच्या आवडीचा? वांग्याची कोशिंबीर का काय असं ते आधी म्हणत होते...मग काय झालं? >>>>आमरस भात म्हणतो सुभा.... आणी ते बरोबर होत... त्या चे expressions एकदम बदलले.. आणि ते ऐकल्यावर आईसाहेब पण शॉक झाल्यासारख्या वाटल्या. ...

ओह..!! हो का...?
आमरस भात शि तु ला पण आवडायचं वाटतं?

काल editing च्या कित्ती चुका होत्या़. वैताग आला. >>>
हो.. अगदीच तुटक आणि सुमार दर्जाचा एपिसोड होता कालचा.. मी पूर्ण बघूच नाही शकले

सुभाच्या अभिनयाचा जीव त्याच्या पांढऱ्या केसांत होता बहुतेक. >> हे भारी आहे.
आणि आमचा पण जीव त्या पांढर्या केसांवरच होता Happy

महा एपिसोड विशेष वटला नाही.
एवढा खर्च केला.. कपडे, दागिने, लोकेशन..
पण एकदम घाई घाईत २-३ समारंभ उरकले..असं वाटलं..

मग इशा विकू रोमँटिक मूडमध्ये असतात, इशा म्हणते, सर कुणीतरी येईल ना, (बाई अजून त्याने काहीही केलेलं नाहीये, लगेच?)
तसंच कुणीतरी आवाज देत. इशा पळत जाते. >>>>>>>> त्यादिवशी विसला अचानक रोमँटिक झालेल बघून शॉक्डच झाले मी. म्हटल, हेच बघायला आम्ही उत्सुक होतो. नाहीतर जेव्हा बघाव तेव्हा ' तुझे डोळे नि माझे डोळे' असा प्रकार होता. अजून त्याने काहीही केलेलं नाहीये म्हणजे? तो तिला किस करणार होता ना. Wink

परवा विसच सर्वान्समोर मेहन्दी काढण आवडल नव्हत. पण प्रत्यक्षात तो सीन बघितल्यावर नॉट बॅड अस वाटल. सो, रुपालीच्या आईचे मत आवडले नाही.

नशिब विसने तिच्या हातावर मेहन्दीच काढली. मॉर्डन आर्ट नाही.

ईशा नंदुचा पुनर्जन्म आहे याच्या अनेक हिंट्स दिल्या काल.. ईशाला आवडणारा पदार्थ सांगताना विक्याचे expressions एकदम बदलले.. आणि ते ऐकल्यावर आईसाहेब पण शॉक झाल्यासारख्या वाटल्या.
ईशाच्या तोंडी मी प्रत्येक जन्मी तुमची साथ देईन अशा अर्थाचा डायलॉग होता. >>>>>>>> अगदी अगदी काल पुजेच्या वेळी सुद्दा ईशाची आई तिला 'जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना कर' अस म्हणाली.

आईसाहेब ईशाला 'माझी तर झोपच उडाली आहे' म्हणाल्या, म्हणजे त्यान्ना ईशाच्या बाबतीत देजावू फिलिन्ग आल असेल.

खुप सीन पण कट केले अस जाणवत होत >>>>>> हो. निमकरान्चा डान्स कट केला.

सॉनया छान नाचली काल. सुभा सुद्दा नॉट बॅड इन डान्सिन्ग. Happy

झेन्डेचा डान्स. Lol

झेन्डे ईशाच्या आईला बाथरुम मध्ये बन्द करतो 'झेन्डे म्हणाव' म्हणून

तो मोजडी लपवण्याचा सीन कैच्याके होता. इतक्या सोप्या जागी कुणी लपवतात का मोजडी?

आईसाहेब विसला अस का म्हणाल्या की , तुम्हाला ह्या (नवरदेवाच्या वेशात) रुपात पाहण्यासाठी माझे डोळे आसुसलेले होते? म्हणजे नन्दूच्या वेळी त्याने पळून जाऊन लग्न केल होत का? Uhoh

कविता. Lol

आता या लग्नाच्याच 2-४, एपिसोडमध्ये एकदा विस झेंडेला म्हणतो की आता तू देखील लग्न करायला पाहिजे बरं का.. किती दिवस एकटं राहणार वै वै.
अन माझ्या हृदयाचा थरकाप झाला.. म्हटलं आता झेंडे रुपालीचे लग्न उरकून घेतात की काय याच मांडवात. Lol

Pages