Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईळू जाम आवडल.
ईळू जाम आवडल.
बाकी सध्या बघावीशीच वाटत नाही सध्या.विसचा लूक,बापरे.नाच्याज वाटला मला त्या निळ्या कपड्यात.सुरमा की काजळ घातल आहे.
आता एकच आशा.शितु,तू छुपी है कहाँ
मलाही माल, वजनावरचे जोक्स
मलाही माल, वजनावरचे जोक्स आवडत नाहीत. पण तेवढे इग्नोर करून बाकी पोस्ट धमाल आहे
मायरा (गहन विचार करून): झेंडे, अहो आपण क्रेन बोलवूया ना... >>>
ते ऐकताच सॉन्या: "आपण इटलीहून क्रेन मागवू"
जयदीपः "त्यापेक्षा आयफेल टॉवर विकत घेउन त्या क्रेन मधून तो ही आणू येथे"
पिंकीमावशी: "आमच्या पुण्यात तर सायबेरियन क्रेन्स येतात"
विक्या, डोक्याला हात लावून: "अहो ते वेगळे. ते पक्षी आहेत"
मंडळी आजच्या भागाचं रसग्रहण!
मंडळी आजच्या भागाचं रसग्रहण!
केड्याच्या फँटसीप्रमाणे संस्कृतिरक्षक, मीडिया २०० रु रोजाच्या कार्यकर्त्यापरमाणे आणि चेहऱ्यावरची माशी उडणार नाही या आवेशाने घोषणा देत येतात. हे पाहून इशा जगप्रसिद्ध भोकाड पसरते. मग विकीला फोन लावते. मग सर, ते दार तोडतील का? सर ते घरात येतील का? सर ते काय करतील? पुढे काय होईल? असे बालिश प्रश्न विचारते. अग बाई, त्याला काय माहीत? तो काही ज्योतिषी आहे का? उद्या लग्नानंतर रस्त्यावर पथारी पसरून त्याला पोपट देऊन भविष्य सांगायला ठेव! शेजारी चकल्या, आणि साड्या सगळं विकायला ठेव! तुमचा लग्नाचा चाळा बघून लवकरच ही वेळ येईल.
विकू तिला तिच्या कॉलेजची आठवण सांगतो, नशीब त्या पोरांनी हिला बघून भोकाड पसरलं नाही, हिला का आणलं इकडे! मग म्हणतो 'दाट्स माय गर्ल.' वा! हा ग्रे केसांवाला फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे चालू करणार बहुतेक!
मग ईबाळ बाहेर येते, आणि म्हणते शांत व्हा... आणि लोक एकदम शांत होतात. इथे मास्तरचा घसा कोरडा पडला, तरी पहिलीतल पोरग शांत होत नाही. असेच जर मीडिया आणि संस्कृतीरक्षक असते तर जग किती सुंदर झालं असत!
मग इशा प्रवचन देते, मग सगळे भारावून जातात.(करणार काय? हिच्यापासून लवकर सुटका हवी तर हे नाटक करावंच लागेल) आणि सुटलो एकदाचे असे भाव घेऊन परत जातात.
मग रुखवतात काय ठेवायचं असं चालू असतं. मला शंभर टक्के डाऊट होता, हे चाळदर्शन आणि चाळीतले लोक किती ग्वाड हे दाखवण्यासाठी आयडिया आहे. तरीही केड्या अक्कल पाजळतो. इशाच्या वागण्याला जागून तिला लिम्लेटच्या गोळ्या आणि पतंगही मिळते.
ता.क. - पतंग आणि इशाच्या ड्रेसचा कलर सेम होता. उरलेल्या कापडातून ड्युरेबल पतंग बनवायचा बिजनेस होऊ शकतो. केड्या घे आयडिया!
ईशा विक्रांत च्या लग्नात
ईशा विक्रांत च्या लग्नात माझ्याकडून आहेर इन ऍडव्हान्स मध्ये ....✉
2 रुपये ,,
क्योंकी 2रुपये भी बहुत बडी चीज होती हे बाबू...
या पत्रकारांनी कहरच केला..लोक
या पत्रकारांनी कहरच केला..लोक लग्नासाठी मोर्चे घेऊन कशाला कुणाच्या घरी जाणार
तो त्यांचा घरगुती प्रश्न आहे आणि इशा विभा त्यांच्या घरच्यांना काही प्रोब्लम नाहीये तर या लोकांचं काय चाललं.. लोक मोर्चे घेऊन आले तर वाटलं सिरीयल बंद करा त्यासाठीच आले की काय
विक्रांतचा नवीन लूक पाहून
विक्रांतचा नवीन लूक पाहून पिंकी मावशीने म्हणायलाच हवं!
"अभि तो कवला है रे तू!'
अंजली 12 यांचा निषेध
अंजली 12 यांचा निषेध
कुठे ती रुपगर्विता स्वप्नसुंदरी चवळीच्या शेंगेसारखी शेलाटी आणि कुठे ही रडकी भावली
छे छे नाहीच
बरं बरं.... आय टेक ब्याक माय
इशाला जनरल वाक्य बरी बोलता
इशाला जनरल वाक्य बरी बोलता येतात पण लाजणे, मुरडणे, प्रेमात हरवुन जाणे मधे ती वेडगळ वाटते अगदी, गवरी बरिचच बरी होती हिच्यापेक्षा.
अज्ञातवासी.रसग्रहण आवडल.भाग
अज्ञातवासी.रसग्रहण आवडल.भाग नाही पाहिला.पण हे वाचून नाही पाहिला तेच योग्य .
इशा देवसेनेसारखी>>>>>>>>
इशा देवसेनेसारखी>>>>>>>> नहीssssssssssssssssssss
सरंजाम्याचा नवा लुक नटरंग
सरंजाम्याचा नवा लुक नटरंग सारखा झाला आहे. कुठे तो पहिल्यांदा भेटलेला मध्यमवयीन डॅशिंग विक्रांत आणि कुठे हा चिकन्या विक्या.
काय योगायोग बघा..
काय योगायोग बघा..
१३ ला विक्रांत सरंजामे ईशाबरोबर दुसरे लग्न करतोय, आणी १४ पासुन रात्रीस खेळ चाले सुरु होतीय.
कस्सकाय साभार
१३ ला विक्रांत सरंजामे
१३ ला विक्रांत सरंजामे ईशाबरोबर दुसरे लग्न करतोय, आणी १४ पासुन रात्रीस खेळ चाले सुरु होतीय. >>>
(No subject)
स्लिपर्स
स्लिपर्स
स्लिपर्स देवा रे! सुभा नाच्या
स्लिपर्स देवा रे! सुभा नाच्या वाटतोय्,इबाळ बरं दिसतेय तिच्या त्या मठ्ठ हसण्यासहित.
स्लिपर्स देवा रे! सुभा नाच्या
स्लिपर्स देवा रे! सुभा नाच्या वाटतोय्,इबाळ बरं दिसतेय तिच्या त्या मठ्ठ हसण्यासहित.
अर्र! नाच्या काय?
अर्र! नाच्या काय?
इशा छान दिसतेय
सुभा नाच्या वाटतोय्,>>>+१११
सुभा नाच्या वाटतोय्,>>>+१११
ईशा खरेच छान दिसतीये
२-२ रूपये आहेर वाला जोक भारी
२-२ रूपये आहेर वाला जोक भारी आहे
अरे झी मराठीचे फेसबुक पहा.
अरे झी मराठीचे फेसबुक पहा. मैत्रिणीने आत्ताच कॉल केला अन म्हणाली की तिथे विकीशा नाव होते. हे नाव मायबोलीवर त्यांना कुणीतरी दिलेले आहे ना? बहुतेक फारेंडने. म्हणजे ते लोक पण मायबोली वाचतात वाटत.
मी नाही. दुसर्या कोणीतरी
मी नाही. दुसर्या कोणीतरी दिले आहे. लक्षात नाही.
तिथे विकीशा नाव होते. हे नाव
तिथे विकीशा नाव होते. हे नाव मायबोलीवर त्यांना कुणीतरी दिलेले आहे ना? >>>>>>> नाही. ते नाव मायराने दिले आहे.
परवा निमकर कर्जतच्या बन्गल्यात पुष्पासमोर अन्गावर साडी घेऊन दाखवत होते, मला वाटल आता तिकडे पण साडी नेसून दाखवतात की क्कॉय.
पिन्की मावशी सॉन्याच्या वरताण आहे. सॉन्याला पुरुन उरणार आहे ही.
हि अशी एका दिवसात कम्पनी विकत घेता येऊ शकते? तेही एका फोनकॉलवर? ना कुठली मिटिन्ग, ना कुठले कॉन्ट्रेक्ट, ना त्या कम्पनीविषयी जुजबी माहिती , आणि ना कुठले डॉक्यूमेन्टस.
ती सोनल सारीजची सोनल हयान्च्या लग्नात येऊन धडकायची, म्हणायची, 'माझी कम्पनी विकत घ्यायची हिम्मत कुणी केली?, तिसुद्दा विसवर फिदा व्ह्याची. लग्नाच्या दिवशीच ईशाला नवीन सवत मिळायची.
बादवे, ती मिडिया, सन्सकृतीरक्षक कोणी पाठवले होते? मायराने? सिनिअर टिल्लूने? झेन्डेने? सॉन्याने? की जालिन्दरने?
ईशाने बरा अभिनय केला सन्सकृतीरक्षकान्समोर भाषण देताना. आता ती विसचा बदला कसा घेतेय ते बघूया.
मायरा ईशावर इम्प्रेस झालीये तिचे भाषण ऐकताना असे वाटले.
ईशा जेव्हा सन्सकृतीरक्षकान्ना विचारते की, 'तुम्ही हे सगळे प्रश्न मला का विचारता? तेव्हा त्यान्नी तिला उलट विचारायला पाहिजे होत, 'का ग बाई, प्रश्न विचारुन डोक खाण्याचा मक्ता तुच घेतलास का? '
ती सन्सकृतीरक्षकाची आयडिया केडीने म. टा. बातमीवरुन घेतली वाटत.
निमकरानी इशाने काढलेल चित्र हॉन्टिन्ग होत. लोणच, लिमलेटच्या गोळया, पेस्ट्री हे ठिक आहे. पण पतन्ग? सॉन्या ह्या सगळया गोष्टी फेकायला लावेल.
जयदीप खरच चान्गला मुलगा आहे, निमकरान्ना किती साम्भाळून घेत होता. सॉन्यासारखा अॅटिटयूड दाखवला नाही त्याने. फक्त त्याने चाळीतल टॉयलेट बघून ओवररिएक्ट केल ते स्वाभाविक होत म्हणा. त्याला असल्या गोष्टीन्ची सवय नाही, सो इटस ओके.
अबोल, दोन रुपयान्चा जोक मस्त आहे. पण त्याची सुरुवात आधी विसने केली होती ना, पत्रिकेच्या बॅगला दोन रुपये चिकटवून?
ईशा छान दिसतेय, पण सुभा इतक्या कमी दिवसात बारीक कसा काय झाला?
कपडयान्ची आणि चपलान्ची चॉईस चुकलीये त्याची.
ईशा, मी तुझ्या डोळयात बोट घालू?
ऐन लग्नाच्या धामधूमीत टिल्लू
ऐन लग्नाच्या धामधूमीत टिल्लू गायब आहे.
जयदीप- आईसाहेब सन्गीतमध्ये
जयदीप- आईसाहेब सन्गीतमध्ये 'आई मला पवायला जायच, जावु दे ना' वर परफॉर्म करणार आहे.
https://www.facebook.com/zeemarathiofficial/videos/1224899097661384/
विकिशाचा परफॉर्मन्स:
https://www.facebook.com/zeemarathiofficial/videos/476079436253559/
विकिशाच लग्न:
https://www.facebook.com/zeemarathiofficial/videos/374160753399307/
(No subject)
(No subject)
(No subject)
अजून बरेच फोटो आलेत कायप्पा
अजून बरेच फोटो आलेत कायप्पा वर, ईशा सुंदर दिसतीये सगळ्यात☺️
Pages