२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी - राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम

Submitted by टवणे सर on 10 December, 2018 - 17:21

२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून बघितल्या जाणार्‍या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज ११ डिसें (भाप्रवे) रोजी जाहीर होतील. त्याबद्दल चर्चा (लाथाळी) करण्यासाठी उघडलेला हा धागा.

माझा होरा:
राजस्थान, मप्र, छत्तीसगढ -काँग्रेस (मध्यप्रदेशात लहान पक्षांबरोबर युती करून, इतर दोन ठिकाणी बहुमताने)
तेलंगणा - टीआरएस
मिझोरामः माहिती नाही. सध्या तिकडे भाजपाचे वारे असल्याने कुठल्यातरी आघाडीत भाजपा असेलच

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्व प्रथम , मामाजींचे अभिनंदन,
व्यापम, नोटबंदी , GST या सगळ्याचे घाव झेलूनही त्यांनी आपला सपोर्ट अबाधित ठेवला,

नंतर राहुल गांधी आणि सिंदियांचे अभिनंदन,
हिंदुत्वाच्या कळपात 10 वर्षे गुरफटून बसलेल्या हार्ड कोअर धर्मनिष्ठ जनतेला, धर्मापेक्षा दुसरे काही महत्त्वाचे आहे हे दाखवून त्यांना आपल्या बाजूला वळऊन घेण्यात यशस्वी झाला बद्दल

भारतीय जनता पक्षाच्या निर्भेळ यशाबद्दल सेट मॅक्स सादर करीत आहे

सूर्यवंशम

आता जुन्या 500 1000च्या नोटा पुन्हा चलनात घ्या आणि मोदींनी काढलेल्या नवीन नोटा त्यांच्या नेत्यात वाटून त्यांना तीन पत्ती खेळायला सांगा. नायतरी त्या नवीन नोटांची क्वालिटी जत्रेत मिळण्यार खोट्या नोटांपेक्षा सुमार दर्जाची आहे.

आपण दत्तात्रय गोत्रीय नसूनही दत्तात्रय गोत्रीयाचे समर्थक का आहोत हे सांगण्याचा आटापिटा वाचून वाटत होते तितकी मजा अजून येत नाहीये

हमारे हाल पे हम खुल के रो भी नही सकते, चलो ! किसीके खूष होने पर हंसने का नाटकही सही
नही तो फिर करे तो क्या करें !

आजच्या घडीला प्रगत राज्य असणार्‍या ह्या तीनही राज्यांना
<<
कावरलेलं कुत्रं चावलेला माणूसही या तीनही राज्यांपैकी कुणालाच प्रगत म्हणणार नाही. गुजरात किमान खोटं बोलूबोलू तरी प्रगत म्हणवलं जातं. या तिन्ही राज्यांच्या प्रगतीची लक्षणं नक्की कोणती?

**

अमुक एक नेता ,अमुक गोत्राचा/जातीचा/धर्माचा आहे म्हणून त्याला मत द्या/देऊ नका हा शुद्ध मूर्खपणा आहे,
<<

ज्यावेळी या गोत्राची थट्टा करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा दत्तात्रय गोत्र नसलेला बेफ्या अन त्याचे भाजपेयी मूर्ख तुम्हाला धर्माच्या/जातीच्या/गोत्राच्या नावावर मतदान करा हेच बोम्बलून सांगताहेत. यांचेच एनाराय मित्र, तिकडे अम्रेकेत कडव्या ख्रिश्चन विकृताचं समर्थन करताहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.. Hindus for Trump!! What The F$$$$!!

गोत्र सांगण्यात आले, कारण ते हजारदा विचारण्यात आले. कुलकर्ण्याच्या पोरांनाही संन्याश्याची पोरं म्हणून वाळीत टाकणार्‍यांचे वंशज हे धर्ममार्तंड आहेत. एक नंबरचे बिनडोक अन विकृत. स्वतःच्याच घराचे तुकडे करून स्वतःची मोठाईकी मिरवणारे.

यांचा विकास नामक अनौरस गर्भ कधीच 'पडून' गेलाय. अन आतला खरा सैतानी हिंदूत्ववादी चेहरा बाहेर दिसू लागलाय.

गोत्र कसलं विचारतो आहेस माझ्या भगव्या मित्रा, स्वतःला तुझ्या गोत्राचा, जातीचा किंवा हिंदू म्हणवून घेण्यासाठी काय दिवे लावलेस नक्की तू? त्यात जन्माच्या अपघाताव्यतिरिक्त तुझं कर्तृत्व नक्की काय??

अन, भारतीय म्हणवून घेण्यासाठी काय केलंस कधी? देशाला काही दिलंस का कधी? दिलखुलास जीव ओतून?

मध्य प्रदेश, छत्तीसगड इथे अँटी इन्कम्बसी फॅक्टर भाजपला भोवला आहे हे उघड आहे.
राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंचे आत्मकेंद्रीत राजकारण आणि गलथान कारभार कारणीभूत आहे.
तेलंगाणा आणि मिझोराममध्ये भाजपला सीट्स मिळण्याची फारशी आशा खुद्द अमित शहांनाही नसेल.

परंतु या सगळ्यात एक गोष्ट मात्र अतिशय विनोदी आणि सर्वांच्या आकलनापलिकडची आहे ती म्हणजे,

कॅथलिक ख्रिश्चन आई आणि पारशी बाप (आजोबाचे नाव Feroze Jehangir Ghandy) यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा जानवेधारी ब्राह्मण कधी आणि कसा झाला?

राहुल गांधीचे गोत्र हा त्याचा वैयक्तिक मामला आणि मोदींची पत्नी हा सार्वजनिक मामला हा शुद्ध दुतोंडीपणा आहे.

>> >
मोदींचे वैवाहिक स्टेट्स हा सुद्धा त्यांचा वैयक्तिक मामला आहे, मात्र निवडणूक विवरण पत्रात त्याचा उल्लेख झाल्याने, आणि या पूर्वी खोटी माहिती दिलेली असल्याचे उघड झाल्याने तो चर्चेत आला,
वाजपेयींचे वैयक्तिक जीवन बऱ्यापैकी स्फोटक होते, पण कोणी त्याचा उल्लेख करत नाही.
कोणत्याही नेत्यांचे पर्सनल आयुष्य घेऊन त्याच्या सार्वजनिक आयुष्याचे मूल्यमापन करायचे घृणास्पद काम केवळ भाजपेयीं लोकच करतात.>>>>

या कडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेय का रिव्हर्स स्वीप?

{कॅथलिक ख्रिश्चन आई आणि पारशी बाप (आजोबाचे नाव Feroze Jehangir Ghandy) यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा जानवेधारी ब्राह्मण कधी आणि कसा झाला?}
यातच गुंतून रहा. तेच बरं आहे आणि तीच लायकी आहे.

सिम्बा,
राहुल गांधीचे गोत्रं चर्चेत कधी आले आणि यामागची पार्श्वभूमी काय हे जरा तपासून पाहण्याचे कष्ट घ्याल का?
राहुल गांधी राजकारणात आल्याला किमान १० वर्ष झाली, पण त्यांच्या गोत्राची चर्चा कधीपासून आणि का झाली?

{रागा भविष्यातील पंतप्रधान ... बापरे किती भयानक आहे हे }
मोदी पंतप्रधान असण्यापेक्षा सुद्धा भयंकर का?
फार नाही. आरविंद सुब्रमण्यन, अरविंद पानगरिया आणि उर्जित पटेलना विचारा.

{कॅथलिक ख्रिश्चन आई आणि पारशी बाप (आजोबाचे नाव Feroze Jehangir Ghandy) यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा जानवेधारी ब्राह्मण कधी आणि कसा झाला?}
यातच गुंतून रहा. तेच बरं आहे आणि तीच लायकी आहे.
>>>>>

दुसर्‍याची लायकी काढण्याचा मक्ता आणि अधिकार तुम्हाला कोणी दिला?
डिस्गस्टींग.

{मोदी पंतप्रधान असण्यापेक्षा सुद्धा भयंकर का}
नक्कीच .... असा राहुल यांचे काय कर्तृत्व आहे कि त्यांनी पंतप्रधान बनावं? केवळ आडनाव गांधी आहे म्हणून? आरे आता तरी गुलामीतून बाहेर या

कॅथलिक ख्रिश्चन आई आणि पारशी बाप (आजोबाचे नाव Feroze Jehangir Ghandy) यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा जानवेधारी ब्राह्मण कधी आणि कसा झाला?}
यातच गुंतून रहा. तेच बरं आहे आणि तीच लायकी आहे.
>>>
+१

>>>>>दुसर्‍याची लायकी काढण्याचा मक्ता आणि अधिकार तुम्हाला कोणी दिला?

ती त्यांनी आज फक्त स्पष्टपणे काढली इतकेच, अस्पष्टपणे हे कैक वर्षे सुरू आहे Proud

असो!

जानवे घातले की निवडणूक जिंकता येते हा अत्यन्त चुकीचा प्रघात मात्र पडला

उनाडटप्पू, मोदींचं कर्तब पाहूनही तुम्हाला हे प्रश्न पडताहेत?
बाकी मोदीच हवेत पासून राहुल नको रे बाबा हा प्रवास कसा झाला?

कॉंग्रेसचा विजय हा फारसा दैदीप्यमान नसला तरी भाजपचा पराभव दैदीप्यमान आहे. मला आणिबाणीनंतरचा इंदिरा गांधींचा पराभव आणि जनता पार्टी राजवट आठवते. १९७७चा कॉंग्रेसचा पराभव हा २०१४ च्या पराभवापेक्षा दारुण होता. पण त्यानंतरच्या जनता राजवटीने कॉंग्रेस हटाओचा धोशा लावला, सतत शहा कमिशनच्या सुनावणीच्या, चांडाळचौकडीच्या प्रतापांच्या आणि नेत्यांची पोल खोलण्याच्या बातम्यांना छापील माध्यमांतून आणि व्यासपीठीय राणा भीमदेवी भाषणांतून फाजिल महत्त्व दिले. त्याचा इतका अतिरेक झाला की अखेर सामान्य जनता या सूडाच्या राजकारणाला विटली आणि नंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी भरघोस मतांनी निवडून आल्या. सध्याही तेच घडले असावे. कॉंग्रेसची साठ वर्षे आणि कॉंग्रेसमुक्त भारत ही घोषणा सतत उगाळल्याने लोकांचे कान किटले. नकारात्मक प्रचार नेहमी यशस्वीच होतो असे नाही. उलट तो अंगावर उलटू शकतो . तेच या वेळी दिसले

लिंबूटिंबूंची लायकी काढल्यावर सातींचा आयडी उडवणारे अ‍ॅडमिन आणि वेबमास्टर याबद्दल काही कारवाई करणार आहेत, का हा आयडीही अमरपट्टा बहाल करण्यात आलेल्या आणि कोणालाही वाटेल ते बोलण्याचा मक्ता देण्यात आलेल्या आयडींपैकी एक आहे?

लिंबूटिंबूंची लायकी नाही, आयक्यू काढला होता. आणि तोही जातिभेदाच्या मुद्द्यावर.म्हणजे तुमच्याच माळेचा मणी
या कमेंटसाठी माझा आयडी उडणार असेल, तर खुशाल उडो.
I stand by it.

मोदींचं कर्तृत्व पाहून प्रश्न पडण्यापेक्षा राहुल गांधींचं वक्तृत्व पाहून ते पंतप्रधान झाले तर काय होईल या भीतीने घाबरायला होण्यासारखी परिस्थिती आहे.

उदाहरणार्थ -

This morning when I woke up at night.
विश्व...विश्वे... रय्या... विश्वरया...
नरेगा.... महात्मा गांधी.. योजना...
गुजरात को किसीने खडा किया है... वगैरे वगैरे...

M R S Sirisena.
600 crore indian voters.
Do you need more?

कॉंग्रेसचा विजय हा फारसा दैदीप्यमान नसला तरी भाजपचा पराभव दैदीप्यमान आहे. मला आणिबाणीनंतरचा इंदिरा गांधींचा पराभव आणि जनता पार्टी राजवट आठवते. १९७७चा कॉंग्रेसचा पराभव हा २०१४ च्या पराभवापेक्षा दारुण होता. पण जनता राजवटीने कॉंग्रेस हटाओचा धोशा लावला, सतत शहा कमिशनच्या सुनावणीच्या, चांडाळचौकडीच्या प्रतापांच्या
>>>>
+१

जनता पक्षाची ती ऐतिहासिक घोडचूक होती हे निर्विवाद सत्य आहे. मुळात जनता पक्षातच इतक्या लाथाळ्या आणि अनेक नेत्यांचे अंडरकरंट्स होते की काँग्रेसला काहीही करण्याची गरजच न पडता ते आपल्या कर्मानेच सत्तेतून बाहेर पडले असते.

रिव्हर्स स्वीप,
मोदी चे असे लाप्स ऐकायचे आहेत का? बरेच आहेत,
अगदी मोहनलाल गांधी पासून आहेत

पर्सनल कॉमेंटस करणार्‍या ट्रोलभैरवांना उत्तर देत नाही.
एकतर माझ्यापाशी तेवढा पेशन्स नाही आणि त्यांच्यासारखा दिवसभर इथे 'दे दान सुटे गिराण' करत पडून राहण्याइतका वेळ त्याहून नाही.
तस्मात आपल्या डबक्यात सुखी रहा.

रिव्हर्स स्वीप,
तुम्ही नक्कीच नाल्यातून निघणारा गॅस वापणारे, ५६ इंची छातीचे भक्त असणार ज्यांना त्यांच्या सुप्रीम लीडर ने १५ लाख दिले आहेत.

Pages