बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, श्री च्या अवतिभोवतिच आहे पूर्ण सिझन !
यु कॅन लव्ह हिम्/हेट हिम बट कॅन्ट इग्नोअर , प्रचंड कन्टेन्ट, अनप्रेडिक्टेबल आणि स्टार पॉवर !

खरच काल ते व्हिलन गँग वाले नॉमिनेट झाले बघुन आनंद झाला... खुप पिरपिरे वाटतात सगळे... ती सुरभी तर डोक्यात जाते.. मस्त वेगळाच ट्विस्ट होता.. चुनचुनके निकाले सभी श्री ने Happy

श्री मेघाला safe करेल अस वाटलं नव्हतं..
त्याच्या डोक्यात काहीतरी शिजतयं???
आता पब्लिक वोट कोणाला करणार
Lol Lol Lol

कालचा एपी आता बघितला,

व्वा मजा आली, सॉलिड मास्टरस्ट्रोक मारला श्री ने, अन किती शांतपणे गेम केला

आताच वुट बघितले, वोटिंग चालू आहे, म्हणजे चौघातील एक नक्की जाणार

मेघाच्या फाजील आत्मविश्वासाला बिग बॉस कारणीभूत आहे, सुरवातीलाच नॉमिनेशन एक्स्पर्ट म्हणून बोलावलं त्यामुळे तीला वाटलं ती मोठी बिग बॉसीणच झाली.

बोकलत ,
तुमचं शुध्द लेखन आणि मेघा प्रेम पाहून बिबॉ मराठीवरचा एक आयडी आठवतोय Proud
असो,
मेघाच्याच भाषेत ती जे आज सुरभिला म्हणाली, “विनर बनके निकलु हूं बच्चु, किसि शो से धक्के मारके बाहर नही निकाला मुझे“( सुरभि रोडीज मधून हाकललेली आहे आणि रोमिल रोडिजच्या ऑडीशनला नापास झालेला आहे)अशा पब्लिकला अ‍ॅटीट्युड द्ययाची गरजच असते, वाटेनाका ओव्हरकॉन्फिडन्स !
आज बाकी काय तो गदारोळ घरात Uhoh
सोमि खान शिवला त्रास द्यायचा म्हणून जे काही करत होती जिम एरीयामधे त्याला सेक्शुअल हरासमेन्ट म्हणतात Uhoh
बिचारा शिव किती संयमित रिअ‍ॅक्शन देत तिला इग्नोअर करत होता !
हेच जर उलटं शिवने तिला त्रास दिला असता तर कसा कांगावा केला असता !
सुरभि जे श्रीसन्तला चिडवायला करत होती ते पाहून अँब्युलन्स मधे टाकून मेन्टल असायलम /रिहॅब मधे कसं नाही नेलं नवल वाटलं, सगळ्या पलिकडे गेली आहे, मेघालाही चेस्टला इनॅप्रोप्रिएट टच केलं सुरभिनी.
दीपकही तसलाच फालतु, त्याची भारतीने परवा जी बेइज्जती केली ते अगदी योग्य होतं त्याच्या वर्तनाला !

सुरभि रोडीज मधून हाकललेली>>> जे लीडर होते त्यांच्यासोबत तिचं वाजयचं नेहमी, उलट उत्तर द्यायची पण तीला हाकलुन न्हवती लावली, शेवटपर्यंत होती ती बहुतेक सेमी फायनल हरली होती.

अनुप जलोटाचा abp majha वर interview चालू आहे..
Jasleen बाहेर आली पुढे तिच लग्न ठरलं की तिच कन्यादान तिचे बाबा आणि मी दोघे मिळून करू इति अनुप जी
Uhoh

अरे काय हे, नो एव्हीकॅशन

सोमीला सगळ्यात कमी मते असून सुद्धा कोणीच गेले नाही म्हणे?

जर ही बातमी खरी असेल तर खूपच चुकले, कशाला इतका ड्रॅमा करायचा. अन इतका का मेहरबानी त्या सो कॉल्ड दुःखी क्लबवर.

त्यांना काल चार लोकांना टॉर्चर करायची संधी पण दिली Angry

हा सिझन पूर्णपणे बायस्ड आहे हॅप्पी क्लब साठी , त्यांचा सडकछाप राडा-दंगा आणि अर्वाच्च शिव्या याची फॅन आहे बिबी क्रिएटिव्ह टिम.
वोटींग लाइन्स बन्द ठेवायच्या होत्या जर एलिमिनेशन करायच नव्हत तर.
रोमिलला तर आता विनर म्हणून घोषित करणेच बाकी आहे !
त्याला कुठल्याशा फालतु टास्क्च्या नंतर १ आठवडा इम्युनिटी मिळाली, व्हिडीओ क्लिप वाल्या टास्क्मधे सोमिसाठी त्याग केल्याबद्दल सलमान खान कडून वाहवा आणि त्याला बायको मुलाला भेटायला दिले !
यापूर्वी त्याग केलेल्या मेंबर्सना केव्ही-नेहा ला मात्रं असंख लेक्चर्स ऐकवली बिबॉ आणि सलमान खानने, त्याग केला म्हणून केव्ही-नेहाला डायरेक्ट नॉमिनेट करून नेहाला एलिमिनेट केले.
मेघाला सलमान खान म्हणत होता आप दिखतीही नही हो Uhoh
रिअली सलमान ?
सलमान च्या या वाक्यावर रोमिलने तो मेघाच्या विरुध्द पार्टीतला असूनही शेवटी ४ गोष्टी ऐकवल्या सलमानला , मेघाजी ३ हफ्तोमे २ बार कॅप्टन्सीकि दावेदार बन चुकी है, अपना स्टॅंड लेती है, हर टास्क मे १०० % देती है इसलिए मेघा स्ट्राँग है, सृष्टी नही, थोडा बहुत शृष्टी दिखती है वो भी रोहितके साथ !
यावर सलमान म्हणे वकिल साब आप कहते हो तो सही ही होगी आपकी बात Biggrin
असं वाटत होत कि रोमिल बाहेर शो बघतोय आणि सलमान घराच्या आत आहे ज्याला काय चाल्लय काही माहित नाही म्हणून रोमिल सलमानला शिकवतोय !
खरच शंका येतेय सलमान शो बघतच नाहीये या सिझनला तरी, मांजरेकर सारखा.

थोडा बहुत शृष्टी दिखती है वो भी रोहितके साथ >>> Lol हे वाक्य भारी आहे.

मेघाच्या बाजूने रोमिल बोलला हे मस्त झालं.

अन्जु,
मेघाच्या बाजुने म्हणजे इनडीरेक्टली स्वतःसाठीच बोलला रोमिल !
वीकेन्डच्या वारच्या जस्ट आधी एक टास्क झालं होतं ज्यात नॉमिनेटेड हॅप्पी क्लबला त्यांच्या ऐवजी इतर कोण ४ सदस्य नॉमिनेट व्हायला हवे होते विचारलं!
दीपकनी जस्लीनच, सोमीने शिव चं, सुरभिनी रोहितच आणि रोमिलने सृष्टीचं नाव घेतलं (नुसतं नाव नाही घ्यायचं, त्यांच्या डोक्यावर शेण, सडके टोमॅटो इ. बादल्या ओतायच्या होत्या टास्क मधे.)
सलमान म्हणे बाकी सगळी नावं ओके आहेत पण सृष्टी ऐवजी मेघा हवी होती, त्यावरने रोमिलने हे उत्तर दिलं त्याचा निर्णय कसा बरोबर होता सांगायला !
सलमानचा काहीतरी सॉफ्ट कॉर्नर आहे सृष्टी साठी आणि तिला मेघाशीच कंपेअर करतोय तो.
मागच्याही आठवड्यात नॉमिनेटेड नसलेल्या हॅपी क्लबला नॉमिनेटेड अस्स्लेल्यांच रँकिंग करायचं टास्क दिल होतं, त्यात हॅपी क्लबनी मेघाचा नं ५ आणि सृष्टीला ७ नं दिला होता, तेंव्हाही सलमान खान म्हंटला बाकी रँक्स ठिक आहेत पण सृष्टी ५ आणि मेघा ७ नंबरवर हवी होती Uhoh

सलमानचा काहीतरी सॉफ्ट कॉर्नर आहे सृष्टी साठी आणि तिला मेघाशीच कंपेअर करतोय तो. >>> अरे बापरे. हे मराठी म मां रेशमला सपोर्ट करायचे तसं झालं.

सलमान म्हणे बाकी सगळी नावं ओके आहेत पण सृष्टी ऐवजी मेघा हवी होती, त्यावरने रोमिलने हे उत्तर दिलं त्याचा निर्णय कसा बरोबर होता सांगायला ! >>> असं झालं काय.

दिपांजली अगदि बरोबर...सलमान मेघाला नाहि लाईक करत.. मलाहि तो तसं म्हणाला तेव्हा भुवई उंचावली होती..
पण त्या चोकडीचा रागच येतो..

मेघाची आता दया यायला लागले, किती ती केविलवाणी धडपड करायची दिसण्यासाठी, आणि स्वतःच हसं करून घ्यायचं.

बायस्ड होस्ट , दुष्ट हाउसमेट्स , दगाबाज मित्रं हे मेघाचा पाठलाग सोडत नाहीत Proud

www.youtube.com/watch?v=nBu3tH7vkVc

हे दाखवून झालं की दाखवायचं आहे. एपिसोड पाहील्यावर नक्की डीटेल्स लिहा.

दीपक अति करत होता का, पण मेघाने टॅक्टफुली खेळायला हवंय, इतकं भडकायला नको. समोरच्यांना तेच हवंय. बाय द वे जर शिक्षा बिग बॉसने करायला सांगितली म्हणून केविने श्रीशांत आणि रोहीतला दिली तर मेघाने मदत करायला जाणं चुक नाही का.

आता चांगलं पॉझिटीव खेळल्याने सलमान खान म्हणतो आप दिखतीही नही, दुसरीकडे सुरभि दीपक सारख्या दंगेखोर पोरांची स्तुति करतो, काय संदेश देतोय बरं सल्लु Wink
मग काय , काढली असेल चप्पल मेघाने दीपकला धोपटायला, अब दिखती है क्या भाई मेघा ? Biggrin
अशीच चप्पल सैड्या आणि फुस्कीवर उगारली असती तर मज्जा आली असती !
असो, मी सुध्दा नाही पाहिला एपिसोड, कळेल उद्या.

अशीच चप्पल सैड्या आणि फुस्कीवर उगारली असती तर मज्जा आली असती >>> ज्जे बात, हे लय भारी.

मग काय , काढली असेल चप्पल मेघाने दीपकला धोपटायला, दिखती है क्या भाई मेघा ? >>> Lol

मेघाने चप्पल काढली हे पाहून वाईट वाटलं . BB खूप biased वाटतंय . दिपकचं जिथे तिथे नाक खुपसणे डोक्यात जातंय . रोमिल बद्दल बराच आदर होता पण दिवसागणिक तो कमी होत चाललाय. क्लबच्या मेम्बरांचं मेघावर हसणं आणि मेघाची टिंगल करणं अति होतंय.

हो ना काल अजिबात नाहि आवडलं, सृष्टी, रोमिल बरे बरे म्हणताना.....
त्या दिपकला काय एव्ह्ढं डोक्यावर घेतात कळत नाहि.. जसलिन साठी मला वाटल मिळणार दोघांना पण जरासं बोलुन सलमान ने दुसरा विषय घेतला..

मेघाने ओव्हर रिअ‍ॅक्ट केले कि नाही आजच्या एपिसोडमधे दिसेल पण दीपक आहेच सडकछाप मवाल्यासारखा , रोमिलने सुध्दा सभ्यपणाचा बुरखा पांघरलाय , त्याची लेव्हल सुध्दा दिसलीच, असल्या मवाल्यांना चप्पल उगारली असेल तर ते डिझर्व करतात फक्त मेघाला हे माहित नाहीये कि हेच बघणं हॅपी क्लब एंजॉय करतात !
मला श्रीसन्तला घमेलं भरून मेगासाइझची कार्याकयात असतात तशी मोठाली भांडी घासायला लावली भर गार्डन एरीयात तेही बहुदा बिबॉ स्टाफची खरकटी भांडी शिक्षा म्हणून ते अजिबातच नाही आवडलं , फार इनसल्टींग वाटलं Sad
काही असलं तरी एक क्रिकेटप्रेमी म्हणून सॉफ्ट कॉर्नर आहे त्याच्याबद्दल !
मुळात ही शिक्षा रोमिलला मिळायला हवी होती, त्यानी जास्त नियम तोडले होते पण केव्हीनी पर्सनल खुन्नस काढली.
मेघा आणि चक्क दीपिकानेही केव्हीच्या या निर्णयाला विरोध केला.
हा पहिलाच सिझन असेल जिथे एकही व्यक्ती पॉझिटिव नाही, सगळेच निगेटिव दिसतायेत शक्य होईल तसे निगेटिव साइड प्रत्येकाची !

Pages