Submitted by टवणे सर on 10 December, 2018 - 17:21
२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून बघितल्या जाणार्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज ११ डिसें (भाप्रवे) रोजी जाहीर होतील. त्याबद्दल चर्चा (लाथाळी) करण्यासाठी उघडलेला हा धागा.
माझा होरा:
राजस्थान, मप्र, छत्तीसगढ -काँग्रेस (मध्यप्रदेशात लहान पक्षांबरोबर युती करून, इतर दोन ठिकाणी बहुमताने)
तेलंगणा - टीआरएस
मिझोरामः माहिती नाही. सध्या तिकडे भाजपाचे वारे असल्याने कुठल्यातरी आघाडीत भाजपा असेलच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
६०० कोटी लोकसंख्येसाठी
६०० कोटी लोकसंख्येसाठी दिवसातले २५ तास कसे पुरणार ? वाढवून दिले पाहीजेत.
नवीन Submitted by हीरा on 12
नवीन Submitted by हीरा on 12 December, 2018 - 18:45
<<
हा आयडीए फक्त फेका फेक करण्यासाठी घेतलेला दिसतोय, लोकसत्ताकरांनी.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ximgPmJ9A5s
{२०१९ इज गोइंग टु बी
{२०१९ इज गोइंग टु बी इंटरेस्टिंग. राहुल गांधीच भाजपाचे अॅसेट ठरू शकतात, मोदी ठरण्याची आशा कमी आहे.}
योगी विरोधी पक्षांचा असेट ठरतील का?
योगी विरोधी पक्षांचा असेट
योगी विरोधी पक्षांचा असेट ठरतील का?
>>>
येस्स. योगी आणि इतर हिंदुत्व कार्ये/विधाने मुस्लिम मते काँग्रेसच्या परड्यात पुन्हा टाकतील - जी काही प्रमाणात २०१४ला भाजपाला मिळाली होती. २००४मध्ये गुजरातचा फटका जसा भाजपाला बसला होता तसेच. पण तेव्हा काँग्रेसची हिंदू जातीय स्तरावरील वोट बँक बर्याच राज्यात मजबूत होती. ती परिस्थिती आता नाही. उदा. पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाज एकगठ्ठा काँग्रेसचा मतदार होता. आज ती परिस्थिती नाही.
तसेच गेल्या काही निवडणुकातला पॅटर्न लक्षात घेता भाजपाने मुस्लिम मतदानाचे 'बल' (वेटेज) कमी करण्यासाठी हिंदू एकगठ्ठा मतदान कसे करता येईल यावर जोर दिलेला आहे. तेव्हा योगी हिंदूंना भाजपाला मत देण्यापासून रोखतील का हा एक प्रश्न आहे.
दुसर्या बाजुला राहुल गांधी काँग्रेसचे नेते आणि पर्यायाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट झाले तर हिंदू गठ्ठा मत त्यांना जाईल का? किमान लक्षणीय टक्का जाईल का?
काँग्रेसकडून राहुल गांधींना पंतप्रधान उमेदवार म्हणून प्रोजेक्ट न करणे राजकीय दृष्ट्या अवघड आहे कारण दुसरा कुठला नेता प्रोजेक्ट करणे शक्य नाही - अंतर्गत वादविवाद / बंडखोरी खोप होइल. त्यापेक्षा ते बहुदा 'भाजपविरोधी मोर्चा' या मुद्द्यावर जोर देतील असा माझा होरा आहे. त्यासाठी स्थानिक पक्षांबरोबर अनेक राज्यात युती करावी लागेल.
अर्थात हे नुसतेच तर्क आहेत. राजकारणी आपल्यापेक्षा १००पट चतुर असतात.
@योग, +१. सेन्सीबल प्रतीसाद
@योग, +१. सेन्सीबल प्रतीसाद (नेहमीप्रमाणेच).
बाकी काही असो पण पप्पू म्हणून (अजूनही) हिणवल्या जाणार्या माणसाने पक्षाध्यक्ष झाल्याच्या वर्षपूर्तीलाच टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं! काँग्रेसचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
एका साध्या कॉमेंटवर सगळे
एका साध्या कॉमेंटवर सगळे ठेवणीतले आयडी काढून झुंडीने हल्ला करावा लागला यातच सगळे आले.
बूंदसे गई वो हौदसे नही आती.
आपल्या डबक्यात सुखी रहा.
No more comments here from me.
योग,
योग,
>>>>>>आपल्या वित्त, कायदा, व्यापार या प्रमुख संस्थांच्या मुख्य पदी असणारे कार्यवाह व सरकार सोबत असणारे त्यांचे संबंध खूप महत्वाचे ठरतील.>>>>
यात "सोबत असणे " आणि सरकार चे मिंधे असणे यात फरक आहे.
RBI गव्हर्नर ची सिलेक्शन ची प्रोसेस कशी बदलली , त्यात PM अपोंयटेड मेम्बर कसे वाढले वगैरे गोष्टी मागे वाचलेल्या, परत शोधून देतो इकडे जमल्यास,
पण त्याचा अन्वयार्थ इतकाच होता की 2014 नंतर स्वायत्त संस्थेच्या प्रमुखाची नेमणूक करण्यात PM चा स्टेक वाढला,
2014 आधी सरकार आणि RBI मध्ये मतभेद नव्हते का?
2013 मध्ये तर रोज चिद्दु आणि राजन चे फटाके पेपर मध्ये यायचे, तेव्हा RBI सोबत असणे गरजेचे असे सांगून कोणी कठपुटली बसवली असती तर तुमची अशीच रिऍक्शन असती का?
अहो डी सुब्बारावांनी तर
अहो डी सुब्बारावांनी तर काँग्रेसला किती झुंजवले होते.
>>यात "सोबत असणे " आणि सरकार
>>यात "सोबत असणे " आणि सरकार चे मिंधे असणे यात फरक आहे.
हो, मलाही तेच म्हणायचे आहे.
तसेच गेल्या काही निवडणुकातला
तसेच गेल्या काही निवडणुकातला पॅटर्न लक्षात घेता भाजपाने मुस्लिम मतदानाचे 'बल' (वेटेज) कमी करण्यासाठी हिंदू एकगठ्ठा मतदान कसे करता येईल यावर जोर दिलेला आहे
<<
भाजपाने मुसलमान व्होटिंग कसे विखुरले जाईल यानुसार मतदारसंघ तयार करण्यात डोकं चालवलं आहे.
तथाकथित तळागाळातले लोक काँग्रेसविरोधात ( उदा. पश्चिम महाराष्ट्र) गेलेत हे विधान, काँग्रेसच्या आशिर्वादाने छत्रपती म्हणवणार्या वतनदारांना कंटाळून आपले नवे वतन तयार करू पाहणार्या वुड बी सुभेदारांनी भाजपाचा सहारा घेतला, हे विसरल्यामुळे केले गेले आहे.
या मतदार किंवा इंपोर्टेड उमेदवारांना कधीही खान्दानी, किंवा वर्जिनल भाजपेयी विचारसरणी वगैरे मान्य होती असा भागच नाहिये.
सध्या सत्तेत असलेले लुटारू आपल्याला आपल्या वतनाचे तुकडे देतील या आशेने, अन आश्वासनाने जे जे सुभेदार मुघलांची चाकरी करू लागले, तसेच आजचे नगरसेवक्/खासदार्/आमदार आज भाजपाची चाकरी करीत आहेत. एका सुलतानाकडून दुसर्याकडे गेलेल आहेत. तुकडे नव्हेत तर चतकोर आदकोरही मिळवत आहेत. तुमच्या आजूबाजूला जरा पाहिलेत तर हे सरळ दिसते आहे.
कुणी कितीही सरकारी कर्मचारी खुर्चीत सापडतो अन ऑनलाईण काम सोपे होते वाल्या बाता मारल्या, तरी कर्नाटकातल्या सामान्याच्या पोराला परिक्षा देण्यासाठी ऑनलाईन सिस्टीम राजास्थानात धाडतेय हे पाहून जीव तीळ तीळ तुटतो. तुमच्या कमाईचे पैसे घरपट्ट्या वाढवून टॅक्सेस वाढवून लुटून नेवून १००० कोटींचा भाजपा वॉर चेस्ट तयार होतोय हे पाहूनही आनंद होतो.
बरं भ्रष्टाचार कमी झाला म्हणावं तर अजिबात नाही. ऑनलाइन केलेले काम अॅमेझॉन सारख्या पेसाईट्स अन नाइलाज असल्यामुळे सुधाराव्या लागलेल्या पासपोर्टसारख्या सेवांव्यतिरिक्त कुठेही चालत नाही. गरीब शेतकर्याची जी*** लागतेय ते आपल्याला कळत नाही. ७०० किलो कंदे हजार रुपयात विकावे लागलेल्या शेतकर्याने १२-१५०० रुपये प्रोटेस्ट म्हणून प्रधानमंत्री रिलिफ फंडाला दिले, तर त्याला पैसे ऑनलाईण जमा करा असा संदेश आला! वाह. असो. आपण आपले पहा, अन ठरवा. मी संघोट्या नाही, त्यामुळे डिक्टेट कर णार नाही, तर तुम्हाला तुमची बुद्धी वापरायला सांगण्याचा यत्न करणार.
१००% टॅक्स भरणार्या माझ्यासारख्यांना काही रिलीफ मिळाला आहे का?
तुमची इन्कम टॅक्सची स्लॅब कमी झाली का?
मुंबईत घर घ्यायला एक टक्का वाढलाय. कशासाठी? आय डोन्ट नो. बहुतेक शिवाजी राजाचा पुतळा अमुक पुतळ्यापेक्षा मोठा करण्यासाठी असावा. काय चुक्षागिरी आहे यार? १ कोटी रुपयाच्या १ बेडरूम किचन फ्लॅटचा १ टक्का किती होतो राजे? तुमचा पगार किती? तुम्ही मत देतांना नगरसेवक, आमदार्, खासदार, यांच्या कडुन टोटल पैसे घेतलेत किती?... असले भयंकर पैसे फेकताहेत आजकाल भाजप्ये निवडणुकांत, तुम्हाला दिसले असतील नसतील मला ठाऊक नाही, घेणं देणं नाही. पैसे घेउन मत फेकणारी पब्लिक बिनडोक नसते. त्यांच्यावरच हे सगळं चालतं.
इतके पैसे फेकूनही, अन ईव्हीएम घोटाळे करूनही काँग्रेस येतेय म्हणजे नक्कीच सामान्य माणसाच्या नको तिथे काहीतरी दुखतंय.
मित्रहो. विकास मलाही हवाय.
पण त्यासाठी गावातले सगळे मुसलमान मारून टाकणे.
सगळ्या मध्यमवर्गीय वेलटू डू लोकांना लुटणे.
सरकारला कर्ज देणार्या सावकारांना त्यांच्या गिर्हाइकांची खुलेआम पिळवंणूक करू देणे.
गरीबाच्याही लंगोटीत हात घालून टॅक्स उर्फ जिझिया हिसकावणे..
नोप्स.
नॉट डन.
भाजपाने मुसलमान व्होटिंग कसे
भाजपाने मुसलमान व्होटिंग कसे विखुरले जाईल यानुसार मतदारसंघ तयार करण्यात डोकं चालवलं आहे.
>>>
जेरिमँडरिंग (https://en.wikipedia.org/wiki/Gerrymandering)
हे भारतात स्थानिक व राष्ट्रीय सरकार करू शकते की फक्त निवडणुक आयोग? आणि असे मतदारसंघ तोड-फोड होत आहे? मला माहिती नाही म्हणून प्रामाणिकपणे विचारतो आहे.
>>
या मतदार किंवा इंपोर्टेड उमेदवारांना कधीही खान्दानी, किंवा वर्जिनल भाजपेयी विचारसरणी वगैरे मान्य होती असा भागच नाहिये.
>>
येस, पुर्णपणे सहमत. पण यामुळे जो वर्ग कधीच भाजपा बरोबर नव्हता तो काही काळाकरिता का होईना भाजपा बरोबर आला. साटंलोटं नातीगोती तयार झाली. नाहीतर आधी या वर्गासाठी भाजपा अस्पृष्य होता. आज दूर गेले तर भविष्यात हे पुन्हा भाजपाकडे येण्यासाठी रस्ता तयार आहे.
दुसरा भाग म्हणजे जर काँग्रेसचे तळागाळातले नेते असे कुठेही जाऊ शकतात तर मग काँग्रेसमध्ये असे काय वेगळे आहे की मतदार चिकटून राहील. इन फॅक्ट भाजपाची कोअर वोट बँक शाबूत राहील, काँग्रेसची कोअर वोट बँक आता फ्लोटिंग झाली आहे. ९०च्या दशकापर्यंतच्या राजकारणात काँग्रेसची वोट बँक शाबूत होती. शेखर गुप्ताने लिहिल्याप्रमाणे काँग्रेसची राहुल गांधींचे सॉफ्ट हिंदुत्व हे धाडसी मूव्ह आहे. https://theprint.in/national-interest/rahul-gandhis-discovery-of-his-inn...
पण इथे दुहेरी कसरत आहे. मुस्लिम वोट बँक शाबूत ठेवून हिंदु वळवणे.
इत इज गोइन्ग टु बी सम इंटरेस्टींग इयर्स.
इत इज गोइन्ग टु बी सम
इत इज गोइन्ग टु बी सम इंटरेस्टींग इयर्स.>>>>>>>>
माशा अल्लाह, राहुल बाबा विल सेल थ्रू
तो सोनियाला पंतप्रधानपदी बसवेल, आणि सुषमा वगैरे ड्रामा क्वीनस ना मुंडन करून विधवा विलाप करायला लावेल.
निकालाच्या दिवशी कामाचा लोड
निकालाच्या दिवशी कामाचा लोड इतका होता की घरी येऊन फ्रेश झाल्यावर आणि नेटवर आल्यावरच निकाल समजले. आजूबाजूला ९०% मोदी भक्त आहेत माझ्या. ते काही बोलले नाहीत निकालावर म्हणजे निकाल काय लागले हे समजून जायला हवे होते.
मला विशेष हे वाटलं की आजचा दिवसही धावपळीत गेला. या निकालांप्रती कसलीच उत्सुकता नाही असं गेला काही वर्षात होतंय. रामराव गेले आणि शामराव चढले असं होतंय हे खूप प्रकर्षाने जाणवतंय. माकडा बोकडाचा खेळ चालू आहे फक्त. या घडामोडीत मी कुठेही इन नाही. भाजप गेले याचे समाधान ही तर लोकांची फसवणूक आहे की काय असे वाटतेय.
वर्षानुवर्षे दंतकथा ऐकल्यानंतर त्यातली पात्रे खरी वाटू लागतात, घटना ख-या वाटू लागतात. तद्वतच काँग्रेस विरुद्ध भाजपा हा सामना खराखुरा वाटू लागतो. एक वाईट आहे म्हणून दुसरा चांगला आहे असे दोन्ही तंबूंना वाटतेय.
लोक हिरीरीने विश्लेषण काय करतात, लोकच लोकांना काय वाटले याचे अंदाज लावतात, लोकांनी काय विचार केला असावा हे वैयक्तिक अनुभवातून लिहीतात. आणखी कुणी बॅलन्स्ड वगैरे साठी दोन्ही बाजूने लिहून दाखवतो...
हे नाटक चांगलं वठलेलं आहे याची ही पावती आहे. दोन्हींची व्यापारी धोरणं कुठे बदलताहेत ?
ख-या समस्यांवर कुणी बोलतच नाही.
मोदींच्या काही धाडसी
मोदींच्या काही धाडसी निर्णयानंमुळे (व्होटबॅंकची तमा न बाळगता घेतलेल्या) ज्यांची दुकाने बसली, करबुडवण्याच्या वाटा बंद झाल्या असे दुखावलेले लोक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडताना फार दिसतात
असो!
मायबोलीवरचा कौल खरा मानला तर पुढच्या लोकसभेत नक्की कॉंग्रेस येईल पण तिथे परत जर भाजपा आली तर मग इथे दोन चारच दुखावलेले (किंवा पेड) लोक अनेक आयड्यांनी बोलत असावेत असे मानण्याला वाव आहे.
धाडसी आणि आततायी मध्ये एक सटल
धाडसी आणि आततायी मध्ये एक सटल फरक असतो..
भरत - १२ Dec. 00:09, छान
भरत - १२ Dec. 00:09, छान पोस्ट.
<< मोदींच्या १६ तास काम करण्याबद्दल पुष्कळ लिहिले जाते >> फक्त १६ तास? ते २५ तास काम करतात दिवसातले.. कोणासाठी ते तेवढं विचारू नका प्लीज >>
--------- किती तास काम करतात यापेक्षा या वेळात काय कामे करतात/ कामे होतात हे जास्त महत्वाचे आहे. जास्त वेळ काम करणे याने नक्कीच कुठलिही गुणवत्ता सिद्ध होत नाही. या वेळात घेतलेल्या निर्णयांमुळे सामान्य जनतेचे दैनंदिन जिवन किती सुखकारक झाले आहे हे जास्त महत्वाचे.
जास्त वेळ काम करावे लागणे हे वेळेचे व्यावस्थापनातला अभाव, किंवा सहकार्यांबाबत कमी विश्वास असणे अशा शक्यता पण आहे.
<< मित्रहो. विकास मलाही हवाय.
पण त्यासाठी गावातले सगळे मुसलमान मारून टाकणे.
सगळ्या मध्यमवर्गीय वेलटू डू लोकांना लुटणे.
सरकारला कर्ज देणार्या सावकारांना त्यांच्या गिर्हाइकांची खुलेआम पिळवंणूक करू देणे.
गरीबाच्याही लंगोटीत हात घालून टॅक्स उर्फ जिझिया हिसकावणे.. >>
------- आरारा. आवडले.
<< मोदींच्या काही धाडसी निर्णयानंमुळे (व्होटबॅंकची तमा न बाळगता घेतलेल्या) ज्यांची दुकाने बसली, करबुडवण्याच्या वाटा बंद झाल्या असे दुखावलेले लोक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडताना फार दिसतात >>
-------- मोदी धाडसी असते तर सर्वोच्च न्यायालयाने काळ्या पैसे धारकांची यादी मागितल्यावर तत्काळ दिली असती (२०१४ च्या सरकार आल्यावरची सुवर्ण संधी). आधीच्या सरकारांनी चाल ढकल केली होती.... मोदी सरकार आल्यावर त्यांनी पण तेच केले. सरकार कुणाचे हित जपत आहे असा करडा सवाल न्यायालयाने "केल्यावरच" २४ तासात सर्वोच्च न्यायालयाला काही काळी नावे (अर्थात छोटी मासे) सादर केली....
काँग्रेस सरकारांनी भ्रष्टाचार केला असेल असे क्षणभर मान्य केले तर भाजपा भ्रष्टाचाराबाबत खुप सॉफ्ट आहे. ते लाख कोटी रुपये परदेशात गेलेले ते भारतात परत आणले तर पुढची ३० वर्षे कुणाही भारतीयाला कुठ्ल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही अशा पोस्टी, मेल्स, WA आता येत नाहीत.
< मायबोलीवरचा कौल खरा मानला
< मायबोलीवरचा कौल खरा मानला तर पुढच्या लोकसभेत नक्की कॉंग्रेस येईल पण तिथे परत जर भाजपा आली तर मग इथे दोन चारच दुखावलेले (किंवा पेड) लोक अनेक आयड्यांनी बोलत असावेत असे मानण्याला वाव आहे. >
-------- लोकांचा कल कुठे आहे/ होता हे निवडनूकांचा निकाल जाहिर झाल्यावरच कळतो.... तो पर्यंत सबुरी धरा, निराश होण्याचे कारण नाही.
ऑनलाईन वापर वाढला हे वर
ऑनलाईन वापर वाढला हे वर वाचनात आले. जनतेचे आयुष्य सुखकर होत असेल तर चांगली गोष्ट आहे. digital वापर वाढावा हा एक उद्देश नोटबंदीच्यी वेळी होता. RBI चा 2017-18 चा वार्षिक अहवालात
currency in circulation ३७ % नी वाढल्याचा उल्लेख आहे. १३५ कोटी लोकांच्या जगात नगद कागदी नोटा हाताळणारी कमी झालेली नाही.
पान क्र. २६० वर APPENDIX TABLE 4
https://rbi.org.in/Scripts/AnnualReportPublications.aspx?year=2018
काँग्रेस सरकारांनी भ्रष्टाचार
काँग्रेस सरकारांनी भ्रष्टाचार केला असेल असे क्षणभर मान्य केले >>> तुम्हाला हे मान्य नाहीय का ? सिद्ध होणे न होणे हा वेगळा प्रश्न आहे. ( हा प्रश्न विचारल्याने मला भाजपेयी ठरवणार असाल तर शुभेच्छा ).
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष व्यापारी चालवतात असे वाटावे अशी या दोघांचीही धोरणे कमालीची सारखी आहेत. भाजप आल्यावर अदानी अंबानींना जास्त फायदा होतो तर काँग्रेस निवडून आल्यावर विशिष्ट १८ समूहांना.
जर गेल्या पाच वर्षात काँग्रेसने भाजपविरोधात जनसामान्यांचे प्रश्न मांडले असतील तर विरोधी पक्ष म्हणून कौतुक केलेच पाहीजे. पण त्याचबरोबर हे प्रश्न काँग्रेसच्या राजवटीत का सुटले नव्हते याचे उत्तर कधी तरी काँग्रेस देईल अशी अपेक्षा करूयात. ६० साल म्हणत मोदी पळून जाऊ शकत नाही हे बरोबर आहे. पण त्यामुळे काँग्रेसला मोदींच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याची आवश्यकताच नाही असे मानावे का ?
शेतक-यांची अवस्था एकाएकी हलाखीची झाली आहे का ? खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा फायदा ठराविक उद्योगपतींनी करून घेतला. त्याचा फटका शेतकरी, मजूर, कष्टकरी यांना झाला आहे. ठराविक लोकांना जागतिक दराने रोजगार मिळाला. त्यामुळे भारतात दोन देश निर्माण झाले. पैकी जागतिक स्तरावर अर्थकारण असणा-या भारतातल्या देशामुळे भारतातल्याच गरीब राष्ट्राला उत्पन्न न वाढता महागाईचा सामना करावा लागला. एक उदाहरण घ्यायचे झाले तर सुरूवातीला आयटी सेक्टर मधे अमेरिकन वेतनाप्रमाणे वेतन आले. तोपर्यंत एव्हढे वेतन दुस-या कोणत्याही सेक्टर मधे नव्हते. या मुळे प्रचंड तफावत निर्माण झाली. या वर्गाची खर्च करण्याची ऐपत पाहून जमिनीचे भाव वाढले, घरांचे भाव वाढले जे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले. त्यातून बेकायदा बांधकामे उभी राहत गेली. हे उदाहरण आहे फक्त..
याचा विचार सरकारने केला नाही. त्यांच्याकडे कुठलेही धोरण नव्हते.
त्यामुळे काँग्रेस गेली भाजप आली भाजप गेली काँग्रेस आली या दुष्टचक्रात जनतेचे प्रश्न कसे सुटतील याची चिंता आहे. गेल्या पाच वर्षात काँग्रेसला जनतेचे प्रश्न समजले असे समजले तर अपेक्षाभंग होईपर्यंत आणखी पाच वर्षे गेलेली असतील. त्यानंतर पुन्हा भाजप येईल.
( फक्त काँग्रेस किंवा भाजप यांना वाहून घेतलेल्यांनी उत्तर देण्याची तसदी घेऊ नये. त्यांच्या उत्तरात रस नाही).
<मोदींच्या काही धाडसी
<मोदींच्या काही धाडसी निर्णयानंमुळे (व्होटबॅंकची तमा न बाळगता घेतलेल्या) ज्यांची दुकाने बसली, करबुडवण्याच्या वाटा बंद झाल्या असे दुखावलेले लोक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडताना फार दिसतात
असो!
मायबोलीवरचा कौल खरा मानला तर पुढच्या लोकसभेत नक्की कॉंग्रेस येईल पण तिथे परत जर भाजपा आली तर मग इथे दोन चारच दुखावलेले (किंवा पेड) लोक अनेक आयड्यांनी बोलत असावेत असे मानण्याला वाव आहे.>
खरा पुणेकर, मुद्द्यांना धरून लिहायची क्षमता लवकर संपली की तुमची.
<< काँग्रेस सरकारांनी
<< काँग्रेस सरकारांनी भ्रष्टाचार केला असेल असे क्षणभर मान्य केले >>> तुम्हाला हे मान्य नाहीय का ? सिद्ध होणे न होणे हा वेगळा प्रश्न आहे. ( हा प्रश्न विचारल्याने मला भाजपेयी ठरवणार असाल तर शुभेच्छा ). >>
--------- काँग्रेस मोठा भ्रष्ट पक्ष आहे अशीच माझी समजुत होती. काळ्या पैशांचे, गैर व्यावहारांचे नुसते आकडे वाचुनच धडकी भरायची. मग चार-सव्वा चार वर्षात किती भ्रष्ट व्यक्तींना शिक्षा झाली, कोर्टा मधे त्यांच्यावर खटले दाखल केले गेले, सज्जड पुरावा गोळा करुन तुरुंगात पाठवले ? चार - दोन नावे दाखवा. मी आतुरतेने वाट पहात आहे.
मी हे का करावे अशी अपेक्षा
मी हे का करावे अशी अपेक्षा आहे ?
पर्याय - १. मी राजकीय नेता आहे २. राजकीय पक्षाचा भाट आहे ३. राजकीय पक्षाचा लाभार्थी आहे ?
यातली काय समजूत आहे तुमची ?
दुसरे म्हणजे भाजपने शिक्षा केली नाही म्हणून भ्रष्टाचार झाला नाही असा नियम आहे का ? काँग्रेसने वड्राच्या बदल्यात व्यापमबद्दल बोलणे बंद केले. आता मध्यप्रदेशात व्यापम कटात एकालाही शिक्षा झाली नाही तर व्यापम घोटाळा आणि खून सत्र झालेच नव्हते असे मान्य करूयात का या न्यायाने ?
कृपा करून हे असले लॉजिक किमान माझ्यासाठी लावून माझे प्रतिसाद कोट नाहीत केले तर उपकार होतील.
भाजपचे ट्रोल्स आणि काँग्रेसचे
भाजपचे ट्रोल्स आणि काँग्रेसचे ट्रोल्स यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे असे वाटत नाही. प्रश्न विचारणा-याला दुस-या पक्षाच्या नावाने प्रतिप्रश्न करून उत्तराला बगल देणे ही गुन्हा करण्याची पद्धत होत चाललेली आहे.
भरत. , योग, टवणे सर, सिम्बा,
भरत. , योग, टवणे सर, सिम्बा, यांचे प्रतिसाद आवडले. आ.रा.रा. यांचे शेवटचे प्रतिसाद आवडले.
किरणुद्दीन यांचा २० . २५ चा प्रतिसाद आवडला.
कॉंग्रेसच्या इतर नेत्यांचे
कॉंग्रेसच्या इतर नेत्यांचे सोडाच, खुद्द सोगा व रागा भ्रष्टाचाराच्या केस मधे न्यायालयातून जामीन घेऊन बाहेर फिरत आहेत. आणि म्हणे कॉंग्रेस भ्रष्टाचारी नाही. थापा मारायची काही लिमिट असते.
भाजपचे ट्रोल्स आणि काँग्रेसचे
भाजपचे ट्रोल्स आणि काँग्रेसचे ट्रोल्स यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे असे वाटत नाही.
अगदी बरोबर, का म्हणून ह्या राजकीय पक्षांचे/लोकप्रतिनिधींचे गैरव्यवहार जनता सहन करते हे समजत नाही.
टवणेसरांआधी अचूक भविष्य
टवणेसरांआधी अचूक भविष्य वर्तवीणारा नोस्ट्रेडोमस धागा मायबोलीवर ऑलरेडी आहे पहा https://www.maayboli.com/node/67426
वरिल एक आयडीचा प्रतिसाद वाचून
वरिल एक आयडीचा प्रतिसाद वाचून संस्कृत मधील एक सुभाषित आठवले.
--
उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभाः शान्तिपाठकाः l
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपं अहो ध्वनिः ll
Pages