Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15
बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थोडक्यात एक स्ट्राँग हिरो
थोडक्यात एक स्ट्राँग हिरो श्री -एक स्ट्राँग व्हिलन दीपिका. >>> ओहह असं आहे का.
पण श्री रड्या आहे, जायचं जायचं रडतो/धमकावतो पण कोणी नॉमिनेट केलं कि चिडतो. >>> हो ना.
नेहाला त्यादिवशी vote दिलं, परत देणार होते तर voot वर मला voting दिसलंच नाही. दोन दिवस मी शोधत होते पण ती आवडायला लागलेली बऱ्याच जणांना. youtube वर खाली कमेंट्स वाचायचे ना मी, तिथे समजायचं.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=XK4HxO5uxO4
हा एक नेहाचा फनी व्हिडीओ मिळाला. उमेश आणि तिची जोडी किती छान दिसतेय. हे दोघे होते का कशात एकत्र. मला आठवत नाहीये. ह्या नेहाने भाग्यलक्ष्मी सिरीयल केलेली पण ती मी बघितली नव्हती, उमेश पण होता का त्यात काय माहिती, नसावा बहुतेक. मराठी पिक्चर केला असेल दोघांनी एकत्र.
हे इथे अवांतर आहे, त्याबद्दल sorry.
अन्जु,
अन्जु,
फनी आहे व्हिडीओ
नेहा मराठी बिबॉ मधे जास्त खुलली असती कदाचित !
मला वाटतं श्री ला मुद्दाम
मला वाटतं श्री ला मुद्दाम सांगितलं गेलं आहे ( पैसे वाढवून दिले आहेत) दिपिका आणि नेहाच्या विरोधात जायला. टिव्हीवर काहीही दिसलं तरी लगेच 'दिपिकाने खरे रंग दाखवले, i hate her, मी घरात गेलो की तिला एकटं करून टाकणार ' etc...etc....बडबडत असतो. आणि अनुप जलोटा त्याच्या हो ला हो करत असतात.. त्यांना कदाचित भिती वाटत असेल, याला नाही म्हटलं तर फटकवून काढेल आणि मधे थांबवायला पण कुणी नाही इथे.
नेहा कदाचित या शोसाठी सुटेबल नाहीये. तीच म्हणते ना तिला काहीच टू द फुल्लेस्ट फिल करता येत नाही आणि एक्स्प्रेसही करता येत नाही. May b she is too good to be here.
नेहा मराठी बिबॉ मधे जास्त
नेहा मराठी बिबॉ मधे जास्त खुलली असती कदाचित ! >>>>> +++++१११११११
अनुप जलोटा त्याच्या हो ला हो करत असतात.. त्यांना कदाचित भिती वाटत असेल, याला नाही म्हटलं तर फटकवून काढेल आणि मधे थांबवायला पण कुणी नाही इथे. >>>>>>>>
नेहा मराठी बिबॉ मधे जास्त
नेहा मराठी बिबॉ मधे जास्त खुलली असती कदाचित ! >>>>> +++++१११११११
पण तरी तिला इतक्या लवकर बाहेर पाठवायला नको होतं, रेशमला कित्ती चान्स दिला मराठी मधे. क्वचित टास्क करायची बाकी आळशी नाम शिरोमणी. त्यामानाने हिंदीत नेहा बरीच बरी होती. तिला पण पाठवा सिक्रेट रुममधे. अजून काही दिवस ती हवी होती.
मराठी पिक्चर केला असेल
मराठी पिक्चर केला असेल दोघांनी एकत्र.>> हम्म कन्यादान नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होता हा भाग असं पुढच्या पार्ट मध्ये दिसतंय.
गेली का नेहा? खरं तर तिच्या
गेली का नेहा? खरं तर तिच्या चेहर्यावर काहीच भाव नसायचे , नॉमिनेट झाली तर दुःख नाही किंवा वाचली तर आनंद नाही, डबल नॉमिनेशनचं आश्चर्य नाही. सगळं कोऱ्या चेहर्याने स्वीकारायची. ते बीबॉला अपेक्षित नाही. तिथे भरपूर गोंधळ घालणारे पाहिजेत.
तसही मला कोण कोणाच्या बाजूने आहे, कोण विरोधात आहे, काही समजत नाही. सगळेच एकमेकांशी भांडत असतात. खान भगिनी, सुरभी तर संधीच शोधत असतात भांडायची. कोणीच आवडत नाहीये. हा सीजन फारच बोर आहे. सगळे सेलिब्रिटी बाहेर गेले तर कॉमोनर्स साठी कोण बघणार शो ?
कदाचित नंतर आणखी 1-2
कदाचित नंतर आणखी 1-2 सेलिब्रेटीज wild card entries म्हणून पाठवणार असतील. पुरेसा दंगा करणारे आणि सलमानला भडकवणारे. कारण त्याशिवाय विकेंड का वार चा पण टीआरपी वाढणार नाही.
कदाचित नंतर आणखी 1-2
कदाचित नंतर आणखी 1-2 सेलिब्रेटीज wild card entries म्हणून पाठवणार असतील.>> कदाचित असच असावं.
बरं त्या गिल्ली टीव्हीवर बीबॉ मधूनच सुरु होतं. काही काही बोलणं अर्धवट सोडतात. त्यादिवशी सुरभीचा दंगा, नंतरची शिक्षा काहीच दाखवलं नाही. हे सगळीकडे आहे कि फक्त ऑनलाईन असं दाखवतात. खूप बेकार एडिटिंग आहे ऑनलाईन टीव्हीवर .
मराठी पिक्चर केला असेल
मराठी पिक्चर केला असेल दोघांनी एकत्र.>> हम्म कन्यादान नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होता हा भाग असं पुढच्या पार्ट मध्ये दिसतंय. >>> पुढचा भाग पण बघितला पण मला वाटलं कन्यादान सिरीयल येणार होती शरद पोंक्षे ची त्याचं बोलत असावेत.
बघतय क कोणी ?
बघतय क कोणी ?
श्री सिक्रेट मधे राहून बड्या बड्या बाता करून स्ट्रॅटेजीच , दीपिकाला धडा शिकवायचा गेम प्लॅन वगैरे आखून आला आणि २४ तासातच पुन्हा आपल तेच, टास्क अर्धवट टाकून श्री चा बिग बॉसच्या घरातून पळून जायचा ड्रामा
मला रोमिल आवडतोय सध्या फक्तं.
काल शेवटी शेवटी बघितले.
काल शेवटी शेवटी बघितले. सर्कीट श्री पळुन जायचा प्रयत्न करतोय. आणि मागुन दिपिका आपल तेच तेच... श्री... श्री. करत त्याच्या मागे पळतेय.
आधी सुरभी मेंटली अनस्टेबल
आधी सुरभी मेंटली अनस्टेबल वाटायची. पण श्री तर तिच्यापेक्षा कैकपटींनी अनस्टेबल आहे. स्ट्रॅटेजी-स्ट्रॅटेजी करतो बावळट आणि अंगाशी आलं की पळून जायच्या बाता. दिपिकाचं महत्त्व त्यानेच जास्त वाढवलंय. आला मोठा गेम प्लॅनवाला. आणि घरचे सगळेपण काय त्याच्यासमोर नांगी टाकतात काही कळत नाही. रोमिल बरा आहे सगळ्यात.
नाही बघत गं. फार इंटरेस्ट
नाही बघत गं. फार इंटरेस्ट नाही वाटत. विकेंड डाव पण नाही हल्ली. मागे पाच दहा मिनिटं तरी बघायचे शनी, रवि. हल्ली तेही नाही. श्रीसंत जास्त पैसे आकारत नसेल म्हणून बिबॉ त्याला ठेवत असतील इतकं बोअर्ड वागून.
मलाही सुरभि चांगली वाटतेय,
मलाही सुरभि चांगली वाटतेय, लडकीमे दम है !
शिव्या देणं बन्द केलय वाटतं आता, क्लिअर अँड लाउड टु द पॉइंट बोलते, शोभेची बाहुली कॅटॅगरी नाजुक नाही वागत.
त्या ट्रेडमिलच्या घोडागाडी टास्क वर ३.७ किमी केले तिनी , इतर सगळ्या सो कॉल्ड बॉडीबिल्डर , स्पोर्ट्समन पेक्षा जास्तं.
श्री नुसत्याच बड्या बड्या बाता, ०.४ करून क्विट, सिरियसली ??
सुरवातीला आली तेंव्हा तिला जंगली, अग्ली टाइप वाइट शब्द ऐकायला मिळाल्यानी जास्तं रडारड , बगावत केली तिनी.
श्री चा राजेश श्रृंगारपुरे
श्री चा राजेश श्रृंगारपुरे होताना दिसतोय... वागणूक सुधारावी म्हणून सिक्रेट रूममधे पाठवलं...दुसरा चान्स दिला परत येण्याचा...तरी आपलं आहे तेच आहे...उलट जास्तच आहे. राजेशने पण परत आल्यावर खूप मोठ्या मोठ्या बाता मारल्या होत्या. श्रीचं पण तेच चालू आहे...माझी स्ट्रॅटेजी...माझा गेम...हिंसक कुठले.
सुरवातीला आली तेंव्हा तिला
सुरवातीला आली तेंव्हा तिला जंगली, अग्ली टाइप वाइट शब्द ऐकायला मिळाल्यानी जास्तं रडारड , बगावत केली तिनी.>>>> बहुतेक सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलं असावं तिने. बाकी नीट बोलायला लागली की पोरगी मुद्द्याचं बोलते. कुणालाही न घाबरता.
श्रीला नेहानी मेंटल स्टेंथ का
श्रीला नेहानी मेंटल स्टेंथ का ऑफर केली, दीपिकानी एलिमिनेशन साठी का नॉमिनेट केलं सगळं काही प्रुव्ह करतोय तो !
सगळ्यात हाइट म्हणजे श्री ने रोमिलपाशी जाऊन बहिणीवरून जी बीप बीप शिवी दिली, रोमिल म्हणे असल्या शिव्या देऊ नको, तुलाही बहिण असेल , यावर म्हणे हो मी माझ्याच बहिणीला /मला स्वतःला शिव्या देतोय.. आय मिन हु डज दॅट
त्याच्या माथेफिरु वागण्याने दीपिका मात्रं उगीच हिरॉइन बनतेय.
श्रीशांत श्रीसंत धन्य धन्य,
श्रीशांत श्रीसंत धन्य धन्य, नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा टाईप.
घरातुन पळण्याच नाटक हा अगदी
घरातुन पळण्याच नाटक हा अगदी क्लिशे प्लॉट आहे बीबी स्पर्धकाचा... हा सिझन अजिबातच बघावसा वाटलाच नाही.
श्रीसन्तचा काही झालं तरी राग
श्रीसन्तचा काही झालं तरी राग येत नाही समहाउ, फार विनोदी वाटतो बोलायला लागला कि त्याच्या अॅकसेन्ट मधे !

अगर दिपिकाजीके गाजर कोई चुराताना तो वो सब स्विमिंग पुलमे तडपेगा
कितीही या सिझनला नावं ठेवली तरी पब्लिक सगळी टास्क ज्या इन्टेन्सिटीने करतात ते आवडतय !
काल गाजरांची चोरी चालुच होती पण आज टास्क करताना घालायचं मेन प्रॉप ती घोड्याची टोपीच चोरून लपवली दीपकनी, त्यावर दीपिकानी चिडून आरडाओरडा न करता उत्तर म्हणून दीपकच्या टिमचा स्कोअर बोर्डच धुऊन मिटवला, दीपकच्या थोबाडावरही मारल पाणी
ज्यात नियम होता घोड्याचा मास्क घालणे कंपलसरी आहे ते नियमाचं पानही चोरून लपवायचा प्लॅन होता !
टेक्निकली चूक बरोबर माहित नाही पण हे टास्क बघताना मजा आली.
मराठी बीबी मधे मेघाला कित्ती कॉर्नर करायचे लोक असा टेढा दिमाग चालवला तर किंवा चोरी केली तर, इथे सगळेच मेघा सारखं डोकं चालवणारे प्लेयर्स आहेत.
श्रीसन्तनी थुंकल्याचा इश्यु झाला पण ते त्याने मुद्दामच दीपकला चिडवण्यासाठी केलं अस वाटलं, अजुन एक म्हणजे थुंकणे म्हणजे डिसरिस्पेक्टफुल असे बोलरच्या डोक्यात नसणेही शक्य आहे, बोलिंग करताना बॉलवर थुंकून बोलिंग करणे कितीदा पाहिलय !
श्रीसांतपेक्षा आमच्या घरातली
श्रीसांतपेक्षा आमच्या घरातली ५/६ वर्षांची पोरे बरी वागतात.
राया.
इथे सगळेच मेघा सारखं डोकं चालवणारे प्लेयर्स आहेत. >>> हो का.
डीजे बघत असशील तर डीटेल्समध्ये लिही अजूनही जमलं तर. वाचत जाईन.
बिग बॉसची वेळ बदलल्याने हा
बिग बॉसची वेळ बदलल्याने हा सीझन नियमित बघितला जात नाहीये.... तरीही दिपिकाच आवडतीय अजुन तरी अणि थोडा थोडा रोमिल.... बाकी कुणी नाहीच आवडले अजुनतरी!
पण अगदीच फालतू आहेत किंवा आता नेक्स्ट दोन तीन एपिसोड हे हे लोक बाहेर जातील असा अंदाज पण लावता येत नाही!
बाकी कालचा तो सिक्रेट ओळखण्याचा टास्क चांगला होता... पण त्या दोघांना isolatoion मध्ये नेउन करायला लावला असता तर जास्त मजा आली असती.... आणि बाकीच्यांना टीव्हीवर दाखवायला पाहिजे होता!
सलमान मात्र अगदीच पाट्या टाकतोय या सीझनला.... बिलकुलच इन्व्हॉल्ड वाटत नाहीये तो शो मध्ये!
आणि हिंदीमध्ये हे प्रमोशनवाले उगाच फुटेज खात बसतात!
मला रोमिल आवडतोय चक्क. सुरभी
मला रोमिल आवडतोय चक्क. सुरभी फटकळ आहे, श्रीसंथच्या पुढे पुढे तर करत नाही. टू द पॉईंट आणि सडेतोड बोलते.
श्रीसंथ is such a spoilsport!!Sorry to say but he is justifying life ban on him. देशासाठी असा खेळत असेल तर नक्कीच नको असा खेळाडू टीममध्ये . जेलमध्ये जायला हरकत नाही म्हणे आणि जायची वेळ आली कि आदळआपट. तो कॅप्टन पण गेला त्याच्या मागे पळत. बावळट कुठला!!
खान भगिनी आधी आजिबात आवडल्या नव्हत्या. आता जरा सेन्सिबल वाटत आहेत. जलोटा,उर्वशी पाट्या टाकत आहे. दीपिका प्रत्येक वाक्य डायलॉग बोलल्यासारखं का बोलते , तिच्या बोलण्यात मला हेमा मालिनीच्या बोलण्याचा भास होतो. आजिबात आवडत नाही.
श्रीसंथ आणि जलोटा खरं बोलत आहेत का खोटं ते कसं कळणार? त्यांना तेच दाखवलं जे आपल्याला दाखवलं कि अजून काही जास्तीचं दाखवलं. सलमानने क्लिअर केलं तर बरय
सुरन्हि आवडते म्हणता म्हणता
सुरभि बरी वाटतेय म्हणता म्हणता अजब काहीतरी वागते.
श्री ने मास्टरस्ट्रोक मारला, त्याला काल डिवचलं सुरभिने आणि त्याला सायको वगैरे लेबल दिली मग त्याने मुद्दामच आज तिच्या बाथरुममधल्या स्मोकिंगचा मुद्दा टाकून ठिणही पेटवली आणि सुरभिच रुप दाखवलं अख्या घराला, इतक करून स्मोक तिनीच केलं कि अजुन कोणी हे प्रुव्ह झालच नाही, नुसताच तमाशा !
स्मोकिंगच्या आरोपानंतर जे काही केलं रिअॅक्श म्हणून , एकदमच सायको बिहेवियर !
तिची ती बडबड , स्वतःच्या रक्तानी टिळा लाऊन घेणे, शि नीड्स हेल्प !
हा बहुदा पहिलाच सिझन जिथे प्रत्येक एपिसोडला हिरो आणि व्हिलन बदलत जातात आणि एक महिना उलटूनही कोणी फार कोणाचे फॅन्डम डेव्हेलप झाले नसावेत.
सध्या तरी शो इज ऑल अबाउट श्री !
दीपक फुटेज घेतो, टास्क चांगली करतो पण कोणाचा सख्खा नाही, त्याची पार्टनर उर्वषीला हिडिसपिडिस करतो, कधी इथे कधी तिथे, चहाडखोर , हलक्या कानाचा.. सुरभि व्हिलन ठरतेय म्हंटल्यावर खरंखोटं समजायच्या आधीच लगेच तिच्याशी मैत्री तोडली, अगदीच पुष्कि सारखा बनतोय !
मला दीपिका अजिबात आवडत नाही, वाक्य न वाक्य ओव्हरर्क्टींग करणार्या संस्कारी टि.व्ही सिरियल बहुसारखं, अति रडकी !
श्रीशांत खेळाडू म्हणून कितीही
श्रीशांत खेळाडू म्हणून कितीही चांगला असेल/नसेल...पण माणूस म्हणून असा असेल तर तो टीममधे नसल्याचं काही आश्चर्य नाही. विश्वास ठेवण्यालायकच नाही तो. स्वतःला सुपरमॅन समजणार्या लोकांपैकी आहे तो. दिपिकाला आता कळलं असेलंच त्याने घरात परत येऊन काय काय ओकलंय तिच्या विरोधात. पण ती त्याचा shield म्हणून वापर करतेय. त्यामुळे तिला काहीच फरक पडत नाही बहुतेक.
सुरभी इतकी किंचाळते तेव्हा कुठल्याही क्षणी तिला हार्टअॅटॅक वगैरे येतो की काय अशी भीती वाटते. एवढा आवाज चढवून, किंचाळून, त्रागा करून माणूस पायावर सरळ उभा पण राहू शकतो यावर माझा विश्वासच बसत नाही.
सलमानने निदान आतातरी श्रीशांतला चांगलंच धारेवर धरावं. आणि सारख्या पळून जायच्या धमक्या देतो ना, त्याला आजच बाहेर काढावं...प्रियांका जग्गा सारखं.
दिपक is 'थाली का बैंगन'.
कोणी नेहा चा interview बघितला
कोणी नेहा चा interview बघितला का??
नेहाचे अनेक इंट्रव्ह्युज आलेत
नेहाचे अनेक इंट्रव्ह्युज आलेत, सेन्स्नेशनल वगैरे कॅटॅगरी पण आता जे बोलतेय ज्या अॅग्रेशनने बोलतेय ते तेंव्हा बोल॑यला हवं होतं, एलिमिनेट नसती झाली.
अर्थात येईलच परत, प्रचंड फॅन्स आहेत तिला ज्यांनी सोश्॑ल मिडिया डोक्यावर घेतलय.
मला आपलं उगीच वाट्तय कि मेघाच येईल वाइल्ड कार्ड म्हणुन
जादुद्या झालं समजेलच सोमवारी !
श्री चा बाकी आज क्लास घेतला म्हणे , सुरभि नव्हती स्मोक करत तरी मुद्दाम हाउस अॅटॅक टाइप भांडण प्लॅन केलं खोटं बोलून , जसलीन ने जे अंदाज केले त्याची संधी साधून.
Pages