बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच मूर्खांचा बाजार. कॅप्टन्सी उमेदवार ,चान्स मिळाला नाही म्हणून जसलीं आणि श्रीशांतला बनवलं , पेर्फोर्मन्सवर नाही. आणि नंतर जसलीं म्हणतेय कि कॅप्टन, कॅप्टन्सी टास्कचा परफॉर्मन्स बघून करायचा होता.
मेघाला दाखवतच नाहीयेत. दीपिका , बोहरा (खरंतर सगळेच) डोक्यात जातात . त्या दीपिकाच्या आवाजाचं काहीतरी करायला पाहिजे. सतत रडत बोलतेय असं वाटतंय.
मेघा कदाचित नेक्स्ट टाइम याच बेसिसवर कॅप्टन्सीची उमेदवारी मागेल.

एकंदरीत मराठी बरंच बरं होतं. बोंबाबोंब झाल्यावर राजेशला हाकललं. रेशम सई पु आ च्या बाजूने बरेच होते बिग बॉस पण रेशमला आधी काढलं आणि आ स ला तीनात नाही येऊ दिलं. मेघाला निवडून आणण्याशिवाय पर्याय नव्हता त्यांच्याकडे, पब्लिकने काय केलं असतं माहीती नाही. पुष्करने फुटेज दिलं स्मितापेक्षा म्हणून तो दुसरा आला असावा. सुमडीत शांत राहून स्मिता कधी रे आ स च्या पुढे गेली हे त्यांना कळलंही नाही.

तिच्या त्या मराठी बिग बॉसच्या विनर असल्याच्या टिमकीची सगळे खिल्ली उडवत होते!

पाहिलं नाही पण ऐकलं मी मेघाला पिडल्याचं , सोशल मिडियावर मेघ्स्टर्स नी भयंकर गदारोळ केलाय, रोमिल सुरभिला जोडे वहातायेत सोशलमिडीयावर !
सुरभि वर्सेस मेघा ड्रामा टिझर पाहिलं, अख्खा हॅपी क्लब चिडवत होता तिला ‘मराठी विनर’ टॅग वरून !
तरी मेघानी एक शाहणपणा शिकवला होता एंट्री नंतर हॅपी क्लबला, सगळे मिळून एखाद्याला टार्गेट करायला सुरवात करतात तेंव्हा सिंपथी त्या व्यक्तीला मिळते आणि तुम्ही वाईट ठरता पण मठ्ठांना समजेल तर ना Proud
काल पर्यंत रोमिलला सपोर्ट करणारे बरेच मराठी लोक आता त्याला शिव्या घालायला लागलेत.

हॅपी कल्बचा फॉर्म्युलाच तो आहे, समोरच्याला इन्स्टीगेट करून चिडव्त रहायचं, मेघा तर नकोच आहे मेजॉरीटी हाउसमेट्सना कारण स्ट्राँग आहे,
वाइल्ड कार्ड एंट्री ती सुध्दा विनर, व्होटींग बँक असणारी इ. बरीच कारणं.
दीपक रोमिल दाखवलेना बोलताना पहिल्याच आठवड्यात.

तो रोहित तर आल्यापासुन डोक्यात जातोय..वागणाची.. बोलण्याची पोच नाहिय.. अन तो मेघाला चिडवायला सुरवातीपासुन आघाडीवर आहे.. मेघाने ती डिल करताच नये होती तिनेच जिंकली असती ती कॅप्टनशिप.
शिवाशिष पण छान आहे काल त्याला संधी द्यायला हवी होती..रोहितपेक्षा.

मेघा सुरवातीपासूनच ओव्हर करत होती, मीच जिंकणार मीच नाचणार असं सारखं सुरू होतं. उगीचच मराठी बिग बॉस जिंकल्याचा टेंभा मिरवून स्वतःच हसं करून मराठी माणसाची मान खाली केली तीने. हे म्हणजे पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची आणि नंतर वर्षभर कितीही वेळा भारताकडून हरले तरी आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो होतो की नई असं करत मिरवणं झालं

मी तर बोलतोय त्या सुरभिने मेघाची अशी काय तासडपट्टी काढायला पाहिजे की मराठी बिग बॉस जिंकल्याची झिंग खाडकन उतरली पाहिजे. असं सळो की पळो करून सोडायला पाहिजे ना त्या श्रीसंत सारखी छपरावर चढून पळून जायला पाहिजे मेघा,

बोकलत Lol
मी बी बॉ हिंदी बघत नाही तरी तुमची कमेंट वाचून हसू आलं!

8 वाजता बत्तमीज दिलवर डान्स केला सर्वांनी.
श्री रोहितला बोलत होता की जसलीनने स्वतःचा बेड क्लीन केला नाही, सगळीकडे केस होते.
दिपक किचनमध्ये जसलीन झाडू कशी मारते त्याची अॅक्टींग करत होता.
.........
जसलीन to रोहित : washroom area मध्ये मी पाणी उडवत होती हे तू श्री ला सांगितल का?

Rohit to Jasleen : हो.. मी आणि सृष्टी ने ते साफ केल.

Jasleen to surabhi : सृष्टी ने आधी माझ्यासोबत बोलायला हव होत. Washroom कसा use करतात ते आम्हाला माहीत आहे.
...........
Somi ने सलमान खान च्या पोस्टर ला kiss केल.
...........

अचानक घरात गोंधळ झाला की बाथरूम च्या दरवाज्यावर असलेले poster दीपक ने फाडलं..
तेव्हा सर्व जण मस्ती मध्ये बोलत होते की आता एक टॉपिक भेटला.

........
श्री बोलला की first time मी jail मध्ये नाही जाणार bcz मी कॅप्टन आहे..
तेव्हा Somi पण तिथे होती ती बोलली की ते poster दीपक नेच फाडल..

Romil बोलला जे तू बघितले नाही त्यावर बोलू नको. तू मेघासोबत असल्यापासून चेंज झाली आहे..
नंतर ती अजून emotional झाली.

.......

Jail मध्ये जाण्याची नाव सांगताना सर्वानी मेघा, दीपक, रोहित च नाव घेतलं.
श्रीने दीपकच्या जागी KV ला पाठवलं.
ज्यावरून नंतर दीपिका आणि श्री मध्ये भांडण झाल.
Washroom च्या topic वरून shrushti आणि Jasleen भांडण करत होत्या..
.....
मेघा आणि romil, ती jail मध्ये असताना भांडायला लागले..
.....
नंतर एक टास्क झाला..

ज्यात रोहित ला winner select करायचा होता..
Jasleen, Somi आणि shrushti makeup करून त्याला इम्प्रेस करत होत्या..
श्री याने आधीच त्याला सांगितलेले की shrushti ला जिंकव.
तेव्हा रोहित बोलला की ती तर बिना मेकअप शिवाय सुध्दा cute दिसते..
Shrushti जिंकली तेव्हा bb यानी सांगितल्या प्रमाणे त्या दोघांनी romantic song वर dance केला..
त्यावेळी jail मध्ये मेघा आणि KV पण couple dance करत होते...
Then Somi, romil, deepak, surabhi, Jasleen बोलायला लागले की हे fix होत की shrushti जिंकणार.
Shrushti ला uncomfortable feel होत होतं यामुळे......
...
Jasleen shrushti ला सर्वांसमोर sorry बोलली...

नंतर जे jail मध्ये होते त्यांची bb यांनी दिलेल्या आदेशानुसार सुटका झाली..
मग KV सृष्टी ला समजावत होता..
....
आज हिना खान सर्वांना सांगेल की बाहेर या लोकांच काय इम्प्रेशन पडतय ते..

यु.एस मधल्या पब्लिकने कलर्स वर एपिसोड बघणं बन्द करा.ऑनलाइन बघा !
मेघा सुरभि भांडण अर्ध कट केल, मेघा तिच्यावर धाऊन गेली श्री मधे आला सगळं कट!
जस्लीन-सृष्टीचं भांडण कट , इतक काय ते सेन्सरची कात्री प्राइम टाइम साठी, भांडणं -धक्काबुक्की काहीच दाखवत नाहीत यु.एस व्हर्जन मधे.. मग काय अर्थ बिग बॉसला, काही समजतच नाही काय झालं मधेच कट केल्याने Uhoh
मेबिलिन मेकप चॅलेन्ज टास्क तर पूर्णच कट , स्पॉन्सरस वेगळे असतात इथे म्हणून !

भांडणं -धक्काबुक्की काहीच दाखवत नाहीत यु.एस व्हर्जन मधे.. मग काय अर्थ बिग बॉसला >>> Lol

अरेरे फार मिळमिळीत.

वीकेन्डकावारला काहीच अर्थ नाही, मागच्या आठवड्यात श्री रडला म्हणून या आठवड्यात बिबॉच्या जावयाला खुश केले, खुश करण्यासाठी आदित्य नारयाण-हिना येऊन स्तुति करून गेले.
आदित्य श्री चा मित्रं आहे.
परवाच श्रीसन्त म्हणे कि असल्या दीपक सारख्या फालतु गायकाशी भांडण झाल्याने मला फरक पडत नाही, माझ्यासाठी आदित्य नारायण म्युझिक व्हिडिओ बनवणार आहे बिबॉ नंतर.
मग काय, बिबॉने बोलावलं त्याला नाहीतर कोण विचारतय आदित्यला !
असो , बाकी आय होप मेघाला आलेला कॉलर ऑफ द वीक ऐकून तिला हिंट मिळाली असेल , ती दिसत नाहीये , तिचा गेम स्ट्राँग करायची गरज आहे !
Btw हिना काय सुंदर दिसते, फारच क्लास, घरातल्या इतर सगळ्या भरमसाट नटलेल्या बाया फिक्या पडल्या !
ये रिश्ता क्या कहलाता है चे १-२ भाग पाहिले होते, तिथे त्या विचित्र मेकप-घुंघट वगैरे गेटप असूनही थेट मधुबाला टाइप दिसायची , आताचा कोमोलिका आणि अनेक इव्हेंट्सच्या रेड कार्पेट लुक मधेही फारच मस्त दिसते.

काल भारतीने मेघाची खिल्ली उडवली. म्हणाली, " आधी होतीस बिग बॉस मराठी विनर, आता पुन्हा स्पर्धक म्हणून आली आहेस. हे म्हणजे अस झाल, इलेक्शन जिन्कलो पण बनलो वॉचमन."

मेघाने उत्तर दिल, " यावेळी सुद्दा मीच जिन्कणार"

भारतीने इतर स्पर्धकान्ना विचारल, तुम्हाला तस वाटत का? सर्वान्न्नी नकारघण्टा वाजवली.

सो, मेघाचा ओवरकॉन्फिडन्स नडतोय तिला इथे. मराठी बिबॉ विनरची असल्याची टिमकी वाजवण्यापेक्षा तिने आपल्या गेमवर शान्त चित्ताने लक्ष दिल तर बर होईल. इवन बाकीच्या स्पर्धकान्नी तिला 'Least Entertaining' कॅटेगरीमध्ये घातलय. Sad

मेघा जिंकू नाही शकत, फार फार तर पाचात येईल सर्व फॅन्समुळे. केवि, दिपिका, श्रीसंतचे फॅन्स बरेच आहेत.

प्रांत आणि देश बराच फरक पडतो. सगळेच मेघाला ओळखतात असं नाहीना, त्यात पहील्यापासून आली असती तर गोष्ट वेगळी. मला तरी कुठे माहीतेय कन्नड बिबि विनर कोण, तमिळ बिबि विनर कोण. तसंच असू शकेल ना इतरांचं.

इलेक्शन जिन्कलो पण बनलो वॉचमन. >>> ही भारतीची कमेंट अति आहे. ही उपमा अयोग्य वाटते मला.

हॅपी क्लब अनहॅप्पी >>> पण त्या कटकट्या लोकांना happy club कोणी नाव दिलं. ती सुरभी तर मला आवडत नाही अजिबात. स्वतःच स्वतःला नाव दिलं का ह्या लोकांनी.

मलाही लक्षात नाही नावं कशी पडली, स्वतःच घेतली असणार.
नेहाला एकदा केव्ही यल्लो वुल्फ दिसती आहेस म्हंटला , तिने ब्राइट यल्लो काहीतरी घातल होतं, त्यावरून सगळ्यांनी आपापालं वुल्फ व्हर्जन केलं म्हणे, हे कुठे तरी युट्युबवर पाहिलं.

अन्जु,
अजुन नॉमिनेशन प्रोसेस पूर्ण झाली नाहीये म्हणून ओपन नाहीये, दीपिका उद्या सुरभिच्या नावाचे मडक फोडून तिला नॉमिनेट करेल मग होईल ओपन.

श्रीसन्तचा आज मास्टरस्ट्रोक्स :टाळ्या:
हॅपी क्लब अनहॅप्पी Proud
फक्त बिबॉने व्होटींगलाइन्स बन्द ठेऊ नयेत!
Submitted by दीपांजली on 5 November, 2018 - 12:34 >>>> अनुमोदन !!!
कधी नव्हे ते श्रीसंत आज अगदी आवडला Happy
मला वाटतं दिवाळी असल्याने एलिमिनेशन नसेल .

बिबॉची दिवाळी झाली शनिवार रविवारी, आता कॅन्सल होऊ नये एलिमिनेशन कारण निम्मा शो संपला तरी १२ लोक राहिलेत घरात !
असो, एलिमिनेशन होवो किंवा न होवो मला हॅपी क्लबच्या थोबाडावर बारा वाजलेले बघताना , जी एकेकाची सटकली ते पाहून फार म्हणजे फार असुरी आनंद झाला Proud
श्रीसन्तला त्याने दिलेल्या सगळ्या शिव्या माफ Happy
मला आता कॉमनर्स, स्मॉल टाउन बॉइज चा सतत भोंगा लावणारे लोक हा प्रकारच नकोसा झालाय, इथून पुढच्या सिझन्सना फक्त सेलिब्रिटीज आणावेत बिबॉनी !

मला आता कॉमनर्स, स्मॉल टाउन बॉइज चा सतत भोंगा लावणारे लोक हा प्रकारच नकोसा झालाय, इथून पुढच्या सिझन्सना फक्त सेलिब्रिटीज आणावेत बिबॉनी ! >>>>> +१११११

रविवारचा एपी आता पाहिला, मेघा खरेच दिसतच नाहीये यांच्यात, कितीही वाटले की ती जिंकावी तरी कठीण आहे, अन अद्याप तरी मला श्रीच आवडतोय

Pages