पर्याय (टुन्ना_किरणुद्दीनच्या_कथा)

Submitted by किरणुद्दीन on 11 September, 2018 - 21:44

टुण्णा किरणुद्दीनच्या बायकोला वांगं आवडत असे. तिने आजूबाजूच्या बायकांना सोबत घेऊन टुन्नाच्या डोक्यात वांगं ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे असे भरवले. रोज एकेक मैत्रीण येऊन टुन्नाच्या बायकोशी मोठ्या आवाजात चर्चा करायची. वांगं सोडून प्रत्येक भाजी कशी निकम्मी आहे यावर त्यांचा खल व्हायचा. हळू हळू टुन्नाचं डोकं काम करेनासं झालं.

मग टुन्नाच्या घरी रोजच वांगं बनू लागलं. रोज वेगळ्या रूपड्यात पण वांगच बनत असे. कधी भरीत, कधी वांग्याच्या फोडीला मसाला लावून हाफ फ्राय, वांगं बटाटा, वांग्याचीच उसळ, वांग्याचा झणझणीत रस्सा...

असं तीन वर्षे चाललं. आता वांग्यामुळे टुन्नाला वाताची समस्या सुरू झाली.
टुन्ना वांग्याबद्दल तक्रार करू लागला.

आता बायकोलाही वांग्याचे जादाचे फायदे सांगता येईनात. मग तिने पेच टाकला

"पण पर्याय काय ?"

टुन्नाची विकेट निघाली. कारण बटाटा, भेंडी, पालक, मेथी, रताळे, वाटाणा, घेवडा, पडवळ, घोसावळे, दोडका, भोपळा, शेपू, अंबाडी, कांद्याची पात इ. इ. सर्वच भाज्या निकम्म्या आहेत आणि वांगे एकटेच कामाचे आहे हे त्याच्या मेंदूवर कोरण्यात आले होते.
टुन्नाला जाच होऊ लागला.

कसेबसे अजून एक वर्ष गेलं.

मग टुन्ना म्हणाला " हे बघ मला निकम्मी असली तरी चालेल पण दुसरी भाजी पाहीजे, काही झाले तरी मला आता वांगे नको "
बायको म्हणाली "असा वांगेद्वेष बरा नव्हे"

टुन्ना म्हणाला " पर्याय नसला तर नसू दे, पण मला आता काहीही चालेल "

बायको म्हणाली "आता वांगेच खा. आजपर्यंत तुला काही झाले नाही, आता का ओरडतोस ?"

असं करता करता पाच वर्षे सरली. टुन्नी खूष होती. टुन्नाची जिरली होती. एकदाचं २०१९ साल उजाडलं. मे महिना आला.
एक दिवस टुन्नी बाजारातून वांगं घेऊन आली आणि बघते तो काय...

घरातून मिक्स भाजीचा खमंग वास येत होता. तिने रागाने आत पाऊल टाकले आणि तिला दुसरा धक्का बसला.

घरात एक अतिशय सुंदर स्त्री टुन्नाला जेवू घालत होती. टुन्नीने रागाने विचारले "ही कोण ?"
टुन्ना म्हणाला " आजपासून हीच या घरात स्वयंपाक बनवणार आणि हिचेच राज्य चालणार कारण ही वांगे खात नाही. वांगे बदलले नाहीस म्हणून मी तुलाच बदलले "

तात्पर्य : प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोच

#टुन्ना_किरणुद्दीनच्या_कथा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॉप कोर्न आणायचे का Wink
अजून एक शीर्षक बनेल ह्या लेखाचे ---> वांग्याची वानगी

:))

मालक
किरणूद्दीन च्या नावाने WA वर घालू का?

मालक
किरणूद्दीन च्या नावाने WA वर घालू का?

५ वर्षानंतर २०१९ लोकसभा निवडणुक, काही संबंध आहे का?
निकाल सुद्धा शक्यतो मे पर्यंत लागेल...

च्रप्स, अ‍ॅमी, किंग ऑफ नेट, कोमल, उमानु, उर्मिला एस, पवनपरी, नमोकर आणि शाली ... आपणा सर्वांचे मनापासून आभार.

कल्पेशकुमार - चांगलं व्हतं की लका हे बी टायटल.. पन म्याच आत्ता आलु.

सिंबा - इचारायचं वं काय त्यात... हाणा !

पद्य - मला सुद्धा कल्पना नाही. एका दिव्य अवस्थेत ही कथा माझ्याकडून परमात्म्याने , विधात्याने लिहून घेतलेली आहे. त्यामुळे शंका त्यालाच विचारणे इष्ट Happy

हे किरनुद्दिन म्हणजे मल्हारी विरुद्ध किरणु हा जो सामना माबो वर चालू आहे त्यातले का?

जाई., मॅगी आभार.
कामदेव बाबा... इतकी सुसंबद्ध प्रतिक्रिया पाहून गहीवरलो. Happy

Pages