तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mala hi Nahee patal... Kadhi Kadhi chukichya make up mule... Look jar Vegala Disat Asel... Tar Lagech ase Bolan he Kuthe tari manala patal Nahee.. Pan Shevati Swatache personal views >>>>>>>>> ++++++++++१११११११११

>>>सुभाला तो Costume शोभत नाही, पण पुरुषाने रन्गीबेरन्गी कपडे घालूच नये, स्त्रियान्च्या हातावर मेहन्दी स्त्रियान्नीच काढायल हवी हे नियम हवेतच कशाला<<<

हा तुम्ही काढलेला निष्कर्ष आहे की पुरुषांना नियम कशाला वगैरे. मी फक्त रंगरण्गोटी आणि खुपच विचित्र रंगसंगती घालण्यावर कमेंट केलीय. नियम वगैरे अर्थ कशाला घुसवताय?
बायल्या म्हणून पुर्वी पात्र असायचे तमाशात त्याच्याषी फक्त हे साम्य वाटले ह्याच अर्थाचे आहे.
तेव्हा रिलॅक्स,

बायल्या म्हणून पुर्वी पात्र असायचे तमाशात त्याच्याषी फक्त हे साम्य वाटले ह्याच अर्थाचे आहे.
तेव्हा रिलॅक्स, >>>>>>>>>>>> ++++++++११११११११११ सहमत

>>>एकान्तात, प्रायव्हसीमध्ये तो तिच्या हातावर मेंदी काढतो अस दाखवायला हव होत. हे अस सगळयान्समोर, तिची हनुवटी वर करणे, मेंदी काढणे हे मात्र बालिश आहे.<<<
हे कसं बालिश मग? आधी म्हणायचं , पुरुषाने मेंदी काढूच नये असे नियम कशाला? मग कशी, कुठे व कधी काढावी हा तरी नियम कशाला?

सुभा चा मेक अप मला पण फारसा नाही आवडलाय .. पण त्यानिमित्ताने त्याला आंघोळ करायला, दाढी करायला , केस नीट विंचरायला मिळालं हे नशीब आपलं . गेल्या काही एपिसोडस मध्ये त्याला बघून "साबणाने खसाखसा तोंड धुवून ये" असं सांगावंसं वाटत होतं ! इतका चिकट गोपट तेलकट दिसायचा ..
बाकी यांच्या लग्नात संगीत मेहंदी आहे आणि घरचं केळवण ग्रहमख काही नाही दिसते .. जौद्या झालं !

मग कशी, कुठे व कधी काढावी हा तरी नियम कशाला? >>>>>> सर्वान्समोर मेहन्दी काढत नाचण म्हणजे प्रेमाच प्रदर्शन केल्यासारख वाटत. सन्गीत मध्ये एकत्र नाचले ते ठीक आहे.

सुभा चा मेक अप मला पण फारसा नाही आवडलाय .. पण त्यानिमित्ताने त्याला आंघोळ करायला, दाढी करायला , केस नीट विंचरायला मिळालं हे नशीब आपलं >>>>>>>>> +++++++१११११११

विक्या ने तिच्या हातावर मेहंदी काढली हे objection आहे की सगळ्यांसमोर मेहंदी काढली हे आहे?

सुभासारख्या मॅचुअर वयस्कर माणसाला ते शोभत नाहीये.+1111
नाच्या ई ई कॉमेंट्स बरोबर नाहीत मान्य, पण सुभा सारख्या अभिनेत्याला एवढं कळू नये का आपण कसे दिसायला पाहिजे, आधीचा लुक मॅच्युअर होता. आत्ताचा लुक बेरकी किंवा लंपट माणसासारखा दिसतोय. वयाला न शोभणारा...., किती आचरटपणा दाखवत आहेत मालिकेत...

शुगोल........सीतेने सोन्याचे हरिण पाहिजे असा हट्ट केला होता,ईथे बाळ तिच्या वयाला शोभेल असे हट्ट करत आहे. >>> एकदम पटलं.

पुरुषाने मेंदी काढूच नये असे नियम कशाला? मग कशी, कुठे व कधी काढावी हा तरी नियम कशाला? >>> अगदी अगदी

मी एका लग्नात पुरुषाच्या हातून मेंदी काढून घेतली आहे. तो कॉलेज स्टूडंट होता. त्याची मावशी मेंदीचा बिझीनेस करायची. याचे ड्रॉईंग चांगले होते. मावशीकडे बेसिक धडे घेऊन हा तिच्याबरोबर मेंदीला जाऊ लागला. त्या दिवशी , त्या मेंदीला तो हिट झाला हे सांगायलाच नको.

डोळ्यात काजळ, गळ्यात माळ, अंगावर जाकीट, तंग तुमान, गुळगुळीत दाढी... हे सगळं एकदम झाल्यामुळे विचित्र वाटतंय खरं. आधीच छान होता.

सुभा सारख्या अभिनेत्याला एवढं कळू नये का आपण कसे दिसायला पाहिजे, >>>> त्याला नक्की कळत असेल. पण तो निर्माता नाही. दिग्दर्शकही नाही. पण एक नक्की. तो या सगळ्या न आवडणार्‍या गोष्टी करण्याचे वाजवून पैसे घेत असेल. अशा यडपट गोष्टीतून भरपूर पैसे मिळवले तरच एखादा कमी पैसे देणारा "लोकमान्य टिळक" करता येतो.

अशा यडपट गोष्टीतून भरपूर पैसे मिळवले तरच एखादा कमी पैसे देणारा "लोकमान्य टिळक" करता येतो.>>>>>>+१११११
त्याला जे हवं ते त्याने करावं. आपण मस्त त्याला ट्रोल करावं. Rofl

डोळ्यात काजळ, गळ्यात माळ, अंगावर जाकीट, तंग तुमान, गुळगुळीत दाढी... हे सगळं एकदम झाल्यामुळे विचित्र वाटतंय >>> +१११

म्हणून तर त्याला नाच्या बोलली मी, अन त्यात त्याला हिनविण्याचा प्रश्नच नाही. ,तमाशात नाच्या म्हणून जो माणूस असतो तो अगदी असाच दिसतो , सो त्यात काय एवढे Uhoh

सुभा सारख्या कलाकाराला खरेच हे लक्षात आले नसेल का की किती विचित्र ध्यान दिसतोय तो Proud

म्हणून तर त्याला नाच्या बोलली मी, अन त्यात त्याला हिनविण्याचा प्रश्नच नाही. ,तमाशात नाच्या म्हणून जो माणूस असतो तो अगदी असाच दिसतो >>>>>>अगदी अगदी.पान ४२ वरचा त्याचा फोटो तसाच वाटला.म्हणून जे वाटलं ते लिहिलं.असो.

तुला पाहते रे, लाइव्ह अपडेट!
ईबाळ विकुची आबाळ करण्यासाठी पुन्हा पुन्हा हात दाखवतेय. विकु 'आता जर हात दाखवला तर त्याच हाताने मारेन,' हे गिळून मंदहसू दाखवतोय. ईबाळ लाजण्याचे एक्सप्रेशन दाखवण्याचा प्रयत्न करून भयाण चेहरा करतेय.
तेवढ्यात सुसह्य मायरा येते, व घोषणा करते, की आता आपण ईशा व विकुच्या आयुष्यातले काही महत्वाचे प्रसंग बघणार आहोत.
प्रसंग क्र १. निमकर व पुष्पा - तेलाचा डबा घेऊन येण्याचा प्रसंग. (हा प्रसंग लिहिल्याबद्दल केड्याला पुष्पाला उचलून चाळीपर्यंत नेण्याची शिक्षा द्यायला हवी)
२. कहर! कहर! मी दोनदा हसून पडलोय - माझं शोनुल, छकुल फिचरिंग मायरा = विक्रांत आणि झेंडे = ईबाळ. ईबाळ अंगठा चोखत असतं, आणि शेवटी जगप्रसिद्ध भोकाड पसरतं. झेंडेला ऑस्कर माझ्याकडून. (आणि खरंच असं झालं? असं विचारू नये)
३. मॅगी सिन - रुपाली व बिपिन. ही जोडी छान जमेल.
४. जयदीप सोन्या - सुसह्य. तो बोळा मारण्याचा सिन. तसाही इथे लॉजिकवर बोळा फिरलाय म्हणा!
मग येतात विकू आणि इशा. चिट्ठीत मेहंदी लिहिलेली असते. मग इबाळ 'माह्या नवरा किती भारी करत 'बघते. विकुही आज तू जसा अभिनय करशील, त्याच लेव्हलला मी उतरेन म्हणून दोघे प्रेक्षकांचा अंत बघतात. ऑन अ सिरीयस नोट, इथे जेव्हा सुभा गालात हसतो, तेव्हा तो नाच्याच वाटतो, हिणवत नाहीये, पण सिनेमात नाचाची भूमिका करणारे असाच अभिनय करतात. काजळ लावताच तो त्या भूमिकेत शिरत असावा.
चाळीवाल्यांची समुद्रकिनाऱ्यावर पार्टी चाललेली असते, आणि झेंडे त्यांना दारू पुरवतो. ईबाळ आणि विकू एकटे बसलेले असतात, तो म्हणतो असं वाटतंय हे चंद्र, सूर्य, तारे, दऱ्या, खोरे, नद्या, नाले, समुद्र, दगड, धोंडे, भिलावे, बिब्बे, लिंबू, मिरची सगळे आपल्याकडेच बघतायेत, आणि मी म्हणतो, नाही बाबांनो, तुमच्या सिरियलचे असले चाळे बघून ते केव्हाच तोंड झाकून पळाले असतील.
रसग्रहण समाप्त!

त्यान्च्या डोक्यावर हात ठेवून ( आता आमच्या डोक्यावर बसलेलीच असते सदानकदा, आणखी तुला कुठे बसवू हया अर्थाने) जो काही पन्च मारतात ते भारी होत.>>>>> हो हो फिस्स्कन हसू आलं त्या सीनला. त्यांची नोकझोक मस्त दाखवलीये पण तिने निमकरांना भाऊजी म्हटलं असतं तर जास्त शोभून दिसलं असतं असं वाटतं.

परवा ईशा चाळीतून निघताना ईआईचे 'बघता बघता पोरगी निघाली की हो' आणी बाबांचे एक्सप्रेशन्स मस्त..

भोर मध्ये समुद्र किनारा कसा काय बुवा?, असो पण एक प्रश्न मला पडला आहे, ह्या सगळ्या celebrations मध्ये विक्रांतला स्वतःच्या पहिल्या लग्नाची आणि बायकोची पुसटशी सुद्धा आठवण येत नाही का? आणि तो जालिंदर कुठे गायब झाला????

तो जालिंदर कुठे गायब झाला>>>
मलाही हाच प्रश्न पडला..
पण केड्या एक वेळी एकाच ट्रॅकवर विचार करू शकतो..

आज finally विस ईबाळाला म्हणाला कि मला सर म्हणू नको. फक्त विक्रान्त म्हण. हुश्श....दर्शक त्या सर्र्र्र्र.. मधून सुटले!!! Happy

त्या जालिंदरला फक्त या दोघांचं ब्रेकप - पॅच अप दाखवता यावे म्हणून घेतले होते असं वाटतं.
तेवढाच जरा झेंडेना जास्तीचा रोल करायला मिळाला. Happy

बादवे, कालच्या भागात अजून एक संगती नसलेले वाक्य ऐकायला मिळाले लग्न होईपर्यंत नाही भेटून शकत ना? असं ईबाळ म्हटल्यावर विस म्हणतो पण मी आत्ताच तर आलोय Uhoh

ही कधीपर्यंत सर हाक मारणार आहे?

विक्रांत=सर
झेंडे=अडसर
मायरा= अग्रेसर
इशा=वेडसर

Whatsapp साभार...

मेहन्दीच्या प्रसगात माझ शोनुल वाल गाण म्हणजे कहर होता, अरे काय हे! देवा अजुन काय दिवे लावतात काय माहिती?
सुभाला क्लिन शेव्ह लुक सुट होत नाहिये आणि वर त्याला मेकप , थोडा कलरफुल अटायर अस सगळ विसन्गत वाटतय त्यातही त्याने बालगन्धर्व केला होता... इतका गाजलेला चित्रपट , त्याचा तोच लुक कुठतरी रिफ्ल्केट होतोय अस वाटतय.
सुभला यन्ग दाखवायच म्हणून क्लिन शेव्ह लुक दिला तरी थोडा डस्की मेकप करायला हवा होता कारण सुभा गोरा आहे त्यात मेकप पर्सन ने जर १ लेयर जरी चमकदार मेकप केला की सगळिच बोन्ब...

म्हणू नको. फक्त विक्रान्त म्हण. हुश्श....दर्शक त्या सर्र्र्र्र.. मधून सुटल
############
कॅंआआय रे विक्रांत $$$$$ मध्ये अडकतील..

Pages