तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इशा छान दिसतेय मात्र सुभा पेक्षा. मुंडावळ्या आणि दोघांचा एकत्र फोटो आहे तिथे दोन्ही ठिकाणी.

दोन रु महत्वाचे मानणारी लग्नात इतका खर्च कसा करू देतेय.

तुला पाहते रे!
लाईव्ह अपडेट!
सगळी चाळ गिरीकदं ट्रॅव्हल ची जाहिरात करत, गाणी गात बसमध्ये बसली होती. इशाबाळ मी मंद असूनही किती मॅच्युयर आहे हे दाखवत गाणं पुटपुटत होती. उगाच भावपूर्ण वगैरे होण्याचा प्रयत्न करत होती. मध्येच सुभा इशाला फोन करतो, आणि प्रेमभऱ्या बालिश गप्पा मारतो.
चाळकर मंडळी लग्नभर आपला छळ करण्याच्या इराद्याने निमकरांच्या सोबत बसमधून उतरतात. कोणत्याही शुभकार्यच्या सुरुवातीला गणपतीची आरती करावी, हे बँडवाल्यांना उमजल्यामुळे ते आरती वाजवतात, पण चाळीतले लोक किती निरागस, उत्सवप्रिय, आनंदी वगैरे दाखवण्याच्या भानगडीत केड्या पात्रांच्या तोंडी नाचण्यासारखं गाणं लावा हे वाक्य घुसडतो. धन्य! आधीच त्या विकीचा नाच्या केला, आता नाचा!
मग चाळीतले जरा खाण्यापिण्याची व्यवस्था बघण्याच्या नादात असतांना, झेंडे येऊन त्यांना VIPच लग्न कसं असतं, याची झलक दाखवतो.
यात मात्र ईबाळ भावपूर्ण मतीमंद भाव दाखवत सुभाकडे जाते. तिथे तोही हिच्यासमोर काय चांगला अभिनय दाखवावा म्हणून जस्ट मतिमंदसारखं हसून बोलतो. मग ही फर्माईश करते. अशी फर्माईश आजपर्यंत कुणी कुणाच्या लग्नात केली नसेल.
"सररररररर,,,,,,,.......!!!!!!! तुम्ही माझ्या हातावर मेंदी काढायची बरका."
केड्या नरकात जाशील रे तू. आधी नाच्या केला, आता मावशी बनवतोय का?(मी आधीच बोललो होतो, या केड्याची वाईट नजर आहे.... पुरुषांवर)
मग हा मंदहसू विकू म्हणतो चॅलेंज असेपटेड!
मारा कपाळावर हात.

सररररररर,,,,,,,.......!!!!!!! तुम्ही माझ्या हातावर मेंदी काढायची बरका.">>>हे असं दाखवलं की गमतीत लिहिलंय????????????????????????

सुभाचा लुक गंडला आहे. मी आता पूर्वी दिसायचो त्यापेक्षा छान दिसतोय या भ्रमात आहे .. अभिनय मात्र कंसिस्टंट आहे..
ईशा ची गाडी 2 एक्सप्रेशन्स per scene इथपर्यंतच आहे.. क्यूकी 2 एक्सप्रेशन्स भी बडी चीज होती है बाबू

>>>ईशा छान दिसतेय, पण सुभा इतक्या कमी दिवसात बारीक कसा काय झाला? Uhoh कपडयान्ची आणि चपलान्ची चॉईस चुकलीये त्याची.
कपडयान्ची आणि चपलान्ची चॉईस पण चुकलीये त्याची.
Proud

नवीन जाहिराती बघितल्या का?
विस ईशा सैराट झालं जी डान्स
झेंडे मायरा माझं सोनूल सोनूलं
आईसाहेब जयदीप जाऊ दे नवं
हे dances
पहाच..

ते वॉट्सॅप वरचे फोटो कसे चिकटवायचे इकडे?

विकिशाचा परफॉर्मन्स:
https://www.facebook.com/zeemarathiofficial/videos/476079436253559/

अयाया... काय भयाण नाचत आहेत दोघे Proud
विक्या फारच अवघडलेला डान्स करतोय असं वाटतंय आणि ही ईबाळ तर नो कमेंट्स Wink

बाप रे! आजच्या एपिसोडात ईबाळानी सससरांनी मेंदी काढावी, तिच्या हातावर, असा हट्ट धरलाय. म्हणजे उद्या सुभ्या बालगंधर्व मोडात दिसणार!

केड्याच्या डोक्याला सलाम!

अयाया... काय भयाण नाचत आहेत दोघे >>> +११११११

नाच्या दिसतोय असं कसं काय लिहितात लोक Uhoh
इशा छान दिसतीये.
सुभाने इशाच्या हातावर मेंदी काढाण्याची आयड्या बालिश आहे.
आणी मांडवात सगळे बसलेले असताना स्टेजवर हा तिचे हात हातात घेउन, तिने बळंच लाजल्यासारखं काही केलं की तिची हनुवटी धरुन चेहरा वर करतोय. काहीच्या काही. सुभासारख्या मॅचुअर वयस्कर माणसाला ते शोभत नाहीये.

लग्नात इतका आचरटपणा केल्यावर हनिमूनला काय दाखवतील देव जाणे.
ईबाळ म्हणेल सर मी आई वडिलांना सोडून कुठेही गेली नाहीये त्यामुळे विस परिवार सहकुटुंब आणि मायरा झेंडे सकट हनिमूनला जातील अशी दाट शक्यता वाटत आहे

तो वनपीस असुनही, तो घसरतोय असे दाखवत ईईबाळ तो वरखाली उचलतेय. Rofl (का खाज सुटलीय तिच्या अंगाला देव जाणे ?)

जाम बथ्थड भाव आहेत बाबा हिच्या चेहेर्‍यावर.

फारएंड, ओके.

आशुचँप Rolling laughter

क ss ह ssर कमेंट्स आहेत सगळ्यांचे Lol

ऑलरेडी आपल्याला आयफेल टॉवर वगैरे दिसतय ना. कुडकुडणारी थंडीने कुडकुडणारी ईशा आणि तिला कोट पांघरणारा विक्या.

मायबोलीवर कमी ट्रोल करायला हवं या सिरीयलला. उद्या मायबोली विकत घेऊन त्याचे पण चेअरमन होतील ते.>>>> Lol खरंय
इथे तर फोन बिन काही करायची गरज नाही. फक्त एक धागा काढतील मायबोली विकत घेतलीये म्हणुन.

अज्ञातवासी>> तुम्ही इतकं बारकाईने बघता? आवडते सिरियल?
Submitted by DShraddha on 10 January, 2019 - 12:58>>>>>>
श्रद्धा, इथल्या कमेंट वाचून बघायला लागलो. इतकी भारी आहे ना सिरीयल, हसून हसून पोट दुखतं, प्रत्येक मुर्खपणावर! चला हवा येऊ द्याला भारी आहे!!!
प्रत्येक भागात एकतरी कहर पंच असेल, याची फुल गॅरंटी!
"सररररररर,,,,,,,.......!!!!!!! तुम्ही माझ्या हातावर मेंदी काढायची बरका." Rofl

शुगोल........सीतेने सोन्याचे हरिण पाहिजे असा हट्ट केला होता,ईथे बाळ तिच्या वयाला शोभेल असे हट्ट करत आहे.

राम बायको हट्ट पूर्ण करत होता
विस बालहट्ट पूर्ण करत आहे
बाळाचे हट्ट
सर....मला शिळ्या पोळीच्या लाडवाचा घास भरवा ना
अग बाई,नको ग नसलेली पाझळू
अस काय हो सर
बर
सर.....मला आता इथे एका बोटाने पियानो शिकवा ना.
सर....नंतर हेलिपँडमध्ये बसून त्या दिवशी जशी अंगठी घातलीत तस मंगळसूत्र घाला ना.
विस......मनातल्या मनात(सॉलिड)
ईशा,तुला काळा दोरा पण चालणार आहे ना,ठीक आहे,हेलिपँडमध्ये चलच.आता दाखवूनच देतो ,मायबोलीकरांना,ईशा मालिकेच नाव सार्थ ठरवते काय.थांबा,आता आधी हिला हेलिपँडमध्ये पाहतोच रे मग येतोच रे मायबोलीवर.

सररररररर,,,,,,,.......!!!!!!! तुम्ही माझ्या हातावर मेंदी काढायची बरका." Rofl >> मी मिस केलं. 5 मिनिटाच्या वर बघावसं वाटत नाही. त्यापेक्षा कूल्फी बरी!

सॉरी पण नाच्या दिसतो, बायल्या दिसतो हया कमेन्टस आवडल्या नाहीत. तसच, पुरुषाने स्त्रीच्या हातावर मेहन्दी काढली म्हणजे ती मावशी कशी काय झाली? मान्य आहे, सुभाला तो Costume शोभत नाही, पण पुरुषाने रन्गीबेरन्गी कपडे घालूच नये, स्त्रियान्च्या हातावर मेहन्दी स्त्रियान्नीच काढायल हवी हे नियम हवेतच कशाला?

सॉरी पण नाच्या दिसतो, बायल्या दिसतो हया कमेन्टस आवडल्या नाहीत. तसच, पुरुषाने स्त्रीच्या हातावर मेहन्दी काढली म्हणजे ती मावशी कशी काय झाली? मान्य आहे, सुभाला तो Costume शोभत नाही, पण पुरुषाने रन्गीबेरन्गी कपडे घालूच नये, स्त्रियान्च्या हातावर मेहन्दी स्त्रियान्नीच काढायल हवी हे नियम हवेतच कशाला?>>>> +11111
mala hi Nahee patal... Kadhi Kadhi chukichya make up mule... Look jar Vegala Disat Asel... Tar Lagech ase Bolan he Kuthe tari manala patal Nahee.. Pan Shevati Swatache personal views

इशा छान दिसतीये. >>>>>>>> ++++++++१११११११

सुभाने इशाच्या हातावर मेंदी काढाण्याची आयड्या बालिश आहे. >>>>>> एकान्तात, प्रायव्हसीमध्ये तो तिच्या हातावर मेंदी काढतो अस दाखवायला हव होत. हे अस सगळयान्समोर, तिची हनुवटी वर करणे, मेंदी काढणे हे मात्र बालिश आहे.

चला , कालच्या एपिसोडच्या निमित्ताने, विस एकदाचा रॉमेन्टिक झालेला बघायला मिळाला. नाहीतर जेव्हा बघाव तेव्हा हयान्च आपल एकच ' आँखों आँखों में' चालू असायच.

पिन्की मावशी जेव्हा बसमध्ये मी कुठे बसू विचारते तेव्हा निमकर त्यान्च्या डोक्यावर हात ठेवून ( आता आमच्या डोक्यावर बसलेलीच असते सदानकदा, आणखी तुला कुठे बसवू हया अर्थाने) जो काही पन्च मारतात ते भारी होत.

माहीमकर एवढे बुटके आहेत? Uhoh आधी कळल नव्हत.

Pages