Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटी आई आणि भेंडे.. सॉरी
शेवटी आई आणि भेंडे.. सॉरी झेंडे चा सीन धमाल होता... 2 तासात तेवढंच अकृत्रिम आणि भारी वाटलं मला.. Hehe
लग्न सोहळा नाही पाहिला..
लग्न सोहळा नाही पाहिला.. झेपलं नसतं.
पण बहुतेक पुढील प्रकरण हे कर्ज चा स्त्री रिमेक वाटतोय.. म्हणजे पहिली बायको ईशा म्हणून आली आहे. (ओम शांती ओम.. लिहीणार होतो पण मग दुसरा विस आणावा लागेल. एक सध्या पुरे आहे!)
काँस्पिरसी थियरी: पहिली बायको द ग्रेट सरंजामे (सिनीयर) ची कन्या. विस तिकडे कामला लागला. मग प्रेम झाले. मग लग्न. पण विस ने तीचा खून केला. धंदा, प्रॉपर्टी सर्व हडपले वगैरे. अर्थात हे फक्त त्या दोघांनाच माहित. झेंडे त्या कटात शामिल. मायरा कदाचित त्या पहिल्या बायकोची मैत्रीण. तीला देखिल बदला घायचा होता. पण ईबाळा ने पहिली बाजी जिंकली. आता ईबाळा ला पास्ट लाईफ ची स्वप्ने पडणार.. मग हळू हळू सर्व आठवणार.. मग शेवटी ईबाळ व मायरा दोघी मिळून (ईबाळा च्या एकटीने एव्हडे चतुर काम होणे नाही.. तिथे मायराच हवी.) बदला घेणार.
जालींदर ला त्या खूनाबद्दल सर्व माहित असावे.. म्हणून तो विस च्या मागावर आहे. आणि पुढे ईबाळा ला मदत करणार.
अजून एक वर्षे तरी सुभा चे मिटर मस्त चालू राहील..
एका वर्षाने ती मोठ कुंकू लावलेली बाई मग समोर येणारः पोरी आज तुझे सर्वे देणे फिटले. चल आता मळवट भर आणि व्हिक्टरी नाच कर.
प्रश्ण एव्हडाच ऊरतो की आधीच्या जन्मात ईतकी गर्भश्रीमंत बायको तीने चाळीत कसा काय जन्म घेतला. बहुदा निमकरांची राजनंदिनीची साडी वरील कर्तव्यनिष्ठा बघून बहुदा तीचा आत्मा गहिवरला असवा.. आणि अशा प्रकारे लो प्रोफाईल ठेवल्याने कुणालाच संशय येणार नाही असे गणित असावे.
असो.
पोरी आज तुझे सर्वे देणे फिटले
पोरी आज तुझे सर्वे देणे फिटले. चल आता मळवट भर आणि व्हिक्टरी नाच कर >>>
योग.कथि खूप आवडली.पण विसला
योग.कथि खूप आवडली.पण विसला खुनी दाखवल तर तमाम सुभाप्रेमींना सहन होणार नाही.म्हणून थोडा बदल करत आहे,तुमच्या परवानगीशिवाय,विस आणि झेंडे धमकी द्यायला गेले असतील,पण झेंडे मिरेल आणि विस ते लपवून ठेवेल(माधुरीचा 100डेज) आणि मग बेबीच्या रुपात येऊन.दोघांकडून गुन्हा वदवून घेईल(कर्ज)
विस गुन्हा कबूल करून जेलात जाईल जी शिक्षा न केलेल्या गुन्ह्याबद्दल आधी जालिंदरने भोगली असेल(अमिताभचा अंधा कानून)
मग बेबी भोकाड पसरून म्हणेल"सर,आय ट्रस्ट यू,तुम्ही जेलातून नक्की परत याल,तोपर्यंत मी"वाट पाहाते मी ग,येणार साजण माझा"हे गाण एका बोटाने पियानोवर वाजवायला शिकिन आणि त्या भिंतीवरच्या तुमच्या फोटोतल्या डोळ्यात बघत,"तुला पाहते रे"हे नावही सार्थ ठरवीन.
लवकर लग्न झालं, अजून थोडं
लवकर लग्न झालं, अजून थोडे एपिसोड ताणायला हवं होतं एकता कपुर स्टाइल.
(No subject)
Udyachya preview madhe Su bha
Udyachya preview madhe Su bha che weglech roop disat ahe! Serial lawkar gundalnar bahutek.
सुभाच्या अभिनयाचा जीव
सुभाच्या अभिनयाचा जीव त्याच्या पांढऱ्या केसांत होता बहुतेक. >>> हे भारी आहे.
छोटासा पीस पाहिला. सुभा आता काहीतरीच दिसतो. त्याचा तो आधीचा गेटअपच चांगला होता. एका शामियाना टाइप तंबूत दोघे बळंच रोमँटिक बोलत होते. मधेच ईशा झोपेतून दचकून उठून बाहेर आली वगैरे होते. नीट पाहिलेले नाही अजून.
(No subject)
तेव्हडे बॅसिनेट रो पण बूक
तेव्हडे बॅसिनेट रो पण बूक करायला सांगा.. आयत्या वेळी नाहीतर धावपळ होईल विस ची.
लग्नाचा एपिसोड महा बोअर झाला
लग्नाचा एपिसोड महा बोअर झाला . सॉन्या एकदम मस्त दिसत होती. तिच्या सगळ्या साड्या हेअरस्टाईल मस्त. डान्स पण भारी. मायरा पण कधीकधी छान वाटली.
पिंकी मावशीचा डायलॉग भारी आवडला 'काय सारखे सारखे गेम्स हे काय ऑलिंपिक आहे का लग्न?"
त्या बळंच रोमँटिक तंबू सीन मधे दोन चंद्र दिसत होते (मी शुद्धीतच होते बरं का!) एक बाहेर कोर आणि विस बोलत असताना त्याच्या मागे गोल
इशाच लाजण आता डोक्यात जायला
इशाच लाजण आता डोक्यात जायला लागलय, कालचा एपिसोड स्किपच केला मी, आजच्या एपिसोड मधे मायरा एक दोन मिनिट सुभाशेजारी उभि अस्ते तेव्हा किती मस्त पेअर वाटत होती, इशाला काहीही विचारल की ती भयाण लाजते .
मायराच चांगली होती. प्रेम
मायराच चांगली होती. प्रेम होतं, दिसायला छान होती.बिझनेस सांभाळायची.
कालचा भाग अजून अॅप वर आला
कालचा भाग अजून अॅप वर आला नाही. दिसला नाही.
लग्नाचा भाग काल रात्री पाहिला. सर्व कपडे स्टायलिंग एकदम बकवास वाटत होते. इतका खर्च करून पण वेस्ट. साखरपुडा मेंदीच्या नंतर मग नाच गाणे, बेकार अशी गेम व डानस स्पर्धा त्यात च ष् क वगैरे कल्पना एकदम बोअर वाटल्या एक्सिक्युशन अतिशय सामान्य. सिनर्जी होम स्टे
पुना गाडगीळ ज्वेलर्स ची जाहिरात फार झाली. पण ज्वेलरी सेट खास नव्हते. त्यात इतके सेट्स समोर असताना सुभाने मायराला तिथलाच एक फालतू बुके धन्यवाद म्हणोन दिला. हे अगदीच हेमटेप णा चे लक्षण. अरे दिला असता एखादा ज्वेलरी सेट तर तिने प्रेमाने ठेवला असता ना.
आणी इथे तिथे अशी रीत नाही तर मी रीत नवी पा डतो आज पासून करत भापत होता.
घरातल्या बायकांनी लावण्यांवर नाचणे, मायराचा नाच मला तरी असभ्य वाटले. साधी पार्टी जास्त नैसर्गिक वाटली असती ना.
लग्न विधी मधे गुरुजींनी पुणेरी पगड्या घातल्या ही तर हाइटच झाली चुकीची. साधी टोपी घालतात.
जयदीप डोक्याने अंमळ अधू आहे का? मेणाचे पुतळे वगैरे. द सरंजामे वेडिंग म्हणे. ब्रिटिश रॉयल समजतो काय स्वतःला?!
इशाने हळद फ्रीज करून एक गो ष्ट सांगायला हवी होती. ३२ क्रोर वाचले असते.
झेंडे नाच वॉज ओके ओके. झिंगाट व हैदोस.
आई व मावशी बाबांनी जावई बापू पाय धुणे व जेवायला पंगतीत बसणे इथे जमेल तेव ढा म म पणा करून बघितला.
लग्नाच्या आधी बाबा एकदम हायपर होउन तिला पाणी, बिस्किट डबा आहे का म्हणतात ते जेन्युएइन वाटले. सो स्वीट. पन इथे इशाला
अभिनय करायला सॉलिड वाव होता. काळजाला हात घाल णारी सिचुएशन . पण दगडावर वाया की हो गेली.
योग चांगली आहे स्टोरी.
योग चांगली आहे स्टोरी.
बळंच रोमँटिक ला + १
मला फक्त निमकर आणि इशाई चा पर्फॉर्मन्स होता ज्यात निमकर तेलाचा डबा घेउन येतात तेव्हा सुभाने डोळ्यांनी ईशाला खुणावलं ते आवडलं
नैतर सुभा काही एवढा चांगला वाटला नाही वेगवेगळ्या कपड्यांत.
मला वाटतं शितु कोमामधे असेल.
पण असं काही असेल तर सरंजाम्यांनी कल्पना द्यायला हवी होती निमकरांना. पण असोच.
त इतके सेट्स समोर असताना
त इतके सेट्स समोर असताना सुभाने मायराला तिथलाच एक फालतू बुके धन्यवाद म्हणोन दिला. हे अगदीच हेमटेप णा चे लक्षण>>>>>येस्स अमा. मी पण हेच बोलले. अरे बुके काय देतोय तिला. ह्यातलाच एखादा नेकलेस सेट द्यायचा ना.
इशाला
इशाला
अभिनय करायला सॉलिड वाव होता. काळजाला हात घाल णारी सिचुएशन . पण दगडावर वाया की हो गेली.> >>> +१ हे पण पर्फेक्ट.
काल editing च्या कित्ती चुका
काल editing च्या कित्ती चुका होत्या़. वैताग आला. आणि ते विक्रांतच चक्कर येणं संबंध काय
>> हो खूप चुका होत्या editing च्या.. आणि विसच चक्कर येणं तर काहीच्या काहीच
आणि विसच चक्कर येणं तर
आणि विसच चक्कर येणं तर काहीच्या काहीच>> अरे एक तर मधुमेहात एकदम नॉर्मल प्रसंग आहे. तो सकाळी काही जेवला नाही. एक ग्लास दूध तरी प्यायल हवे होते. गोळी नेहमी जेवायच्या आधी असते. किंवा माझी तर एक रात्री पोस्ट डिनर आहे. एकच गोळी दिवसभर काम करी. नवा फ्रॉमुला. हे एक चक्करीचे कारण होते तो उपाशी आहे हे. शुगर डाऊण ली. हायपो ग्लायसेमिया.
दुसरे भावात्मक कारण. सप्तपदी पूर्ण झाली इशाशी लग्न पक्के झाले. म्हणू राजनंदु वहिनींनी सुपरनॅचरल संदेश पाठवला. त्या मुळे चक्कर आली.
, मी हि सिरीयल नियमित बघत
, मी हि सिरीयल नियमित बघत नाही... पण इथल्या कमेंट्स मात्र रेग्युलर वाचते.. तुम्ही सगळे सुभा बद्दल निगेटिव बोलता म्हणजे त्याने शितू चा खून केला असेल वगैरे तर असं काही आधी दाखवलं का? नेमकं काय दाखवलंय?
अन माझ्या हृदयाचा थरकाप झाला.
अन माझ्या हृदयाचा थरकाप झाला.. म्हटलं आता झेंडे रुपालीचे लग्न उरकून घेतात की काय याच मांडवात >>> त्यांच्यासाठी पताका
ईमाशीची ती रीसेप्शन्ची लाल
ईमाशीची ती रीसेप्शन्ची लाल साडी बघितली . त्या साडीसाठी सोनल सारीज विकत घेतली ??
मायराच चांगली होती. प्रेम
मायराच चांगली होती. प्रेम होतं, दिसायला छान होती.बिझनेस सांभाळायची. >>>+++++
हो नं...याला ईशात काय आवडलं याचाच विचार करतेय...!!
मायरा किती छान दिसली लग्नात..तो डान्स सोडला तर....!!
जयदीप म्हणे की मी नासा त चौकशी केलीए...मून वर ट्रीप ची!!
वेडा आहे का तो? एक स्क्रू ढिला आहे थोडा बहुतेक!
सॉन्या बरी वागत्येय की ...!!!
सरंजामे यांना कुणीच नातेवाईक नाहीत का? आत्या, मामा, काका वगैरे...... निदान सॉन्याच्या माहेरचे?
रुपाली चा गुलाबी ड्रेस मस्त होता...आणि तिचे कामही मस्त!
आज दाखवणार आहेत बहुतेक
आज दाखवणार आहेत बहुतेक काहीतरी सस्पेन्स!
विस त्या बन्द गुढ रुममधे जातो आणि इशा त्याच्या नकळत दार ढकलते तर विस जाम ओरडतो. नन्तर तीला पाहुन 'इशा, तु आहेस होय' असे म्हणतो.
इशा त्याच्या नकळत दार ढकलते
इशा त्याच्या नकळत दार ढकलते तर विस जाम ओरडतो>> चोंबडी आहे ईशा.. मागे पण एकदा seniors ची मीटिंग असताना असंच दार उघडून आत डोकावते
इशा त्याच्या नकळत दार ढकलते >
इशा त्याच्या नकळत दार ढकलते >>> ढकलते की ठोठावते ?
ठोठावते.... ह्यात तिने काय
ठोठावते.... ह्यात तिने काय चुकीचे केल... नवरा जिथे होता त्याचच तर दार ठोठावल... कारण तिला एकट ठेवल खाली... ती करणार च ना
ती करणार च ना >> त्यात ते ईतक
ती करणार च ना >> त्यात ते ईतक लहान मूल..
त्यात ते ईतक लहान मूल..>>>>>>
त्यात ते ईतक लहान मूल..>>>>>>>>>
मला सुभा पहिल्या ब्लु ड्रेस मधे नाही आवडला नन्तर यलो आणि साखरपुडा ड्रेस .. लग्नाचा पांढरा कुर्ता ओके वाटला..
सुभा हळु हळु या लुक मधे पण ग्रिप घेइल.. बाळ मात्र बोरिंग
सुभा त्या बळं रोमॅन्टिक सिन मधे येवढा किस बिस घ्यायला आला.. पण बाई छान लाजेल तर शप्पथ ..
नवीन promo बघून आता ही horror
नवीन promo बघून आता ही horror serial वाटत आहे. आईसाहेबांसकट सगळे नवीन नवरी ला एकटीला सोडून गायब!
Pages