बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपकचं थोबाड चांगलं उतरलं होतं काल, फाजील आत्मविश्वास.. फार ढगात गेला होता.. आणला धाडकन खाली त्याला.. थोड्या फार फरकाने हॅप्पी क्लब वाले सगळेच ढगात आहेत आणि सेलेब्रिटी बिचकून आहेत.. सलमान खानने फुगा फोडला पाहिजे टचकन एकेकाचा.. चीड येते नुसतं किरकिर.. सलमान बरोबर बोलला.. कोणी हात उचलू शकत नाही म्हणुन irritate करत असतोस आणि डिवचत असतोस.. आता आज रोहित आणि सोमीचा नंबर लागायला पाहिजे

>>
दीपिका, सृष्टी आणि तो बिहारी सिंगर सध्यातरी फेव्हरेट
Submitted by स्वरुप on 19 September, 2018 - 13:28

दिपीका, सृष्टी वगैरे अजुनही आवडतायत
नेहा एरवी दिसतच नाही!
Submitted by स्वरुप on 26 September, 2018 - 18:15

बिग बॉसची वेळ बदलल्याने हा सीझन नियमित बघितला जात नाहीये.... तरीही दिपिकाच आवडतीय अजुन तरी अणि थोडा थोडा रोमिल.... बाकी कुणी नाहीच आवडले अजुनतरी!
Submitted by स्वरुप on 19 October, 2018 - 12:50

मेघा आल्यानंतरही दिपिकाच फेव्हरेट आहे आपली.... अर्थात मेघा पण आवडते पण मराठीत तिला जो परफेक्ट प्लॉट मिळाला होता.... किमान निम्मा सीझन तरी चांगले मित्रमैत्रिणी मिळाले होते तसे इथे काही झाले नाही अजुनतरी!
चुका करुन चटकन माफी मागून सहानभूती मिळवणे ही तिची स्टॅटेजी होती मराठीत.... इकडेही तिने तेच चालू केलेले दिसतेय!
असो.... श्रीशांत, दिपिका, मेघा, जसलीन ग्रूप जमताना दिसतोय

कॉलर ऑफ द वीक मात्र मेघाला टारगेट करणारे असतात.... कालचा तर फारच खत्रूड वाटत होता.... मेघा मुळे बिग बॉसचा दर्जा खालावलाय म्हणे..... जसे काही बिग बॉस म्हणजे संस्कारवर्ग आहे!

पुढच्या आठवड्यात मेघाला कंटेंट दिलाच पाहिजे. नाहीतर तीच जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
शिल्पा शिंदेचं लै कौतिक होतं सगळीकडं, पण रांगोळीच्या टास्कमधले तिचे वागणे आणि दिपकला तिने दिलेले समर्थन पाहून ती काहीच्च्या काहीच वाटली.

काल सोमी आणि दीपक ला पण बरेच सुनावले चांगल्या शब्दात असले तरी. मेघाला बोलणे अपेक्षितच होते. सोमी अन दीपक रडत बसले चादरीत घुसून. मेघाच उलट त्यांना समजावत होती Happy

पुढच्या आठवड्यात मेघाला कंटेंट दिलाच पाहिजे. >>> देणार आहे मी वोट पण फक्त मराठी बिबि मुळे. आत्ता मला ती काही एवढी आवडली नाहीये इथे. दिपिका आवडली पण वोट मेघाला देणार.

मेघाच उलट त्यांना समजावत होती >>> हो पण तिलाही लाज वाटायला हवी होती कारण ती घाण घाण शिव्या देते हे सलमानने बोलून दाखवलं. पॉझिटीव्हली घेईन म्हणाली, बघुया.

मेघाला वीकेन्डचं बोलणी खाणं इतरांइतकं नसेल शॉकिंग वाटलं, चप्पल मारल्याने मनाची तयारी केली असेल तिनी , वर बिबॉ मराठीच्या बोलणी खाण्याची/फेक कॉलर्सची सवय आहे तिला.
दीपक सोमी जोडीला कदाचित नसेल अपेक्षित !
मला अजुन बघायचाय एपिसोड पण पब्लिक म्हणतय कि बर्याच दिवसांनी , रादर या सिझनला पहिल्यांदाच सलमान खान बॅलन्स्ड वाटला म्हणून !

दीपक सोमी जोडीला कदाचित नसेल अपेक्षित ! >>> Lol

ह्या दोघांना तर आधीपासूनच बोलायला हवं होतं, सबा सोमी एकत्र किती इरीटेट करायच्या. दीपक पण करत असतोना.

शनिवारच्या एपिसोडमध्ये सलमान balanced वाटला, एकदम कुल मूड मध्ये त्याने त्रागा न करता सुनावलं. मी विकेंड का वार चक्क बघू शकले नाहीतर पहिले दोन तीन पाच दहा मिनिटांनी बंद केलेले बघणं आणि नंतर सोडून दिलेलं तेवढंही बघायचं.

रविवारचा एपिसोड आला नाही अजून voot वर. आला की बघेन.

काल चक्क श्री छान नाचला.. मुक्काबला गाण्यावर.. त्याचाच परफॉर्म मस्त होता सगळ्यात.. Happy सृष्टी गेली बरं झालं काहिच करत न्हवती.
मेघाला काहिच परफॉर्म करायला देत नाहित कधी.. मला तर तिच्या वागण्यात काहि कधी चुक नाहि दिसली.. तिथे ती एकटी पडतेय मग नाराजीतुन आल्या असतील शिव्या ..अन त्या टुच्च्यासाठी त्या ठिकच होत्या.. जसलीन खरच डंब आहे.. कुठे कसं वागायच नाहि कळत..

ह्यावेळी रोहीत वाचलाय असं बघितलं नॉमिनेशनपासून. जसलीन जाईल बहुतेक. मेघा, दिपिका, रोमिल, दिपक, जसलीन नॉमिनेट आहेत.

पुंबा, मेघाने कंटेंट दिलाय ना मग तिला नाही पाठवणार. श रा सारखं शेवटपर्यंत नेतील असं वाटतंय. मग शेवटी कदाचित आधी काढतील.

हो, यावेळी सगळे स्ट्राँग काँटेस्टन्ट्स नॉमिनेटेड आहेत.
दीपिका रोमिल दीपक जस्लीन मेघा !
त्यातल्या त्यात जस्लीन वीक आहे पण बिबॉ कोणाला काढतील सांगता येत नाही !
दीपक उडला तर फार आनंद होईल पण ते शक्य नाहीये, धोका जस्लीन किंवा मेघाला Sad
मुळात बरोब्बर सुरभि कॅप्टन झाल्यावर अशी टास्क्स का देतात ? ज्यात सगळी नॉमिनेशन्स तिच्याच हतात आहेत ?
पुन्हा एकदा सोमि आणि रोहित वाचले Uhoh
मला रोहित पेक्षा सोमि जायला हवी आहे,आळशी सुस्तं बनून लोळत अस्स्त्द फक्त १
नुसतं एकदा तिला वीक असल्याचा रिअ‍ॅलिटी चेक दिल्यावर किती ड्रामा केलाय तिनी प्रोमो मधे !
रोहित कसाही असो, तो गेम खेळतोय आणि टास्क सुध्दा करतोय , सोमि गुड फॉर नथिंग !
जसलीनला उगीच वजन वाढल्यावरून टोमणे मारतात पण सोमि तर फुगून फुटबॉल झाली आहे !

नॉमिनेशन्स अगदीच मॅनिप्युलेटेड होती असे दिसते. एका टीम मधे दीपिका, रोमिल, जसलीन आणि दीपक. दुसर्‍या टीम मधे सोमी, रोहित, करणवीर, श्री. कोणत्याही एका टीम चे ३ नॉमिनेट केले तर आख्खी टीम आपोआप नॉमिनेट होणार आणि दुसरी टीम सगळी वाचणार! सुरभी ला पावर म्हटल्यावर ती काय करेल हे सध्याच्या स्थितीत प्रेडिक्टेबल होते.

प्रोमो मधे सोमि प्रकरणात रोमिलशी केव्ही आणि हॅपी क्लबचे सगळेच मेंबर्स भांडताना दाखवलेत त्यावरून केव्ही हॅपी क्लबचा म्होरक्या आणि रोमिल श्री च्या टिममधे जाईल अशी शक्यता दिसतीये !

सोमि गुड फॉर नथिंग !
जसलीनला उगीच वजन वाढल्यावरून टोमणे मारतात पण सोमि तर फुगून फुटबॉल झाली आहे ! >>>>> exactlyy...!

Btw हा केवी सेलिब्रिटी टीममध्ये होता ना पूर्वी, commoners ला कधी जॉईन झाला.

सोमी नॉमीनेट नाहीये ना, त्यामुळे ती राहीलच, किती पटर पटर बोलते, मला अर्ध कळतंच नाही Lol

दोघी बहिणी होत्या तेव्हाही कित्ती बडबड, भांडणं करायच्या.

रविवार एपिसोड उडत उडत बघितला. कलर्सच्या कलाकारांनी धमाल आणली. श्रीसंत छान नाचला. सुलतानी आखाडामध्ये बोलण्यात रोमिल आवडला, वकील शोभतो. रोमिल आवडायला लागलाय की काय मला. असो जास्त बघत नाही. अर्थात कोणी आवडलं, नाही आवडलं तरी वोट मात्र मेघाला देणार.

नाही अंजूताई, मग मेघाच जाईल. Sad
जसलीनपेक्षा धोका मेघाला जास्त आहे. >>>> +१११

मलाही असाच वाटतंय कि मेघाला धोका आहे .
का कोण जाणे असा वाटतंय जसलीन श्री, दीपिका , शिव या लोकांबरोबर खूप आधीपासून मिंगल करत असल्याने त्यांचे फॅन्स तिला वोट करतील .
आज ती दिसली ही जास्त .
श्री, दीपिका, जसलीन आवडतात मला पण पर्सनल फेवरेट मात्र मेघाच !!!

अन्जु,
तो हर्षित एकदम मेघाभक्त आहे, तो चूकून सुध्दा मेघा जाईल असं म्हणणार नाही, त्याचे बिचार्याचे रिव्ह्युजही मेघाच्या अवति भोवति असतात.
तरी कोणाच्या प्रेडिक्शनला अर्थ नाहीये सध्या, सगळ्यांनाच ऑब्स्व्हियस्ली वाटतय जस्लीन जायला हवी पण शो क्रिएटिव टिमला काय हवय त्यांनाच माहित!
मेघा कन्टेन्ट देतेय , ट्विटर युट्युबवर चर्चा वगैरे सगळं भरभरून देतय , She’s created buzz for sure but let’s see what channel is up to !

तो हर्षित एकदम मेघाभक्त आहे, तो चूकून सुध्दा मेघा जाईल असं म्हणणार नाही, त्याचे बिचार्याचे रिव्ह्युजही मेघाच्या अवति भोवति असतात. >>> Lol

तरी कोणाच्या प्रेडिक्शनला अर्थ नाहीये सध्या, सगळ्यांनाच ऑब्स्व्हियस्ली वाटतय जस्लीन जायला हवी पण शो क्रिएटिव टिमला काय हवय त्यांनाच माहित! >>> खरं आहे.

सुरभी स्मार्ट खेळली मग. तिने सगळे स्ट्रॉंग कन्टेस्टंट्स उभे केले नॉमिनेशनला सोमी रोहितला वाचवून. मलाही वाटतंय मेघाच जाईल. कारण जसलीं स्ट्रॉंग वाटतेय. दीपक ठाकूरचे पण फॅन्स आहेत बरेच. दीपिका आणि रोमिल तर आहेतच स्ट्रॉंग. 'इथे बीबॉ ने पण गेम खेळली असे ग्रुप्स पाडून. मेघाची नेगेटिव्ह इमेज झालीये. सो तिचे जाण्याचे चान्सस जास्त आहेत, ती काही श्री नाही एवढा नेगेटिव्ह होऊन टिकायला.

पण मेघा मुळेच या बिग बॉस मध्ये सुद्धा थोडीफार जान आली आहे... नाहीतर हा धागा सुद्धा आधी ओस पडला होता... मेघाच्या एन्ट्री नंतर बरेच लोक बिग बॉस बघायला लागले ...तिला काढलं तर त्यांचा टीआरपी पुन्हा रसातळाला जाईल म्हणून तिला काढतील असं वाटत नाही..

बरोबर ... महाराष्ट्रियन या निमित्ताने तरी बिबॉ बघतील... मी तर वुट अ‍ॅप तिच्यासाठी डाऊनलोड केलं.. अन अगोदर एकदम बोअरींग वाटत होतं बघायला..

Pages