बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Deepak Thakur walks away with money bag offer leaving Shree Dipika in top 2 Happy
Yes , Kachra club didn't win !
Good for Deepak though, he accepted 25 lakh offer which was great decision!
Dipika has won , according to Khabri news.

मी आत्ता लावलंय, पण काही कळत नाहीये. बिल्डींगमधे हळद आहे एका मुलाची, त्यामुळे डीजे सुरु आहे.

इथे वेळ लागणार टीव्हीवर. आत्ताशी केव्ही एलिमिनेट झाला. मग रोमिल होईल. त्यानंतर पैसे बॅग सीन असेल. जाऊदे खूप वेळ लागणार, बंद करते.

दीपिका न्युज लिक झाली पण ती खरी नसावी, शो अजुन शुट होतोय.

Btw हा व्हिडीओ व्हयारल झालाय, श्री ची मुलगी मेघाचा मेकप करतेय, टु क्युट Happy
https://www.instagram.com/p/BsAkjGBhDZl/?utm_source=ig_share_sheet&igshi...

दीपिका जिंकली. पहिले दोन मला हवे ते आले. तिसरा रोमिल असेल असं वाटायचं पण तो चौथा आला.

दीपिका जिंकली तर आनंद होईल जास्त, असं श्रीने सांगितलं.

मला दीपिका जिंकायला हवी होती, तसं झालं. मी वोट दिलेलं तिला.

मेघाच्या बाबतीत बिग बॉस खेल गये >>> हम्म्म.

मला फार वाटायचं ती अशी वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून उगाच आली. पुढच्या सिझनला पहिल्यापासून आली असती तर बरं झालं असतं.

https://www.youtube.com/watch?v=lIZRO_K38mA

शिल्पा शिंदेने असं का react केलं.

खरं सांगू का मला फार इंटरेस्ट नव्हताच, पण दीपिकाचा वावर दोन तीनदा बघितला अतिशय निगेटिव्ह वातावरणात, तो आवडला. ती श्रीलापण शांत करायची बरेचदा. त्यामुळे ती जिंकावी असं वाटत होतं.

श्री मात्र दीपिकाबाबत खरोखर उदारमतवादी वाटला, त्याला ती जिंकावी असं मनापासून वाटत असल्याचं दिसलं पण दीपिकाने ठामपणे सांगितलं की स्वतः जिंकली तर जास्त आवडेल तिला.

अन्जु,
शिल्पा शिन्दे डे १ पासून अशाच परसनल ट्विट्स करतेय दीपिका बद्दल, अगदी खुलेआम Happy
भुवनेश्वरी सुध्दा खूप अ‍ॅक्टिव्ह राहून श्री सारखीच कडव्या शब्दात टिका करायची, टिजे, कामया पंजाबी, गौहर सगळे उतरले होते ३ महिने मैदानात , हे ट्विटर वॉर जास्तं स्पायसी होतं बिग बॉस १२ पेक्षा !
दीपिका जिंकल्याबद्दल सगळ्यांनीच टिका केली आहे, हस्यास्पद निर्णय , बायस्ड निर्णय अशाच प्रतिक्रिया आहेत.
बिबॉच्या इतिहासात पहिक्यांदाच अशी मुखवटा धारण केलेली, स्ट्राँग पर्सनॅलिटी नसणारी, अजिबातच अ‍ॅग्रेसिव्ह नसणारी, सतत कोणाच्या आड राहून खेळणारी आणि मुख्य म्हणजे एपिसोड्समधे फार फुटेज सुध्दा न मिळणारी/ फार न दिसणारी व्यक्ती जिंकली आहे , टिका तर होणारच !
श्री चे शो नंतरचे इंटरव्ह्युजसुध्दा मस्तं आहेत, तो म्हणतो “ आय केम हिअर टु सरव्हाइव्ह , बट आय अ‍ॅक्चुअली रुल्ड द शो ‘ Happy
श्री ने अक्षरशः शेवटच्या क्षणा पर्यन्त एंटरटेन केलं , रोमिल त्याला मागे एका भांडणात म्हंटला होता ‘मै आपको ट्रॉफी सुंगनेतक नही दूंगा‘, सलमानने टॉप २ ला ट्रॉफी दाखवताच पहिली रिअ‍ॅक्शन, रोमिल विथ युअर परमिशन म्हणत त्याने भरभरून ट्रॉफीचा वास घेतला Proud
श्री अ‍ॅक्चुअली रुल्ड द शो !
दीपिका पहिलीच अशी अस्तित्व नसणारी विनर असेल बहुदा.

अच्छा असं सर्व आहे तर, मला आवडलेली दिपिका पण मी अगदी नगण्य बघितलं.

रोमिल त्याला मागे एका भांडणात म्हंटला होता ‘मै आपको ट्रॉफी सुंगनेतक नही दूंगा‘, सलमानने टॉप २ ला ट्रॉफी दाखवताच पहिली रिअ‍ॅक्शन, रोमिल विथ युअर परमिशन म्हणत त्याने भरभरून ट्रॉफीचा वास घेतला >>> हो हे मी बघितलं. जबरदस्त होतं ते.

श्री चे शो नंतरचे इंटरव्ह्युजसुध्दा मस्तं आहेत >>> एक मी बघितला, आवडला, छान उत्तरं देत होता.

श्री आता हम्बल वाटायला लागलाय, शेवटी दोघे स्टेजवर असताना आणि एक इंटरव्यु बघितला त्यात. मात्र आतमधे तो अतिमाज करतोय असं वाटायचं. अर्थात मी थोडंच बघितलं हे परत एकदा सांगते.

दीपिकाने शेवटी दिलेल्या उत्तरावर खूप टीका का होतेय (youtube वरून अंदाज), मी स्वतः जिंकले तर मला जास्त आनंद होईल असं ती म्हणाली ना. मग जे मनात आहे ते तिने सांगितलं.

तिच्या मनात स्वतः जिंकावे असं असेल तर उगाच, श्रीला trophy मिळाली तर मला आनंद होईल वगैरे तिने खोटं सांगायला हवं होतं का.

कलर्सची नायिका म्हणून channel चा सपोर्ट तिला असणारच होता, तो मराठीत आस्ताद काळेलाही होता. आ का पूर्ण सिझन नीट वागला असता तर कदाचित विनर किंवा दोन नं वर तरी channel ने त्याला आणलं असतं. पब्लिक support पण मिळाला असता.

कलर्स channel वरचे कोणी कलाकार असतील मराठी किंवा हिंदीत तर ते मोस्टली पहिल्या पाचात असणार हे गृहीत धरायला हवं.

Romil Chaudhary Kahaan Hum Kahaan Tum या सिरियल मध्ये villain च्या रोल मध्ये दिसला
Lol Lol Lol

त्याची personality छान होती. तो व्हिलन रोल चांगला करेल, घरात पण काड्या टाकायचा ना असं ऐकलं होतं.

बाकी हिंदी bb मेघासाठी काही दिवस बघितलं. त्यात तिने आधी चांगलं आणि नंतर वाईट केलं. त्यात सलमानने चक्क सांगितलं की तू घाण शिव्या देते ज्या आम्ही on air दाखवूही शकत नाही. त्यामुळे मी सोडून दिलं. वोटस दिलेले तिला.

पण रोमिल जसलीन मला आवडले होते, impressive personality फक्त एवढ्यासाठीच आणि दीपिका अतिशय ग्रेसफुल वावर यासाठी. बाकी जे दोन चार दिवस बघितलं मेघासाठी आणि त्याआधी तो task छान केला म्हणून नेहा पेंडसेसाठी बघितलं होतं voot वर.

Pages