बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहह sorry कविता. मला दीपांजलीने पोस्ट लिहिली असं वाटलं. एडीट करते.

अजुनही हा फक्त आणि फक्त श्रीसन्त शो दिसतोय मला , वाईट दिसो किंवा फनी, अनप्रेडीक्टेबल, व्हिलन किंवा हिरो सगळे एपिसोड्स फक्त श्रीसान्तसेंट्रिक !
प्रत्येकानी पंगा घ्यायचाय तर तो श्रीसन्तशी, म्हणजे हमखास फुटेज ही घरच्यांची स्ट्रॅटेजी, तरी मेघा सांगत होती पहिल्या दिवशी सगळ्यांना तुम्हीच महत्त्व देता श्री - दीपिकाला, पण तेच चालु आहे !

अंजु,
एपिसोड पहा पूर्ण, इट्स काँप्लिकेटेड Proud
मेघा रोमिलच्या गँग मधून बाहेर पडली आहे, दुसरा गृप बनवायचा प्रयत्न करतेय, रोमिल सुरभि असताना तिला डोकं चालवायला मिळेल कि नाही हे क्लिअर करू घेतलं तिनी, त्याने सरळ उत्तर दिलं हरियाणवी लहेज्यात “ओ मैडमजी, ऐसे कैसे २ दिन मे आप पे ट्रस्ट करके प्रेसोडेन्ट बनादे , आप पहले क्लब जॉइन करके साथ रहो“
मेघा जे समजायचं ते मागच्याच आठवड्यात समजली होती, म्हणून टास्क क्विट करत डिल करताना डॉयलॉग फेकून गेली, कुछ चीझोंकी क्लॅरिटी चाहिए थी, समझ गयी
आता बहुदा मेघाला शातिर रोमिल-सुरभि-दीपक पेक्षा डंब सेलेब्ज मधे राहूल रुल करायला सोप वाटतय म्ह्स्णून मेंबर फोडायला सुरवात केली आहे.
एकंदरीत अवघड असणारे ही जर्नी मेघासाठी, वाइल्ड कार्ड म्हणून आल्याने आणि ती रोमिलला सर्वात मोठी थ्रेट वाटते म्हणून एकदमच टार्गेट बनली आहे हॅप्पी कल्बची.
बघुया काय होतय !

Btw जस्लीन बरोबरची लव्ह स्टोरी फेक होती हे बाहेर पडताच लग्गेच सांगतायेत जलोटा सगळ्या चॅनल्सना , ते गुरु शिष्य म्हणून जाणार होते पण क्रिएटिव टिमने हा अँगल आला तर इंटरेस्टींग होईल असा प्लॅन केला, पण बिचार्या जस्लीनला नाही माहित हे, ती अजुनही A J iniatials वाली हार्ट शेप पिलो कवटाळून मिस यु अनुपजी ‘फेक लव्ह स्टोरी मोड मधे आहे Biggrin
पण मला अ‍ॅक्चुस्ली जस्लीन आवडायला लागलीये, सुरवात तिने केली तेंव्हा डंब दोन पिनिटेल घालणारी ब्लाँडी इमेजने पण आता स्ट्राँग ओपिनियन मांडते, विचारांनी क्लिअर आणि डेअरिंगबाज वाटते दीपिका, सृष्टी पेक्षा !

एपिसोड पहा पूर्ण, इट्स काँप्लिकेटेड >>> पुर्ण बघायचा कंटाळा येतो.

Btw जस्लीन बरोबरची लव्ह स्टोरी फेक होती हे बाहेर पडताच लग्गेच सांगतायेत जलोटा सगळ्या चॅनल्सना , ते गुरु शिष्य म्हणून जाणार होते पण क्रिएटिव टिमने हा अँगल आला तर इंटरेस्टींग होईल असा प्लॅन केला, पण बिचार्या जस्लीनला नाही माहित हे, ती अजुनही A J iniatials वाली हार्ट शेप पिलो कवटाळून मिस यु अनुपजी ‘फेक लव्ह स्टोरी मोड मधे आहे >>> Lol

लोल! मला ह्या धाग्याचं टायटल Psoriasis वगैरे सारखं काहीतरी वाटत होतं Lol
हिंदी शब्द रोमन लिपीत मराठी धाग्यात का लिहिले आहेत? त्याचा काही त्या शोशी संबंध असेल तर मला माहिती नाही.

एकंदरीत अवघड असणारे ही जर्नी मेघासाठी, वाइल्ड कार्ड म्हणून आल्याने आणि ती रोमिलला सर्वात मोठी थ्रेट वाटते म्हणून एकदमच टार्गेट बनली आहे हॅप्पी कल्बची. >> येस..अवघड आहे ईथे मेघा चं...सुरभी न रोमिल लैच शातिर न तयार आहेत..
तरी मेघा प्रयत्न करतेय जम बसवायचा...
रोमिल, सुरभी, सोमी काल मेघा बद्दल बोलत होते उलट्सुलट..की ही बघा कशी सगळ्यांना आपल्या बाजुने ओढतेय वगैरे...
मागे एकदा " ही कशी काय जिंकली बिबॉ मराठी " असं पण बोललं होतं कोणीतरी...कोण ते आठवत नाही..
मेघा ला कमी फुटेज आहे एकंदर अजुन तरी..

" ही कशी काय जिंकली बिबॉ मराठी " असं पण बोललं होतं कोणीतरी...कोण ते आठवत नाही..
मेघा ला कमी फुटेज आहे एकंदर अजुन तरी..

नवीन Submitted by स्मिता श्रीपाद on 31 October, 2018 - 11:19>>>>
रोहित आणि रोमिल दोघे पण बोलले होते..

श्रीसन्त जास्तच निगेटिव चाल्लाय, मागच्याच वीकेन्डला सलमान नी क्लास घेतला होता त्याचा कि सेक्शुअ‍ॅलिटी वरून रिमार्क टिझिंग हे इथे चालणार नाही, पण श्री थांबतच नाहीये.
यावेळी तर खुद् बिबॉनी टास्क साठी पाठवलेल्या पाहुण्याला, मागच्या सिझनच्या मास्टरमाइंड विकास गुप्तालाच टार्गेट केलय, “तू मर्द नही है, मर्दको खडा होना पडता है“ , असं म्ह्झ्णतोय सरळ Uhoh
काय ही मेंटॅलिटी ! एखाद्याने गे असणं म्हणजे आपल्याला टिंगल करायचा हक्क हे भर नॅशनल टेलिव्हिजनवर दाखवताना आपण अतिशय लो मेंटॅलिटी/निगेटिव अग्ली थिंकिंगचे वाटतो अस नाही वाटत का एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल प्लेयरला ?
विकास गुप्ताला प्रोफेशन वरूनही बोलतोय, अरे काय हे, तो एम टी.व्ही वरच्या बर्याच शोजचा प्रोड्युसर आहे, त्याला का तुच्छ समजतोय श्री ?
करणवीरलाही म्ह्झ्णतोय, तू मर्द नही, तू बीचका है Uhoh
याशिवाय धक्काबुक्कीही करतोय..
मला तर अता १००% वाट्तय श्री चं जे काँट्रॅक्ट लिक झालं होतं , ज्या बद्दल तो स्वतःच फुशारक्या मारत होता ते खरच असावं, ७ आठवडे अडीच करोड.
बरोब्बर सात आठवडे होतील आता,व्होटींगने श्री बाहेर जाणार नाही म्हणून रुल्स तोडून जातोय, सलमान रुल्स तोडल्याबद्दल बाहेरचा रस्ता दाखवणार बहुदा रविवारी !
या लिंकमधे श्री - केव्ही पेटलेत.
https://youtu.be/iMVHhihcQhs

अरे बापरे, अति करतोय श्री, आता बायको काही बोलत नाही का? एरवी कोणी बोललं की धावून जाते. श्रीला काढा, हे फार disgusting आहे.

रोहित आणि दीपिका त्या झोपाळ्यावर बसले होते तेव्हा पण मुद्दाम टाळ्या वाजवत होता...
कधीकधी तो माजोरडेपणा दिसून येतो त्याच्यात...

मेघा थोडी फिकी पडतिये का?
पहिल्यापासुन आली असती तर चांगला जम बसवला असता तिने..
बघत नाहिये पण अ‍ॅड्स वरुन वाटले..

श्रीशांतइतका फालतू माणूस आजवर बघितला नाही. हा रड्या भारतीय टीममध्ये होता यावर विश्वास बसत नाही. त्याच्या व्यक्तिमत्वाला कसलाही आकार नाही, रंग नाही. अशा माणसाला सोशल मिडियावर जो पाठींबा मिळतोय तो अविश्वसनीये आहे.
बाकी, मेघा खुलत चाललीये हळू हळू. तिला फुटेज मिळतंय आणि लिंबू टिंबूंची टीम बनवण्याचेतिचे प्रयत्न यशस्वी होतायंत असं वाटतंय. अजून ४ आठवडे तरी तिला धोका नाही असं वाटतंय.

दीपांजली. भारतीय जनमानस असल्या कमेंटवर खुदुखुदू हसतं, पोलिटिकली इनकरेक्ट असलं तरी असली शेरेबाजी म्हणजे मोठी करमणूक मानणारी लोकं सोशल मिडियावर श्रीला प्रचंड सपोर्ट करताना दिसतायंत.

<मेघा थोडी फिकी पडतिये का?>
तसं वाटत नाहीये. सुरभी तिला नडतेय आणि ती तिला प्रत्युत्तर देतेय असे दिसतेय.

मेघा फिकी नाही , पण वाइल्ड कार्ड असल्यामुळे अजुन स्ट्राँग बाँड्स झाले नाहीयेत कोणाशी , त्यामुळे दीपक -सुरभि सारखे चिल्लर लोक जास्त फुटेज खातात.
आजही त्या रोहित-सुरभि - दीपक छिछोर्या त्रिकुटाला बेस्ट उत्तरं दिली तिनी.
अर्थात इथे स्पर्धा मराठीपेक्षा खूप टफ आहे.
तरीही ती योग्य स्टँड घेत होती आजही श्रीसन्त पुढे ,चॅनलला मात्रं श्री च्या सणकीपणात सर्वात जास्त इंटरेस्ट आहे दुर्दैवानी आणि फॅन्स खरोखरच आंधळे आहेत.
मला ती शिल्पा-विकास दोघे माहित नाहीत, मागचा सिझन पाहिला नाही त्यामुळे, इथे पाहिल त्यात तरी शिल्पा शिन्दे मुळीच आवडली नाही, अतिशय उथळ , डंब, व्हँप पर्सनॅलिटी वाटली, उलट विकास गुप्ता आवडला.
Btw यु.एस मधेप्रचंड एडीटेड एपिसोड दाखवतात, फिजिकल व्हर्बल कुठलेच वाद दाखवतच नाहीत, लिंकच लागत नाही त्यामुळे, अन्सेन्सर्ड एपिसोड इथे पहा:
www.biggboss12.net

Megha should take her time .... असे आल्याआल्या सगळ्यांवर थोपवता येणार नाही तिला स्वताला..... सुरुवातीला थोडे अंडरप्ले करुन एक दोन सॉलिड बॉंड जोडले पाहिजेत तिने मग हळूहळू एकेकाला नडले पाहिजेल
टास्क करो... किचन करो.... पहलेपहले सपोर्ट करो और मौका देखके लीड करो!

Channel का काढत नाहीये श्री ला. मराठी bb वेळी बऱ्याच जणांनी लिहिलं असं हिंदीत झालं असतं तर सलमानने हाकलवून दिलं असतं अमक्याला, तसं काहीच दिसत नाही. उलट त्याला नेहेमी वाचवतात. पब्लिक सपोर्ट पण दिसतोय, कॅप्टनपण झाला असं youtube वर वाचलं.

मेघा जाईल शेवटच्या पाचात पण जिंकेल असं वाटत नाही मला. वाईल्ड कार्ड एन्ट्री ला जिंकू देत नाहीत.

माझ्यामते मेघाने आत्ता लगेच मधेच येण्यापेक्षा, पुढच्या वर्षी मला पहिल्यापासून एन्ट्री द्या सांगायला हवं होतं. यावेळी जिंकल्याची दिवाळी कुटुंबाबरोबर करायला हवी होती.

श्री खरंच अति करतोय. कसला एवढा माज आहे काही समजत नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी उत्तम करियर गाजवलेले (चांगल्या अर्थाने) खेळाडू, सेलिब्रेटी आहेत. हा फक्त एक लूझर आहे. शो आणि सलमानने एवढी का नांगी टाकलेय त्याच्यासमोर? इतका उद्धटपणा दाखवणार्या लोकांना सलमानने याआधी अतिशय वाईटरित्या फटकारलेले बघितले आहे आणि वेळ पडल्यास शो बाहेर केलेले आहे.
घाणेरडे कमेंट्स पास करायचे, दुसर्याला वाट्टेल ते बोलायचं आणि स्वतःवर आलं की बाथरूममधे जाऊन रडायचं. ते पण नाटकच करत असेल. Stupid attention seeker..

मेघाला जम बसवायला थोडा वेळ लागेलच. तिला कुणीच इतक्या लवकर आणि सहजासहजी जवळ करणार नाही. त्यामुळे तिने सुमडीतच काम करत रहावे आणि सेफ रहावे.

BB नसेल यावेळी कदाचित टॉप 10 मध्ये.

आज आम्ही ऑफिस मध्ये डिस्कस करत होतो हा शो तर लक्षात आले की श्री बऱ्याच जणांना आवडत आहे, त्यांच्यामते तो जे काही करतोय ते ह्या शो साठी परफेक्ट आहे

अन्जु,
फारच पॉझिटिव आहेस, इतकी घाई नको करु मेघाला टॉप ५ मधे टाकायची , मेघा आल्यापासूनचे एपिसोड पहाता एकन्दरीत सध्याची परिस्थिती पहाता मला नाही वाटत ती फिनालेला असेल, इन फॅक्ट हॅप्पी गँग ट्राय करतेय तिला शक्य तितक नॉमिनेट करून लवकर काढायचं , त्यामुळे रोहित आधी ती जाऊ शकते पुढच्या १-२ आठवड्यात.
टॉप ५ फिनालेला बहुतेक श्री-केव्ही- दीपिका - रोमिल - दीपक असे असणार , पहिल्यांदाच बॅड मॅन इमेजवाला माणुस यावेळी जिंकणार !
अगदीच चेन्ज झाला तर दीपिका ऐवजी सुरभि.

इन फॅक्ट हॅप्पी गँग ट्राय करतेय तिला शक्य तितक नॉमिनेट करून लवकर काढायचं , त्यामुळे रोहित आधी ती जाऊ शकते पुढच्या १-२ आठवड्यात. >>> होऊ शकेल असंही कारण trp कमी झाला असेल तर तिचे योगदान नाही काही फारसं, असंही वाटेल bb ना.

२ दिवस BB बघून त्रास होत आहे . मेघा खूप कमी दिसतेय Sad . सगळं काही श्रीशांत आहे इथे ! टास्क न करता हि कसा काय कॅप्टनसी दावेदार झाला तो याचच आश्चर्य वाटलं आणि निवडून हि आला . दिपक, सुरभी यांना काही ताळतंत्र नाही , सलमान ओरडत हि नाही वीकएंडला, सो एकदम सुटले आहेत ते Sad

मूर्खांचा बाजार सगळा , श्रीसन्त नेहमीप्रमाणे इथेही खेळलाच नाही , इतकच काय ऑफिशिअयली दुसर्या टिमला जाऊन मिळाला , तरी “मेरको चान्स नै मिला अबितक‘ असा दादागिरीचा स्वर लाऊन कॅप्टन्सीची दावेदारी मागितली आणि मिळवली, हा सर्वात मोठ्ठा जोक होता सिझनचा !
मला तर आता तो डॉन वाटायला लागलाय, बाहेर कोणी जिवाचं बर वाइट करेल भीतीने हाउसमेट्स्नी सपोर्ट केले त्याला , नाहीतर त्याचं काँट्रॅक्टच असं आहे कि त्यालाच ९० टक्के फुटेज मिळणार !

Pages