तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईशाला पर्याय 'पसंतं आहे मुलगी' मधली लीड रोल - नाव आठवत नाही, छान अभिनय करायची व स्मार्ट सुद्धा . >>> रेशम प्रशांत. मी कधीपासूनच ती हवी होती लिहीलं आहे. मग मी बघितली असती ही सिरीयल.

होय अन्जू. मी मिसली तुझी पोस्र्त/ WISH.
रेशम प्रशांत दिसली नाही पआमुनंतर. मला झी मराठीशिवाय दुसरे मराठी serial factory channels दिसत नाहीत

रेशम प्र. इतकी शहाणी मुलगी आहे की तिनं असला वेडेपणा केलाच नसता मुळी. Happy
शिवानी रांगोळेनं मस्त केलं असतं.

सवता सुभा हे फार उच्च आहे. Rofl

रेशम प्र. इतकी शहाणी मुलगी आहे की तिनं असला वेडेपणा केलाच नसता मुळी. >> +1.
ती मृण्मयी देशपांडेची बहिण गायत्रीचं ना?? सोनी मराठीवरच्या सिरियलमध्ये आहे ती पण शोभली असती ईशाऐवजी. काम पण छान करते अगदी. Happy

नुकतेच व्हाटस् अपवर आलेले..

आमच्या येथे एका *"राजनंदिनी"* साडीमधून २ *ईशा* ड्रेसेस, १ *मायरा* स्कर्ट आणि १ *झेंडे* जाकीट शिवून मिळेल.

आणखी कापड उरलेच तर त्यातून दोन *निमकर* रूमाल शिवून मिळेल.

प्रो.पा.: *विक्रांत पायजामे*

का पाहताय रे??

कालचा भाग पाहिला,विकूने जेव्हा सांगितले की बाळ राजनंदिनी साडी डिपार्टमेंटची हेड आहे तेव्हा बाळाला काही एक्स्प्रेशन्स देताच आली नाहीत.नंतर बाळ हसल की आओठ पसरवले कळल नाही,पण ते आधीच्या सिन च एक्स्प्रेशन् असाव.
जाम चेहयशरा हलत नाही या बाळाचा.आजकालची पाळण्यातली बाळ सुध्दा छान एक्स्प्रेशन्स देतात.
बाळ जेव्हा कपटी हसत खाली मान घालून म्हणजे ते तिच लाजण आहे,तेव्हा मात्र एक द्यावीशी वाटते.

शेवटी काल ईशाचा सुद्दा डायलेमा झाला की 'मी फ्लॅटची चावी घेऊ की नको'

बाकी चॅलेन्ज सीन्समध्ये सुभाचे एक्सप्रेशन्स मस्त. विसला मराठी शायरी सुचली नाही वाटत. 'अभी दिल्ली दुर है बाबू' म्हणायला हव होत त्याने झेन्डेला.

मायरा आणि ईशाच्या सीन मध्ये मायराची अ‍ॅक्टिन्ग जबरदस्त झालेली.

झेन्डेला मायराच्या मनातल तिने न सान्गता कळत वाटत. Wink ती ईशाला इमोशनल टॉर्चर करणार आहे हे बरोब्बर कळल.

मायरा झेन्डेला ' गॉड ब्लेस यू' म्हणाली. Uhoh

जालिन्दरकाका सुट्टीवर गेले वाटत.

*विक्रांत पायजामे* >>>>>> Lol

शिवानी रांगोळेनं मस्त केलं असतं. >>>>>> ती तर आणखीनच लहान वाटली असती सुभापुढे.

जालिन्दरकाका सुट्टीवर गेले वाटत.>> ते त्यांच्या मदतनीसाच्या घरी बिर्याणी खायला गेले होते. त्यानंतर दाखविलेच नाहीत.

आजचा एपि बघितला नाही पण चुकून पुढच्या भागात मध्ये दाखवतात ते दिसलं.. धन्य .. उद्या ईशा स्कर्ट घालून येणार . :फेसपाम:

ई बाळ स्लो मोशन मध्ये पापण्यांची उघडझाप करते.. बहुतेक तिला बोलणं आणि blinking असं मल्टि टास्किंग जमत नाही..

ई बाळ स्लो मोशन मध्ये पापण्यांची उघडझाप करते.. बहुतेक तिला बोलणं आणि blinking असं मल्टि टास्किंग जमत नाही.. >>> Lol हे जबरी आहे.

अरे ते सवता सुभा इतके हिट होईल कल्पना नव्हती. थॅन्क्स पब्लिकहो.

आनंदी,फार काहीच नाही झाल.बाळाची आई चाळकर्यांना घरी सामोश्याची पार्टी देते बाळाच्या प्रमोशनबद्दल.मायराच काहीतरी कट चालूच आहे.विकू फोन करतो बाळाला पार्टी चालू असताना,चाळकरी त्यावरून काहा बाही टॉंंन्टिंग करतात,मग बाळाच्या बाबांची झोप उडते ,बाळ विचारत काय झाल?
बाबा म्हणतात,लोक काहीतरी बोलत होते.पण बाबूवर विश्वास आहे त्यांचा
पण बाबूच एकच पालूपद,विक्रांत सर जेव्हा मनातल सांगतील तेव्हा बाबांना सांगेन.संपला भाग.

Okkk

शेवटी काल ईशाचा सुद्दा डायलेमा झाला की 'मी फ्लॅटची चावी घेऊ की नको'>> ती म्हणत असेल की चल हट, माझा 3500 कोटींवर डोळा आहे आणि तुम्ही माझी बोळवण एका फ्लॅट वर करत आहेत?

हा उच्च सुभा सो कॉल्ड एका एपिसोड मध्ये " ची पुनराव्रू त्ती पुन्हा व्हायला नाही पाहिजे असे म्हणला. " तो काय फार ग्रेट नाये. पुनराव्रू त्ती म्हणजेच पुन्हा ना?! आणि विस फार डॅशिन्ग उद्योजक असेल तर एका पोरीला मनचे सांगा या ला इतके काय घाबरतो?! करो डोंची डील एका फटक्यात करत्
असावा. लाज्जरीच्या रोप्पटिला अ‍ॅक्ट इज नॉट सुटिंग.

बरे इशा एका प्रॉजेक्ट्ची हेड. मायरा ग्रूप ए व्हीपी. जेल स व्हायला जागा तरी आहे का?! पण मायराला सर्व मलाच पाहिजे बॉस पण असे आहे.
असतात अश्या.

Happy आणि जेव्हा विस ला माहिती आहे की पोरगी एका पायावर तयारे व लग्गेच हो म्हणणार....मग काय इतके आढेवेढे !! ..
मायरा फोन उचलून..."मा यरा..! " म्हणते...ते फार आवडतं मला....!

तुंबाडमधली म्हातारी Rofl मायराचं स्पेलिंग Myra आहे. Mayra असायला हवं ना. ईशासाठी सुभा ईतका लाजतोय बिजतोय हे काय पटत नाय बुवा.

हा उच्च सुभा सो कॉल्ड एका एपिसोड मध्ये " ची पुनराव्रू त्ती पुन्हा व्हायला नाही पाहिजे असे म्हणला. " तो काय फार ग्रेट नाये. पुनराव्रू त्ती म्हणजेच पुन्हा ना?! >> हे काय होतं. कधी झालं?

सुभा, त्या इशाच्या बावळट कल्पनांना वर्ल्ड क्लास म्हणून डोक्यावर घेतो तेव्हाच त्याच्या अभिनयाची अत्युच्च कसोटी लागते.

ईथे हापिसात प्रोजेक्ट चेंज झाला तरी पहिले काही दिवस फ्या फ्या उडते
आणि ईथे ही डायरेक्ट हेड ? पण असो, मालकाची बाय्को मालकीण ह्या न्यायाने बरोबर आहे.

सुभा, त्या इशाच्या बावळट कल्पनांना वर्ल्ड क्लास म्हणून डोक्यावर घेतो तेव्हाच त्याच्या अभिनयाची अत्युच्च कसोटी लागते.####
खरंच..

मी तर महाएपिसोड ची वाट बघतेय.. इथे लिहायला खूप मटेरियल मिळणार आहे

आत्ता एक प्रोमो दाखवला, फ्रँकली दिसण्यात दोघेही आवडले नाहीत. सुबोध बोलत मात्र छान होता. मला पहील्यापासून वाटतंय की त्याला अति एजेड दाखवलंय, एवढी गरज नव्हती. मी आधीही लिहीलेलं.

Pages