बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Surbhi won't, Jasleen/Megha can go.
They will manipulate/cancel elimination if happy club member gets least votes Sad

माझी खात्री आहे मेघाच जाणार. अतिशय वाईट वागणूक दिली तिला. ती मराठी बीबॉ मध्ये होती म्हणून माहित आहे ती कशी आहे ते. बाहेरच्यांना माहीतच नाही. इथे तिला खूप चुकीचं प्रोजेक्ट केलंय. त्यामुळं तीच जाईल. या सिजनला फक्त शिव्या आणि रडगाणी चालताना दिसतायेत. सगळ्यांच्या शिव्या आणि दीपिकाचं रडगाणं. मध्ये २ ३ दिवस पाहिला पण नाही मी. काही नवीन नसतंच.

आज मेघाला खरच गरज नसताना टिंगल आणि ती डंब आहे असं पोर्ट्रे करत होते !
सलमान म्हणत होता फराहला कि एकदा जिंकून झालय म्हणून इथे रिलॅक्स करतेय , सिरियसली ?? Uhoh
तिच्या टायटल वर हसणार्यांना हिरो दाखवतायेत याचा अर्थ खुद्द बिबॉ हसतायेत स्वतःच्या टायटल वर.
बिबॉने ऑबव्हियस्ली ठरवलय इथे कि हा सिझन फक्त श्रीसन्त -रोमिल-दीपिका - केव्ही हे फक्त पोटेन्शिअल विनर इमेज , बाकी सगळे साइड अ‍ॅक्टर्स म्हणून हवे आहेत !
बाकीच्यांनी फेक लव्हस्टोरीज , लॉयल फ्रेंड्स किंवा वेडसर ड्रामा करायचा इतकच अपेक्षित आहे बिग बॉसला, मेघा सारखी ओव्हर पॉवरिंग स्पर्धक नको आहे म्हणून तिचे सीन्स एडीट होतात , व्हुट वर टाकतात आणि डिमोटीव्हेट करतात.
असो, मला फिमेल स्पर्धकात अजुनही मेघाच आवडते आणि इतरांमधे श्रीसन्त सोडून कोणीच विनर होऊ नये अस वाटतय !

मी मेघाला वोट दिलं. बघत नाही पण nominate आहे समजलं म्हणून गेले voting करायला.

आत्तातरी जसलीनला सर्वात कमी आहेत असं youtubeवर बघितलं मग रोहित आणि मग मेघा असा शेवटून क्रम आहे.

अंजुताई, मीपण मेघाला मत देऊन आलो.
पण मेघाचा पुढचा प्रवास खडतर आहे असंच दिसतंय. याच आठवड्यात जाऊ शकते ती. रोमिल गॅंगवर बिबॉ तुडुंब खुश आहे असंच सध्या तरी दिसतंय. दिपकला हाकलायला पाहिजे लोकांनी पण.....

अंजुताई, मीपण मेघाला मत देऊन आलो. >>> मस्त. आपण वोट देऊ शकतो फक्त. हे हिंदीवाले आहेत ना, मराठीत कसं, त्यांना माहीती होतं की मेघाला काढलं तर पब्लिक उसळेल. हिंदी प्लॅटफॉर्मवर फार काही चालणार नाही आपलं. कॅनव्हास मोठा आहेना. त्यात तिच्यामुळे टी आर पी वाढला नसेल फारसा तर भाव नाही देणार तिला.

पण एकंदरीत वोटींगनुसार ती जायला नको पण काय माहीती.

आजचा एपिसोड पहा मेघा फॅन्सनी, सोशल मिडियावर खूप वाहवा झालीये तिची.
तिच्या टिममधल्या त्या रोहितने गद्दारी केली आणि दीपक+ रोहित मिळून टास्कमधे अ‍ॅटॅक केला मेघावर, दोघांना पुरून उरली म्हणे मेघा.
रोहितने अतिशय असभ्य शेरे वगैरे मारले मेघावर ज्याचा सोशल मिडीयावर निषेध करातायेत बिग बॉसचे जुने सेल्ब्रिटीज शिल्पा सिन्दे, कामया पंजाबी वगैरे.
आम्हला यु.एस मधे दाखवणार नाहीत कदाचित व्हॉयलेन्स असेल तर, ऑनलाइन पहावा लागेल.

Voot वर आला नाहीये अजून एपिसोड, डीजे. उशिरा टाकतात बहुतेक. तुझी कमेंट वाचून मी बघायला गेले आत्ताच.

युटुबवर डिसके टॉक्स नावचं चॅनल आहे, दीपकसिंग खुशवाहा म्हणून एक युट्युअबर आहे जो छान रिव्ह्यु करतो, बिबॉ मराठीच्या वेळीही नॉन मराठी असून फार छान रिव्ह्यु करयाचा.
त्याच्या १-२ व्हिडीओत त्याने एकदमच परफेक्ट रिमार्क्स टाकलेत, तो म्हणे हे दीपक-रोमिल हे बिहार हरियाणा कडचे लोक आहेत जे बायकांना तुच्छ् लेखण्यात, त्यांच्यावर दादागिरी करण्यात टॉपचे कुप्रसिध स्टेट्स का आहेत , ते हे दोघे वेळोवेळी रिप्रेझेन्ट करतात आणि सिध्द करतात.
डिसके स्वतः मुळचा तिथला असून तो वेळोवेळी या टोळक्याचा निषेध करतो , मेघाचा सपोर्टर आहे बीबी मराठीपासून.

युटुबवर डिसके टॉक्स नावचं चॅनल आहे, दीपकसिंग खुशवाहा म्हणून एक युट्युअबर आहे जो छान रिव्ह्यु करतो, बिबॉ मराठीच्या वेळीही नॉन मराठी असून फार छान रिव्ह्यु करयाचा. >>> हो, मागे एक दोनदा मराठी bb च्या वेळी बघितलं होतं ह्याला.

मेघा आपली शेरनी आता चांगली पुढे चालली आहे . आजच्या टास्क मध्ये तिने परत एकदा दाखवून दिलं कि ती taskqueen आहे . मला अजूनही आशा आहे तो फिनाले पर्यंत नक्की जाईल. सध्या ती ६व्या rank वर आहे असं बरेच ठिकाणी सो. मि . वर पाहिलं .

BTW काहीही ना करता KV टॉप ५ मध्ये कसा हे कोडं मला पडलं आहें . त्याचा परफॉर्मन्स काहीच दिसत नाही आहे . सोमी तर काहीच ना करता वाचली आहे . काहीही म्हणा हिंदी BB खूपच biased वाटतंय . हॅपी क्लबला खूप म्हणजे खूप फेवर करत आहे बीबी आणि सलमान . तसेच अगदी सरळ सरळ दिसतंय कि श्रीशांत आणि रोमिलला पहिल्या तीनमध्ये portray करत आहेत . गेल्या २ आठवड्यात रोमिलचं खरं रूप बाहेर आलं आहे तरीही त्याला चांगलं दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न चाललाय . अगदी आवडतं असं कोणीच नाही झालं आहे except मेघा ,तिची मराठीची BB मुळे ओळख झाल्याने. तिला तर इतकं कमी दाखवलाय मागच्या आठवड्यापर्यंत . आणि तिचा चुकीचा वापर करत होते वीकएंडला . ठरलेल्या ४-५ जणांना चांगल्या दाखवण्यासाठी बाकी सगळ्यांना खरंच साईड ऍक्टर केलं आहे . हिंदी BB बिग डिसॅप्पोइन्टमेन्ट आहे. आपलं मराठी BB बरं होतं त्यापेक्षा !

हिन्दी बिबॉ ऑडीयन्स तेवढा मॅच्युअर्ड नाहीये, काहीही न करता केव्ही दीपिका टॉप मधे असतात त्यांच्या शो आधीच्या फॅन बेस वर, त्यामुळे टॉप ५ मधे श्री- दीपिका -केव्ही असणारच, उरलेले २ बहुदा रोमिल दीपक.
सृष्टीलाही काही न करता भरपूर व्होट्स असतात.
मेघाला जिंकु देणार नाहीत, फिनालेत जाऊ देणार नाहीत हे माहित आहे निदान सोमि, रोहित, सुरभि-जसोईन-सृष्टी आधी जाऊ नये असं फार वाटतं.
कालच्या रोहितच्या शेमफुल अ‍ॅक्ट नंतर खुद्द त्याच्या मेन्टर विकास गुप्तालाही रोहित विरुध्द ट्विट करणं भाग पडलं , याशिवाय मिसेस भुवनेश्वरी श्रीसान्त, गौहर खान, शिल्पव, कामया सगळ्यांनी मेघाला सपोर्ट लरत रोहितचा निषेध सोशल मिडीयावर केला आहे.
थँक यु रोहित, जगाला मेघा काय आहे समजलं तुझ्या चीप वागण्यामुळे Happy
थँक्स टु बीबी मराठी कि निदान हा टास्क तिथे ठेवला नाही, जस्ट इमॅजिन रोहित दीपक या नवख्या गुंडां ऐवजी जर राजेश सुशान्त असते तर याहून काहीतरी वाईट घडलं असतं !

मी कालचा एपिसोड बघितला आत्ता. रोहित opp team ला मिळालाय हे माहिती होतं बऱ्याच जणांना. जसलीन म्हणून जात होती तर श्रीशांतने ऐनवेळी रोहितचं का ऐकलं खरं माहिती असून. ती सृष्टी किती बायस्ड आहे. मेघा पुरून उरत होती मात्र. रोहित जायला हवा ह्या विकमध्ये.

मेघा आहे म्हणून टीकतेय तरी , नाही तर वाट लावली असती एखादीची ह्या दीपक रोहितने मिळून.

खरच मेघा पुरुन उरली त्या दोघांना... किती रडीचा डाव... एकतर तो गद्दार रोहित... ना घर का ना घाट का..
मलाहि असच वाटतं मेघाला लवकर बाहेर घालवण्याचा प्रयत्न करणार घरातले... त्या श्री चा काहिच फायदा नाहि... काहि गेम खेळता येत नाहि... मदतीला गेला अन बसुन गंमत बघत होता अन मेघालाच शिकवत होता..
त्या दिपकला कुणीच काहि समज देत नाहि.. सृष्टि सरळ सरळ त्यांच्याबाजुने निर्णय देत होती..

रोहित 'बजानेलायक सिर्फ मेघा बची है!' असं म्हणाला. त्यावरून नो तमाशा?
मेघाच्या जिद्दीला, रेझिलियन्सला सलाम आहे खरेच!

https://www.google.co.in/amp/s/m.timesofindia.com/tv/news/hindi/bigg-bos...

बाकी आज राठा एपिसोड बघत असतील तर खूश झाले असतील..(मेघाने दीपकवर सँडल फेकली आणि थुंकली ते बघून)
यावेळी bb biased आहे हे दिसतय..
उद्या मेघाला जेलमध्ये पाठवतील कदाचित..

प्रोमोज बघितले तर मेघा अति हायपर होऊन चूक करतेय असं वाटलं. समोरचा कसाही असो, थुंकणे आणि sandle मारणे चूक आहे असं आत्तातरी वाटतंय. दीपकची तक्रार bb कडे करायला हवी होती, स्वतः असं react होण्यापेक्षा. काहीही झालं तरी ती bb मराठी विनर आहे. ती dignity तिने ठेवायला हवी होती. फक्त काही प्रोमोज बघून लिहिलं आहे. एपिसोड जमलं तर बघेन.

रोहित अत्यंत चीप बोलला, कंटीन्युअस बोलत होता, त्यानेही चप्पल फेकली पण ती मेघाला लागली नाही म्हणून त्याच्यावर काही अ‍ॅक्शन घेणार नाहीत पण मेघाला मात्र बिबॉ काहीतरी शिक्षा देणारेत , एलिमिएशनच असु शकते बहुदा तशीही ती नॉमिनेटेड आहे किंवा माइल्डर व्हर्जन म्हणजे सृष्टीसारखी शिक्षा कधीही कॅप्टन बनु शकत नाही/ अनलिमिटेड काळासाठी नॉमिनेटेड , निमित्त मिळालं बिगबॉसला !
एपिसोड पाहिला नाही पण दीपकला ठोकून बाहेर पडावच लागल तर लगेहाथ रोहितलाही धोपटून घ्यावं तिनी Wink
अन्जु,
राठांनी खरच लक्ष देऊन जरा आपली पॉवर दाखवावी वोटींगचा पाऊस पाडून.

रोहित अत्यंत चीप बोलला, कंटीन्युअस बोलत होता, त्यानेही चप्पल फेकली पण ती मेघाला लागली नाही म्हणून त्याच्यावर काही अ‍ॅक्शन घेणार नाहीत पण मेघाला मात्र बिबॉ काहीतरी शिक्षा देणारेत , >>> ओहह मग रोहितलाही द्यायला हवी की, न्याय सारखाच हवा.

काढणार नाहीत बहुतेक मेघाला, पण every week nominate करतील. पण मेघा असं का वागली, नको होतं वागायला. तिची एक पोझिशन आहे तिने निर्माण केलेली आणि त्यामुळे प्रक्षकानी तिला जिंकवले होतं. तिने थोडं calm राहायला हवं होतं, बाकीचे gone case आहेत पण तरीही.

एपिसोड पाहिला नाही पण दीपकला ठोकून बाहेर पडावच लागल तर लगेहाथ रोहितलाही धोपटून घ्यावं तिनी >>> Lol

बाहेर पडावे लागणार असेल तर हरकत नाही, नाहीतर नको असं करायला. ती माफी मागेल बहुतेक bb ची.

मलाहि असच वाटलं जास्त ओव्हररिअ‍ॅक्ट नाहि व्हायच होतं .. अन तेहि त्या दिपकला... सरळ इग्नोर करायच ना... कश्याला फुटेज देतेय? त्यामुळे तो लाईमलाईट मध्ये राहतोय.. फालतु माणुस..
रोहित तर आल्या दिवसापासुन खार खावुन आहे तिच्यावर

इग्नोअर नाही मारायचं पण चालचलन या शब्दावरून रान उठवायचं होतं तिने. इतकं हायपर झाल्याने तिने दोन दिवस दाखवलेली इमेज कचर्‍याच्या डब्यात गेली.

आता तर सरळ त्याला तिने भिकारी म्हटलय... ते लोक बरोबर शब्द पकडुन स्टॅड घेतात.. अन तस म्हटलं तर मेघा करेल ते पण .. परंतु तिच्या सोबत कुणी नाहिय.. तिथे ती एकटी पडतेय.. सापाच्या खेळाच्या वेळी काय मस्त सुचलं होतं तिला ते शॅम्पु वगैरे.. Happy
दिपकला जरा झटका मिळाला पाहिजे कुणाकडुन तरी अती झालय त्याचं

दिपक अन सुरभी ... दोघेही कटकटे आधिपासुनच माझ्या डोक्यात जात आहेत. . त्या खालोखाल ती सृष्टी!
श्री बरा वाटतोय त्यान्च्यापुढे. अ‍ॅट लिस्ट काही कारण असेल तर हायपर होतोय.
काल श्री, दिपिका दोघेही रडताना पाहिले. वाईट वाटल.

Pages