बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरभिने श्रीला धक्का दिला, आधीही राडे केलेत, दीपक कायमच थर्डक्लास बोलतो, अपशब्द वापरतो पण दोघेही वाचतात.
हा सिझन वर्स्ट ऑन एव्हरी पॉसिबल फिल्ड्स त्यात गेल्या आठवड्यात मोठी उलाढाल म्हणजे प्रोड्युसर्स एन्डेमोलशाइन आणि कलर्सचं वाजलय, व्हायाकॉम कलर्सच्या सीइओ ने रिजाइन केलय , टोटल डिझॅस्टर !
अशी चर्चा आहे कि नेक्स्ट सिझन कदाचित कलर्स वर येणार नाही , दुसर काँपिटीटीव्ह चॅनल ओढेल स्वतःकडे हा शो !
या शो ची क्रिएटिव्ह टिम हॉरिबल आहे, सगळे क्युट फनी मोमेंट्स व्हुटवर टाकतात आणि अ‍ॅक्चुअल शो मधे फक्त भांडणं !
मेघाचे काही सीन्स आहेत , श्रीसन्तचेही .
श्री दीपिकाचा हेअरकट करून देत होता तो सीन, मेघा आणि दीपिका कोकोनट ऑइलने मेकप रिमुव्ह करत होत्या तेंव्हा श्री त्या दोघींच्या खोड्या काढत होता आणि सांगत होता मै अपने फेसपे बेबी ऑइल लगाता Proud , झाडु मारताना श्री २ झाडु २ हतात घेऊन सफाईने भराभर झाडु मारतो हे सीन खूप क्युट आहेत बघायला, पब्लिकने ट्विटरवर शेअर केलेत पण ते अ‍ॅक्चुअल एपिसोड्समधे ठेवतच नाहीत , आपल्याला फक्त तमाशा करणारा श्रीसन्त आणि चिडलेली मेघा दिसतात !
Btw थॅंक्स अन्जु.

मग तो caller बरोबर विचारत होता की मेघाला, तेव्हा तिने मान्य नाही केलं.>> कसं आहे ना आपण बिबॉम पाहिलंय , त्यामुळे आपल्याला मेघा कशी स्ट्रॉंग आहे ते माहित आहे, टास्क अगदी जीव तोडून करते त्याचा श्री आणि दीपिका फायदा घेतात. मला दीपिका २-४ वेळेस आवडली ,तिने खरंच ग्रेसफुली हॅन्डल केल्या काही गोष्टी. पण तरी ती स्वतःच्या कंफर्ट झोनमधून बाहेर येत नाहीये असं वाटतं. हैप्पी क्लब पुढे श्री बराच बरा वाटतो पण लगेच गिव्ह अप करतो. थोडक्यात या सिजनमध्ये कोणीच आवडत नाहीये.

या काही Bigg Boss House बद्दल इंटरेस्टिंग लिंक्स मिळाल्या youtube वर ," Rahasya Live" youtube हे चॅनेल वाला कुणी BB crew मधला असणार नाही तर इतकी माहिती कशी असावी त्याला ! BB च्या कॅम्पसमध्ये एन्ट्री मिळणे एरवी कठीण आहे .

Dark Secret Behind Bigg Boss Weekend Ka Vaar
https://www.youtube.com/watch?v=C1YgzqN8qAo&t=0s&list=PLyfFkco0shEFrmQFb...

Dark Secrets behind Bigg Boss Appe Fizz Caller of The week
https://www.youtube.com/watch?v=2YHndRb5d_E&index=15&list=PLyfFkco0shEFr...

Secrets behind Bigg Boss Audition
https://www.youtube.com/watch?v=vDXdJTC3c8M

Bigg Boss Control Room
https://www.youtube.com/watch?v=qZjQnB1wSbw

How to Enter Bigg Boss as Audience
https://www.youtube.com/watch?v=SAwASAsp0lQ

New things in Bigg Boss 12 । Clock, Washing Machine
https://www.youtube.com/watch?v=HdcEA2UGdxY

Bigg Boss is Scripted with Proof
https://www.youtube.com/watch?v=LerPz7NXSaM

Why Bigg Boss 12 smoking zone zone is hidden
https://www.youtube.com/watch?v=8U0zI562s60

What happens to Bigg Boss house after The Show
https://www.youtube.com/watch?v=E2f3Gk5DaQQ&list=PLyfFkco0shEFrmQFbZkrMF...

बारकाईने घराचा प्लॅन २ आठवडे बघत आहे आणि केलेले बदल आता चांगले कळले आहेत मला Happy
क्षेत्रफळ वाढवलं आहे बरंच . डिझाईन इतकं चेंग केलय कि मराठी BB घराची ओळख खूप थोड्या ठिकाणी पटते .
घराची ऊंचीही ( ceiling height ) वाढवली आहे असं वाटतंय
Submitted by manila on 5 October, 2018 - 10:21 >>>>>>>

रच्याकने BB हिंदी या आधी पहिले नसल्याने मला असे वाटले होते कि हिंदी साठीचे घरच मॉडिफाय केले असावे मराठी BB साठी Happy LOL
पण एकलव्याचा स्टुडिओ ( रश्मी नेहा - BB episodes reviewer ) चा हा विडिओ बघून कळले कि दोन्ही वेगळी घरे आहेत .
तरी म्हटलं अख्खा स्विमिन्ग पूल आणि बाहेरून दरवाजा असलेले बाथरूम एकदम त्या टोकाला कसे गेले Happy

BIG BOSS MARATHI LOCATION ?
https://www.youtube.com/watch?v=YrL_z_yYzBQ

दीपिका श्री ला खेळायला मेघा हवी असते , पण कॅप्टन साठी ते दोघेच , बाकी कोणी नाही. >>> +११११ अगदी खरे !
या बहीण-भावाला कुणाची पडलेली नाही . एरवी दीपिका बरी वाटते मला बाकीच्यांपेक्षा , पण मेघाच्या अडचणीच्या वेळेस मेघासाठी साठी ती काही करत नाही .

श्री आणि दीपिका हे दोघेच खेळत आहेत हे जगजाहिरच आहे आणि ते कबुलही करतात, इनफॅक्ट नुकतच दीपिका श्री जस्लीन मेघा गृपनी त्यांच ‘वुल्फ पॅक्क‘ हे जुनं नाव बदलून ‘द इंडीव्हिज्युअल्स’ असं केलय म्हणे कारण चौघेही म्हणायला एकत्रं असणार पण टिम म्हणून एकत्र स्ट्रॅटेजीज न करता सगळे अपापला इंडीव्हिज्युअल गेम खेळणार म्हणे.
श्री चा तर त्याचा एकट्याचाच काय तो गेम चालु आहे, अनप्रेडीक्टेबल आहे तो!
प्रसंगी दीपिकाला धोका देऊन हॅपी क्लबला जाउन मिळेल किंवा मग एकदम दुसरं टोकः तो जिंकला तर स्वतःची ट्रॉफी दीपिकाला देऊन टाकेल , त्याचा काहीच भरोसा नाही Proud
इथेच हे सेलिब्रिटीज लोक मार खातात, तिथे हॅपी क्लब कितीही मतभेद अस्स्ले तरी गृप मधले वीक काँटेस्टन्ट बरोब्बर नॉमिनेशन पासून वाचवतात, या उलट दीपिका श्री दोघांनाही खरे तर इतके फॅन्स आहेत, ते दोघेही टॉप ३ मधे आहेत माहीतेय त्यांना, जस्लीन-मेघाला शक्य तितक सेव्ह केलं पाहिजे त्यांनी !
मेघा - जस्लीन - दीपिका हे त्रिकुट श्रीच्या अध्यात मध्यात न अडकता एकत्र फोकस्ड राहून खेळल्या तर ३ देवियां सगळ्यांना भारी पडतील खरं तर !

Btw केव्ही आणि बायकांच्या अंडरगार्मेन्ट्स वरून चिप चेष्टा व्हिडीओ व्हुटवर व्हायरल होतोय गेले २-३ दिवस ते बघून ऋतुजा धर्माधिकारी आठवली , अर्थात केव्हीच्या चेष्टेपेक्षा सुरभिने केलेली कॉमेंट जास्त चिप आहे!
हा व्हिडिओ व्हुटवरचा नाही पण काय घडल ते मेन्शन केलय.
https://youtu.be/e6bc6iREcN0

खरच असच दिसुन येतय कि दिपिका अन श्री दोघांमध्येच खेळत आहेत.. दुसर्‍यांच खरच काहि पडलं नाहि.. काल मेघा बरोबर चिडली होती...अन किती काहि झालं तरी या गृप ची साथ नाहि सोडली.. सुरभीने तिचं नाव सपोर्ट साठी घेतलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं होत... मेघा जाता नये पण... या लोकांपेक्षा तरी चांगल करतेय..

घर वेगळं आहे तर मेघा माझं किचन, माझं किचन का करते.

केव्हीने जे काही केलं ते आवडलं नाही, त्यावर शिल्पाने त्याच्या बायकोची केलेली चेष्टा हेही नाही आवडलं. मी युट्युबवर शिल्पाने लिहीलेलं वाचलं. सुरभी काय बोलली ते माहीती नाही, ती मला आवड्तंच नाही आधीपासून.

Submitted by भावना गोवेकर on 30 November, 2018 - 16:16
>>>>
आजच्या एपिसोड मध्ये मेघा Jasleen ला तेच सांगत आहे..

नो एव्हिक्शन आणि वोट्स कॅरी फॉरवर्ड नेक्स्ट विक म्हणे, याचा अर्थ पुन्हा तेच लोक नॉमिनेटेड कि काय ? Uhoh
बिबॉ पूर्ण भंजाळलेत, ना टास्क डिसिजन घेता येत , ना कॅप्टन्सी ना एलिमिनेशन !
आता ७५ दिवस झाले तरी घरात १० लोक आहेत अजुन , गर्दी काही ओसरेना !
कदाचित डबल एव्हिक्शन करतील नेक्स्ट !
सुरभिने केलेल्या दंग्याला रिअ‍ॅक्ट करताना श्री ने सुध्दा तितकीच खालची पातळी गाठली म्हणे, तिला कॅरॅक्टरलेस, रस्त्यावर उभी रहाणारी कॉल गर्ल वगैरे म्हंटला Uhoh
सुरभिला इमेज वगैरे फरक पडत नाही, पण श्री का इमेज अजुनच खराब करतोय कळत नाही !
वीकेन्डला श्री-सुरभि - दीपक सगळ्यांचा क्लास घेतला म्ह्स्णे, कळेलच उद्या !

बिबॉ पूर्ण भंजाळलेत, ना टास्क डिसिजन घेता येत , ना कॅप्टन्सी ना एलिमिनेशन >>> हो ना.

मग त्या सुरभी दीपकला तरी बाहेर काढायचं, चुकीचं वागले म्हणून. voting ची विश्वासार्हता संपते एकीकडे आणि दुसरीकडे कोणी कसंही वागतंय. वोट द्यायचं का नाही आता.

सुरभी तर बाब्बो, एक प्रोमो बघितला तर तिला हवंच होतं जणू श्रीने फिजिकली hurt करणे, अशी वागत होती.

सुरभिने केलेल्या दंग्याला रिअ‍ॅक्ट करताना श्री ने सुध्दा तितकीच खालची पातळी गाठली म्हणे, तिला कॅरॅक्टरलेस, रस्त्यावर उभी रहाणारी कॉल गर्ल वगैरे म्हंटला >>> हो, संतापजनक आहे. ह्याला पण बाहेर काढायला हवंय.

सलमानने विचारल्यावर श्री उठून गेला, असं वाचलं.

अर्थात बोलण्यावर काढत नाहीत बहुतेक, फिजिकल हिंसा केली तर काढतात. कारण बरेच जण पातळी सोडून बोलतात हिंदीमध्ये.

काल सहज थोडा भाग पाहिला तर कोणीतरी उताऱ्याचा लिंबू ठेवलाय, काय आहे नक्की ते, की बिग बॉसनेच ठेवायला सांगितलाय trp वाढवण्यासाठी?

हो , मेघा ला सिक्रेट टास्क दिली आहे BB नी , कुंकू भरलेले आणि सुया टोचलेले लिंबू ठेवून देण्याची (आणि May be इतर HMs ना घाबरवायची ) .

बिग बॉस trp साठी एव्हड्या खालच्या थराला उतरेल असं वाटलं न्हवतं.आता रात्रीच्या वेळी हातात काठी, मोकळे केस सोडलेली हडळ इकडे तिकडे फिरताना दाखवा म्हणजे अजून trp मिळेल.

अरे त्यांची नविन मालिका येतेय 'तंत्र' म्हणुन हा भाग घेतला असेल.
सुरभी जास्तच डोक्यात जातेय... काल बोलुन बोलुन घसा बसला तरी हि बया कुणाला उकसवायला सोडत नाहि.. अगोदर रोमिलबरोबर चालु होतं मग लगेच श्री ला पकडलं.. तसा तो सॉफ्ट टार्गेट वाटतो.. चिडतो रिअ‍ॅक्ट होतो.. कसला धक्क दिला तिने त्याला अन वर त्याने धक्का दिला सांगायला मोकळी... माणुस काहि करु शकत नाहि तेव्हा तो तोंडानेच बोलणार.. काहि गैर नाहि त्यात.. जस मेघाचं झालं.. अति झालय सुरभी, दिपक अन रोहितचं.

कधी वेळ मिळाला तर मी एक्सट्रा डोस बघते . नेहमीच जमत नाही . मोस्टली लोक शांत असतात. कुणी हेअर - मेकप करत असतं , कुणी जिम, किचन मधलं दाखवतात. एकूण शांत शांत असत . आजचा म्हणजे शुक्रवार चा एक्सट्रा डोस पहिला . शुक्रवारच्या एपिसोडची सकाळ ते दुपार होती. श्री आणि सुरभीचा एपिक भांडण (ज्या बद्दल श्री ला वीकएंड वॉर ला सलमानची तडी पडणार आहे ) तो प्रसंग नुकताच होऊन गेला असावा . नंतर बेडरूमएरिया मध्ये श्री आपल्या बेड वर बसून काही लोशन वैगरे लावत होता. बाजूच्या आरशात मध्ये दीपिका आप-आपला मेकप करत होती पण सुरभी मात्र बेडवर बसल्याबसल्याही श्री ला कुत्र्याला चुचु करतात तसा आवाज काढून उगीचच कळ काढत होती. त्याच्या मेकप करण्यावर, चेहऱ्यावर कंमेंट करत होती. ती एकूणच सायको केस असावी . औषध न मिळाल्यावर जशाप्रकारे सैर-भैर असेल तशीच तिची बॉडी लँगवेग होती . श्री आणि दीपिका नी लक्ष दिलं नाही . नंतर ती त्याच मूड मध्ये घरभर फिरत होती.
रोहित पण बरा होता, त्याच्याशी पण जाऊन काही तरी बडबत होती सुरभी . तोही तिला इग्नोर करत होता .

मेघा आणि जसलीन ची मात्र चांगली मैत्री झालेली या एक्सट्रा डोस मध्ये जाणवले . दोघीहि स्वयंपाक करत होत्या. मेघा जसलीन शी जे बोलत होती ते फार छान होते . "मेघा तू सध्या कन्फयुज्ड आहेस का ? मी चुकत असेन कदाचित असं विचारायला , पण मला असं वाटतंय म्हणून विचारतेय तुला. " असं जसलीन ने विचारताच मेघा म्हणाली " नाही, मी खूप शांत आहे . आले तेंव्हा शॉक्ड होते कारण कुणीच इथे बरोबर वाटत नव्हते , नंतर मग हळू हळू माझी चीड चीड व्हायला लागलीं , माझा स्फोट झाला मागच्या आठवड्यात पण आता मी शांत आहे . कन्फयुज्ड नाही. "
(कदाचित आता यापुढे काय करायचं , कसं पुढे जायचं हे मला माहीत आहे असं काहीसं तिला म्हणायचं असावं )

वर त्याने धक्का दिला सांगायला मोकळी... माणुस काहि करु शकत नाहि तेव्हा तो तोंडानेच बोलणार.. काहि गैर नाहि त्यात.. जस मेघाचं झालं.. अति झालय सुरभी, दिपक अन रोहितचं. >>>> हो न, हाकला यार त्यांना आधी, यांच्या आधी कोणीही दुसरे बाहेर पडले तर खुप वाईट असेल ते Angry

मेघाला तंत्र प्रमोशन task दिला असेल तर मेघा bb ला हवीय शो मध्ये, तिला काढायचं नसावं. त्यामुळे elimination पण कॅन्सल केलं असेल. कारण त्यांना जाणीव झाली असावी की मेघापेक्षा आधी काही लोकं जाण्यालायक आहेत.

आज वूटवर sneak peak पाहिला... सिक्रेट टास्क साठी बिग बॉस ला मेघालाच सिलेक्ट करावे लागले यातच तिचं यश दिसतं.. She is really a mastermind..., आणि सलमान जसलीनला विनाकारण सुनवत होता असं वाटलं... अरे पंचायतचा task दिला म्हणजे काय हे खरं कोर्ट आहे का जज ने कोणाशी डिस्कस करू नये म्हणे.... श्री आणि सुरभी च्या बाबतीत श्री बरोबर आहे असं वाटतं... रोमिल अगदी बरोबर बोलला..., तसंही या सीझनमध्ये कॅरेक्टर, चारित्र्य हे जरा अती होतय का की सगळ्याच हिंदी सीझनमध्ये असं होतं?

आजचा एपी कुणी बघितला नाही का?

खूप वाईट वाटले श्री साठी, भले त्याने चुकीचे शब्द वापरले, तरी त्याने ते मान्य देखील केले की तो ते रागाच्या भरात बोलला अन त्यावेळी त्याच्या मनात सुरभी त्याला तशीच वाटली. पण सुरभिची जास्त चुकी होती, सलमान बोलला तसे आपली इज्जत आपल्या च हातात असते, तिला आधीपासून माहीत होते की श्रीचा त्याच्या रागावर ताबा राहत नाही मग त्याला इतके उसकवायचेच कशाला ???

पण आज सलमान ने फार निराशा केली, जुना सलमान असता तर त्याने सुरभिची खूप बेक्कार शाळा घेतली असती अन श्रीला देखिल योग्य शब्दात सुनावले असते.

मला असं वाटतंय हे मुद्दाम करत असावेत. मुद्दाम जे चुकीचे आहेत त्यांच्या बाजूने बोलायचं, म्हणजे पब्लिक चिडणार ,ट्विटर ट्रेंड्स वाढणार , पब्लिसिटी मिळणार . मराठी मध्ये पण हेच केलं होतं.
सलमान तर जे मागच्या आठवड्यात बोलला , त्याच्या विरुद्ध या आठवड्यात बोलतो. त्याला वेळ नसेल तर बीबॉ पाहायला , तर होस्ट बदलावा तरी. काय बोलत होता आज काही कळत नव्हतं. काही झालं कि फाडा मेघावर बिल .

मलाही असाच वाटतंय मुद्दाम करतायत ते असं ! म्हणजे सुरभी दिपक ला (Negative side la ) जास्ती ओरडले तर ते शांत बसतील नेक्स्ट वीक. पुन्हा TRP ची पंचाईत . साम दाम दंड भेद काहीही करून TRP भले तो नेगेटिव्ह असला तरी मिळवायचा इतकं साधं गणित असावं BB च .
पब्लिक ला अपेक्षित नसेल ते बोलायचं वीकएंड वॉरला ३ आठवडे , मग चौथा आठवडा पुन्हा एकदम शिस्तीत पुन्हा त्यासाठी पब्लिक ची वाहवा !
Contestants बरोबरच पब्लिकच्याही इमोशन्स शी खेळायचाही हा गेम दिसतोय .

तसंही या सीझनमध्ये कॅरेक्टर, चारित्र्य हे जरा अती होतय का की सगळ्याच हिंदी सीझनमध्ये असं होतं?>>>>> सगळ्याच सीझन मध्ये हे चालतं... डॉली बिंद्रा,श्वेता तिवारी,सपना चौधरी,अर्शी ख़ान....यांच्या सीज़न मध्ये पण व्हायचं.

‘जुना सलमान असता तर’ हे म्हणजे आमच्यावेळचं पुणं असं नव्हतं असं झालय Happy
आम्ही तर बाबा हाच सलमान पाहिलाय, पोल्युटेड , भंजाळलेला !
मला नाही वाटत तो एपिसोड्स बघतोय आणि काही इंटरेस्ट आहे.
आजच्या एपिसोडमधे सुरभि- श्री प्रकारणाच्या बायस्डनेसपेक्षा हाइट होती ते सोमी या सर्वात बिनडोक, यूसलेस वर्थलेस बाईची स्तुति करणे आणि जस्लीन-मेघा -दीपिकाला सतत टार्गेट करणे!
जाउद्या , बिगबॉसचा इरादा दिसतोय सोमी अँड भिकारी कंपनीला पुढे पर्यंत नेण्याचा, थोडक्यात हे असेच जाणार असतील उरलेले आठ्वडे तर आता फायनली सिझन बघणे बन्द करतील लोक.

मी नाही बघितला विकेंड वार पुर्ण. तो श्रीशांत चिडून गेला बाथरुममधे ते बघितलं. सुरभी राणाला काढायला हवंय. जसलीनला डंब म्हणतात पण ती मेघापेक्षापण आवडली मला. प्रेझेंटेबल वाटते.

मेघाचं मिशन सक्सेसफुल नाही झालं, ती कन्विन्स करु शकली नाही तंत्र मंत्र जादूटोणा बद्दल. श्रीने सरळ उचलून फेकून दिलं Lol , बाकी पण काहीजण म्हणले आम्ही मानत नाही.

सलमान काल सुरभीला पण बोलला पण मेघाला जे म्हणाला त्यावरून मला वाटतं मेघाने स्त्रीच्या चालचलन ह्या शब्दावरून जे रान स्वतः साठी उठवलं ते त्यापेक्षा खालचे शब्द तिच्या मित्राने वापरले दुसऱ्या स्त्री साठी तेव्हा उठवलं नाही, तिच्याकडून अपेक्षा होती. मला हा मुद्दा खरं सांगू का चुकीचा वाटला नाही. दीपिका मेघा जसलीनने त्या गोष्टीसाठी श्रीशांतकडे निषेध व्यक्त करून सुरभीची माफी त्याला मागायला लावली असती तर उलट हे सर्व फार उंचीला पोचले असते. सुरभी अजून खालच्या थराला गेली असती लोकांच्या मनात. मेघा सलमानला आवडत नाही बहुतेक त्यामुळे त्याला point मिळाला त्याने बायस्ड होऊन तो हायलाईट केला असला तरी तो point चुकीचा नव्हता, मेघाने एक संधी घालवली. माझं पर्सनल मत.

बाकी सुरभी मला आधीपासूनच डोक्यात जाते, मला आवडत नाही, कलकलाट करते, हिला हाकलवून द्यायला हवंय. रोमिल हल्ली आवडायला लागलाय मला Lol

सलमान पाहिलाय, पोल्युटेड , भंजाळलेला !>>> ह्या वेळी सलमान पहिल्यासारखा नाही हे खरे तरी तो पोल्युटेड भांजळलेला नक्कीच नाही अन म मां पेक्षा तर खूपच भारी आहे, हा
कदाचित इतरांचे मत वेगळे असू शकते, पण शेवटी आवड आपली आपली ☺️

Pages