Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ अज्ञातवासी.. सिरीयल बघायची
@ अज्ञातवासी.. सिरीयल बघायची गरजच नाही आता. असचं रसग्रहण लिहीत राहा.

नविन लुक वाल्या सुभाशी लग्न
नविन लुक वाल्या सुभाशी लग्न करायचं तर मग बिपीन काय वाईट होता?
आभा, आपल्या सुजाण
आभा, आपल्या सुजाण प्रेक्षकांना आता नक्की कळेल की प्रेमाला वयाचं अंतर नसतं की पैशाचं.
मी पाहिला मेंदीवाला भाग.
मी पाहिला मेंदीवाला भाग. चाळकरी रात्री दारू पार्टी करतात ते बेस्ट आहे. हेअर मेक अप बदलल्याने वेग्ळी दिसते आहे. जयदीप व सोन्याचा
नाच छान आहे. माझे आव ड्ते गाणे नाचायचे. व नॉर्मल शादी स्टफ. सुभा शेजारी आई लसूण सोलत बसली होती का? मायरा च्या गळ्यात कानात काय होते.? त्या पेक्षा बरी ज्वेलरी मी घरी बनवत असते. सोने चाम्दी चे तर काही दिसले नाही. आता अशी ट्रेंड आहे का? मावशी व इतर बायांचा सीन अगदी मस्त रिअलिस्टिक होता.
हे सर्व रिजॉर्ट ची जाहिरात असल्याचाच फील येतो आहे.
नाच्या संदर्भाने: गणपत पाटील पूर्वी फार प्रसिद्ध नाच्या होते. आत्ता गं बया म्हणत तमाशातल्या स्किट मधे. बायकांच्या नाचात मध्ये ब्रेक म्हणून हे लोक कॉमेडी करत.
मला एक जेन्युइन डाउ ट आहे इशा व सुभा प्रेमात पडलेत ते का? विचार एक्स्चेंज केले? का शारिरिक आक र्ष ण आहे? का एक मेकांचा सहवास आव ड्तो. खूपच शालो आहे रिलेशन शिप असे दिसते आहे आत्ता तरी. तिला त्याच्या रोज घ्यायच्या गोळ्यांची नावे तरी माहीत आहेत का? एनिवेज.
विनोद इथे लिहायला आले ते. मुलुंड पूर्व मध्ये आज सेरिमनी आहे. त्यात ह्या सिरीअलच्या दिग्दर्शकांचा काहीतरी मुलुंड गौरव का काय म्हणून सत्कार आहे. लायब्ररीत पाटी वाचून खो खो हसणार् होते. ह्या धाग्याची व प्रति साद कर्त्यांची आठव्ण झाली. पण कशाला पाप म्हणून चुप बाहेर आले. मुलुंड ज्येना संघाच्या सभा गृहात आज साडेपाच ला आहे समारंभ. घरी टोमाटो आहेत का बघते. अंडी आहेत पण वाया नको घालवायला. ही ही.
सॉरी पण नाच्या दिसतो, बायल्या
सॉरी पण नाच्या दिसतो, बायल्या दिसतो हया कमेन्टस आवडल्या नाहीत. तसच, पुरुषाने स्त्रीच्या हातावर मेहन्दी काढली म्हणजे ती मावशी कशी काय झाली? मान्य आहे, सुभाला तो Costume शोभत नाही, पण पुरुषाने रन्गीबेरन्गी कपडे घालूच नये, स्त्रियान्च्या हातावर मेहन्दी स्त्रियान्नीच काढायल हवी हे नियम हवेतच कशाला?>>>>>>.सुलु +१
सगळे प्रतिसाद मस्त.
सगळे प्रतिसाद मस्त.
तो मेंदीवाला प्रोमो बघितला.
तो मेंदीवाला प्रोमो बघितला. सुभा भयाण दिसतोय. एकंदरीत तो प्रकार विचित्र वाटला.
विसं कडून थोड्या maturity ची अपेक्षा होती.
अमा , genuine doubt बद्दल अनुमोदन.
नाच्या म्हणण्यात मला काही
नाच्या म्हणण्यात मला काही चुकीचे वाटले नाही हे मी वर लिहिलेय, पण तो मेहंदी प्रकार मला आवडला. काय फरक पडतो की वय काय आहे किंवा दोघांत किती अंतर आहे. प्रेम आहे न मग झाले की मला आवडले ते. हा तो क्षण यांना नीट दाखविता/ खुलविता आला नाही ही बाब वेगळी ☺️
एकच निष्कर्ष निघतोय:
एकच निष्कर्ष निघतोय:
दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि संवाद लेखिका यांची अक्कल गहाण पडलीये.
खरं तर जयदीप आणि सॉन्याचा
खरं तर जयदीप आणि सॉन्याचा डांस बेस्ट होता..... जयदीप फॉर्मात नाचत होता....पण तो पूर्ण दाखविलाच नाही!
माझं फेव्ह गाणं.....धक धक धडके ये दिल बोले अम्रित्सारी चूडीया............
त्याऐवजी भलतेच कोज अप्स दाखवित बसले.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=GTwvYCVm858
रश्मी _/\_
रश्मी _/\_

आई ग...रश्मी धमाल आहे नुसती..
आई ग...रश्मी धमाल आहे नुसती...तो बच्चन आल्यावर ईबेबी च्या तोंडात 2 बुंद टाकतो औषधाचे...
मालिका पाहत नाही पण इथे मज्जा येतीये वाचायला... आणि प्रोमो मध्ये तर ई बेबी चे ड्रेस मला इतके स्टीफ वाटले ना...कडक इस्त्री सारखे..फुगलेले...ओडणीचे धागे पण दिसले मला निघालेले... तिला नाहीच येत आहे कॅरी करता.. आणि सुभा आवडणे बंद झालंय केव्हाच... आता का$$$ही वाटत नाही ... फक्त कीव,दया एवढीच भावना उरलीये त्याच्याबद्दल ....
तिचाही ड्रेस भयानकच होता.
तिचाही ड्रेस भयानकच होता.
—बर्य्सच ठिकाणी पेढे वाटताहेत मिठाईची दुकाने... मुर्खपणा आहे.
हो काका हलवाई त्यापैकी एक.
हो काका हलवाई त्यापैकी एक.
रसग्रहण!
रसग्रहण!
इशा आणि विकू बसलेत मंद प्रकाशात. विकू म्हणतो, मला ससससररररररररर!!! नको म्हणूस, विक्रांत म्हण. ती म्हणते, हे शक्य नाही ससससररररररररर!!! (इथे प्रेक्षकांची उरलीसुरली आशा मावळते.) मग सुभा चंद्राकडे बोट दाखवून म्हणतो, हा चंद्र माझ्याशी बोलतोय, (म्हणत असेल, इधर पाणी है, बरफ है, भेज दे इशाको इधर. तेवढीच माबोला सुटका.)
काय म्हणतोय ससससररररररररर!!!
तो म्हणतोय, माझ्यापेक्षा इथे अजून सुंदर कोण आलंय!!!!!
(हे लिटरली असंच घडलंय... आणि मी जोरात कपाळावर हात मारून घेतल्याने कपाळ सुजलय!)
मग इशा विकू रोमँटिक मूडमध्ये असतात, इशा म्हणते, सर कुणीतरी येईल ना, (बाई अजून त्याने काहीही केलेलं नाहीये, लगेच?)
तसंच कुणीतरी आवाज देत. इशा पळत जाते.
यानंतर झेंडे आणि विकुचा सिन आला. छान वाटला. रिफ्रेशिंग, आणि सुभा इथे प्रॉमिसिंग वाटला.
नंतर इशा हलव्याचे दागिने घालून अतिभयाण दिसते. (ते कितीही ओरिजिनल दाखवले, तरी हलव्याचे वाटतात.) तिची छेड काढताना रुपाली चांगली दिसते. मायरा विविध देशातील हल्दीचं प्रदर्शन मांडते (इंडिया, इंडोनेशिया, म्यानमार, चायना, खवडी बुद्रुक, पवनी खुर्द)
ईबाळाला स्वप्न पडतं, ती जागी होते(सगळा लवाजमा घालून झोपलेली असते. उद्या काढून घेतील ना कॉस्च्युमवाले, उं उं) मग बाहेर जाते. तिथे सासूबाई दबा धरून बसल्याप्रमाणे तिच्या पाठीवर हात ठेवतात. मग प्रेमभरी बात होते. सासूबाई म्हणतात, माझी कधीची झोप उडालीय ग(आता पोराने असलं ध्यान बांधून आणल्यावर झोप उडणारच) बाळ कारण विचारते, तर म्हणतात, सांगेन कधीतरी!!!!
उद्या लग्न!
हे लिटरली असंच घडलंय... आणि
हे लिटरली असंच घडलंय... आणि मी जोरात कपाळावर हात मारून घेतल्याने कपाळ सुजलय>> अरेरे.. औषध लावा आधी लग्नाचं रसग्रहण लिहायचंय अजून

श्रद्धा धन्यवाद! ते हलाहल
श्रद्धा नक्कीच! ते हलाहल पचवायचंय अजून!
इशा आणि विकू बसलेत मंद
इशा आणि विकू बसलेत मंद प्रकाशात >>>>> गेल्या भागात तो romantic होऊन सांगत असतो , इथे किती शांतता आहे वगैरे वगैरे ... ती म्हणते , हे पाणी पण किती शांत आहे सर.
मला तो फारेण्ड चा (?) Dialog आठवला.. सर हे helicopter खरं आहे? उडत का ??
Subha aajachya episode Madhe
Subha aajachya episode Madhe bara disla, makeupman ne mayboli vachaley vatate.
Aaisaheb ani soniya sodun sagalyanche dagine ani makeup batabatit vatale. Uthaval agadi,
Tya doghincha dress sense shrimantia shobhesa ahe.
ती म्हणते , हे पाणी पण किती
ती म्हणते , हे पाणी पण किती शांत आहे सर.
मला तो फारेण्ड चा (?) Dialog आठवला.. सर हे helicopter खरं आहे? उडत का ??>>>>>>>>>>>>>>मला पण .....
ईशा झोपताना तो जाड फुगीर
ईशा झोपताना तो जाड फुगीर ड्रेस आणि गळ्याला गच्च बसलेला नेकलेस, मोठे कानातले, मेकपसकट झोपली होती. आईसाहेबही त्याच अवतारात होत्या. ईशा एकटीच का झोपली होती पण त्या खोलीत.
विक्रांत चंद्राकडे बोट दाखवून
विक्रांत चंद्राकडे बोट दाखवून ईशाशी बोलतो.
पण तो चंद्र खोटा आहे. चंद्राचे चित्र तिथे चिकटवले आहे नीट बघा. नेपथ्यही नीट करता येत नाही झी वाल्यांना एवढा मोठा खर्च करूनही!
ईशा बाळ आणि विक्रांत सर
ईशा बाई आणि विक्रांत सर यांच्या लग्नाला कोण कोण आहेत?
तर ईशा-विक्रांतच्या घरातले सात-आठ, ऑफीसातले सात-आठ जण आणि सात-आठ चाळकरी मंडळी.
आमच्या सत्यनारायणालासुद्धा यापेक्षा जास्त मंडळी असतात हो!
वृद्धाश्रमातले ते पांचट वृद्ध आणले नाहीत का लग्नाला?
ईशाशी बोलताना विक्रांत
सोन्या आणि जयदीप छान नाचतात. सोन्या अभिनयही छान करते. तिला पुढे मुख्य नायिकेसाठी चांगली कामे मिळायला हवीत. मायरा मोकळ्या केसांमध्ये छान दिसते.
ईशाशी बोलताना विक्रांत
ईशा हळदीसाठी घातलेल्या शुभ्र घागरा ड्रेसमध्ये छान दिसली पण.
पौष महिन्यात लग्न करत आहेत!
पौष महिन्यात लग्न करत आहेत! ऑलमोस्ट संक्रांतीला!?
ईशा हळदीसाठी घातलेल्या शुभ्र
ईशा हळदीसाठी घातलेल्या शुभ्र घागरा ड्रेसमध्ये छान दिसली पण.>>> ती दिसते गोडच.. पण acting चा उजेड आहे सगळा..
ईशा झोपताना तो जाड फुगीर
ईशा झोपताना तो जाड फुगीर ड्रेस आणि गळ्याला गच्च बसलेला नेकलेस, मोठे कानातले, मेकपसकट झोपली होती. आईसाहेबही त्याच अवतारात होत्या. ईशा एकटीच का झोपली होती पण त्या खोलीत.>>>> +100000.
बाकी ईशाई , ईमाशी , रूपाई , सावंत बाई सगळ्या एका खोलीत राहतात. निदान रुपाली तरी बाळाबरोबर हवी .
मेंदीची कलर थीम हिरवी होती , त्या finance वाल्या madam नी गुलाबी साडी नेसली होती. मला त्या ईमाशीची साडी पहायची आहे. सोनल सारीज विकत घ्यावी लागली जावयाला त्या साठी.
निदान रुपाली तरी बाळाबरोबर
निदान रुपाली तरी बाळाबरोबर हवी .>> हो ना. नाहीतर बाळ मध्येच भयानक स्वप्न पडून उठायचं आणि आजूबाजूला कोणी नाही बघून भोकाड पसरायचं.
Pages