बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिबॉच्या घरात मेघाने दीपकला इग्नोअर करणे म्हणजे वीकेन्डला सलमानचे रिमार्क्स कि आप दिख नही रहे हो, अता जे काही झालय फक्त मेघाची चर्चा आहे आजच्या एपिसोडनंतर, चांगली/वाईट पण श्रीसन्तच्या ब्रेकिंग न्युजपेक्षा पुढे मेघा सगळ्या सोशल मिडीयाभर !
दीपकही सुरवातीपासून ते मार खाल्ल्यानंतरही निर्लज्ज फक्त मेघाच्या मागे होता न्युजसाठी, तिचा पाठलागच सोडत नव्हता.
बाकी सगळे घरातले सदस्य दिसलेच नाहीत मेघापुढे, काही दम नाही मेघा सोडून आणि श्रीसन्त सोडून इतर कोणाच्या अ‍ॅटीट्युड मधे, न्युज मधे!

आज हा ऑनेस्ट्ली इन्सेन चा रिव्ह्यु नक्की बघा, बिबॉ एपिसोड एक वेळ चुकवला तरी चालेल, अगदी मनापासून आपल्या मनातल बोलतो विकास कनोजिया, फेमिनिस्ट मुलींना समाधान मिळेल !
https://youtu.be/9bR_mO4gc90

मी मेघाची खूप मोठी फॅन होते मराठी बिबाॅमधे. अगदी इथेसुद्धा काहीवेळा तिची बाजू घेऊन लोकांसोबत खटके उडालेत.
आता खरंच वाट्टंय की मेघाने हिंदी बिबाॅमधे जायलाच नको होतं. तिने तसाच एक शो जिंकलाय ऑलरेडी आणि आता इथे येऊन त्या विजयाची एकप्रकारे खिल्लीच उडवलेय तिने स्वतःच. बाकी लोक उडवायला लागले की चिडायचं कशाला मग?
हिंदी बिबाॅ मराठी बिबाॅ पेक्षा काहीतरी जास्त आहे हेच दाखवायचं आहे का इथे?
हा सिझन सगळ्यात घाणेरडा आणि बोअर आहे.

अता जे काही झालय फक्त मेघाची चर्चा आहे आजच्या एपिसोडनंतर, चांगली/वाईट पण श्रीसन्तच्या ब्रेकिंग न्युजपेक्षा पुढे मेघा सगळ्या सोशल मिडीयाभर ! >>> वाईट इमेज व्ह्यायला नको होती.

मी अजुनही एपिसोड बघितला नाही पण मेघाचं वागणं पर्सनली नाही आवडलं. पुंबा म्हणतायेत ते बरोबर वाटलं.

ही कशी काय झाली मराठी विनर, हिला कसं निवडून दिलं मराठी प्रेक्षकांनी, बेकार आहे ती. असं सर्व पण वाचलं.

मेघाने डीग्निटी सांभाळायला हवी होती असं मला तरी वाटतं. मला हे सर्व बघुन झुंज मराठमोळीमधे भांड भांड भांडायची आणि मला अजिबात तिथे आवडली नव्हती, हे आठवलं. बिबि मधे आधी आवडली नव्हती पण नंतर तिच्या वागणुकीने तिने माझ्या मनात रिस्पेक्ट निर्माण केला, आवडायला लागली. तसंच वागणं मला इथे अपेक्षित होतं.

मी अजुनही एपिसोड बघितला नाही पण मेघाचं वागणं पर्सनली नाही आवडलं. पुंबा म्हणतायेत ते बरोबर वाटलं.

ही कशी काय झाली मराठी विनर, हिला कसं निवडून दिलं मराठी प्रेक्षकांनी, बेकार आहे ती. असं सर्व पण वाचलं.

मेघाने डीग्निटी सांभाळायला हवी होती असं मला तरी वाटतं. मला हे सर्व बघुन झुंज मराठमोळीमधे भांड भांड भांडायची आणि मला अजिबात तिथे आवडली नव्हती, हे आठवलं. बिबि मधे आधी आवडली नव्हती पण नंतर तिच्या वागणुकीने तिने माझ्या मनात रिस्पेक्ट निर्माण केला, आवडायला लागली. तसंच वागणं मला इथे अपेक्षित होतं >>>>>>> ++++++++११११११११ इन्डिया फोरम्स वर प्रत्येक एपिसोडसचे डेली अपडेटस असतात. त्यात सुद्दा मेघा बॅशिन्ग चालू असत लोकान्च. इवन, साप टास्कमध्ये सुद्दा ती रोहितला त्याच्या आईवरुन बोलली हे लोकान्ना दिसल, पण रोहित आणि दिपक कसे तिच्याशी वागले हे नाही दिसले त्यान्ना. तिकडे तिला राखी सावन्त पार्ट २ म्हणतात.

मी मेघाची खूप मोठी चाहती आहे, पण कालचा भाग बघुन मन विषण्ण झालं Sad
दिपक थर्डक्लास आहेच आणि तो इरिटेट , इन्स्टीगेट करतोच आणि करणारच . पण तीच तर परीक्षा आहे ना !
मंगळवारी, बुधवारीच तिने पब्लिक मन जिंकलं. पण काळ सगळ्यावर पाणी पडलं Sad
पण तिचं थुंकणं अगदी अयोग्य होतं . मागच्या आठवड्यातही तिने चप्पल उचलेली आवडली नाही आणि कालही .
सगळं एकदम वेगळ्या पातळीवर जात आहे. विनर ची ट्रॉफी आहे तिच्याकडे याचं भान तिला हवं . Very Sad !!
Personally मला ती लवकर निघाली तरी चाललं असतं, पण आपला , आपल्या मराठी BB ट्रॉफी चा मान राखूनच , स्वतःची डिग्निटी राखूनच .
I don't want the whole world to remember her like this !

I don't want the whole world to remember her like this ! >>> अगदी अगदी.

दिपक थर्डक्लास आहेच आणि तो इरिटेट , इन्स्टीगेट करतोच आणि करणारच . पण तीच तर परीक्षा आहे ना ! >>> खरं आहे.

https://www.youtube.com/watch?v=Dxs0kuiyO-A

दिपक आणि मेघा दोघांना बोलला सलमान. मेघाने घाण घाण शिव्या दिल्यात ज्या दाखवू शकत नाही असंही म्हणाला सलमान.

बरेच जण देत असतील पण मेघाने असं वागायला नको होतं. जाऊदे आता तिला वोट नाही देणार. अशी प्रतिमा करणार असेल स्वतःची तर बाहेर आलेली बरी.

मुळात तिने जायला नको होतं असं मधेच हे मी आधीही लिहीलं. वर्षभर मराठीमधे जिंकली ते एन्जॉय करायचं आणि पुढच्या सिझनला पहील्यापासून बोलावलं तर जायचं. तिच्या कट्टर फॅन्सपैकी काही जणांना तरी तिचं वागणं नक्कीच खटकलं असणार.

कुठेतरी स्वत;वर कन्ट्रोल असण आणि स्वतःची डिग्नटी मेन्टेन करण जरुरी असत( यात स्त्री/पुरुष हा भेद नाही) एपिसोड ,प्रोमो काहीही पाहिल नाही पण आत अस्ताना कुणाला फेवर केल जातय, आपण वाईल्ड कार्ड आहोत त्यामुळे परत चॅनेल आपल्याला कस जिन्कु देइल याच अ‍ॅनेलिसिस करुन कस वागायच याच भान तिने ठेवायला हवय , हे मी मराठी बीबॉ लाही बघितल होत की मेघा आपण जिन्कायचच असा पण करुन गेली होती त्याप्रमाणे ती जिन्कली सुद्धा पण त्यान्तर यश पेलण हेसुद्धा कठिण असतच की...
हॅपी क्लब आणी त्यातली टिपकल राउडी मन्डली आणि त्याचा कलकलाट तर अगदी नको करणारा आहे, हा सिझन कणभरही मनोरजन्क नाही, नुसते भाण्डण , कोकलण आणी राडे-गोन्धळ

पुंबानी लिहिल्याप्रमाणे चालचलनवरून रान उठवून बिग बॉसकडे डायरेक्ट तक्रार करून, तुम्ही शारीरिक हिंसा करायची नाही म्हणता पण असं समोरच्याने बोलल्यावर एक मुस्कटात द्यायला नको का किंवा चप्पल मारावीशी वाटतेय असं म्हणायला हवं होतं, त्याचा impact जबरदस्त झाला असता.

त्या रोहितलापण बोलायला हवं आहे सलमानने.

मुळात तिने जायला नको होतं असं मधेच हे मी आधीही लिहीलं. वर्षभर मराठीमधे जिंकली ते एन्जॉय करायचं आणि पुढच्या सिझनला पहील्यापासून बोलावलं तर जायचं. तिच्या कट्टर फॅन्सपैकी काही जणांना तरी तिचं वागणं नक्कीच खटकलं असणार. >>>>>>> +++++++११११११११

कुठेतरी स्वत;वर कन्ट्रोल असण आणि स्वतःची डिग्नटी मेन्टेन करण जरुरी असत >>>>>> बरोबर. इथे नेहा पेन्डसेच उदाहरण बोलक आहे. ती श्रीसन्तच्या कॉन्ट्रोवर्शियल उदगारान्वरून राडा करु शकली असती. पण तिने शान्तपणे त्याच्याशी बोलून घेतल ह्या विषयावर. स्वतःची मते सुद्दा वेळोवेळी न भान्डता मान्डत होती. ती डिसेन्टली बिबॉमधून बाहेर पडली. लोक सोशल मिडीयावर तिला परत आणा म्हणून भान्डत होते.

मेघाच मात्र उलट आहे. सतत मी बिबॉ मराठी विनर आहे हा धोशा लावायचा. हाच अतिआत्मविश्वास तिला नडला. प्रत्येक वेळी अरे ला कारेच करायला हव अस काही नाहीये.

हॅपी क्लब आणी त्यातली टिपकल राउडी मन्डली आणि त्याचा कलकलाट तर अगदी नको करणारा आहे, हा सिझन कणभरही मनोरजन्क नाही, नुसते भाण्डण , कोकलण आणी राडे-गोन्धळ>>>>>+११११ हॅप्पी क्लब एकदम बोर, त्यांचे ते सगळे राडे, त्या चिप हरकती जिथे टीव्ही वर बघवत नाही, तिथे त्यांच्या सोबत राहणाऱ्यावर दया येतेय.
सगळ्यात जास्त चीड येतेय ती रोहित ची, रोमिल अन दीपक तर आधीपासूनच मवाली वाटत होते पण हा तर सभ्य वाटायचा पण तो तर खुपच चिप निघाला, मेघाच्या तोंडाजवळ तोंड आणून जो खालच्या पातळीचा प्रकार केला, अन जसलीनशी जसा वागला त्यावरून तर त्याला तेव्हाच हाकलून द्यायला हवे होते Angry

बाकी मेघा सारखी मुरलेली अन बिग बॉस चे आजवरचे सगळे सिजन कोळून प्यायलेली बाई असा निर्णय कसा घेऊ शकते याचे खूप आश्चर्य वाटते. तिला हे नक्कीच माहीत असणार न की आजवर कोणी वाईल्ड कार्ड जिंकला नाहीये, तसेच मराठी सारखे इकडे गोडुगोडू नसणार न मग?
तिने केलेली पहिलीच चूक तिला भारी पडतेय, त्या ट्रेनच्या टास्कमध्ये तिने मांडवली करायला नको होती, पण आता झाले ते झाले.
मी आजवर ह्या सिजन ला वोटिंग केले नाहीये पण पुढच्या आठवड्यात तिला नक्की करेन कारण काही झाले तरी मला ती त्या टपोरी रोहित अन दिपकच्या आधी बाहेर जायला नकोय. कितीही नावडती असली तरी असल्या चिप माणसांपेक्षा तरी ती जास्त डिसर्व करते. Proud

कालचा भाग पाहिल्यापासून मला मेघाच्या मॅडनेसमध्ये मेथड दिसू लागली आहे. मला वाटतं जेवढं फुटेज तिला गप्प बसून मिळालं असतं त्याच्या किती तरी पट आता मिळतंय. आधी बघितलं तर ती अक्षरशः दिसतच नव्हती, आता दिपकच्या लफंगेपणामुळं तिच्यावर फोकस आल्यासारखं वाटतंय. दिपकला हेट करणारे मेघाला सपोर्ट करतायंत असंच दिसतंय. अर्थात मला पर्सनली तिचा हा पराभव वाटला.

मी इतक्यातच बघायला सुरुवात केली आहे. मराठी बिबॉ फारच डिग्निफाइड होते असे वाटले हे लोक बघून. विशेषतः कॉमनर जे आहेत ते फारच कर्कश्य, थर्ड क्लास मेन्टॅलिटीवाले लोक भरलेत. सेलिब्रिटीज त्यातल्या त्यात डीसेन्ट वाटतायत. दीपक चा अशक्य राग येतो. त्याला चपलेने मारणे ही मला वाटते मेघाने मौका देख के मुद्दाम केले असावे. रिपोर्टर टास्क मधे मराठीत पण त्यांनी नंदकिशोर ला तसे टार्गेट केले होते.
मेघाच्या मॅडनेसमध्ये मेथड दिसू लागली आहे>> +१ . एकूण राडे करणे ही जाणून बुजून केलेली स्ट्रॅटेजी असू शकते. तसेही बिबॉ मधे शांत रहाणे, जाऊ दे म्हणून सोडून देणे, काही स्टँड न घेणे हे फक्त सिमर सारख्या सेलिब्रिटीज अफोर्ड करू शकतात. इतर कुणाही साठी ती सुसाइड च ठरते. दीपक ला त्याचा फॅन फॉलोविंग आहे तसे त्याचे हेटर्स आहेतच. त्यांना आपल्याकडे वळवणे ही स्मार्ट स्ट्रॅटेजी( तसे असेल तर) ठरू शकते, पराभव वगैरे काही नाही त्यात.

सलमानने एकदम कुल राहून स्वतःचं म्हणणं मांडलं. पण तो रोहीतला काहीच बोलला नाही हे मला पटलं नाही.

मेघाच्या मॅडनेसमध्ये मेथड दिसू लागली आहे>> +१ . एकूण राडे करणे ही जाणून बुजून केलेली स्ट्रॅटेजी असू शकते. तसेही बिबॉ मधे शांत रहाणे, जाऊ दे म्हणून सोडून देणे, काही स्टँड न घेणे हे फक्त सिमर सारख्या सेलिब्रिटीज अफोर्ड करू शकतात. इतर कुणाही साठी ती सुसाइड च ठरते. दीपक ला त्याचा फॅन फॉलोविंग आहे तसे त्याचे हेटर्स आहेतच. त्यांना आपल्याकडे वळवणे ही स्मार्ट स्ट्रॅटेजी( तसे असेल तर) ठरू शकते, पराभव वगैरे काही नाही त्यात.
<<
+1111
Vote for Megha !

युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं. मेघाला मत द्या. त्या भैयावर थुंकली ते योग्यच होतं, त्याच लायकीचा आहे तो भैया. मी तर बोलतोय त्याची गचांडी पकडून सटासट चपलीने कानाखाली पण वाजवायला पाहिजे होता. सकाळ सकाळ सायकलवर पाव विकायचे टाकून बिग बॉसच्या घरात काय करतोय तो. भैये ते भैयेच शेवटी जिथे जातील तिथे घाण करतील, एक बिहारी सौ बिमारी उगीच नाय म्हणत.

मी शुक्रवार एपिसोड बघितला नाही पण बिग बॉसने मेघाला नॉमिनेट करुन शिक्षा दिली आहे का, पण मग दिपकलाही द्यायला हवी होती. त्यालापण नॉमिनेट करायला हवं होतं.

मेघाने स्वतः मधे पॉझिटीव्ह चेंजेस करायला पाहीजेत मात्र. एका विनरला असं शोभत नाही असं अजुनही मला वाटतं. तिचं आणि दिपकचं झालं त्यापेक्षापण ती घाण घाण शिव्या देते त्या दाखवू शकत नाही, असं सलमान म्हणाला त्यामुळे तिने खरंच एका विनरला शोभेल असंच वागावं असं मला वाटतं.

दिपक आणि तिने एकमेकांची माफी मागितली सलमानने दोघांना सुनावल्यावर. ती स्वतःवर पण नाराज दिसली हे दिसून आलं.

देईन ह्यावेळीपण मेघाला वोट.

मेघा थुंकली, शिव्या घातल्या हा मोठा गुन्हा मानला जातोय अंजुताई, जे मलापण थोडे पटते. मेघाने इमोशनल बॅलन्स हरवला असंच दिसलंय तिथे. मी पराभव म्हणतो तो हा की, रोमिल, सुरभीसारख्या लंबी रेस च्या घोड्यांना न नडता दिपकसारख्या चिरकुटला इतकं फुटेज दिलं. तेच दिपिकाने पहाल तर खुप छान पद्धतीने हॅंडल केलं त्याच्या इन्स्टिगेशनला.

दिपक आणि सोमी अतिशय फुसकुंडे प्लेयर्स आहेत, रोमिल, सुरभीमुळे पुढे जाताहेत.
इथे सध्या चर्चा आहे ती श्री, दिपिका, रोमिल यांचीच, लास्ट तीन हेच असतील असे वाटते. मेघा, रोहित, केव्ही, जसलीन हे पुढच्या आठवड्यात पण नॉमिनेट असतील. त्यातून जॅज किंवा रोहित जातील.

छान पोस्ट पुंबा. बघितलं नाहीये पण अंदाज आला थोडाफार.

तेच दिपिकाने पहाल तर खुप छान पद्धतीने हॅंडल केलं त्याच्या इन्स्टिगेशनला. >>> अच्छा. मग दिपिका विनर व्ह्यायला जास्त योग्य वाटतेय आत्तातरी.

दिपिका- मेघा- श्री- जसलीन असा अक्ष बनला आहे असं सध्या तरी वाटतंय. यात मेघाला खरा सपोर्ट हे कितपत करतील हे माहित नाही.

दिपक आपल्या खेळीत यशस्वी झाला, असं मेघाने कबुल केलं .

सलमानने आज तिला हे दाखवून दिलं की तो हेच करतोय पण तू विनरसारखी खेळत नाहीयेस. जे तिलाही पटलं.

जसलीनने मेघाचं नांव घेतलं म्हणून तिला टॉर्चर केलं गेलं. सुरभीने मात्र दिपकचं नांव घेतलं आणि मेघाला जेलमधे पाठवून झालंय असं म्हणाली.

जसलीनला डंब म्हणतात का सगळे, आज समजलं. स्मिताला म्हणायचेना मराठी बि बि त.

मी शुक्रवारचा एपिसोड बघितला.

बिग बॉसनी दीपक आणि मेघा दोघांना nominate करायला हवं होतं. फक्त मेघाला केलं हे चुकलं.

दीपक आणि रोहित कित्ती इरीटेट करतात, बापरे. श्रीशांत आणि मेघा त्यांच्या जाळ्यात बरोबर फसत होते. पण hats off to दीपिका. पूर्ण एपिसोड ती अजिबात इरीटेट न होता ज्या ग्रेसने सामोरी जात होती ना त्यासाठी लव दीपिका, छा गयी दीपिका पूर्ण एपिसोड. मला आवडली ती अगदी निदान हा एपिसोड बघून.

शेवटी रोहितला जेलमध्ये जायला लागलं तो सीन बेस्ट. सुरभी पण म्हणाली, bb ने तमाचा मारा. रोहितला जेलमध्ये पाठवलं नाही, त्याची जागा तिथेच होती ह्याबद्दल तिला कळून चुकलं. तिने कबूलही केलं.

पुढे दीपिका कसं वागेल किंवा आधी कशी वागली मला माहिती नाही पण शुक्रवारचा एपिसोड बघून ती विनर होण्यासाठी योग्य आहे असं मलातरी वाटतं.

मेघा आणि श्रीशांत मात्र नाही आवडले त्या एपिसोडमध्ये, ते बळी पडत पडत होते त्यांच्या irritate करण्याला आणि तेही तमाशा करत होते. जे प्रेशर मेघाने मराठी बिग बॉसमध्ये सहन केलं, त्यात इथे कमी पडतेय.

रोमिल कितीही गयागुजरा mastermind असुदे, त्याचं impression पडते मात्र. त्याची personality त्याच्याकडे लक्ष द्यायला भाग पाडते. त्याला सिरियल्स मिळणार नक्की. इन्स्पेक्टरचा रोल चांगला करेल, dashing personality.

मेघाने टेक्लिकली चप्पल नेम धरून लागेल अशी मारली म्हणून बिबॉच्या काँट्रॅक्टनुसार शिक्षा तिला झाली , दीपकला नाही.
जाउदे, एका आठवड्यासाठी नॉमिनेटेड ही शिक्षा फेअर इनफ, खूप काही कडक नाहीये ही शिक्षा.
या आधीही सबा आणि सृष्टीला त्याचसाठी शिक्षा झाली, धक्कबुक्की झिंज्या उपटणे प्रकार केला म्हणून या सिझनला कधीही कॅप्टन्सीची उमेदवारी नाही.
मेघाने मर्यादा ओलांडली असेल, चूकीच्या प्रकारे रिअ‍ॅक्ट केलं असेल पण काही शब्द ट्रिगर पॉइंट्स असतात प्रत्येकाच्या आयुष्यात घडणार्या घटनांमुळे !
एका कुठल्यातरी फेमस ट्विटर हँडलनी ट्विट केल होतं याबद्दल, नाव विसरले, बहुदा आपलामराठीबिगबॉस.
जसा श्रीसन्तला मॅच फिक्सिंग /जेल या शब्दांवरून सटकतं, दीपिकाला डिव्हिर्स या पर्सनल मुद्द्यावरून तसं मेघाला या शब्दावरून सटकु शकतं.
लग्ना आधी टिनेज मधे आई होण्याचा प्रसंग तिच्या आयुष्यात आला त्यस्मुळे 'कॅरॅक्टर' शब्दावरून तिला ऑलरेडी आयुष्यात डिवचल गेलं असेल, एक वाईट फेज बघितली असेल तिनी, त्यामुळे दीपकच्या चुकीच्या शब्दामुळे हे घडु शकतं.
तरी मेघा वीकेन्डच्यावर नंतर योग्य ती हिंट घेऊन सुधारणा करेल अशी आशा !
Btw त्या दीपकला भरपूर फॅन्डम आहे, सेलिब्रिटिजच्या बरोबरीने, तो का आणि कोणाला आवडतो देव जाणे!
बहुदा स्मॉल टाउन, गरीब वगैरे सिंपथी कार्ड /प्रांतीय व्होट्स इ. असु शकेल, शिवाय तो गातो चांगला म्हणूनही असेल, पण त्याला फिनाले मधून काढणे अशक्य दिसतय वोटींगच्या आधारे !
सर्वात जास्त मार्जिनने टॉप रँकवर दीपिका, नंतर श्रीसन्त मग केव्ही, त्यानंतर ४थ्या पाचव्या नं वर रोमिल दीपकमधे टफ फाइट अस्स्ते.
यांच्यानंतर बाकी सगळे येतात !
बाकी कॉमनर्सना फेवर केल जातं याच साध सोपं इक्वेशन हे शेवटी कोण किती महाग आहे शो मधे यावर अडकतं !
हॅपी क्लबच्या लोकांची किंमत ही आठवड्याला काही हजार पण सेलेब्जची किंमत दिवसाला काही लाख त्यामुळे काही कन्टेन्ट/ ड्रामा न देणारे नेहा, सृष्टी सारखे सेलिब्रिटीज घरात ठेवणं परवडत नाही शो ला, तेही हा सिझन फार टीआरपी देत नसताना !
अजुन एक कारण हेही आहे कि टास्क मधे अ‍ॅग्रेशन दाखवत नाहीत मेघा सोडून इतर सेलिब्रिटीज, आरामात जाऊन किचनमधे बसतात यांच्या टिमचे इतर मेंबर्स टास्क करत असताना ! Uhoh

आरामात जाऊन किचनमधे बसतात यांच्या टिमचे इतर मेंबर्स टास्क करत असताना >>> ओहह असं आहे का मग मेघाला ठेवतील शेवटपर्यंत कारण ती कंटेंट देतेय टास्कमध्ये.

छान आढावा, डीजे.

दीपकचं थोबाड चांगलं उतरलं होतं काल, फाजील आत्मविश्वास.. फार ढगात गेला होता.. आणला धाडकन खाली त्याला.. थोड्या फार फरकाने हॅप्पी क्लब वाले सगळेच ढगात आहेत आणि सेलेब्रिटी बिचकून आहेत.. सलमान खानने फुगा फोडला पाहिजे टचकन एकेकाचा.. चीड येते नुसतं किरकिर.. सलमान बरोबर बोलला.. कोणी हात उचलू शकत नाही म्हणुन irritate करत असतोस आणि डिवचत असतोस.. आता आज रोहित आणि सोमीचा नंबर लागायला पाहिजे

Pages